आता कशाला शिजायची बात - बाईमाणूस - <3 <3 प्यार भरी कटोरी <3 <3

Submitted by बाईमाणूस on 8 September, 2014 - 10:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दही - १/२ किलो
पिठीसाखर- १कप
स्ट्रॉबेरी -८-१०
कोणतेही चॉकलेट बिस्कीट -१ पॅक
२-३ चमचे दूध

क्रमवार पाककृती: 

१.दही रातभर चक्क्यासाठी टांगून ठेवा.
२. बिस्कीटांचा चुरा करा/ अथवा मिक्सर मध्ये बारीक करा.
३. हा चुरा ओलसर होण्यापुरते २-३ चमचे दूध टाका.
४.कटोरी साठी- ज्या वाटी/ बोल चा आकार हवा आहे त्यात बटर पेपर लावा.
५. बिस्कीटांचा चूरा वाटीत दाबून सेट करा जेणेकरून कटोरी तयार होईल.
६. आता वाटी फ़्रीजमध्ये ३०-४० मिनिटे सेट करायला ठेवा.
७. स्ट्रॉबेरी मिक्सर मधून क्रश करा परंतू पूर्ण रस होणार नाही ह्याची काळजी घ्या.
८. तयार झालेल्या चक्क्यातील गुठळ्या मोडा. आता त्यात पिठीसाखर मिक्स करा.
९. क्रश केलेली स्ट्रॉबेरी वरील मिश्रणात एकत्र करा. छान गुलाबीसर रंग आला पाहिजे.
१०. सेट झालेली फ्रीज मधील टोकरीत गुलाबी मिश्रण ओता.
१२.मिश्रण एकसारखे करा.
१३. २ तास टोकरी फ्रीज मध्ये ठेवा.
१४. सजावटीसाठी स्ट्रॉबेरी ला 'दिल' चा आकार द्या Wink
१५.एखादे पुदिना पान अथवा चॉकलेट सॉस ने टोकरी सजवा.
१६. 'प्यार भरी कटोरी' खाण्यास तय्यार!!

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट म्हटले की 'Valentine Day' आठवतो म्ह्णून 'प्यार भरी कटोरी' Wink

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल आणि स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages