आता कशाला शिजायची बात - अल्पना - डेट अ‍ॅपल मिनी पाय

Submitted by अल्पना on 8 September, 2014 - 02:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

खजूर - १०-१२, दोन तिन चमचे बदाम, अक्रोड याची भरड पुड, अर्धं सफरचंद, थोड्या मनुका आणि किसमिस, लिंबाचा रस, मध, दालचिनी ची पुड

क्रमवार पाककृती: 

खजूराच्या बिया काढून त्यात बदाम अक्रोड पूड घालून मळून घ्यावे. मी घेतलेला खजूए मऊ असल्याने मला हातानेच मळता आलं. जर खजूर मऊ नसेल तर फुड प्रोसेसर /किसनीचा वापर करता येईल. या मळलेल्या गोळ्याच्या छोट्या च्।ओट्या लाट्या बनवून मिनी मफिन च्या साच्यात बटर पेपर ठेवून त्यांना मिनी पाय क्रस्टचा आकार द्यावा.
नंतर हे पाय क्रस्ट फ्रिझरमध्ये सेट व्हायला १-२ तासांसाठी ठेवा.

सफरचंद किसून घ्या. त्यात थोडा लिंबाचा रस, दालचीनी पुड आणि मनुका-किसमिस, मध घालून मिक्स करा. (सफरचंद काळं पडू नये म्हणून त्यात लिंबाचा रस घातला आहे.)

सेट झालेल्या पाय क्रस्टमध्ये हे मिश्रण भरा. वरून थोडा मध घालून डेकोरेट करा.

IMG_20140908_111856.jpg

वाढणी/प्रमाण: 
वरील साहित्यानी सहा नग तयार झाले.
अधिक टिपा: 

लिंबाचा रस वापराय्च्या ऐवजी व्हिप्ड क्रिममध्ये सफरचंदाचे तुकडे घालूनही हे पाय करता येतिल. वेगवेग्ळ्या फळांचे तुकडे पण वापरता येतिल.

माहितीचा स्रोत: 
गेल्या वेर्षी हॅबिटॅट सेंटरच्या कॅफेटेरियामध्ये खजूराच्या क्रस्टचे पाय खाल्ले होते. त्यात आत भरलेलेल मिश्रण शिजवलेले होते. त्यात फेरफेर केलेत.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्दर

मला ही रेसेपी व्हिप्ड क्रिम वापरून करायची होती. आणि सफरचंदाच्या ऐवजी स्ट्रॉबेरीज किंवा ब्ल्युबेरीज /मिक्स बेरीज (मुलाची आवडती फळं) तिन दिवस फळांच्या दुकानात चकरा मारूनही सफरचंद आणि केळी, पेरू याशिवाय काही फळ न मिळाल्याने शेवटी आम्ही सफरचंदावर समाधान मानलं.
व्हिप्ड क्रिमसाठी हेवी व्हिपिंग क्रिमचा २ लीटरचा पॅक मिळत होता. घरच्या सायीला किंवा अमुल क्रिमल फेटायचा प्रयोग काल करायचं ठरव्लं होतं. पण काल स्वैपाकघर सुताराच्या ताब्यात असल्याने ते पण जमलं नाही म्हणून मग क्रिमशिवायच केले. Happy

मस्त. यम्मी. छोट्यांच्या पार्टीसाठी छान आहे.
संयोजकांची ही संकल्पना आणि आलेल्या एण्ट्रीज् एकदम भारी आहेत .. >>++