पुनर्जन्माच्या विषयाला वाहिलेली अमेरिकन संस्था

Submitted by नितीनचंद्र on 9 September, 2014 - 02:34

पुनर्जन्माच्या विषयाला वाहिलेली अमेरिकन संस्था

पुनर्जन्म हा तसा अनेक मायबोलीकरांच्या आणि तथाकथीत बुध्दीपामाण्यावाद्यांच्या दृष्टिने चेष्टेचा, टिंगल टवाळीचा आणि टीका करण्याचा विषय आहे. भारतात हिंदु धर्म असा आहे की जो कर्मसिध्दांत आणि त्याला जोडुन असलेले प्रारब्ध्द आणि त्याला जोडुन येणारा पुनर्जन्म ह्या विषयाला मान्यता देणारा आहे. याच कारण हा धर्म किंवा जड वाटत असेल तर संस्कृती म्हणा एका पुस्तकाच्या आधाराने चालणारा नाही. अनेक ग्रंथ गुढ अश्या विषयावर भाष्य करताना दिसतात तसेच आजच्या जीवनाशी त्याची सांगड घालताना दिसतात.

मी एका पुस्तकाच्या वाचनाने फ़ारच प्रभावीत झालो त्याच नाव " कर्माचा सिध्दांत " हे पुस्तक माजी सनदी अधिकारी व वेदांत अभ्यासक श्री हरिभाई ठक्कर यांनी लिहले आहे. ह्या पुस्तकाची अनेक भाषात भाषांतरे होऊन त्याच्या अनेक अवृत्या निघाल्या.

यात प्रथम कर्म - प्रारब्ध्द आणि पुनर्जन्माची साखळी वाचवयास मिळाली. अनेक धार्मिक पुस्तकात याचा उल्लेख येत होताच. शिवाय माझे आजोबा भृगुसंहीता या ग्रंथाच्या सहायाने ज्योतिष सांगत ज्यात प्रामुख्याने मागला जन्म आणि त्या संदर्भाने हा जन्म हा विषय येत असे.

नजिकच्या काळात डॉ. प.वि. वर्तक यांचे पुनर्जन्मावरचे पुस्तक ही वाचले. ज्यात बहिणाबाई यांचे आधीचे त्यांनी लिहुन ठेवलेले १३ जन्म किंवा तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले आधीचे दोन जन्म याच्या वाचनाने मला विश्वास वाटु लागला की हे कल्पनेचे जग नाही. जेव्हा पास्ट लाईफ़ रिग्रेशन या थेअरीचा जन्म परदेशात झाला आणि तो एका मानसशास्त्री व्यक्तीने घडवला ते वाचल्यानंतर मात्र http://en.wikipedia.org/wiki/Past_life_regression अधिक अधिक खात्रीच झाली की या विषयाच्या अभ्यासाला चांगले दिवस येणार.

आयुर्वेद आणि योग ज्याचे पुढे योगा झाल्यानंतर माहात्म्य भारताला पटले या धर्तीवर आता पुनर्जन्म ही थेअरी जर पटली तर मला सर्वात जास्त आनंद होईल. अर्थात कुणी जबरदस्तीने पटवुन घ्यावी असा आग्रह मात्र अजिबात नाही.

मागे एका चर्चेत स्वामी विवेकानंदांच्या राजयोगात वर्णीलेल्या प्रयोगाचे पुनर्जन्म या संदर्भात मी प्रकटीकरण केले तेव्हा मायबोलीकर तुटुन पडले होते. प्रयोग असा होता. कोंबडीची तीन अंडी आणि बदकाची तीन अंडी कोंबडीकडे उबवायला दिल्यावर जन्माला आलेली तीन बदकाची पिले पाण्याकडे धाव घेतात तर कोंबडीची तीन पिले पाण्याला भितात. याचा अर्थ स्वामी विवेकानंद म्हणतात की बदकाची पिले मागच्या जन्मी जलचर होती म्हणुन त्यांना पाण्याची भिती वाटत नाही. यावर मायबोलीकर यांनी तो जीन्सचा प्रभाव आहे असे प्रतिपादीले होते. हे ही पटण्यासारखे होते म्हणुन ठोस संशोधनाशिवाय हा विषय काही मान्य होणार नाही असे जाणवले.

आजच्या " तेज" चॅनलवरच्या बातमीने मी शोध घेतला तेव्हा अमेरीकेत ह्या विषयावर खुपच संशोधन झाल्याचे माहित पडले.http://www.iisis.net/index.php?page=semkiw-reincarnation-past-life-lives... या साईट्वर Institute for the Integration of Science, Intuition and Spirit या संस्थेने २०,००० व्यक्तींच्या मागच्या जन्माचा अभ्यास करुन अनेक पुस्तके लिहली आहेत तसेच रिसर्च पेपर्स ही लिहले आहेत. Principles of Reincarnation-Understanding Past Lives या नावाची नविन थेअरी या वेबसाईटवर चर्चीलेली आहे ज्यायोगे हे संशोधन झालेले आहे.

भारतात जन्माला आलेले पं जवाहरलाल नेहरु ( यांच नाव आधी लिहतो म्हणजे भाजप विरोधक खुष होतील ) हे मागच्या जन्मी बहादुरशहा जफ़र होते तर पुढच्या जन्म त्यांनी पाकिस्थानात झुल्फ़ीकार अली भुट्टो यांच्या घराण्यात बेनझीर भुट्टो यांच्या रुपाने घेतला असा दावा या वेबसाईटवर आहे.

इंदिरागांधी मागच्या जन्मी नानासाहेब पेशवे होत्या असे ही वेबसाईट म्हणते. डॉ. प.वि, वर्तक यांनी वर्णिलेला जन्म साहचर्याचा भाग इथेही दिसतो कारण बहादुरशहा जफ़र आणि नानासाहेब पेशवे समकालीन होते. ( बहुदा ) त्यांची भेटही झाली होती किंवा पत्रव्यवहार होता आणि १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता.

आजच्या तेज च्या बातमीचा महत्वाचा भाग श्री नरेंद्र मोदी यांच्या मागच्या जन्माचा शोध हा होता. ही वेब साईट म्हणते की नरेंद्र मोदी मागच्या जन्मी सर सय्य्द अहमद खान होते ज्यांनी मुस्लीम स्त्रीयांच्या शिक्शणासाठी काम केले ज्याचे पुढे अलिगढ विद्यापिठात रुपांतर झाले. सर सय्यद अहमद खान पाकिस्थानची मागणी करणारे पहिले मुसलमान होते.

अमिताभ बच्चन मागच्या जन्मातही नट होते ज्यांनी शेक्सपियरच्या नाटकात अनेक भुमिका केल्या होत्या. तसेच शाहरुख खान मागच्या जन्मी प्रसिध्द बंगाली स्त्री नटी होते असे या वेबसाईट वर आहे.

या शिवाय टिप्पु सुलतान, डॉ अब्दुल कलाम इ. प्रसिध्द भारतीयांच्या पुनर्जन्माचा ( पुढच्या जन्माचा शोध ) घेतला गेलेला आहे.

मागच्या जन्मातली कौशल्ये आणि सुप्त इच्छा आपण घेऊन जन्माला येतो तसेच पास्ट लाईफ़ रिग्रेशनचा शोध लागताना मागच्या जन्माची दु:खे - न्युनगंड याचा शोध घेतला गेला होता हे या लेखाच्या निमीत्ताने अधोरेखीत होते.

अभ्यासुंनी जरुर वाचन करावे आणि आपली मते मांडावी. आपल्या मतांचा मला आदर आहेच. कोणतीही नविन थेअरी आली की त्याला आक्शेप ही येणारच या दृष्टीने आपली मते मी जरुर वाचीन. विनंती इतकीच की एखादा माझा चुकीचा लिहलेला शब्द धरुन टिका करु नये. काही साधक बाधक लेखन झाल्यास मला ही आवडेल. ज्यांचा पुर्वग्रह दुषित आहे आणि काहीतरी लिहुन प्रभाव टाकताना ज्यांनी इतका अभ्यास करुन हे सिध्दांत मांडले आहेत त्यांचा अपमान होतो हे लक्शात घ्यावे. मी फ़क्त भारवाहक आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितीनचंद्र ,
साधारण पणे पत्रिकेच्या माध्यमातून एकाच घरातील पुनर्जन्म ओळखता येऊ शकतो पण एकदम अमिताभ बच्चन ह्यांचे उदाहरण वाचून हे कसे ओळखत असावेत हा प्रश्न पडला .
आधीच्या जन्मात ती व्यक्ती कोण होती हे कसे ठरवतात हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे . ह्या बद्दल काही माहिती असली तर लिहा .

अन्विता,

ही थेअरी ह्या वेबसाईटवर आहे. पत्रीकेवरुन अस काही खात्रीलायकपणे सांगता येत नाही असे माझे मत आहे.

पुनर्जन्माबद्दल संशोधन खरं असलं तरी असं शाहरुख खान बंगाली नटी होता वगैरे कुठेतरी या गंभीर विषयाला हास्यास्पद बनवून टाकतं!

अमेरीकेत सर्वच लोक सेन्सीबल असतात ही पण (अंध) श्रद्धाच. सेन्सीबल लोक बहुसंख्येने असावेत हे विधान चुकीचे ठरणार नाही ही श्रद्धा. अर्थात वळणाचे पाणी वळणाला जाणार ही अंधश्रद्धा नाही हे पण चुकीचे ठरणार नाही. पुनर्जन्म, टेलिपथी हे काही लोकांसाठी उत्सुकतेचे, आश्चर्याचे आणि मौजमजेचे विषय असतात तर काही लोकांसाठी अहमहिकेचे...

मस्त आहे लेख. असेच " शास्त्रीय" लेख लिहित राहा.
तुमच्या थिअरीला कुणी चुकीचे म्हटाले, त्याविरुद्धा पुरावे दिले, प्रश्न विचारले तरी उत्तरं द्यायची गरज नाही.
तुम्ही एकदा म्हटलेय ना की संशेधन केलेय, मग केलेच असले पाहिजे. त्याचं प्रुफ द्यायची काय गरज?

बरं आता तुमच्या मते नेहरु मरायच्या आधी त्यांचा भुट्टो म्हणून पुनर्जन्म कसा झाला ते सांगा. मला जरा उत्सुकता आहे. म्हणजे मी अजुन जिवंत असताना माझाही कुठेतरी पुनर्जन्म झाला असेल, नाही का? का फक्त फेमस लोकांचेच होतात पुनर्जन्म? मग माझा नाही व्हायचा..

डोकं गरगरायला लागलंय. मागच्या जन्मी मी भोवरा असणार.>>>>>> @ मामी - मागच्या जन्मी नितिनचंद्र भोवरा असतील आणि तुम्ही त्यांना गरगर फिरवले असेल, म्हणुन ह्या जन्मी ते तुमचे डोके गरगरवुन ते तुमचा सूड घेतायत,

बरं आता तुमच्या मते नेहरु मरायच्या आधी त्यांचा भुट्टो म्हणून पुनर्जन्म कसा झाला ते सांगा.
------- याचा अर्थ एक आत्मा एकाच वेळी एका पेक्षा जास्त शरिरात राहू शकतो हे सिद्ध होते. यालाच आत्मा पॅराडॉक्स असेही म्हणता येइल.

कर्माचा सिद्धान्तं हे पुस्तकच आपल्याला झेपलं नाही.
म्हणजे आपल्या बाबतीत चांगलं झालं की समजायच आपण काहितरी पुण्य केलं असणार.
वाईट झालं कि समजायचं की आपण काहीतरी पाप केलं असणार. आणि जर ह्या जन्मात पाप केलच नसेल तर असं समजायचं की मागच्या जन्मी काहीतरी केलं असणार, हे भोग आहेत-भोगूनच सम्पवायचे वगैरे..

चागंले कर्म करत राहणे (जमेल तेव्हडे) हीच बॉटम लाईन ...असं समजुन मी दहा बारा पानातच पुस्तक गुंडाळलं...

चागंले कर्म करत राहणे (जमेल तेव्हडे) हीच बॉटम लाईन ...असं समजुन मी दहा बारा पानातच पुस्तक गुंडाळलं...
<<
गुंडाळलं हे लै ब्येस कर्म केलंत पघा Happy

चागंले कर्म करत राहणे (जमेल तेव्हडे) हीच बॉटम लाईन ...असं समजुन मी दहा बारा पानातच पुस्तक गुंडाळलं...
----- काहीच कारण नसताना उगाचच दहा बारा पाने वाचल्याचे पाप खात्यावर जमा झाले... :स्मितः

मी पुस्तक वाचण्याचा विचारही केला नाही.

<<< पतिव्रता पत्नी पातकी पतीला पातका पासून परावृत्त करून परमेश्वराच्या पाया पर्यंत पाठवते. >>>

एक शब्द राहिला कि - करून Wink

मोहन भागवत मागच्या जन्मी अफजलखान होते असं संशोधन झालंय का Rofl
पुनर्जन्मावर माझा १००% विश्वास आहे. ह्या लेखात दिलेली लिंक अजून वाचली नाही. पण काही प्रश्न आहेत .

मागच्या जन्मातली कौशल्ये आणि सुप्त इच्छा आपण घेऊन जन्माला येतो तसेच पास्ट लाईफ़ रिग्रेशनचा शोध लागताना मागच्या जन्माची दु:खे - न्युनगंड याचा शोध घेतला गेला होता हे या लेखाच्या निमीत्ताने अधोरेखीत होते.>>>
समजा एखादा मनुष्य श्रीमंत आहे . ऐश्वर्य अबाधित ठेवण्यासाठी तो काळे धंदे करत आहे. लोकांना लुबाडत आहे . आणि त्याची पुढच्या जन्मातही खूप श्रीमत होण्याची सुप्त इच्छा आहे. लुबाडण्याच कौशल्य तर त्याच्याकडे आहेच . मग ह्या माणसाला ह्या कौशल्ये आणि सुप्त इछेच्या जोरावर पुढचा जन्म श्रीमंत घराण्यात मिळेल का ? कर्माच्या सिद्धांताच काय मग ?

स्वामी विवेकानंदांच्या राजयोगाचा संदर्भ अर्थहीन आहे . मोठ्या व्यक्तीच्या नावावर खपवलं कि विरोध कमी होतो म्हणून .

मित्रा,

<....शिवाय माझे आजोबा भृगुसंहीता या ग्रंथाच्या सहायाने ज्योतिष सांगत ज्यात प्रामुख्याने मागला जन्म आणि त्या संदर्भाने हा जन्म हा विषय येत असे....>
हा संदर्भ वाचून उत्सुकता वाटली... आपल्या नात्यातील भृगु संहिता वाचक कोण? त्यांच्याकडे कुठला ग्रंथ छापील किवा हस्तलिखित उपलब्ध होता? आता तो कोणाकडे आहे... फीज काय? असा खुलासा करावा ही विनंती...

Pages