कटलेट [ वेस्ट मे बेस्ट, टेस्ट मे बेस्ट कटलेट]

Submitted by प्रभा on 30 August, 2014 - 09:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बटाटा, पोहे, चना दाळ, मिठ, मिरची, कोथिंबीर, अळूची पान, कढिपत्ता, धणे- जिरे पावडर, लिंबाचा रस.

क्रमवार पाककृती: 

उकड्लेले बटाटे कुस्करुन घ्यावेत. भिजवलेली चना दाळ मिक्सरमधे बारीक करावी.. मिरची जिरे, आल बारीक करुन घ्याव. बटाट्यात चना दाळ, मिरची, जिरे, धणे पावडर मिठ, कढिपत्ता, कोथिंबीर, अळुची पान बारीक चिरुन घालावित. आल-मिरची वाटुन घालावीच पण १-२ मिरच्या चिरुनही घालाव्यात. नंतर त्यात थोडे [अर्धी वाटी ] पोहे घालुन गोळाकरुन घ्यावा. थोडा सोडा किंवा १ चमचा कॉर्न- फ्लॉवरहि घालु शकतो. नंतर आपल्या आवडीचा आकार देवुन रव्यात घोळवुन शॅलो फ्राय करावे चविष्ट कटलेट तयार.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार.
अधिक टिपा: 

मी अळुची भाजी करण्यासाठी अळुची पान आणली होती. चना दाळ भिजवुन ठेवली होती. पण दाळ-भाजी जास्त होइल अस वाटल. म्हनुन थोडी दाळ काढुन ठेवली.. १ अळुच पानही काढल. बटाट्याची सुकी भाजी पण उरली होती.. . या सर्व उरलेल्या वस्तु एकत्र करुन त्यात थोडे पोहे घालुन बनवलेत हे कटलेट. फारच टेस्टी. लगेच संपलेत. सॉस किंवा दह्याच्या च्टणीबरोबर छान लागतात.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे सही. मी मध्यंतरी मुगाची उसळ + तांदुळ पीठ + काकडीची भा़जी + शिजवलेले नाचणी सत्व + पोहे + गरम मसाला + मीठ + लींबाचा रस + टो. सॉस असे स्मॅश करुन शॅलो फ्राय कटलेट केले.

सगळे संपले म्हणुन आई खुश तर, नेहेमीपेक्षा वेगळी डीश संध्याकाळी मिळाली म्हणुन बाकी मेंबर खुश.

टिप : हे असले प्रयोग करत असताना घरातील कोणालाही किचन मधे प्रवेश करण्यास देऊ नये. Wink

टिप : हे असले प्रयोग करत असताना घरातील कोणालाही किचन मधे प्रवेश करण्यास देऊ नये.... हे महत्वाचे !