मानाचे नैवेद्य

Submitted by संयोजक on 28 August, 2014 - 15:57

गणेशाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. पण मोदकांबरोबर बाप्पाला इतरही नैवेद्य आवडतात बरे! कोणी खीर करतात, तर कोणी मिठाई. नाना प्रकारची पक्वान्ने आपण बाप्पासाठी रांधतो. मग असे विविध नैवेद्य आपल्या मायबोलीकर मित्रांबरोबर शेअर करायला नक्कीच आवडेल ना तुम्हाला? चला, तर मग येऊ द्या तुमच्याकडचे एक से बढकर एक नैवेद्य.

गणपती बप्पा मोरया !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरी फणसाचा रस फ्रीझ केलेला कारण गावाहून बरेच फणस आले. त्याची सांदणं केली. नैवेद्य म्हणून आणि एक गोड प्रसाद म्हणून आरती नंतर सर्वांना वाटली.
खूप आवडला सर्वांना हा प्रसाद. तुम्हाला आवडेल हि अपेक्षा.
2014-05-06 002 (300x400).jpg

हे खव्याचे मोदक, पेढे, उकडीचे मोदक भारी टेंप्टींग आहे.

लहान्पणी नुसते येता जाता चरायचे. आता दूरून नम्स्कार.

मी काल उपवासाचे मोदक बनवले होते. व आज बनाना ओट स्वीट बॉल नैवेद्द्याला केले होते. खुप छान झाले होते. दोन्हीही प्रसाद. रेसिपी देण्याची गरज नाही न'IMG-20140830-00606.jpgIMG-20140704-00548.jpgIMG-20140831-00608.jpg

मी काल उपवासाचे मोदक बनवले होते.
आज ''बनाना ओट स्वीट बॉल बनवलेत .दोन्हीही प्रसाद चविष्ट झालेत. रेसिपी देण्याची गरज नाही न/IMG-20140830-00606.jpgIMG-20140831-00608.jpg

पहिल्या दिवशी ज्या मा.बो. करांनी नेवैद्याच्या प्रचि इथे दिल्या त्या सर्वांच कौतूक. मी तर उ.मो. आणि नैवेद्याच्या पानाचे फोटो काढले नाही. वेळच मिळाला नाही.
सर्वांचे मानाचे नैवेद्य तो.पा.सु.णारे आहेत. Happy
आमचा नैवेद्य काय आहे ओळखा पाहू??? Wink
P31-08-14_17.44.jpg

बाप्पाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना असे प्रसादाचे बॉक्स बनवून ठेवले होते.
P31-08-14_17.37[1].jpg

बाप्पाला प्रसन्न व्हावंच लागेल असे एक से बढकर एक नैवेद्य आहेत!
दिनेश, इतके मोदक गट्टम केल्यावर भाजी दिलीत ते बरं झालं Happy

मस्त मस्त नैवेद्य सगळेच!

वॉव सर्वांचे प्रसाद उत्तम.

दिनेशदा तुमचीच भाजी खाते आता, कसली दिसतेय, सॉलिड. ह्यावर्षी आईला करायला नाही जमली भाजी. धन्यवाद तुम्ही दिल्याबद्दल.

आशिका http://www.maayboli.com/node/50606 इथे लिहिलीय कृती.

अन्जू, लहानपणापासून माझी आवडती. ज्या देशात असेन तिथे ज्या भाज्या मिळतील त्या वापरून करतो ही भाजी मी.

आमच्या घरच्या बाप्पाला दाखवलेला नेवैद्य....
त्याच्या आणि आमच्याही आवडीचा.... उकडीचे मोदक...

14 gan 9-001.jpg14 gan 7.jpg

दिनेश दा
तुम्ही स्वतः इतक्या सुंदर तोंपासु पाक्रु बनवता...
तुमचे सर्टीफिकेट मिळालेय मला... खुप छान वाटतयं... Happy

Pages