चला, भाषासमृद्ध होऊया !!!

Submitted by दक्षिणा on 24 September, 2014 - 08:27

महाराष्ट्रात दर मैलागणिक मराठी भाषा बदलते असे म्हटले जाते. यात अतिशोयोक्ती नाही हे महाराष्ट्राच्या भटकंतीत लक्षात येतेच. मराठी भाषा आपल्या या अनेक सख्ख्या, चुलत, मावस, सावत्र बहिणींच्या प्रभावामुळे वेळोवेळी बदलत गेली आहे. हिंदी, इंग्रजीसह महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषातील शब्द विनासायास मराठीच्या पंक्तीत मानाने जागा अडवून आहेत.

चला तर मग या शब्दांना जाणून घेऊ या आणि त्यांचे नेमके मराठी अर्थ शोधूया.

उदाहरणार्थ, पेन या शब्दाचा मराठी शब्द तुम्हाला माहीत असेलच, पण रिफिलला मराठीत काय म्हणतात ?
ताबडणे, खुंदलणे ही क्रियापदे किती जणांना माहीत आहेत ?

आपण सर्रास टेबल खुर्ची म्हणतो. पण टेबल चेअर म्हणत नाही. का बरे ?
विदर्भात तर हिंदीभाषिक मराठी की मराठी भाषिक हिंदी हा वेगळाच घोळ आहे.
अनवट, विमल, उन्मन, कैवल्य, अद्वैत असे शब्द कवितेत जागोजागी बागडत असतात. पण साध्या सरळ मराठी भाषेत यांचे अर्थ काय आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे का ? या शब्दांनी कविता उच्च होत असली तरी ती सर्वसामान्यांना कळत नसली तर काय उपयोग ?

इथे कुणाला कमी लेखायचा किंवा हिणवण्याचा विचार मनात नाही. फक्त मराठी बोलीभाषेत येणार्‍या शब्दांची नव्याने ओळख करून घेण्याचा एक प्रयत्न आहे.

असेही जे शब्द आपण इंग्रजी असूनही सर्रास वापरतो आणि त्यांचे मराठी अर्थ आपल्याला पटकन आठवतात का?

कोणताही मराठी शब्द जो नेहमी सहजपणे वापरला जात असेल पण शब्दकोषात सापडणार नाही असा.

चला तर मग करायची का सुरुवात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>'फॉक्सपुरची मॅन्गोआई तू मला पाव' म्हणायचो आम्ही.
डिट्टो गं अस्मिता.
हर्पा, केकू आणि अमित आपल्यातले नाहीत 'ते' पल्याडचे. शत्रूगट Wink

ओ.. पॅलिंड्रोम शब्द समजायला आणि प्रोग्रॅम करता यायला विंजिनिअर व्हावं लागलं. पण हे असं आमच्या मातीत दुसरी क वर्गापासून होतं त्याला आचरटपणा म्हणता! कुफेहीपा! Proud

नितीन(Nitin) नावाचा एक मुलगा माझ्या मैत्रिणीच्या मागे लागायचा कॉलेजात तर तो दिसला की 'आला तुझा पॅलिन्ड्रोम' म्हणायचो. एक मंगेशही दुसऱ्या मैत्रिणीच्या मागे ती जिथे जाईल तिथे कडमडायचा तर आम्ही 'मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश' म्हणायचो. Proud

नितीन मंगेश किस्से भारी
पॅलिन्ड्रोम साठी आम्ही कवीला काय काय विकायला लावायचो
तो कवी डालडा विकतो
तो कवी ईशाला शाई विकतो
तो कवी कोको विकतो
तो कवी रीमाला मारी विकतो

मी वाड्यावर एक मोठा पॅलिंड्रोम लिहिला होता, आठवला/सापडला तर बघतो.

सहजच धागा उघडला...
आणि वरच्या पोस्ट वाचून भाषासमृद्ध झालो Proud

बाई दवे,
आमच्याकडे फॉक्सपुरची मँगो लेडी तू मला पाव म्हणायचे.
मांजर बरी खडू उशीरा असे सुद्धा एक म्हणायचे.
मायबोलीवर त्याचेही माबखऊ केले असते.

एक मंगेशही दुसऱ्या मैत्रिणीच्या मागे ती जिथे जाईल तिथे कडमडायचा तर आम्ही 'मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश' म्हणायचो. >> म्हणजे तुझी मैत्रीण आणि मागचा पुढचा मंगेश मिळून एक जिवंत palindrome होत होता. (मंगेश - मैत्रीण - मंगेश असं दृश्य)

Good one हर्पा. पॅलिन्ड्रोमाळले चांगले. Lol

खोकड शब्द नवीन समजला.

अस्मिता मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश भन्नाट.

कोल्हापूरच्या अंबाबाईचं एक आम्ही सेम ऋन्मेषसारखं आणि दुसरं फॉक्सपूरची मँगोलेडी यु मी ब्रेड म्हणायचो.

फॉक्स = खोकड. >>> ओह! इतकी वर्षं 'लबाड लांडगं ढ्वांग करतय' गाण्यात ऐकत आलोय. त्याचा अर्थ आज समजला.

आम्ही बिनडोक माणसाला पण खोकड म्हणायचो Happy

रच्याकने coyote आकाराने या वर्गात कुठे येतो? त्याला काही मराठी नाव आहे का?

काल मराठीची पाठ्यपुस्तके पाहात होते. बहुधा सातवीच्या पुस्तकात दोन बोलीभाषांची एक झलक वाचली. मुलांना ओळख व्हावी म्हणुन एकेकच उतारा आहे. त्यात एक होती अहिराणी. ही बोलीभाषा मी ऐकली होती. दुसरी होती सामवेदी. हे नावही कधी
ऐकले नव्हते. थोडी मराठी कोंकणी मिश्रीत वाटली. लेख लिहिणारा ख्रिस्ती होता त्यामुळे मला वाटले गोवन कोकणी असेल. पण मालवणी कोकणीच्या जास्त जवळ जाणारी होती. आज गुगल केले तेव्हा कळले की ही वसईच्या पट्ट्यात बोलली जाणारी भाषा आहे.

हो साधना, मूळ सामवेदी ब्राह्मण समाजाची भाषा आहे. नालासोपारा इथे रहात असताना ट्रेनमध्ये बरेचदा ऐकू यायची. सामवेदी ब्राम्हण जे ख्रिश्चन झालेत, त्यांना कुपारी समाज म्हणतात आणि त्याच भाषेला कादोडी असंही म्हणतात, असं सुनील डिमेलोचे vlogs बघून समजलं, तो मूळ सामवेदी आहे.

Pages