मायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - गाडी बुला रही है! " ४ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 25 August, 2014 - 10:51

गणपती बाप्पा मोरया!
कोण्या शहराची 'ती' शान तर कोण्या शहराची ओळख. कोणासाठी 'तिचा' प्रवास म्हणजे सहज हौस तर कोणासाठी गरज. अशी ही बालगीतातली झुकझुक गाडी पुढे मेट्रो, लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस अशा वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते. तीच तुम्हाला बोलावते आहे मायबोली गणेशोत्सव २०१४ मध्ये, झब्बू खेळण्यासाठी! 'गाडी बुला रही है!'
आगीनगाडीचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हाला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ रेल्वेची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत. खर्‍या, खोट्या, चालू, बंद अशा कोणत्याही रेल्वेचे प्रकाशचित्र चालेल.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

उदाहरणार्थ :-

tram 2.jpg
(कोलकता ट्राम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मनिष, ट्राम डी आणि ७१ दोघीपण.

फारेण्ड, त्यांना schnellbahn म्हणतात. इथे श आणि न एकत्र टाईप करायला अडचण येत होती म्हणून मग स्नेल बान लिहिले. मनिषने सांगितले तसे schnellbahn म्हणजे फास्ट ट्रेन.

धन्यवाद जिप्सी! तुमच्यासारख्या दिग्गज फोटोग्राफरकडून मिळालेली दाद वाचून छान वाटले. Happy माझे SLR फोटोग्राफीचे वय १ १/२ वर्षेच आहे, त्यामुळे कुठलीही सूचना किंवा टीप्स असतील जरूर कळवा.. धन्यवाद!

स्वित्झर्लंडमधील सुप्रसिद्ध ग्लेशियर एक्प्रेस. झरमॅट स्टेशनवर उभी आहे. >>> मामी, त्या स्टेशनवर चक्क देवनागरीत 'स्वागत' असं लिहिलय? का माझा बघण्यात काही घोळ होतोय?

लिवलंय लिवलंय. देवनागरीतच लिवलंय.

बाकीही बर्‍याच भाषांतून लिहिलंय.

झुरीकच्या झू मध्ये गीरचे सिंह आहेत त्याबाहेर ची ही पाटी :

मंदार ही स्विस मधल्या रिगी सारखीच दिसते गाडी.

मॅक्स - मस्त. ही ती एसीई वाली गाडी का? (अल्टॉमॉण्ट कम्यूटर एक्स)

>>ही ती एसीई वाली गाडी का?
फा नाही माहिती. बरीच दूर होती. पण गुगल सांगते की तो ट्रॅक मालगाड्या आणि अ‍ॅमट्रॅक वापरते. Happy

लोकहो हे बरेचसे परदेशातील फोटो स्टॅण्डर्ड गेज किंवा त्याहून लहान ट्रॅकवाल्या गाड्यांचेच आहेत ना? भारताबाहेर ब्रॉड गेज बहुधा ब्रिटन मधेच असेल फक्त (विकी चेक केले नाही अजून). त्यामुळे आपल्यासारख्या महाकाय गाड्या इतरत्र दिसत नाहीत. अमेरिकेतील सुद्धा जास्त उभट वाटतात, आडवा विस्तार जास्त नसतो.

फारएण्ड - इंटरेस्टिंग! ब्रिटन आणी नॉर्वे/अ‍ॅम्स्टरडॅम मधे स्टॅण्डर्ड गेज का ब्रॉडगेज चेक केलं नाही, बघायला पाहीजे होतं.
नॉर्वे ट्रेन स्पीड मधे असताना वळण आलं की थोडी टिल्ट व्ह्यायची वळताना, भन्नाट वाटायचं एकदम Happy हा प्रकार ब्रिटीश ट्रेन मधे जाणवला नाही. अमेरिकेत एकदाच लांब पल्ल्याच्या ट्रेन नी गेलोय, पण तिनी कधी स्पीडच पकडला नाही त्यामुळे समजलं नाही Proud

विकी वर त्याचा "इंडियन गेज" म्हणून उल्लेख आहे :). ब्रॉड गेज मधले सुद्धा नेहमीच्या वापरातील सर्वात मोठे गेज आहे ते.
http://en.wikipedia.org/wiki/Indian_gauge

येथे बार्ट मधेही वापरतात मधे वाचले होतेच.

Pages