मंगळयान मोहीम: इस्रोच्या शास्त्रज्ञांचे व सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन

Submitted by कोकणस्थ on 24 September, 2014 - 00:40

भारताचे मंगळ यान मंगळा ग्रहाच्या कक्षेत आज स्थापित करण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना पहिल्याच प्रयत्नात यश आले. त्याबद्दल या धाग्यावर त्यांचे अभिनंदन करुया. मंगळ ग्रहाच्या बाबतीत अधिक माहिती इथे देता येईल.

कोणतेही तंत्रज्ञान परिपूर्ण असूच शकत नाही, अन्यथा अमेरिका आणि रशियाच्या सगळ्या अवकाश मोहीमा कोणताही अपघात न होता यशस्वी झाल्या असत्या. पण विशेष असे की पहिल्याच प्रयत्नात मंगळमोहीम यशस्वी करणारा भारत हा आत्तापर्यंतचा एकमेव देश ठरला आहे. या आधी चांद्रयान-१ मोहीम अशाच रितीने पहिल्याच फटक्यात यशस्वी झाली होती. Get it right the first time हे व्यवस्थापन तत्व आपण अंमलात आणू शकलेलो आहोत, ते ही दुसर्‍यांदा. याचाच अर्थ असा की भारताकडे असलेले तंत्रज्ञान हे अत्यंत परिपक्व झालेले आहे. तसेच, हे तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय आहे आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या तूलनेत एक दशांश खर्चात ही मोहीम पार पाडण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत.

या मोहीमेबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि कौतुक करताना आदरणीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी म्हणाले की देशवासियांना शास्त्रज्ञांबद्दल गर्व वाटावा अशीच ही घटना आहे. या कार्यक्रमासाठी इस्रोने मॉम (मार्स ऑर्बिटर मिशन) हे संक्षिप्त रूप वापरले होते. तोच धागा पकडून मोदी यांनी आपल्या भाषणात मंगळाला आज 'मॉम' मिळाल्याचे सांगितले. मॉम कधीही कोणाला निराश करीत नाही, अशी सार्थ कोटीही त्यांनी आपल्या भाषणावेळी केली.

भारत अवकाश मोहीमांत अशीच प्रगती करत राहो ही इश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे व सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन!!!!

ह्या यानाचे काय फायदे होणार आहेत ते कुणी लिहिन का? म्हणजे उद्देश काय आहे आपला हे यान पाठवण्यामागचा ?

आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि युरोपियन देशांनाच मंगळ मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण करता आल्या आहेत. भारत हा पहिला आशियाई देश ठरला आहे .
इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन!!

कोकणस्थ,

नो इश्यूज!

मी माझा धागा उडवण्यासाठी लिहितो अ‍ॅडमीन महोदयांना! माझ्या धाग्यात दिलेल्या आधीच्या तपशीलात तशीही एक चूक होती.

Happy

सर्व शास्त्रज्ञान्चे मनःपूर्वक अभिनन्दन! सर्व भारतीयान्साठी गौरवाची घटना.:स्मित:

ह्या यानाचे काय फायदे होणार आहेत ते कुणी लिहिन का? म्हणजे उद्देश काय आहे आपला हे यान पाठवण्यामागचा >>>
या मोहीमेद्वारे भारताला मंगळ ग्रहाविषयी संशोधन करता येणार आहे. हे यान मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल . मंगळावरील वातावरणा चा अभ्यास करून तिथे मिथेनचे अंश आहेत का हे कळू शकेल .
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण मंगळापर्यंत पोहचू शकलो !!!!

- महिती चुकीची असल्यास दुरुस्त करावी -

मंगळाच्या दोन्ही धृवांवर बर्फाचे थर आहेत. ते वितळवल्यास संपूर्ण मंगळावर जवळ जवळ ११ मीटर इतके खोल पाणी जमा होऊ शकेल असा अंदाज आहे.

<देशवासियांना शास्त्रज्ञांबद्दल गर्व वाटावा अशीच ही घटना आहे >गर्व की अभिमान?

अंतराचा विचार केल्यास भारताला प्रति किलोमीटर ११ रुपये ऐवढाच खर्च झाला आहे.
म्हणजे रिक्षा-वाल्यांपेक्षा हि कमी Lol

इस्त्रो व सर्व टीमचे अभिनंदन. तत्कालिन पीएम डॉ. मनमोहन सिंग यांचं व त्यांच्या यावर काम केलेल्या टीमचंही अभिनंदन.

नीमू:
हा धागा भारताची मंगलयान मोहीम तसेच मंगळ ग्रहाच्या "शास्त्रीय" माहिती साठी आहे .
मंगळाच्या ज्योतिष शास्त्रीय माहिती साठी आपण वेगळा धाग काढू शकता .

मंगळयानाचे यश - एक आढावा

भारताचे पहिले प्रधानमंत्री बॅ. पं जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे इस्त्रो सारख्या अनेक संशोधन संस्थांचा भारतात पाया घातला गेला. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या व आधुनिकतेचा गंधही नसलेल्या भारत या देशात अशा प्रकारचा विचार आणणारा नेता देशाला लाभला हे कोंग्रेसचा प्रशंसक नसतानाही म्हणावे लागते. भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या अनेक देशांमधे प्रगती झाली आहे पण ती परदेशी कंपन्यांना देश आंदण दिल्याने. तर काही देशांमधे अद्याप अंधार आहे. त्यानंतर १९६२ साली डीआरडीओ चा पाया घातला गेला.

भारताच्या सर्वात लोकप्रिय नेत्या श्रीमती इंदिरा गांधी यांनीही या संस्थांना काहीही कमी पडू दिले नाही. उपग्रहांना भास्कर, आर्यभट्ट अशी नावे सुचवून प्राचीन शास्त्रज्ञ आणि आधुनिक शास्त्र यांची सांगड घातली गेली. त्याचवेळी लवचिक अणूधोरण आखून आंतरराष्ट्रीय समुदायाचा रोष न पत्करता सर्वांना खूष ठेवत गुप्तपणे अणूबाँब बनवण्याचं धोरण पूर्णत्वाला पार पाडलं. शास्त्रज्ञांचा नेतृत्वावर विश्वास असल्याशिवाय पोखरणचा अणूस्फोट होऊ शकला नसता. त्ञाचवेळी उर्वरीत जगाला भारताकडे काय क्षमता आहे हे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाने दाखवून दिले.

पुढे आलेल्या राजीव गांधी यांनी वाहन उद्योग, संगणक आणि फोन या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. खाजगी गुंतवणूक, परदेशी तंत्रज्ञान यांना दारे किलकिली करून दिली. सॅम पित्रोदा व विजय भटकर सारख्या गुणी माणसांना हेरून त्यांना मुक्तपणे काम करता यावे असे अधिकार दिले. सी डॅकची स्थापना आणि महासंगणक नाकारल्यानंतर भारताने परम हा महासंगणक बनवणे ही अणूबाँब सारखीच मोठी घटना होती.

याच दरम्यान इस्त्रोच्या सर्व कार्यक्रमांना आर्थिक दृष्ट्या सढळ मदत करत राहणे हे धोरण या सर्व नेत्यांनी सांभाळले. रोहीनी, आयआरएस आणि जीसएलव्ही सारख्या मोहीमांना सुरुवातीला अपयश येऊनही सातत्याने इस्त्रो वर दाखवलेल्या यशामुळे शास्त्रज्ञांमधे विश्वास उत्पन्न झाला. आज इस्त्रॉ ही पूर्णपणे स्वावलंबी संस्था आहे. इतर देशांचे उपग्रह सोडण्यापासून ते लष्करी उपयोगाचे तंत्रज्ञान त्या क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांच्या सहाय्याने विकसित करणे हा एक मोठा लाभ या संस्थेमुळे झालेला आहे.

भारताचा क्षेपनास्त्र विकास कार्यक्रम देखील यशस्वी झाला. त्या वेळी राजीव गांधींच्या जाहीरातिंवर कुत्सित टिका होत असली तरी धोरणसातत्याने विश्वास निर्माण झाला आणि भारताची ओळख तंत्रज्ञानाने परीपूर्ण अशी होऊ लागली. हे सर्व काम स्वतंत्र झाल्यावर अल्पावधीत झालं एखाद्या देशाच्या इतिहासात ४० वर्षे हा काळ हा शिशूवस्थेसारखाच म्हणावा लागेल. अजून देश तरुण व्हायचा आहे. पण बळाचे पाय पाळण्यातच दिसावेत असा दैदीप्यमान दिव्य भविष्याचा संदेश या नेतृत्वाने दिला.

याच नेतृत्वाचा कित्ता गिरवत राजीव गांधी यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सो. गांधी, त्यांचे सुपुत्र श्रीमान राहुलजी गांधी व आदरणिय प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी इस्त्रोच्या सर्व मोहीमांना मनापासून पाठिंबा दिला. इस्त्रोच्या संशोधकांना बोनस इन्क्रीमेंट्स देनारे हे पहिले सरकार ठरले. चांद्रयान मोहीम अपयशी होऊनही मंगळयानाच्या मोहीमेवर सरकारने संपूर्ण विश्वास टाकला व खर्चात कुठेही कमी पडू दिले जाणार नाहि हे पाहत या मोहीमेला हिरवा कंदील दाखवला. या विश्वासामुळे या मोहीमेत सहभागी झालेल्या गुणी चमूचे बळ दुणावले नसते तरच नवल.

आज या सर्व घडामोडिंचा एकत्रित परिणाम म्हनूनच पोखरण, परम प्रमाणेच एक दैदीप्यमान दिवस दिसतो आहे. जगातले सर्व लोक तोम्डात बोट घालून भारताच्या या यशाकडे पाहत आहेत. या यशामुळे भारताचे पहिले प्रधान सेवक नरेंद्र मोदी यांच्यावर जगातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या वर्षावाखाली प्रधानसेवकांना देशाच्या वाटचालीतल्या साठ वर्षाचा अभिमान वाटू लागला असेल यात नवल ते काय ?

मंगळयानाच्या या दैदीप्यमान यशाबद्दल सर्व देशवासियांना हार्दीक शुभेच्छा !

Pages