महाराष्ट्रात दर मैलागणिक मराठी भाषा बदलते असे म्हटले जाते. यात अतिशोयोक्ती नाही हे महाराष्ट्राच्या भटकंतीत लक्षात येतेच. मराठी भाषा आपल्या या अनेक सख्ख्या, चुलत, मावस, सावत्र बहिणींच्या प्रभावामुळे वेळोवेळी बदलत गेली आहे. हिंदी, इंग्रजीसह महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषातील शब्द विनासायास मराठीच्या पंक्तीत मानाने जागा अडवून आहेत.
चला तर मग या शब्दांना जाणून घेऊ या आणि त्यांचे नेमके मराठी अर्थ शोधूया.
उदाहरणार्थ, पेन या शब्दाचा मराठी शब्द तुम्हाला माहीत असेलच, पण रिफिलला मराठीत काय म्हणतात ?
ताबडणे, खुंदलणे ही क्रियापदे किती जणांना माहीत आहेत ?
आपण सर्रास टेबल खुर्ची म्हणतो. पण टेबल चेअर म्हणत नाही. का बरे ?
विदर्भात तर हिंदीभाषिक मराठी की मराठी भाषिक हिंदी हा वेगळाच घोळ आहे.
अनवट, विमल, उन्मन, कैवल्य, अद्वैत असे शब्द कवितेत जागोजागी बागडत असतात. पण साध्या सरळ मराठी भाषेत यांचे अर्थ काय आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे का ? या शब्दांनी कविता उच्च होत असली तरी ती सर्वसामान्यांना कळत नसली तर काय उपयोग ?
इथे कुणाला कमी लेखायचा किंवा हिणवण्याचा विचार मनात नाही. फक्त मराठी बोलीभाषेत येणार्या शब्दांची नव्याने ओळख करून घेण्याचा एक प्रयत्न आहे.
असेही जे शब्द आपण इंग्रजी असूनही सर्रास वापरतो आणि त्यांचे मराठी अर्थ आपल्याला पटकन आठवतात का?
कोणताही मराठी शब्द जो नेहमी सहजपणे वापरला जात असेल पण शब्दकोषात सापडणार नाही असा.
चला तर मग करायची का सुरुवात ?
<<असे एखाद्या शब्दावरून
<<असे एखाद्या शब्दावरून भाषेची तुलना कशी करणार ना?>>
प्राण्यांचा कळप हे केवळ एक उदाहरण झाले. अशी अनेक उदाहरणे आहेत.
उदा. टू गूगल हे क्रियापद. अशी क्रियापदे बनवण्याची ताकद मराठीत नाही.
गुगलणे, गुगलून पाहणे असे
गुगलणे, गुगलून पाहणे असे शब्दप्रयोग हल्ली आंतरजालावर सर्रास वाचण्यात येतात की!
आता टू गुगल किंवा गुगलणे ही क्रियापदे अधिकृतरित्या अजून अनुक्रमे इंग्रजी आणि मराठीत समाविष्ट झाली नसावीत. किंवा झाली असतील तर मला माहीत नाही.
मराठी इंग्रजी तुलना (थोडावेळ) बाजूला ठेऊन भाषा समृद्धीबद्दल तुम्हाला अजूनही तुमच्या पहिल्या पोस्टप्रमाणेच वाटते का?
सुनिल तुम्ही प्रिटी वुमन
सुनिल तुम्ही प्रिटी वुमन केव्हा पुर्ण करणार?
@गजानन होय. एकच शब्द अनेक
@गजानन
होय. एकच शब्द अनेक अर्थांनी वापरणे हे भाषेची लवचिकता दर्शवित असले तरी ते भाषेची शब्दसंपत्तीतील कमतरतादेखिल अधोरेखीत करतात, असेच वाटते.
@मी अमि
इतक्या वर्षांनंतरदेखिल तुम्हाला प्रीटी वूमन आठवते आहे, हे पाहून खरेच भरून आले! आता मात्र पूर्ण करायलाच हवे!
ओके.
ओके.
सुनील, माझ्या मते नविन
सुनील, माझ्या मते नविन शब्दप्रयोग हे बहुतेक वेळा तरुण पिढीकडून तयार होत असतात. त्या वयात असेलेला बंडखोरपणा, प्रस्थापिताविरुद्ध काहीतरी करण्याची मानसिक गरज आणि नाविन्याची आस याचा परीणाम भाषेवरही होतच असतो. नविन शब्दप्रयोगांपैकी काही विसरले जातात काही टिकतात. अजूनही ही प्रक्रिया घडतच असते. फक्त हल्लीची पिढी जास्त इंग्रजी शब्द वापरत असल्याने इग्रजाळलेले शब्द जास्त येतात. पूर्वी आलेल्या उर्दू / फारशी शब्दांना आपण आपलेसे केलेच ना? तसे हे ही होतील. गुगल करणे हा अजच्या मराठी पिढीचा स्टँडर्ड शब्दप्रयोग आहे मराठीत
आणि प्रिटी वूमन मागे तुम्ही होतात तर?
मी लेखकाचे नावच विसरून गेलो होतो. लिहा पुढचे 
धागा वर काढतो आहे.
धागा वर काढतो आहे.
खास विदर्भीय शब्द
खास विदर्भीय शब्द
शीशी = बॉटल (काचेची)
हिरोति = मिर्ची पावडर ('ती' नाही)
फोकनाड = थापाड्या (ऋ= ला नागपुरी पर्यायी शब्द)
मंडई= तमाशा (नागपूर, भंडारा व गोंदिया भागात)
शान्ं = हि विदर्भीय शेपूट अशी वापरतात... जाऊनशान्ं, येऊनशान्ं, म्हणूनशान्ं... इं.
फोकनाड = थापाड्या (ऋ= ला
फोकनाड = थापाड्या (ऋ= ला नागपुरी पर्यायी शब्द) >>>

ह्यावर मागे किती धमाल केलेली.
मस्त होता हा धागा. परत सर्व वाचून काढायला हवा.
अरे ईथेही खुप शब्द आहेत.
अरे ईथेही खुप शब्द आहेत. सुरवातीपासुन वाचायला हवे आता. मस्तच!
wolf howled हे मराठीमधे कसे
wolf howled हे मराठीमधे कसे म्हणता येईल? कोणितरी विचारले आणि मला सांगता आले नाही नीट. लांडगा ओरडला असे म्हणता येईल का की काही वेगळा शब्द आहे?
लांडग्याने साद घातली?
लांडग्याने साद घातली?
हा हा, साद घातली हे अगदी
हा हा, साद घातली हे अगदी मैत्रीपूर्ण वाटत आहे. आरोळी दिली म्हणता येईल का?
लांडग्याचे रडणे म्हणता येईल?
लांडग्याचे रडणे म्हणता येईल?
मला गर्जले सुचले होते पण
मला गर्जले सुचले होते पण योग्य वाटले नाही.
ग्रामीण भागात लांडगा आरडला
ग्रामीण भागात लांडगा आरडला म्हणतात
लांडगा ओरडला जास्त योग्य वाटत
लांडगा ओरडला जास्त योग्य वाटत आहे.
कोल्हेकुई तसं लांडगेलुई असं म्हणता येईल का ?
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
मजेदार आहे शब्द ऋतुराज!
मला ओरडला योग्य वाटतं आहे आता.
लांडगेलुई
लांडगेलुई
लांडगा गुरागुरला?
लांडगा गुरगुरला?
लांडगा वेगवेगळ्या प्रकारे
लांडगा वेगवेगळ्या प्रकारे आवाज काढतो.
बरेचदा विव्हळतो, खास करून एकापेक्षा जास्त असतील तर साथ देत विव्हळतात.
इंग्रजीतला फॉक्स, वुल्फ आणि
इंग्रजीतला फॉक्स, वुल्फ आणि जॅकेल यांच्या कोल्हा आणि लांडगा यांच्याबरोबर जोड्या लावा प्लीज. इंग्रजीत तीन आणि मराठीत दोनच का?
फॉक्स = खोकड
फॉक्स = खोकड
वुल्फ = लांडगा
जॅकल = कोल्हा
फॉक्स = खोकड >>>> ओह अच्छा.
फॉक्स = खोकड >>>> ओह अच्छा. धन्यवाद स्वाती२.
अच्छा. म्हणजे - फॉक्सफ्लडची
अच्छा. म्हणजे लहानपणी ऐकलेलं - फॉक्सफ्लडची मँगो लेडी यू मी ब्रेड - हे चुकीचं आहे. तिथे जॅकॉल पाहिजे.
फॉक्सफ्लडची मँगो लेडी यू मी
फॉक्सफ्लडची मँगो लेडी यू मी ब्रेड - हे चुकीचं आहे. तिथे जॅकॉल पाहिजे.
हो हे चुकीचं होतं तर...
हर्पा 'फॉक्सपुरची मॅन्गोआई
हर्पा
'फॉक्सपुरची मॅन्गोआई तू मला पाव' म्हणायचो आम्ही. तुझं इंग्लिश तेव्हापासून चांगलेय 
लांडगालुई
खोकड शब्द विसरून गेला होता. थॅंक्यू
'फॉक्सपुरची मॅन्गो मॅडम यू
'फॉक्सपुरची मॅन्गो मॅडम यू मी ब्रेड "
फॉक्सफ्लडची मँगो लेडी यू मी
फॉक्सफ्लडची मँगो लेडी यू मी ब्रेड .. आम्ही पण असंच म्हणायचो. आमचं पण विंग्रजी चांगलं म्हणा.
Pages