आय मेड अ मिसटेक

Submitted by बेफ़िकीर on 10 September, 2014 - 12:22

मध्यंतरी कामानिमित्त पॉला नावाच्या कॅनेडियन युवतीशी संवाद साधण्याचा योग आला. ती चक्क पुण्यात येऊन एक मराठी फीचर फिल्म बनवत आहे जिचा विषय शिवरायांच्या काळाशी निगडीत असून ती फिल्म ऑगस्ट २०१५ मध्ये प्रदर्शीत होणार आहे. विषय अत्यंत दिलचस्प आहे पण व्यावसायिक कारणांमुळे तो येथे नोंदवणे अयोग्य आहे. तिचे आडनांवही येथे न देण्याचे कारण तेच आहे.

पॉलाने फिल्म मेकिंग हे क्षेत्र का निवडले, भारत का निवडला, मराठी भाषा का निवडली, पुणे का निवडले, शिवशाहीशी निगडीत विषय का निवडला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला यथावकाश देता येतील.

ह्या मुलाखतीदरम्यान चित्रपटनिर्मीती व्यतिरिक्तची चर्चा कॅनेडियन व भारतीय महिला ह्यांची तुलना वर्तणूक, संस्कार, स्वातंत्र्य, कौटुंबिक'ता', सौंदर्याच्या परिभाषा, पोषाख अश्या निकषांवर झाली.

चर्चेच्या शेवटी शेवटी मी विचारलेला प्रश्न फारच नि:संदिग्ध होता.

"एक संदेश, जो तू भारतीय मुली व स्त्रियांना देऊ पाहात असशील, तो कोणता?"

हा प्रश्न तिला विचारणे हा निव्वळ मुलाखतीचा एक भाग होता. ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यास ती पात्र आहे किंवा नाही हा विचार मी केलेला नव्हता.

त्यावर पॉलाचे उत्तर तत्परतेने आले. ती म्हणाली,

"डिमांड अ‍ॅन्ड एक्स्पेक्ट मोअर रिस्पेक्ट फ्रॉम अदर्स"

अनेक दिवस ह्या उत्तराने विचारात पाडले होते.

'असे कसे होऊ शकेल' ह्या शंकेने नव्हे, 'नेमके काय बदलायला लागेल' ह्या शंकेने!

'पॉला', एक 'गोरी' युवती असे म्हणाली म्हणून आपण विचारात पडलो आहोत का हाही विचार करून पाहिला. तेव्हा पटले की 'हो', ती गोरी आहे म्हणून आणि गोरी वा काळी काहीही असो पण, ती ह्या संस्कृतीतील अजिबात नाही म्हणून आपण विचारात पडलो आहोत. त्यात पुन्हा ती 'गोरी'ही आहेच, ह्या गोष्टीचा आपल्यावर प्रकर्षाने प्रभाव पडतच आहे.

आता द्विधा मनस्थिती झाली. एका भलत्याच संस्कृतीमधील जेमतेम चोवीस वर्षांचे आयुष्य जगलेली युवती येऊन काहीबाही बोलते ह्याने आपण विचारात पडावे की आपल्याकडील बहुतांशी स्त्रिया ज्या विचारांच्या पुरस्कर्त्या आहेत त्यांचे 'त्या येथल्याच असणे' हे क्वॉलिफिकेशन ध्यानात घेऊन पॉलाचे म्हणणे झटकून टाकावे!

मग 'आपण -येथल्या- बायकांशी कसे वागतो' ह्यावर विचार करून पाहिला. मला जाणवले की मी त्यांना 'बायका' म्हणून वागवतो. बायका 'बायका' आहेत हे मनात प्रथम येते आणि 'म्हणून मग कसे वागायला हवे' ह्याचा साचा पुढचे वर्तन सुचवत जातो. मी पॉलाचे म्हणणे 'एका बाईचे म्हणणे' म्हणून का नाही विचारात घेतले ह्यावर विचार केल्यावर जाणवले की 'पॉलाच्या म्हणण्याला मी एखाद्या भारतीय स्त्रीच्या म्हणण्यापेक्षा अधिक महत्व अ‍ॅटॅच केलेले होते'. ह्यामागे स्कीन कलर, अतीप्रगत देशातील स्त्री वगैरे दिखाऊ कारणे तर असतीलच, पण त्याहीपेक्षा एक अशी अपेक्षा होती की 'प्रगत' संस्कृतीमधील ही युवती 'बाई' ह्या विषयाचे एक अतिशय वेगळेच स्वरूप सादर करून आपल्या जुनाट 'स्त्रीकेंद्रीत' विचारांमध्ये एक नावीन्याचा अंश आणू शकेल. कदाचित, तिने काहीतरी धीट विधान करून आपल्या पुरुषी मनाचा एक दुर्गम कोपरा सुखावावा अशी सुप्त इच्छा असावी!

बहुधा, मी पॉलालाही एक बाई म्हणूनच बघत होतो. अर्थात माझे सध्याचे कामच ते आहे की बायकांना भेटणे, त्यांच्या मुलाखती घेणे वगैरे! आणि त्या बायका जेव्हा माझ्याशी मनमोकळेपणाने बोलतात तेव्हा 'आपण एका पुरुषाशी बोलत आहोत' ह्याची जाणीव ठेवून किंचित अधिकच बोल्ड होऊन बोलतात हे चक्क खरे आहे. पण हे सगळे करत असताना आपण एका बाईला भेटत आहोत ही भावना मनात राहतेच राहते.

भारतामध्ये, एक पुरुष म्हणून, मला अजूनही बाईला आधी बाई म्हणून वागवण्याची सवय आहे.

एखाद्या बाईला निव्वळ एक माणूस मानून मी हवे ते बोलू शकत नाही.

तिला तिचे बाईपण बहाल केल्याशिवाय मला माझे मीपण मिळतच नाही इथे.

मी जेव्हा एखाद्या बाईला तिचे 'बाई'त्व मान्य करून तू खूप सुंदर आहेस आणि तुला पाहून तुझ्यावर तात्काळ भाळावेसे वाटत आहे हे - अतिशय मोकळेपणाने - म्हणतो, तेव्हा त्या बाईला एक 'बाई' म्हणून ते ऐकायला आवडेल ह्याची मला खात्री असते. एक 'माणूस' म्हणून ऐकायला आवडेल असे नव्हे!

आता आता तर असे वाटायला लागले आहे की येथील बायका, बायका म्हणून आपले अस्तित्व जपतात ह्यामुळेच इतर प्रदेशांतील 'माणूस' होऊन जगणार्‍या बायकांना 'माणूस' होणे शक्य होते.

ते अलाहिदाच!

पण गोची अशी आहे, की पॉलाचे म्हणणे असे होते, की बाईला बाई म्हणण्याआधी माणूस म्हणा आणि वागा! तिला जितका देता त्यापेक्षा अधिक आदर द्या.

म्हणजे काय करायचे? नेमके करायचे काय? जिथल्या बायकांच्या मते त्यांची पहिली ओळख 'एक बाई' अशी आहे तिथे नेमके काय करायचे?

बाईला माणूस म्हणून वागवल्यावर अश्लीलच बोलता यायला हवे असे मुळीच नाही. पण सहज खांद्यावर हात टेकवता येतो का? 'गप साले' म्हणून खांद्यावर बुक्की मारता येते का? "चल आज बसायचे का" असे म्हणता येते का? ". "ए, येते का कोपर्‍यावर बिडी मारायला" अशी हाक मारता येते का? "काय ट्रॅफीक होते भेंच्योद" असे म्हणता येते का?

पण तरीही बायकांना जाळले जाते, त्यांचे शोषण होते. आणि हे तर तिथेही होते आणि प्रचंड प्रमाणावर होते असे तिचे म्हणणे आहे.

मग पॉला, यू आर राँग!

इथे स्त्री अधिक सुरक्षित आहे असे मला वाटते. कुटुंबव्यवस्था मोठ्या प्रमाणावर असल्याचाही काही ना काही परिणाम आहेच सकारात्मक! आणि मुळातच लोकसंख्या तुमच्या कित्येक पटीने असल्यामुळे गुन्ह्यांची संख्याही कित्येक पट असू शकेल. पण ओव्हरऑल, वुई ट्रीट वूमन अ‍ॅज अ वूमन!

फक्त दुर्दैवाने ह्या विधानाचे दोन्ही अर्थ होतात, चांगले आणि वाईट! चांगला अर्थ, वूमन इज अ सुपरह्यूमन आणि वाईट अर्थ 'वूमन इज अ वूमन फर्स्ट अ‍ॅन्ड देन अ ह्यूमन'!

आम्ही एक समाज म्हणून आज कसे आहोत हा वेगळा भाग आहे, पण आम्ही कसे असायला हवे आहे ह्याच्या परिभाषा येथे अतिशय व्यवस्थित नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि त्या पाळायला हव्यात ह्याचे भान तळागाळापर्यंत पोचलेले आहे केव्हाचेच!

सो, आय मेड अ मिसटेक! दॅट आय आस्क्ड 'यू' धिस क्वेश्चन!

मला वाटते, भारतीय स्त्री इतर देशांतील स्त्रियांच्या तुलनेत अधिक सुरक्षित वातावरणात आहे.

===============

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यातल्या 'ह्यामुळेच' शब्दाचा अर्थं कुणाला कळल्यास मला पण सांगा.

>>साती, तुला ह्यामुळेचचा अर्थ लागला की मला त्या सबंध वाक्याचा अर्थ सांग.

लेखाची समजवासमजवी कृपया मेलमधून सिक्रेटली करू नका. मलाही गरज आहे.

>>पॉलाने फिल्म मेकिंग हे क्षेत्र का निवडले, भारत का निवडला, मराठी भाषा का निवडली, पुणे का निवडले, शिवशाहीशी निगडीत विषय का निवडला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला यथावकाश देता येतील.>> हे पुढच्या भागात येईल का? वाचायला आवडेल पण क्रमशः दिसलं नाही.

रीया, बेफिकीरांच्या लेखावर 'बाकी चालू द्या' म्हणायचं नसतं. त्यांना भयंकर राग येतो त्याचा. पण आता तू म्हटलं आहेस म्हणून चालेल कदाचित. Happy

सशलला अनुमोदन.

इथे स्त्री अधिक सुरक्षित आहे असे मला वाटते. कुटुंबव्यवस्था मोठ्या प्रमाणावर असल्याचाही काही ना काही परिणाम आहेच सकारात्मक! <<< सौदी अरेबियाला जावे लागणार म्हटल्यावर त्या देशासंबंधी माहिती वाचताना एका फोरमवर एका अमेरिका/युरोपस्थित अरेबियन स्त्रीने असेच काहीसे लिहिल्याचे आठवले. बाहेरच्या जगातल्या तुम्हाला असे वाटत असेल की आमच्या देशातल्या स्त्रियांवर अन्याय होतो, स्वातंत्र्य नाही, किंवा योग्य वागणूक दिली जात नाही, परंतु असे काही नाही, आम्हाला आमच्या देशातच सर्वाधिक सुरक्षित वाटते. त्याची आठवण झाली. Happy

>>> चर्चेच्या शेवटी शेवटी मी विचारलेला प्रश्न फारच नि:संदिग्ध होता.
यात काहीतरी गडबड वाटते. त्यात काय नि:संदिग्ध?

तसंच शीर्षका़त 'मिस्टेक' आहे.

बाकी (रिया म्हणते चालू द्या तर) चालू द्या. Proud

>>> चर्चेच्या शेवटी शेवटी मी विचारलेला प्रश्न फारच नि:संदिग्ध होता.
यात काहीतरी गडबड वाटते.

फक्त एवढ्या एकाच वाक्यात काहीतरी गडबड वाट्तेय? Proud

>> तिचे आडनांवही येथे न देण्याचे कारण तेच आहे.

"paula canada marathi film" असं गुगल केलं की सगळे संदर्भ मिळतात. कशाला उगाच आपल्याकडे मोठ्ठं शिक्रेट आहे असा आव आणायचा.

सगळाच लेख आवर्जून टीका करावी इतका पूर्ण गंडला आहे.

हे पहा, लेखक तिकडे गगनबावड्याचे फोटो टाकण्यात मग्न आहेत. एकूण इथला वावर बघता एक पोस्ट लिहून गप्प बसण्याचं त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड नाही, तरीही ते इथे पुन्हा फिरकलेले नाहीत! तेव्हा काय ते ओळखा आणि आपापल्या कामाला जावा मंडळी Happy

लेख नाही आवडला.

आता आता तर असे वाटायला लागले आहे की येथील बायका, बायका म्हणून आपले अस्तित्व जपतात ह्यामुळेच इतर प्रदेशांतील 'माणूस' होऊन जगणार्‍या बायकांना 'माणूस' होणे शक्य होते. >>??????

" भारतीय स्त्री इतर देशांतील स्त्रियांच्या तुलनेत अधिक सुरक्षित वातावरणात आहे."

Do not agree with this last statement at all...

Title is perfect though... "Yes, (you) made a mistake" writing this article in this way...

Laka laka laka, yevhadha partisad kasala mhun tichkyav kela tar hita...

Apla haat bhari, laat bhari, chya mayala saglach lay bharee... chalalay

त्यावर पॉलाचे उत्तर तत्परतेने आले. ती म्हणाली,

"डिमांड अ‍ॅन्ड एक्स्पेक्ट मोअर रिस्पेक्ट फ्रॉम अदर्स">> एवढच कळल!!

एखाद्या बाईला निव्वळ एक माणूस मानून मी हवे ते बोलू शकत नाही.>>>>>> आणि माणूस म्हणून बोलायला विषय काय निवडला तर "बिडी मारायला येतेस का?" " आज बसायचं का?". हे असे विषय आहेत ज्यात खरं किती बायकांना माणूस म्हणून वागणूक हवी आहे? हे म्हणजे वूमन्स सफ्रेज मूव्मेंट बायकांनी आम्हाला पण तुमच्या सारख्या फकाफक सिगरेटी ओढता याव्यात किंवा आम्हालाही मस्त तुमच्यासारखं प्यायला बसता यावं किंवा तुमच्या सारख्या कच्कावून आई बहिणींवरुन शिव्या देता याव्यात ह्या करता घडवून आणली असं म्हणण्यासारखं आहे. Lol

इतर ही बरेच महत्वाचे विषय आहेत ज्यात आपल्याकडे भारतात बायकांना माणूस समजून वागवण्यात येत नाही. हे मध्येच बाईचे बाईपण अन तिच्या सौदंर्यावर भाळायचं येडछाप लटांबर कुठून आणलत? काय संबंध त्याचा ती पॉला की कोण आहे तिच्या उत्तराशी? आणि त्यावरुन परत बायका भारतात सुरक्षित आहेत हा बादरायण संबंध कसा काय लावलात?

श्या: आजकाल पुर्वी सारखे वादविवाद होत नाहीत मायबोलीवर ....>>>>.मग पूर्वी काय कडाडुन भान्डणे व्हायची का?:फिदी:

>> पॉलाचे म्हणणे असे होते, की बाईला बाई म्हणण्याआधी माणूस म्हणा आणि वागा! तिला जितका देता त्यापेक्षा अधिक आदर द्या >>

एवढेच पटले .
बाकीचा लेख परत वाचावा की काय या विचारात . हो ,वाचनात निसंदिग्धता ठेवली नाही असं व्हायला नको.
Proud

५८ प्रतिसाद आणि तेही सारेच्या सारे विरोधी सूर लावणारे? वाचून सखेद आश्चर्य वाटले.

<< ओव्हरऑल, वुई ट्रीट वूमन अ‍ॅज अ वूमन!

फक्त दुर्दैवाने ह्या विधानाचे दोन्ही अर्थ होतात, चांगले आणि वाईट! चांगला अर्थ, वूमन इज अ सुपरह्यूमन आणि वाईट अर्थ 'वूमन इज अ वूमन फर्स्ट अ‍ॅन्ड देन अ ह्यूमन'! >>

ही वस्तुस्थिती आहे. पुरुषांचे इतर पुरुषांशी आणि स्त्रियांशी असणारे वागणे नक्कीच भिन्न असते. इतकेच काय फक्त पुरुषांच्या गटात वावरताना आणि स्त्री पुरुषांच्या मिश्र गटात वावरतानाही पुरुषांची वर्तणूक बरीच भिन्न असते. लेखक म्हणतात तसे या विधानाचेही दोन्ही अर्थ होतात हे देखील तितकेच खरे आहे.

आधी चांगल्या अर्थाने पाहूयात.

मला चांगले स्मरते. मी १९९६ ते २००१ या कालखंडात बजाज टेम्पो लिमिटेड या कारखान्यात कामाला होतो. ११७ एकर परिसरात विविध प्लॅंट्स आणि कार्यालये पसरलेली. सेन्ट्रल मेन्टेनन्स प्लॅनिंग नावाच्या विभागात मी काम करीत असल्याने माझा संपूर्ण कारखान्याच्या सर्व विभागांमध्ये संचार असे. त्यामुळे मला पूर्ण कारखान्यातील वेगवेगळ्या विभागांमध्ये असणार्‍या विविध संस्कृतींचे दर्शन होत असे. सर्वच प्लॅंट्स मध्ये प्रत्यक्ष यंत्रावर काम होते तिथे काम करणारे फक्त पुरुषच. अनेक कार्यालयामध्य़े देखील पुरुषच. फक्त एका टोकाला असलेल्या ईडीपी (ईलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग) आणि मनुष्यबळ विकास विभागात अत्यल्प संख्येने महिला. कारखान्यात एकूण सहा हजारांवर पुरुष आणि केवळ पंधरा महिला असे अतिव्यस्त प्रमाण. प्लॅन्ट (शॉप फ्लोअर) वर फक्त पुरुषच असल्याने त्यांच्या वागण्यात एक प्रकारची बेफिकिरी आढळत असे. यंत्रांवर काम करताना उकाडा असल्याने शर्ट काढून फक्त बनियन वर वावरणे. सहकार्‍यांसोबत संवाद साधताना मोठ्याने हसणे, ओरडणे. बोलताना शिव्यांचा मुक्त वापर असणे, इत्यादी. तिमाहीत एखादे वेळी दुपारच्या भोजनानंतर निवांत क्षणी शॉप फ्लोअरवर काही माहिती घेण्याकरिता मनुष्यबळ विभागातून एक दोन महिला कर्मचारी येत तेव्हा पुरुष कामगारांची चांगलीच तारांबळ उडे. घाईघाईत शर्ट अंगावर चढविणे, तोंडातील गुटखा, तंबाकू इत्यादी स्पिटून मध्ये थुंकणे, वेषभूषा, केशभूषा नीटनेटकी करणे, मुख्य म्हणजे तोंडातून बाहेर पडणार्‍या शब्दांवर नियंत्रण ठेवणे. पंधरा वीस मिनीटांनी जेव्हा या महिला कर्मचारी तिथून निघून जात तेव्हा पुरुष कर्मचार्‍यांना हायसे वाटत असे. या महिला विशी-पंचविशीतल्या असल्या तरी पन्नाशीतले कर्मचारीही त्यांना मिस / मॅडम अशी संबोधने वापरून आदरार्थी वचनात बोलत असत. याउलट कधी बीपीआर (बिझनेस प्रोसेस रिइन्जिनीअरिंग) किंवा आईईडी (ईंडस्टीअल इंजिनीअरिंग डिपार्टमेंट) मधील एम्बीए तरूण शॉप फ्लोअर वर आले तर त्यांची पुरुष कर्मचार्‍यांसोबत चांगलीच बाचाबाची (पु.लं. च्या म्हणण्याप्रमाणे बा-चा-बा-ची) होत असे.

तसेच फक्त पुरुष कर्मचार्‍यांच्या सहली निघत तेव्हा सहलीतही हे पुरुष मस्त बेहोष होऊन वागत. शर्ट काढून नाचणे, दारू पिणे, अचकट विचकट गाणी म्हणणे नाच करणे इत्यादी उद्योग करीत. परंतु कधी जर सहलीत कुटुंबीय (पक्षी कर्मचार्‍यांच्या बायका) सामील झाल्या किंवा ज्या विभागांमध्ये महिलाही आहेत अशा विभागांच्या सहलींमध्ये जिथे स्त्री-पुरुष एकत्र असत, तिथे पुरुषांच्या वागण्यात कमालीचा फरक दिसून येई. सोबतच्या महिलांना कुठलाही त्रास होणार नाही, त्यांची सुरक्षितता पाहिली जाईल याची जबाबदारी सर्व पुरूष घेत.

वरील उदाहरणांत दिसून येते की पुरुषांनी इतर पुरुषांना दिलेली वागणूक आणि इतर महिलांना दिलेली वागणूक निश्चितच वेगळी आहे आणि तीही चांगल्या अर्थाने.

आता वाईट अर्थाने पाहूयात.

महाबळेश्वर, ताम्हिणी घाट, लोणावळा अशा अनेक ठिकाणच्या सहलींना मी गेलो आहे. तिथे गटागटांनी येणार्‍या अनेक (अनेक म्हणजे सर्वच नव्हे) पुरुष मंडळींचे वर्तन कसे असते याचे निरीक्षण देखील केले आहे. ते इथे नोंदवितो. पुरुषांचा एक गट दुसर्‍या गटासमोर आला आहे. फार तर एकमेकांना हाय हॅलो / नमस्कार चमत्कार होईल, किंवा काहीच होणार नाही, सरळ दुर्लक्ष करतील. याउलट पुरुषांच्या एका गटासमोर दुसरा केवळ महिलांचा गट आलाय आणि तोही संपूर्ण अनोळखी... मग काय होईल? पुरुष मंडळी काहीतरी अचकट विचकट बोलतील, अश्लील गाणी गातील, किंचाळतील, मग महिलांचा गट त्रासून निघून जाईल.

थोडक्यात काय पुरुष इतर पुरुषांना देतील त्यापेक्षा वेगळी वागणूक महिलांना देतात ही वस्तुस्थिती. संस्कारी पुरुष चांगली, उच्च दर्जाची वागणूक देतील. तर संस्कारहीन पुरुष संस्काराच्या अभावामुळे खराब वागणूक देतील. बेफिकीर ह्यांनी जे दोन वाक्यांत सांगितले ते इतरांना न कळल्याने मला इतके विस्ताराने सांगावे लागले.

लेखकाचा दुसरा मुद्दा

<< मला वाटते, भारतीय स्त्री इतर देशांतील स्त्रियांच्या तुलनेत अधिक सुरक्षित वातावरणात आहे. >>

हाही अनेकांनी अमान्य केलाय. या मुद्याला जरा मी वर दिलेल्या स्पष्टीकरणाशी पडताळून आणि पुन्हा

<< इथे स्त्री अधिक सुरक्षित आहे असे मला वाटते. कुटुंबव्यवस्था मोठ्या प्रमाणावर असल्याचाही काही ना काही परिणाम आहेच सकारात्मक! >>

या संदर्भाने पाहिल्यास पटेल.

बघा म्हणजे पुरुष - पुरुषाशी ज्या पातळीवर वागतो ती सम पातळी धरून तिला शुन्य पातळी म्हणूयात.
चांगला पुरुष - स्त्री शी ज्या पातळीवर वागतो तिला थोडी उच्च पातळी धरून +एक पातळी म्हणूयात
वाईट पुरुष- स्त्री शी ज्या पातळीवर वागतो तिला थोडी निम्न पातळी धरून -एक पातळी म्हणूयात
आता +एक व -एक या पातळीतला फरक लक्षणीय असल्याने भारतातील महिलांना चांगला पुरुष / वाईट पुरुष यातला फरक लगेचच लक्षात येतो. अनेक महिला तर त्या पुरुषांची वाईट नजर चटकन ओळखतात असा ठाम दावा करतात.

पाश्चात्य देशात हा फरक ओळखणे कठीण आहे. वाचा श्री. साहिल शहा यांचा प्रतिसाद. तिथे सर्रास पुरुष इतर पुरुषांप्रमाणे बायकांच्याही खांद्यावर हात घेतात. तेव्हा स्त्रियांना चांगला / वाईट पुरुष ओळखणे कठीण जाते. त्यामुळे इतर देशांप्रमाणेच भारतातही वाईट प्रवृत्तीचे पुरुष असले तरी संस्कृतीतील फरकामुळे धोका चटकन लक्षात येऊन सुरक्षिततेची पातळी वाढते.

शिवाय आपल्याकडे महिला समोरच्या पुरुषाला चटकन दादा / भाऊ / भाईसाब / भैय्या म्हणून संबोधतात. या संबोधनांचा आपल्या कुटुंब व्यवस्थेतील संस्कारांमुळे बहुतांश (काही अतिनीच अपवाद वगळता) पुरुषांवर सकारात्मक परिणाम होतोच.

सबब लेखकाने ही

<< ओव्हरऑल, वुई ट्रीट वूमन अ‍ॅज अ वूमन!

फक्त दुर्दैवाने ह्या विधानाचे दोन्ही अर्थ होतात, चांगले आणि वाईट! चांगला अर्थ, वूमन इज अ सुपरह्यूमन आणि वाईट अर्थ 'वूमन इज अ वूमन फर्स्ट अ‍ॅन्ड देन अ ह्यूमन'! >>

<< मला वाटते, भारतीय स्त्री इतर देशांतील स्त्रियांच्या तुलनेत अधिक सुरक्षित वातावरणात आहे. >>

<< इथे स्त्री अधिक सुरक्षित आहे असे मला वाटते. कुटुंबव्यवस्था मोठ्या प्रमाणावर असल्याचाही काही ना काही परिणाम आहेच सकारात्मक! >>

जी विधान केली आहेत त्यात काहीच चूक नाहीये.

आजवर मी स्त्रियांच्या पुरुषांच्या वर्तणूकीमुळे होणार्‍या समस्यांचा वेध घेणारे जे काही लेख वाचलेत त्या सर्व लेखांहून श्री. बेफिकीर यांचा हा लेख मला सर्वात जास्त प्रामाणिक वाटला आणि म्हणूनच आवडला. इतरांनी नाहक टीका केलेली आहे असे वाटते. गंगाधर गाडगीळांची किडलेली माणसे नावाची एक लघुकथा आठवते. त्यात एक पात्र एक विधान करते आणि त्यावर गाडगीळ म्हणतात त्यांचे बोलणे सर्वांनाच पटले होते आणि म्हणूनच कुणालाच आवडले नव्हते. इथल्या प्रतिसादकांचे असेच काहीसे झाले आहे असे वाटतेय.

इथे लेख टाकून लेखकाला "आय मेड अ मिस्टेक" असे वाटल्यास नवल नाही.

जाता जाता लोकसत्तातला हा एक अग्रलेख.

जल्पकांचा उच्छाद

http://www.loksatta.com/sampadkiya-news/destructive-communication-on-soc...

वस्तुत: भारतीय परंपरेला वाद नवा नाही. उपनिषद काळापासून आपण वादच घालतो आहोत. फार काय, आपल्याकडे न्याय नावाचे दर्शन आहे आणि वादपद्धत हा त्यातील एक विषय आहे. पण हा वाद कसा, तर त्यातून तत्त्वाचा बोध झाला पाहिजे. कारण वाद याचा अर्थच मुळी एखाद्या विषयातील तत्त्व कळावे या हेतूने सुरू केलेली चर्चा असा आहे. आज व्यवहारात वाद या शब्दाला नकारात्म अर्थ असला, तरी खरी धारणा हीच. त्यामुळे जल्प आणि वितण्ड हे वादप्रकार आपल्याकडे दुय्यम मानले गेले. केवळ शब्दाला शब्द वाढविणे, दांडगाई करून चर्चाच बंद पाडणे आणि मग वादात आपलाच जय झाला म्हणून शेखी मिरवणे म्हणजे वितण्ड. तर जल्प म्हणजे आपण कोणताही पुरावा द्यायचा नाही. दुसरा कोठे चूक करतो यावर बारीक लक्ष ठेवायचे आणि ती चूक सापडली रे सापडली की तिचेच भांडवल करून समोरच्याचा पराभव झाला असे म्हणून पुन्हा दांडगाईने चर्चा बंद पाडायची. आज नेमक्या याच वितण्डक आणि जल्पकांनी समाजमाध्यमांतून उच्छाद मांडला आहे. सुसंवादाची प्रेरणाच जणू संपुष्टात येऊ लागली आहे. हे केवळ भारतातीलच चित्र आहे, अशातला भाग नाही. जगात सर्वत्र समाजमाध्यमांतून हेच दिसते. आणि त्याचे एक कारण समाजमाध्यमांचे स्वरूप आणि व्यवस्था हेही आहे. या माध्यमांनी माणसा-माणसांत भाषणसेतू बांधला हे खरे. पण तो आभासीच. अनेकदा तर मायावी. फेसबुकवरच्या मित्र या कल्पनेसारखे. क्षणापूर्वी ओळख-पाळख नसणारी व्यक्तीही तेथे निमिषात आपली मित्र बनते. या अशा माध्यमांना गप्पांचे कट्टे वगैरे म्हटले जाते. त्यातही तसा अर्थ नाही. कट्टय़ांपेक्षा यांना फलाट म्हणावे. फलाटावर अनोळखी व्यक्तीशीही गप्पा रंगू शकतात. ओळख, किमान समानशील ही कट्टय़ांसाठीची अर्हता असते. एकमेकांचा परिचयही नसणाऱ्या व्यक्तींच्या झुंडी तयार करणे हे या समाजमाध्यमांमुळे शक्य झाले आहे. या झुंडी हव्या तशा पळवता येतात, वळवता येतात. पुन्हा सगळ्याच जमावांचे जे वैशिष्टय़ तेही येथे जपले जाते. ते म्हणजे अनामिकता. आपल्याला पाहणारे, ओळखणारे कोणीही नाही, म्हटल्यावर समाजातल्या सज्जनाचाही वानर होण्यास कितीसा वेळ लागतो? आपल्या घराच्या भिंतीआड अनामिकतेचा वा अनोळखीपणाचा बुरखा ओढून संगणकासमोर बसलो, की मग हव्या तशा वानरचेष्टा करण्यास आपण मोकळे. मनात भावनांची हळवी गळवे ठसठसत असतातच. एरवी चारचौघांत ती बोलून दाखविता येतातच असे नाही. समाजाचे भय असते. मूर्खता, अज्ञान उघड होण्याची भीती असते. पण अनामिकतेच्या अंधारात सगळे काही करता येते. आपल्या विरोधातील विचार दिसला की त्याची खिल्ली उडवा, विरोधी मत दिसले की त्यावर तुटून पडा, प्रसंगी शिव्या घाला, असे हे चाललेले असते. राजकीय नेते ही अशा जल्पकांची नेहमीची 'गिऱ्हाइके'. पण केवळ राजकारणीच नव्हे, तर सगळ्यांनाच याचा कधी ना कधी फटका बसला आहे. अण्णा हजारे यांची दुसऱ्या की तिसऱ्या स्वातंत्र्याची लढाई, नुकतीच झालेली निवडणूक या काळात हे प्रामुख्याने दिसले. मार्क्‍सने भले विरोधविकासवाद सांगितला असेल. पण आज कोणाला विरोध नकोच आहे. याल तर आमच्यासह, नाही तर पायच कापून टाकू, ही समाजमाध्यमी पिढीची भाषा बनलेली आहे. हे सारे चिंताजनक आहे. बहुवैचारिकता हे खरेतर समाजाचे बळ. ते संपवून एकसाची आणि एकसुरी समाज बनविण्याची घाई तर आपणांस लागली नाही ना अशी शंका यावी असे हे वातावरण आहे.

समोरच्याचा मुद्दा मान्य नसला, तरी तो मांडण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. त्याचा हवा तर आपण सभ्यपणे प्रतिवाद करू. मात्र त्याच्या व्यक्त होण्याच्या हक्कांवर कोणी गदा आणत असेल, तर ते सहन करणार नाही. त्याला कडाडून विरोध करू, हा व्हॉल्टेअरी उदारमतवाद जोवर समाजाचा स्थायिभाव होत नाही, तोवर हा जल्पकी उच्छाद कायमच राहणार. भारतीय समाजाला अच्छे दिन दिसावेत याकरिता हे आव्हान सर्वाना पेलावेच लागणार आहे.

स्ञीनी पुरूषाला सूख (शरीर, सेवा इ.)देणे व त्या बदल्यात पुरूषाने स्ञीला सुरक्षा देणे हा नैसर्गीक नियम आहे.
स्ञी पूरूष जेंव्हा मिठी मारतात तेंव्हा दोघांच्या फीलींग्स भीन्न अलतात. पुरूष सुखावत असतो तर स्ञी सुरक्षीततेचा अनुभव घेत असते. शिक्षणामुळे खेचून ताणून निसर्ग नियमाला छेद देण्याचे काम चालू आहे.

Pages