मॉरिशियस - समारोप

Submitted by दिनेश. on 20 August, 2014 - 07:47

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152

मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre http://www.maayboli.com/node/50186

मॉरिशियस - भाग तिसरा - बोटॅनिकल गार्डन, Pamplemousses Botanical Garden, Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden http://www.maayboli.com/node/50225

मॉरिशियस - भाग चौथा - पोर्ट लुई Port Louis & Le Caudan Waterfront http://www.maayboli.com/node/50261

मॉरिशियस - भाग पाचवा - बीच टुअर Ile Aux Cerf Island (deer island) http://www.maayboli.com/node/50271#comment-3231325

मॉरिशियस - भाग सहावा - शिप मॉडेल फॅक्टरी http://www.maayboli.com/node/50311

मॉरिशियस - भाग सातवा - निद्रीस्त ज्वालामुखी - Curepipe Volcano Crater http://www.maayboli.com/node/50322

मॉरिशियस - भाग आठवा - गंगा तलाव http://www.maayboli.com/node/50344

मॉरिशियस - भाग नववा - शमारेल धबधबा, Le Cascade de Chamarel http://www.maayboli.com/node/50384

मॉरिशियस - भाग दहावा - सप्तरंगी माती, Seven Colored Earth http://www.maayboli.com/node/50420

माझे विमान संध्याकाळचे होते. त्यामूळे सकाळ तशी मोकळीच होती. पहाटेच बॅग भरून ठेवली. मग जवळच्याच
बीचवर भरपूर भटकलो. त्यादिवशी वादळी हवामान होते. पाऊस पडेल असे वाटत होते. दिवसभर नाही पण
विमानतळावर पोहोचेपर्यंत पडलाच.

एकंदर मस्त ट्रिप झाली..

१) मागच्या भागातल्या "निळ्या मुंगी"चे फुल

२) शमारेल हून बाहेर पडल्यावर एका अत्यंत उंचावरच्या जागी आपण येतो. तिथला नजारा ( सूर्याची पोझिशन मात्र योग्य नव्हती )

३) "माझा" फोटो Happy

४) तिथला "तिकोना "

५)

६) बहाव्याची झाडे फार हेल्दी दिसत होती.. फुलल्यावर किती मस्त दिसत असतील

७) तिथली " वानरलिंगी "

८)

९)

१०)

११) हॉटेलच्या माझ्या विंग मधून दिसणारा समुद्र

१२)

१३) बीचवर हा स्टॉल होता. मी २ अननस खाल्ले तिथे. इथून मी काही चटण्या घेतल्या ( काही मायबोलीकरांनी चाखल्या त्या )

१४)

१५)

१६)

१७)

१८)

१९)

२०)

२१) निवांत विमानतळ

२२)

२३)

२४)

२५) ए ३८० ( आता मुंबईत पण येते एमिरेट्स चे ३८०. इके ५०१ / ५०२ .. गेल्याच महिन्यात सुरु झाले )

२६) विमानतळावर पोहोचलो तर पाऊस सुरु झालाच

२७)

आता दुबई / अबु धाबीला जाऊ आपण !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतीम मालिका!:स्मित: आपण नुसतेच आपले युरोप, कश्मिर, केरळ मस्तए मस्तए करत बसतो आणी आपल्या पासुन काही अन्तरावर सौन्दर्याच्या अनेक खाणी आपली हिरे माणके जपत असतात. बाली, मॉरीशस आणी मागे न्युझीलन्ड अशा ट्रिपमधले तुम्ही इथे दाखवलेल्या जागा ( फोटोरुपी) कायम स्वरुपी स्मरणात रहातील.:स्मित:

तिथे जाणे होईल न होईल, पण तुमच्या या सिरीज बद्दल धन्यवाद.:स्मित:

पुढे ट्रिप आखाल तेव्हा ब्राझील, ग्रीस वगैरेचा पण विचार करा. आम्ही फुकटे ते फुकटात पाहु.:खोखो:

आभार..

रश्मी.. पुढच्या ट्रिपचे प्लानींग सुरु पण झाले... म्हणजे स्वप्नरंजन तरी !

शशांक... मेकप टिप्स द्याव्यात काय ?

माधव... भन्नाट वारा सुटला होता त्या दिवशी.. एवढ्या मोठ्या लाटा पण मागे फिरवल्या जात होत्या.

छान फोटो आहेत.
मस्त झाली मालिका.
मॉरीशसला न जाताही छान ट्रिप झाली.
अगदी मॉरीशसमध्ये गेल्यासारखे वाटले.
प्रचि १० बद्दल काही लिहा.

कामिनी,
१० मधले झाड भेरली माडासारखेच होते. पण आपल्याकडचा फुलोरा मोठा असतो यापेक्षा. आपल्याकडे त्यात "अर्ध्या" सुपार्‍या लागतात. ( जी फळे असतात ती अर्ध्या कापलेल्या सुपारी सारखी दिसतात. )

ह्म्म संपली ट्रिप.. बाहेर गेल्यावर परत घरी यायची ओढ असली तरी शेवटच्या दिवशी मला दिवसभर खुप वाईट वाटत राहते. परतीच्या वाहनात बसल्यावर तर उडी मारुन बाहेर पळावेसे वाटते.. Happy

आता दुबाई Happy

साधना, पुर्वी मला पण वाटायचे तसे.. आता एक प्रवास संपला कि पुढच्या प्रवासाच्या योजना मनात तयार व्हायला लागतात !

मॉरिशियस, मालदीव, बाली, न्यू झीलंड.... सगळीकडचा समुद्र असाच वेड लावणारा आहे.

अप्रतिम झाली आहे लेखन माला... खुपच नविन माहिती आणि फोटोज पाहायला मिळालेत. धन्यवाद.
शशांकजी, ती वेंधळी चिमणी आत्ता तुम्ही नि.ग वर जी फुलांची लिंक दिली आहे त्यातलीच वाटते आहे!

दिनेशदा, खुपच सुंदर लेखमालिका. आम्ही तर बसल्या जागीच तुमच्या बरोबर मॉरिशियस फिरून आलो. प्रत्येक फोटो मनाच्या कोनाड्यात जपुन ठेवावा असा.

मामी तुम्ही काढलेले फोटो मस्त आलेत. त्या डोन्गरावरुन खाली मस्त पळत यावस वाटतय आणी शेवटच्या फोटोत रेतीत पाय पसरुन बसावेसे वाटतेय.:स्मित:

सुंदर लेखमाला. डोळे अगदी निळाईने भरून गेले आणि डोंगररांगांमधल्या हिरवाईनेही.
ते एक लाल चोचीचं गुबगुबीत करडं पाखरूही गोडेय Happy