खमंग कुरकुरित...काजु आणि लसूण...

Submitted by p_r_a_जो on 23 September, 2014 - 02:26
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

काजुच्या बिया,
मोठ्या आकारच्या लसूण पाकळ्या,
तिखट,
मिठ,
तळण्यासाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

कढई मधे तेल छान गरम करून घ्या.
मोठ्या आकारच्या लसूण पाकळ्या (सालं न काढ्ता) थोड्या ठेचून घ्याव्यात.
काजुचे गर आणि मोठ्या आकारच्या लसूण पाकळ्या (सालं न काढ्ता) छान खमंग, सोनेरी तळून घ्या.
गार होऊ द्या.
आता वर स्वादा नुसार तिखट, मिठ भुरभुरवा.

वाढणी/प्रमाण: 
एक मोठा लसूण कांदा आणि २०/३० काजु (२ जणांसाठी)
अधिक टिपा: 

लसूण सारक आहे त्यामुळे वात विकार कमी होतो. काजु मुळे पित्त होऊ शकते त्यामुळे प्रमाणातंच खावेत.
मुख्य जेवणांत असे खमंग काहि असेल तर जेवणांची लज्जत नक्किच वाढते. पंजाबी ढाब्यावर असे तळलेले लसूण हमखास मिळतात.

माहितीचा स्रोत: 
स्वतः करून पाहिले.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान... नुसत्या लसणाच्या पाकळ्या सालासकट त़ळलेल्या, इकडे पण पद्धत आहे...
लग्न समारंभात, हॉटेल्स, ढाब्यावर, लोणचे, सलाद, कडधान्याच्या बोल सोबत, तळलेला लसणाचा बोल पण असतो...

कॉमन आवडीचा चखणा आहे Wink
पण लसणाचा कोलेस्ट्रॉल कमी करणे हा इफेक्ट तेलात तळून अन सोबत काजू तेही तळून खाल्ल्याने वाया जातो, अन लसणाचा दुसरा स्पेशल इफेक्ट तोंडाला येणार्‍या लसूण अन चखण्यासोबतच्या द्रव्याच्या वासामुळे बोंबलतो Wink