मंगळयान मोहीम: इस्रोच्या शास्त्रज्ञांचे व सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन

Submitted by कोकणस्थ on 24 September, 2014 - 00:40

भारताचे मंगळ यान मंगळा ग्रहाच्या कक्षेत आज स्थापित करण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना पहिल्याच प्रयत्नात यश आले. त्याबद्दल या धाग्यावर त्यांचे अभिनंदन करुया. मंगळ ग्रहाच्या बाबतीत अधिक माहिती इथे देता येईल.

कोणतेही तंत्रज्ञान परिपूर्ण असूच शकत नाही, अन्यथा अमेरिका आणि रशियाच्या सगळ्या अवकाश मोहीमा कोणताही अपघात न होता यशस्वी झाल्या असत्या. पण विशेष असे की पहिल्याच प्रयत्नात मंगळमोहीम यशस्वी करणारा भारत हा आत्तापर्यंतचा एकमेव देश ठरला आहे. या आधी चांद्रयान-१ मोहीम अशाच रितीने पहिल्याच फटक्यात यशस्वी झाली होती. Get it right the first time हे व्यवस्थापन तत्व आपण अंमलात आणू शकलेलो आहोत, ते ही दुसर्‍यांदा. याचाच अर्थ असा की भारताकडे असलेले तंत्रज्ञान हे अत्यंत परिपक्व झालेले आहे. तसेच, हे तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय आहे आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या तूलनेत एक दशांश खर्चात ही मोहीम पार पाडण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत.

या मोहीमेबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि कौतुक करताना आदरणीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी म्हणाले की देशवासियांना शास्त्रज्ञांबद्दल गर्व वाटावा अशीच ही घटना आहे. या कार्यक्रमासाठी इस्रोने मॉम (मार्स ऑर्बिटर मिशन) हे संक्षिप्त रूप वापरले होते. तोच धागा पकडून मोदी यांनी आपल्या भाषणात मंगळाला आज 'मॉम' मिळाल्याचे सांगितले. मॉम कधीही कोणाला निराश करीत नाही, अशी सार्थ कोटीही त्यांनी आपल्या भाषणावेळी केली.

भारत अवकाश मोहीमांत अशीच प्रगती करत राहो ही इश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे व सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गण्या
आपल्या प्रतिसादात इस्त्रो अथवा मंगल याना विषयी अधिक माहिती असती तर बरे झाले असते .
"मंगळयानाचे यश - एक आढावा" या पेक्षा "नेहरू - गांधी घराण्याचे यश : एक आढावा " असे अधिक वाटतोय Lol
हलके घ्यावे Happy

विनोबा हलकेच घेतले आहे.

मूळ लेखात खाली दिलेली शास्त्रीय माहीती परिपूर्ण आहेच की

या मोहीमेबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि कौतुक करताना आदरणीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी म्हणाले की देशवासियांना शास्त्रज्ञांबद्दल गर्व वाटावा अशीच ही घटना आहे. या कार्यक्रमासाठी इस्रोने मॉम (मार्स ऑर्बिटर मिशन) हे संक्षिप्त रूप वापरले होते. तोच धागा पकडून मोदी यांनी आपल्या भाषणात मंगळाला आज 'मॉम' मिळाल्याचे सांगितले. मॉम कधीही कोणाला निराश करीत नाही, अशी सार्थ कोटीही त्यांनी आपल्या भाषणावेळी केली.

याच नेतृत्वाचा कित्ता गिरवत राजीव गांधी यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सोनिया गांधी, त्यांचे सुपुत्र श्रीमान राहुलजी गांधी व आदरणिय प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी इस्त्रोच्या सर्व मोहीमांना मनापासून पाठिंबा दिला. इस्त्रोच्या संशोधकांना बोनस इन्क्रीमेंट्स देनारे हे पहिले सरकार ठरले. चांद्रयान मोहीम अपयशी होऊनही मंगळयानाच्या मोहीमेवर सरकारने संपूर्ण विश्वास टाकला व खर्चात कुठेही कमी पडू दिले जाणार नाहि हे पाहत या मोहीमेला हिरवा कंदील दाखवला.

............

राहुल गांधी , सोनिया याना क्रेडिट देणे योग्यच आहे.

...........
मॉम निराश नाही करत. पण येशोदामॉमको मोदी पॉपने बहुत निराश किया है

कठीण आहे Sad
किमान अशा बाबतीत तरी फक्त अभिनंदनाच्या पोस्ट येऊ शकत नाहीत का ?
आमच्या नेत्यामुळेच हे झाल पासून याची गरजच काय होती इथपर्यंत पोस्ट येण खरोखर गरजेच आहे का ? Sad

'क्‍युरिऑसिटी रोव्हर'कडून 'मॉम'चे अभिनंदन!

"नमस्ते मार्सऑर्बिटर!! इस्रो व भारताचे या पहिल्या मंगळमोहिमेबद्दल हार्दिक अभिनंदन,‘‘
असा संदेश क्‍युरिऑसिटी रोव्हरच्या ट्‌विटर अकाऊंटवरुन देण्यात आला होता. यावर ""मार्सक्‍युरिऑसिटी संपर्कात रहा. मी जवळच असेन!,‘‘ असा या अभिनंदनाचा स्वीकार करणारा संदेश ‘मॉम‘च्या ट्‌विटर अकाऊंटवरुन देण्यात आला.

इस्त्रोचे शास्त्रज्ञ खरच जबरद्स्त आहेत.....इतक्या कमी वेळात आणि इतक्या कमी खर्चात त्यानी पहिलीच मन्गळ मोहिम यशस्वी केली त्याबद्द्ल त्याचे हार्दिक अभिनन्द्न आणि शतशः आभार......... Happy

खरं म्हणजे त्या लेखातला युक्तिवाद स्टॅच्यु ऑफ युनिटीसाठी वापरता येईल. अजूनही वेळ गेलेली नाही.

अत्यंत बालीश आणि खोडसाळ लेख वाटतो. असे लेख यायचेच विघ्नसंतोषी लोकांकडून. लेखकाला गेट वेल सून, >>>>> atmaparikshan ki kaay ? Swathachya lekhache ase sadetod parikshan kelyabaddal abhinandan . sakshaatkar zala aaj. Jai ho manglyan

मनमोहन सिंग यांनी केले इस्रोचे अभिनंदन

नवी दिल्ली - ‘मंगळयाना‘च्या माध्यमामधून ऐतिहासिक कामगिरी केलेल्या भारताच्या अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही अभिनंदन केले आहे.

Pages