मध्यंतरी कामानिमित्त पॉला नावाच्या कॅनेडियन युवतीशी संवाद साधण्याचा योग आला. ती चक्क पुण्यात येऊन एक मराठी फीचर फिल्म बनवत आहे जिचा विषय शिवरायांच्या काळाशी निगडीत असून ती फिल्म ऑगस्ट २०१५ मध्ये प्रदर्शीत होणार आहे. विषय अत्यंत दिलचस्प आहे पण व्यावसायिक कारणांमुळे तो येथे नोंदवणे अयोग्य आहे. तिचे आडनांवही येथे न देण्याचे कारण तेच आहे.
पॉलाने फिल्म मेकिंग हे क्षेत्र का निवडले, भारत का निवडला, मराठी भाषा का निवडली, पुणे का निवडले, शिवशाहीशी निगडीत विषय का निवडला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला यथावकाश देता येतील.
ह्या मुलाखतीदरम्यान चित्रपटनिर्मीती व्यतिरिक्तची चर्चा कॅनेडियन व भारतीय महिला ह्यांची तुलना वर्तणूक, संस्कार, स्वातंत्र्य, कौटुंबिक'ता', सौंदर्याच्या परिभाषा, पोषाख अश्या निकषांवर झाली.
चर्चेच्या शेवटी शेवटी मी विचारलेला प्रश्न फारच नि:संदिग्ध होता.
"एक संदेश, जो तू भारतीय मुली व स्त्रियांना देऊ पाहात असशील, तो कोणता?"
हा प्रश्न तिला विचारणे हा निव्वळ मुलाखतीचा एक भाग होता. ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यास ती पात्र आहे किंवा नाही हा विचार मी केलेला नव्हता.
त्यावर पॉलाचे उत्तर तत्परतेने आले. ती म्हणाली,
"डिमांड अॅन्ड एक्स्पेक्ट मोअर रिस्पेक्ट फ्रॉम अदर्स"
अनेक दिवस ह्या उत्तराने विचारात पाडले होते.
'असे कसे होऊ शकेल' ह्या शंकेने नव्हे, 'नेमके काय बदलायला लागेल' ह्या शंकेने!
'पॉला', एक 'गोरी' युवती असे म्हणाली म्हणून आपण विचारात पडलो आहोत का हाही विचार करून पाहिला. तेव्हा पटले की 'हो', ती गोरी आहे म्हणून आणि गोरी वा काळी काहीही असो पण, ती ह्या संस्कृतीतील अजिबात नाही म्हणून आपण विचारात पडलो आहोत. त्यात पुन्हा ती 'गोरी'ही आहेच, ह्या गोष्टीचा आपल्यावर प्रकर्षाने प्रभाव पडतच आहे.
आता द्विधा मनस्थिती झाली. एका भलत्याच संस्कृतीमधील जेमतेम चोवीस वर्षांचे आयुष्य जगलेली युवती येऊन काहीबाही बोलते ह्याने आपण विचारात पडावे की आपल्याकडील बहुतांशी स्त्रिया ज्या विचारांच्या पुरस्कर्त्या आहेत त्यांचे 'त्या येथल्याच असणे' हे क्वॉलिफिकेशन ध्यानात घेऊन पॉलाचे म्हणणे झटकून टाकावे!
मग 'आपण -येथल्या- बायकांशी कसे वागतो' ह्यावर विचार करून पाहिला. मला जाणवले की मी त्यांना 'बायका' म्हणून वागवतो. बायका 'बायका' आहेत हे मनात प्रथम येते आणि 'म्हणून मग कसे वागायला हवे' ह्याचा साचा पुढचे वर्तन सुचवत जातो. मी पॉलाचे म्हणणे 'एका बाईचे म्हणणे' म्हणून का नाही विचारात घेतले ह्यावर विचार केल्यावर जाणवले की 'पॉलाच्या म्हणण्याला मी एखाद्या भारतीय स्त्रीच्या म्हणण्यापेक्षा अधिक महत्व अॅटॅच केलेले होते'. ह्यामागे स्कीन कलर, अतीप्रगत देशातील स्त्री वगैरे दिखाऊ कारणे तर असतीलच, पण त्याहीपेक्षा एक अशी अपेक्षा होती की 'प्रगत' संस्कृतीमधील ही युवती 'बाई' ह्या विषयाचे एक अतिशय वेगळेच स्वरूप सादर करून आपल्या जुनाट 'स्त्रीकेंद्रीत' विचारांमध्ये एक नावीन्याचा अंश आणू शकेल. कदाचित, तिने काहीतरी धीट विधान करून आपल्या पुरुषी मनाचा एक दुर्गम कोपरा सुखावावा अशी सुप्त इच्छा असावी!
बहुधा, मी पॉलालाही एक बाई म्हणूनच बघत होतो. अर्थात माझे सध्याचे कामच ते आहे की बायकांना भेटणे, त्यांच्या मुलाखती घेणे वगैरे! आणि त्या बायका जेव्हा माझ्याशी मनमोकळेपणाने बोलतात तेव्हा 'आपण एका पुरुषाशी बोलत आहोत' ह्याची जाणीव ठेवून किंचित अधिकच बोल्ड होऊन बोलतात हे चक्क खरे आहे. पण हे सगळे करत असताना आपण एका बाईला भेटत आहोत ही भावना मनात राहतेच राहते.
भारतामध्ये, एक पुरुष म्हणून, मला अजूनही बाईला आधी बाई म्हणून वागवण्याची सवय आहे.
एखाद्या बाईला निव्वळ एक माणूस मानून मी हवे ते बोलू शकत नाही.
तिला तिचे बाईपण बहाल केल्याशिवाय मला माझे मीपण मिळतच नाही इथे.
मी जेव्हा एखाद्या बाईला तिचे 'बाई'त्व मान्य करून तू खूप सुंदर आहेस आणि तुला पाहून तुझ्यावर तात्काळ भाळावेसे वाटत आहे हे - अतिशय मोकळेपणाने - म्हणतो, तेव्हा त्या बाईला एक 'बाई' म्हणून ते ऐकायला आवडेल ह्याची मला खात्री असते. एक 'माणूस' म्हणून ऐकायला आवडेल असे नव्हे!
आता आता तर असे वाटायला लागले आहे की येथील बायका, बायका म्हणून आपले अस्तित्व जपतात ह्यामुळेच इतर प्रदेशांतील 'माणूस' होऊन जगणार्या बायकांना 'माणूस' होणे शक्य होते.
ते अलाहिदाच!
पण गोची अशी आहे, की पॉलाचे म्हणणे असे होते, की बाईला बाई म्हणण्याआधी माणूस म्हणा आणि वागा! तिला जितका देता त्यापेक्षा अधिक आदर द्या.
म्हणजे काय करायचे? नेमके करायचे काय? जिथल्या बायकांच्या मते त्यांची पहिली ओळख 'एक बाई' अशी आहे तिथे नेमके काय करायचे?
बाईला माणूस म्हणून वागवल्यावर अश्लीलच बोलता यायला हवे असे मुळीच नाही. पण सहज खांद्यावर हात टेकवता येतो का? 'गप साले' म्हणून खांद्यावर बुक्की मारता येते का? "चल आज बसायचे का" असे म्हणता येते का? ". "ए, येते का कोपर्यावर बिडी मारायला" अशी हाक मारता येते का? "काय ट्रॅफीक होते भेंच्योद" असे म्हणता येते का?
पण तरीही बायकांना जाळले जाते, त्यांचे शोषण होते. आणि हे तर तिथेही होते आणि प्रचंड प्रमाणावर होते असे तिचे म्हणणे आहे.
मग पॉला, यू आर राँग!
इथे स्त्री अधिक सुरक्षित आहे असे मला वाटते. कुटुंबव्यवस्था मोठ्या प्रमाणावर असल्याचाही काही ना काही परिणाम आहेच सकारात्मक! आणि मुळातच लोकसंख्या तुमच्या कित्येक पटीने असल्यामुळे गुन्ह्यांची संख्याही कित्येक पट असू शकेल. पण ओव्हरऑल, वुई ट्रीट वूमन अॅज अ वूमन!
फक्त दुर्दैवाने ह्या विधानाचे दोन्ही अर्थ होतात, चांगले आणि वाईट! चांगला अर्थ, वूमन इज अ सुपरह्यूमन आणि वाईट अर्थ 'वूमन इज अ वूमन फर्स्ट अॅन्ड देन अ ह्यूमन'!
आम्ही एक समाज म्हणून आज कसे आहोत हा वेगळा भाग आहे, पण आम्ही कसे असायला हवे आहे ह्याच्या परिभाषा येथे अतिशय व्यवस्थित नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि त्या पाळायला हव्यात ह्याचे भान तळागाळापर्यंत पोचलेले आहे केव्हाचेच!
सो, आय मेड अ मिसटेक! दॅट आय आस्क्ड 'यू' धिस क्वेश्चन!
मला वाटते, भारतीय स्त्री इतर देशांतील स्त्रियांच्या तुलनेत अधिक सुरक्षित वातावरणात आहे.
===============
-'बेफिकीर'!
हतोडावाला, शिक्षणामुळे
हतोडावाला,
शिक्षणामुळे ???
मुलगी शिकली अधोगती झाली ... वाह !
सुपर लाईक
सुपर लाईक
स्ञीनी पुरूषाला सूख (शरीर,
स्ञीनी पुरूषाला सूख (शरीर, सेवा इ.)देणे व त्या बदल्यात पुरूषाने स्ञीला सुरक्षा देणे हा नैसर्गीक नियम आहे.
स्ञी पूरूष जेंव्हा मिठी मारतात तेंव्हा दोघांच्या फीलींग्स भीन्न अलतात. पुरूष सुखावत असतो तर स्ञी सुरक्षीततेचा अनुभव घेत असते. शिक्षणामुळे खेचून ताणून निसर्ग नियमाला छेद देण्याचे काम चालू आहे. >>>
वैचारिक दिवाळखोरी . पण ती लोकांसमोर जाहीर करायची काय गरज आहे ?
स्ञ या जोडाक्षराचा उच्चार कसा
स्ञ या जोडाक्षराचा उच्चार कसा करायच? त्र = त + र होतो. हे सोडून कॅपिटल वाय का दाबताहात?
>> कॅपिटल वाय का
>> कॅपिटल वाय का दाबताहात?
वाय क्रोमोसोम किती भारी असतो हे दाखवायला बहुतेक.
स्वाती, ग्रेट!
स्वाती, ग्रेट!
मी जेव्हा हा लेख वाचला तेव्हा
मी जेव्हा हा लेख वाचला तेव्हा एकही प्रतिसाद आला नव्हता आणि मला ही लिहावासा वाटला नाही. अनुल्लेखाने मारणे हेच बेस्ट आहे अशा लेखांसाठी. .
बे.फी. तुम्हाला नेमके काय
बे.फी. तुम्हाला नेमके काय म्हणायचय ते लक्षात आलयं बहुधा. पण तुम्हाला जर स्त्रीस स्त्री म्हणुन वागवले म्हणुन ती सुरक्षित होते असे वाटत असेल तर, विचारप्रक्रीया आणि काढलेले निष्कर्ष यात थोडी गल्लत आहे. स्त्रीस एक माणुस म्हणुन, एक स्वतंत्र व्यक्ती म्हणुन वागवणे अपेक्षित आहे आणि भारतातच काय पण परदेशातही, इतकी आदर्श स्थिती नाही. त्यामुळे स्त्री भारत काय किंवा इतर देश काय, आदर्श सुरक्षित वातावरणात नाहीच. तुलनात्मक ती परदेशात अधिक स्वावलंबी आणि म्हणुन अधिक समर्थ आहे. आता तुमच्याच लेखात एक कॅनेडियन युवती शिवशाहीशी निगडीत विषयावर पुण्यात येवुन काम करते आहे, याच्या विरुध्द किती सर्वसामान्य मराठी मुली कॅनडात जावुन तिथल्या एखाद्या ऐतिहासीक विषयावर काम करतील? मराठी मुली ते नक्कीच करु शकतात, तेवढी कुवत त्यांच्यात आहेच, पण त्यांना तश्या किती संधी मिळतात/उपलब्ध असतात? किती जणीना आपल्या समाजाने तेवढे सशक्त केले आहे?
संध्या ???? किती मिळतात -
संध्या ???? किती मिळतात - अवांतर पण राहावले नाही म्हणुन
मुलींनो, हतोडावाला हे
मुलींनो, हतोडावाला हे आपल्यापैकी कोणाचेही नातेवाईक (i hope so) नसल्याचा आनंद मी व्यक्त करते आहे.
बेफि - तुम्ही नक्की काय लिहिलं आहे जरा सविस्तर सांगाल का/
सडेतोड, "संध्या" टायपो
सडेतोड, "संध्या" टायपो सुधरवलाय आता. लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
किती दिवसांनी मा बोवर आले.
किती दिवसांनी मा बोवर आले. म्हट्लं अरे वा व आता काय नवीन मिसटेक?

हा लेख नक्की बेफींनी लिहिलाय का? एकतर दोन स्क्रोल्स मधे लेख संपला. दुसरं, भारतिय पुरुषांचं जाऊ दे, तुम्हीसुधा काहीच सनसनाटी घडवलं नाहीत लेखात. आणि तिसरं नेहमी तुमच्या लिखाणात असतात तशी स्फोटक पण " हो यार असं होउ शकतं" टाईप वाक्यं पण सापडली नाहीत.
नवीन निरिक्षणं पण नाहीत. तुम्ही सोडा पॉला म्हणाली त्यात पण काही नवीन नाहीय. सगळ्या जगाला माहीतिय ते. त्यात आत्ता एवढं विचारात पडण्यासारखं काय?
>> आता आता तर असे वाटायला लागले आहे की येथील बायका, बायका म्हणून आपले अस्तित्व जपतात ह्यामुळेच इतर प्रदेशांतील 'माणूस' होऊन जगणार्या बायकांना 'माणूस' होणे शक्य होते.
हे अगदी जुन्या मराठी सिनेमांमधे शिकलेल्या शेरातल्या सुना दुष्ट आणि गावातल्या अडाणी खूप मायाळू आणि सासूसासर्यांची सेवा करणार्या असलं cheesy, hilarious division असायचं तसल कैच्या कै वाटतंय.
का म्हणे? काय संबंध? इथल्या बायका अशा जगल्या म्हणून तिकडच्या तशा कशा जगू शकतात? आपले पुरुष weekly visits करून तिथल्या बायकांना चांगलं वागवून येतात आणि इथ ल्या बाय कांवर frustration काढतात का काय ? logic च कळलं नाही. एवढं फक्त explain करा.
चेतन, ही वस्तुस्थिती आहे.
चेतन,
ही वस्तुस्थिती आहे. पुरुषांचे इतर पुरुषांशी आणि स्त्रियांशी असणारे वागणे नक्कीच भिन्न असते. इतकेच काय फक्त पुरुषांच्या गटात वावरताना आणि स्त्री पुरुषांच्या मिश्र गटात वावरतानाही पुरुषांची वर्तणूक बरीच भिन्न असते. लेखक म्हणतात तसे या विधानाचेही दोन्ही अर्थ होतात हे देखील तितकेच खरे आहे.
आधी चांगल्या अर्थाने पाहूयात.
मला चांगले स्मरते. मी १९९६ ते २००१ या कालखंडात बजाज टेम्पो लिमिटेड या कारखान्यात कामाला होतो. ११७ एकर परिसरात विविध प्लॅंट्स आणि कार्यालये पसरलेली. सेन्ट्रल मेन्टेनन्स प्लॅनिंग नावाच्या विभागात मी काम करीत असल्याने माझा संपूर्ण कारखान्याच्या सर्व विभागांमध्ये संचार असे. त्यामुळे मला पूर्ण कारखान्यातील वेगवेगळ्या विभागांमध्ये असणार्या विविध संस्कृतींचे दर्शन होत असे. सर्वच प्लॅंट्स मध्ये प्रत्यक्ष यंत्रावर काम होते तिथे काम करणारे फक्त पुरुषच. अनेक कार्यालयामध्य़े देखील पुरुषच. फक्त एका टोकाला असलेल्या ईडीपी (ईलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग) आणि मनुष्यबळ विकास विभागात अत्यल्प संख्येने महिला. कारखान्यात एकूण सहा हजारांवर पुरुष आणि केवळ पंधरा महिला असे अतिव्यस्त प्रमाण. प्लॅन्ट (शॉप फ्लोअर) वर फक्त पुरुषच असल्याने त्यांच्या वागण्यात एक प्रकारची बेफिकिरी आढळत असे. यंत्रांवर काम करताना उकाडा असल्याने शर्ट काढून फक्त बनियन वर वावरणे. सहकार्यांसोबत संवाद साधताना मोठ्याने हसणे, ओरडणे. बोलताना शिव्यांचा मुक्त वापर असणे, इत्यादी. तिमाहीत एखादे वेळी दुपारच्या भोजनानंतर निवांत क्षणी शॉप फ्लोअरवर काही माहिती घेण्याकरिता मनुष्यबळ विभागातून एक दोन महिला कर्मचारी येत तेव्हा पुरुष कामगारांची चांगलीच तारांबळ उडे. घाईघाईत शर्ट अंगावर चढविणे, तोंडातील गुटखा, तंबाकू इत्यादी स्पिटून मध्ये थुंकणे, वेषभूषा, केशभूषा नीटनेटकी करणे, मुख्य म्हणजे तोंडातून बाहेर पडणार्या शब्दांवर नियंत्रण ठेवणे. पंधरा वीस मिनीटांनी जेव्हा या महिला कर्मचारी तिथून निघून जात तेव्हा पुरुष कर्मचार्यांना हायसे वाटत असे. या महिला विशी-पंचविशीतल्या असल्या तरी पन्नाशीतले कर्मचारीही त्यांना मिस / मॅडम अशी संबोधने वापरून आदरार्थी वचनात बोलत असत. याउलट कधी बीपीआर (बिझनेस प्रोसेस रिइन्जिनीअरिंग) किंवा आईईडी (ईंडस्टीअल इंजिनीअरिंग डिपार्टमेंट) मधील एम्बीए तरूण शॉप फ्लोअर वर आले तर त्यांची पुरुष कर्मचार्यांसोबत चांगलीच बाचाबाची (पु.लं. च्या म्हणण्याप्रमाणे बा-चा-बा-ची) होत असे.
तसेच फक्त पुरुष कर्मचार्यांच्या सहली निघत तेव्हा सहलीतही हे पुरुष मस्त बेहोष होऊन वागत. शर्ट काढून नाचणे, दारू पिणे, अचकट विचकट गाणी म्हणणे नाच करणे इत्यादी उद्योग करीत. परंतु कधी जर सहलीत कुटुंबीय (पक्षी कर्मचार्यांच्या बायका) सामील झाल्या किंवा ज्या विभागांमध्ये महिलाही आहेत अशा विभागांच्या सहलींमध्ये जिथे स्त्री-पुरुष एकत्र असत, तिथे पुरुषांच्या वागण्यात कमालीचा फरक दिसून येई. सोबतच्या महिलांना कुठलाही त्रास होणार नाही, त्यांची सुरक्षितता पाहिली जाईल याची जबाबदारी सर्व पुरूष घेत.
वरील उदाहरणांत दिसून येते की पुरुषांनी इतर पुरुषांना दिलेली वागणूक आणि इतर महिलांना दिलेली वागणूक निश्चितच वेगळी आहे आणि तीही चांगल्या अर्थाने.
आता वाईट अर्थाने पाहूयात.
महाबळेश्वर, ताम्हिणी घाट, लोणावळा अशा अनेक ठिकाणच्या सहलींना मी गेलो आहे. तिथे गटागटांनी येणार्या अनेक (अनेक म्हणजे सर्वच नव्हे) पुरुष मंडळींचे वर्तन कसे असते याचे निरीक्षण देखील केले आहे. ते इथे नोंदवितो. पुरुषांचा एक गट दुसर्या गटासमोर आला आहे. फार तर एकमेकांना हाय हॅलो / नमस्कार चमत्कार होईल, किंवा काहीच होणार नाही, सरळ दुर्लक्ष करतील. याउलट पुरुषांच्या एका गटासमोर दुसरा केवळ महिलांचा गट आलाय आणि तोही संपूर्ण अनोळखी... मग काय होईल? पुरुष मंडळी काहीतरी अचकट विचकट बोलतील, अश्लील गाणी गातील, किंचाळतील, मग महिलांचा गट त्रासून निघून जाईल.
थोडक्यात काय पुरुष इतर पुरुषांना देतील त्यापेक्षा वेगळी वागणूक महिलांना देतात ही वस्तुस्थिती. संस्कारी पुरुष चांगली, उच्च दर्जाची वागणूक देतील. तर संस्कारहीन पुरुष संस्काराच्या अभावामुळे खराब वागणूक देतील. बेफिकीर ह्यांनी जे दोन वाक्यांत सांगितले ते इतरांना न कळल्याने मला इतके विस्ताराने सांगावे लागले.
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
आज सहज या धाग्यावरचे प्रतिसाद वाचायला घेतले तेव्हा ईतरांपेक्षा वेगळा असा आपला भलामोठा प्रतिसाद नजरेस पडल्याने आवर्जून वाचला, त्यातील एक भाग इथे डकवतोय.
तुम्ही जे वर दोन प्रकार वर्तवले आहेत त्यात पुरुषी वृत्ती बदलली नाही तर स्थळकाळाचे असलेले भान सोयीनुसार ठेवले आहे. जिथे इमेज जपायची असते तिथे सारेच संत बनून राहतात, खरी कसोटी लागते ती संधीचा दुरुपयोग तर नाही ना करत यावरून ..
तसेही आपल्या पहिल्या उदाहरणातील पुरुषांची वर्तणूकही मला चुकीचीच वाटली. पण ठिक आहे, फारश्या अपेक्षा नाही ठेवू शकत आपण सर्वांकडून ..
(No subject)
स्ञीनी पुरूषाला सूख (शरीर,
स्ञीनी पुरूषाला सूख (शरीर, सेवा इ.)देणे व त्या बदल्यात पुरूषाने स्ञीला सुरक्षा देणे हा नैसर्गीक नियम आहे.
स्ञी पूरूष जेंव्हा मिठी मारतात तेंव्हा दोघांच्या फीलींग्स भीन्न अलतात. पुरूष सुखावत असतो तर स्ञी सुरक्षीततेचा अनुभव घेत असते. शिक्षणामुळे खेचून ताणून निसर्ग नियमाला छेद देण्याचे काम चालू आहे.>>
बापरे.. हे वाचून घाबरलेच..अजून किती शतके बिचा-या शिक्षणाला दोष देत फिरणार आहात? सरळ सांगा ना उच्चशिक्षित मुलींच्या 'ख-या' सुधारित विचारांमुळे तुम्हाला असुरक्षितता वाटते..
हि पॉला म्हणजे bhadipa ची
हि पॉला म्हणजे bhadipa ची संस्थापक का ?
Pages