मायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - गाडी बुला रही है! " ४ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 25 August, 2014 - 10:51

गणपती बाप्पा मोरया!
कोण्या शहराची 'ती' शान तर कोण्या शहराची ओळख. कोणासाठी 'तिचा' प्रवास म्हणजे सहज हौस तर कोणासाठी गरज. अशी ही बालगीतातली झुकझुक गाडी पुढे मेट्रो, लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस अशा वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते. तीच तुम्हाला बोलावते आहे मायबोली गणेशोत्सव २०१४ मध्ये, झब्बू खेळण्यासाठी! 'गाडी बुला रही है!'
आगीनगाडीचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हाला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ रेल्वेची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत. खर्‍या, खोट्या, चालू, बंद अशा कोणत्याही रेल्वेचे प्रकाशचित्र चालेल.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

उदाहरणार्थ :-

tram 2.jpg
(कोलकता ट्राम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिजित, सही फोटो आहेत फ्लिकर लिन्कवरचे.

फेरफटका - थॉमस ची वाटच पाहात होतो :). या थॉमस च्या शोज मधे बाकी इतर इंजिने दिसत नाहीत ना कधी त्यांच्या स्टोरीज मधली? गॉर्डन, एडवर्ड, जेम्स, टोबी वगैरे?

अर्रे! कडक फोटो आहेत... एक से एक! Happy

काळाघोडा फेस्ट.हून परत येताना व्ही.टी.स्टेशनवर काढलेला फोटो... २ मिनिटांत भरलेला लेडीज डबा

Copy of Picture 070.jpg

अरे वन राणी म्हणजे अमर अकबर अँथनी मधल्य गाण्यात ऋषी कपूर च्या कडव्यातील ती हीच का?>>>>>हो फारएण्ड Happy

अभिजीत एक से बढकर एक फोटोज Happy

ललिता धन्यवाद ग . आपल्या मुंबई लोकल चा फोटो दिलास. नाही तर जगभरातल्या रेल्वे आल्या पण आपली मुंबई लोकलच नव्हती.

मस्त फोटो येतायत सर्वांचे Happy

मनीमोहोर Happy

थॅलीस पाहून नवरा नॉस्टॅल्जिक झाला. थॅलीसकी तारीफ करते आज भी थकता नहीं है वो... Lol

स्वित्झर्लंडमधील सुप्रसिद्ध ग्लेशियर एक्प्रेस. झरमॅट स्टेशनवर उभी आहे <<< मामी, खिडकीतून बाहेरच्या फलाटावर दिसणारे देवनागरीतले स्वागत बघून भारी वाटले.

नलिनी, फास्ट ट्रेन चे नाव स्नेल बान वाचून गंमत वाटली. वरचा तो स्टेशन मधे स्प्लिट होणारा सिंगल ट्रॅकही एकदम सुबक आहे.

मनीष, नलिनी - थॅलिस च्या अनुभवावर लिहा. त्यात बसायचे आहे कधीतरी.

फास्ट ट्रेन चे नाव स्नेल बान वाचून गंमत वाटली >> फारेंडा.. स्नेलचा अर्थ जर्मन आणी डच मधे फास्ट असा आहे. मी पण सुरुवातीला गोंधळलो होतो कारण मला रोज 'स्नेल बस' पकडावी लागते Happy

थॅलिसनं मी दोनदाच प्रवास केलाय (ब्रसेल्स - पॅरीस आणि परत). त्यामुळं खूप काही लिहिण्यासारखं नाहिये. पण ट्रेन खरंच फार मस्त आहे. पोटातलं पाणीपण हलत नाही (इथे दुसरी कुठली उपमा सूचत नाहिये Wink ) एकदम लक्झरी.

स्वित्झर्लंडमधील सुप्रसिद्ध ग्लेशियर एक्प्रेस. झरमॅट स्टेशनवर उभी आहे <<< मामी, खिडकीतून बाहेरच्या फलाटावर दिसणारे देवनागरीतले स्वागत बघून भारी वाटले. >>> हो हो. मलाही ते बघून एकदम प्राऊड प्राऊड झालं होतं.

आता येत आहेत स्वित्झर्लंडमधिल लुगानो येथिल स्विस मिनीएचर मधील लहान झुकझुकगाड्या.

Pages