भारताचे मंगळ यान मंगळा ग्रहाच्या कक्षेत आज स्थापित करण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना पहिल्याच प्रयत्नात यश आले. त्याबद्दल या धाग्यावर त्यांचे अभिनंदन करुया. मंगळ ग्रहाच्या बाबतीत अधिक माहिती इथे देता येईल.
कोणतेही तंत्रज्ञान परिपूर्ण असूच शकत नाही, अन्यथा अमेरिका आणि रशियाच्या सगळ्या अवकाश मोहीमा कोणताही अपघात न होता यशस्वी झाल्या असत्या. पण विशेष असे की पहिल्याच प्रयत्नात मंगळमोहीम यशस्वी करणारा भारत हा आत्तापर्यंतचा एकमेव देश ठरला आहे. या आधी चांद्रयान-१ मोहीम अशाच रितीने पहिल्याच फटक्यात यशस्वी झाली होती. Get it right the first time हे व्यवस्थापन तत्व आपण अंमलात आणू शकलेलो आहोत, ते ही दुसर्यांदा. याचाच अर्थ असा की भारताकडे असलेले तंत्रज्ञान हे अत्यंत परिपक्व झालेले आहे. तसेच, हे तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय आहे आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या तूलनेत एक दशांश खर्चात ही मोहीम पार पाडण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत.
या मोहीमेबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि कौतुक करताना आदरणीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी म्हणाले की देशवासियांना शास्त्रज्ञांबद्दल गर्व वाटावा अशीच ही घटना आहे. या कार्यक्रमासाठी इस्रोने मॉम (मार्स ऑर्बिटर मिशन) हे संक्षिप्त रूप वापरले होते. तोच धागा पकडून मोदी यांनी आपल्या भाषणात मंगळाला आज 'मॉम' मिळाल्याचे सांगितले. मॉम कधीही कोणाला निराश करीत नाही, अशी सार्थ कोटीही त्यांनी आपल्या भाषणावेळी केली.
भारत अवकाश मोहीमांत अशीच प्रगती करत राहो ही इश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे व सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन.
Edited ?
Edited ?
फोटॉ गॅलरी: मंगळ मोहीमेचा
फोटॉ गॅलरी: मंगळ मोहीमेचा जल्लोष
येथे(ही) भांडणे झाली?
येथे(ही) भांडणे झाली?
विशेष म्हणजे वरील फोटोत महिला
विशेष म्हणजे वरील फोटोत महिला शास्त्रज्ञांची संख्या लक्षणीय आहे.
वरचा प्रतिसाद धाग्याच्या
वरचा प्रतिसाद धाग्याच्या विषयाशी सुसंगत आहे का?
---------
lol . त्या संकेतस्थळाची अॅलर्जी कधीपासून उद्भवली.
इजरोच्या सर्व कर्मचार्यांचे
इजरोच्या सर्व कर्मचार्यांचे अभिनंदन !! भारतीयासाठी एक अभिमानास्पद गोष्ट !!
मंगळ मोहीमेने ट्विटरही
मंगळ मोहीमेने ट्विटरही गाजवले
http://indianexpress.com/article/india/india-others/like-mangalyaan-isro...
भारताचे मंगळयान
भारताचे मंगळयान प्रोजेक्टः
उपग्रह सोडुन त्याच्या निर्धारीत कक्षेत प्रस्थापीत करण्याच्या व्यापाराला २०० बिलियन डॉ ईतके मोठे स्वरुप आलेले आहे, त्या अनुशंगाने भारत ह्या मार्केट मध्ये ३ - ४ स्थानावर आलेला आहे. भारताचा नं पुर्वी म्हणजे २०१२ ला ५ वा म्हणजे चीन नंतर होता.
आता भारताला जगात सर्वात जास्त काम मिळण्याची शक्यता आहे.
मोठे उपग्रह, लघु उपग्रह आणि अती लघु उपग्रह हे वेगवेगळ्या कामासाठी जगात वापरले जातात, पण वापरणार्या देशांची संख्या कमी आहे. जे देश स्वता़:चे उपग्रह सोडु शकत नाहीत ते दुसर्याचे उपग्रह भाड्याने घेतात, किंवा स्थीत असलेल्या उपग्रहाची सेवा / वेळ विकत घेतात,
भारत अश्या गरीब देशांना नविन विकल्प देऊ शकतो आणि वर दिलेल्या २०० बिलियन डॉ च्या बाहेरच मार्केट स्वता:साठी विकसीत करु शकतो.
रेफः http://en.wikipedia.org/wiki/Space_industry
http://www.popularmechanics.com/science/space/rockets/8-countries-anglin...
वावावा शांतारामा, उत्तम
वावावा शांतारामा,
उत्तम माहिती.
भारताने उपग्रह सोडून भूस्थिर कक्षेत प्रस्थापित करण्याची टेक्नॉलॉजी कधीपासून मिळवली? आजपर्यंत किती उपग्रह व कोण-कोणत्या देशांचे सोडले, आर्यभट्ट, पीएसएलव्ही म्हणजे काय इ. व याबद्दलची अधिक माहिती आपल्या सिद्धहस्त लेखणीतून आलेली वाचायला आवडेल.
सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक
सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन.
खरंच, प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बातमी ! ...अगदी खरे.अशा घटना कोणत्याही राजवटीत झाल्या याला बिलकूल महत्व नसून त्या शास्त्रज्ञांचे परिश्रम व बुद्धी यांचे सार आहे
संस्थेचे नाव ISRO आहे.
संस्थेचे नाव ISRO आहे. शीर्षकात व हेडरमध्ये अनेक जागी इस्त्रो असे आहे ते इस्रो हवे.
सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक
सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन.
खरंच, प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बातमी ! ...अगदी खरे.अशा घटना कोणत्याही राजवटीत झाल्या याला बिलकूल महत्व नसून त्या शास्त्रज्ञांचे परिश्रम व बुद्धी यांचे सार आहे>>>>> +१००
सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक
सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन.
अभिनंदन ! शास्त्रज्ञांचे !
अभिनंदन ! शास्त्रज्ञांचे !
मंगळयानाने पाठविलेले पहिले
मंगळयानाने पाठविलेले पहिले छायाचित्र
मंगळ ग्रहाच्या कक्षेत दाखल झाल्यानंतर भारताच्या मंगळयानाने पहिल्यांदाच मंगळाच्या पृष्ठभागाचे छायाचित्र पृथ्वीवर पाठविले. या ठिकाणचा देखावा सुंदर आहे, अशा आशयाचे ट्विटदेखील या मंगळयानाने केले आहे.
सर्व भारतीयांचे त्रिवार
सर्व भारतीयांचे त्रिवार अभिनंदन आणि ISRO आणि शास्त्रज्ञ आणि कामगिरीला हातभार लावणार्या प्रत्येका कामगिरीला सलाम.
आततायी आणि स्वार्थी राजकारण्यांचा अडथळा नसल्यास देश तंत्रज्ञान क्षेत्रात (आणि पर्यायाने तंत्रज्ञानाची दैनंदिन जीवनात जनतेसाठी ऊपलब्ध्ता) किती ऊंच गरूडभरारी मारू शकेल ह्याचे डोळे दिपवणारे ऊदाहरण.
अभिनंदन
अभिनंदन
मंगळयानाने पाठविलेला हा
मंगळयानाने पाठविलेला हा दुसरा फोटो .
हा फोटो मंगळाच्या पृष्ठभागापासून 74,500 किमी अंतरा वरून घेतला आहे.
वॉव
वॉव
वा वा काय सुरेख दिसत आहे
वा वा काय सुरेख दिसत आहे फोटो
मोदींमुळे मंगळ ग्रह इस्त्रोच्या माध्यमातुन बघायला मिळाला अन्यथा इतके दिवस आपण नासाने दाखवलेल्या फोटो मधुनच समाधान मानत होतो
नमो नमः
मोदींमुळे मंगळ ग्रह
मोदींमुळे मंगळ ग्रह इस्त्रोच्या माध्यमातुन बघायला मिळाला>>


भारतीय शास्त्रज्ञांमुळे मंगळ ग्रह इस्त्रोच्या माध्यमातुन बघायला मिळाला
शास्त्रज्ञ तर आहेच त्यांची
शास्त्रज्ञ तर आहेच त्यांची कामगिरी तर महत्वाचीच आहे
पण राजकिय इच्छाशक्ती सुध्दा आवश्यक आहे जी मोदी साहेबांकडे आहे.
मोदींची राजकिय इच्छाशक्ती
मोदींची राजकिय इच्छाशक्ती निश्चितच वादातीत आहे .
पण मंगळयानाची मोहीम हि २०१२ पासून सुरु आहे. या मोहिमेचे श्रेय हे भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांचे आहे कुठल्याही एका राजकीय पक्षाचे नाही.
मोदीं साहेबांच्या स्वागतासाठी
मोदीं साहेबांच्या स्वागतासाठी आधीच्या सरकार ने तिजोरी खाली ठेवलेली परंतु त्यांनी इस्त्रोला सढळ हस्ते मदत चालुच ठेवली. मोदींनी मंगळ मोहीम स्थगित केली नव्हती. उलट लवकरात लवकर यान कसे पोहचेल याची खास काळजी घेतली. शास्त्रज्ञांबरोबर मोदींचे देखील थोडेफार श्रेय आहेच.
दिवाकर. इथे अॅडमिन यांनी
दिवाकर. इथे अॅडमिन यांनी काही टिप्पण्या उडवल्या आहेत. तेव्हा तुम्ही जे चालू केले आहे ते आता पुरे. नाही तर पोष्टीच नव्हे, आयडीही उडायचा. धन्यवाद.
<<<< मोदींमुळे मंगळ ग्रह
<<<< मोदींमुळे मंगळ ग्रह इस्त्रोच्या माध्यमातुन बघायला मिळाला >>> पण मंगळ मोहीम हि मोदिजी पंतप्रधान होण्यापूर्वी सुरु झाली होती.
राजेश. हा धागा शास्त्रज्ञ
राजेश. हा धागा शास्त्रज्ञ वगैरेंच्या अभिनंदनाचा आहे. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित चर्चा इथे आणू नये. आणखी संदर्भासाठी माझी वरची पोस्ट पहावी.
मी कुणावर वैयक्तिक टिप्पणी
मी कुणावर वैयक्तिक टिप्पणी केली नाही अथवा कुणासंबंधी वाईट देखील बोललो नाही आहे ?
दिवाकर, आम्हाला समजत नाही असे
दिवाकर, आम्हाला समजत नाही असे वाटले का? हा शेवटचा इशारा समजा. हा धागा शास्त्रज्ञ वगैरेंच्या अभिनंदनाचा आहे. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित चर्चा इथे आणू नये.
तुम्ही काय अर्थ काढत आहात
तुम्ही काय अर्थ काढत आहात तुम्हालाच ठाउक साहेब.
आम्ही शास्त्रज्ञांचे देखील अभिनंदन करतच आहोत.
Pages