मॉरिशियस - भाग सातवा - निद्रीस्त ज्वालामुखी - Curepipe Volcano Crater

Submitted by दिनेश. on 12 August, 2014 - 04:23

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152

मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre http://www.maayboli.com/node/50186

मॉरिशियस - भाग तिसरा - बोटॅनिकल गार्डन, Pamplemousses Botanical Garden, Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden http://www.maayboli.com/node/50225

मॉरिशियस - भाग चौथा - पोर्ट लुई Port Louis & Le Caudan Waterfront http://www.maayboli.com/node/50261

मॉरिशियस - भाग पाचवा - बीच टुअर Ile Aux Cerf Island (deer island) http://www.maayboli.com/node/50271#comment-3231325

मॉरिशियस - भाग सहावा - शिप मॉडेल फॅक्टरी http://www.maayboli.com/node/50311

यानंतर आम्ही क्यूअरपाईप या गावी एक निद्रीस्त ज्वालामुखी बघायला गेलो. क्यूअरपाईप हे नाव पडायचे
कारण पुर्वी पोर्ट लुई वरून येणार्‍या आगगाडीचे पाईप्स या गावी साफ करत असत.

हा ज्वालामुखी फक्त निद्रीस्त आहे, मृत नाही. पुढील हजारएक वर्षात तो कधीही जागा होऊ शकेल ( मराठी माणसा !!! ) . सध्या त्या विवराच्या तळाशी सरोवर आहे आणि कडांवर घनदाट जंगल आहे. थेट वरपर्यंत गाडी
जाते आणि त्या विवराच्या भोवती आपण पायी फिरू शकतो.

हा भाग उंचावर असल्याने हवा थंड असते. आम्ही गेलो त्यावेळी पाऊसही होता. तिथेच सोनटक्क्याचे रान माजलेले आहे.

१)

२)

३)

४) तिथला रस्ता आणि सभोवतालचे दृष्य

५)

६)

७)

८)

९) ढाल तेरडा

१०)

११) आपल्यापेक्षा थोडा वेगळा सोनटक्का

१२)

१३)

१४)

१५) साद घालणार्‍या पायवाटा

१६)

१७) अधून मधून विवरात डोकावत होतोच

१८) विवराचा तळ

१९)

२०) तिथेही इंद्रधनुष्य

२१)

२२)

२३)

२४)

२५)

२६) टिपीकल मॉरिशन थाली... किम्मत १,३०० भारतीय रुपये.. आग्रहही फारसा नव्हता Sad

२७ ) देवदर्शनाच्या वाटेवर

२८) गोड्या पाण्याचे सरोवर

पुढील भागात देवदर्शन करु ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केला ना...
खरे तर त्या विवराला पुर्ण प्रदक्षिणा मारायची होती पण वेळ नव्हता.. एका बाजूला विवर आणि दुसर्‍या बाजूला असे दृष्य दिसत असते.

मस्त

मस्त फोटो. २३ नंबर पाहुन भुई चाफ्याची आठवण झाली. ते फुल असे नसेल पण माझ्या आठवणीत असे आहे. Happy .
.

निद्रिस्त ज्वालामुखी जागृत व्हायच्या आधी सुचना देत असणार ना? नाहीतर पर्यटक आपले विवरात वाकुन बघताहेत आणि हे साहेब अचानक भ्वॉक करुन बाहेर येतील... Happy

मामे, इतकी कंजुषी कशाला गं... अजुन टाक ना फोटो

आभार !
मामी, छान आहेत फोटो.. तूम्ही पुर्ण प्रदक्षिणा मारलेली दिसतेय. आणि काही वेगळी ठिकाणे बघितली असतील तर त्याचे पण फोटो येऊ देत कि..

साधना, इतक्या वर्षाची झोप झाल्यावर थोडे आळोखे पिळोखे देणार ना.. आधी बुडबुडे, मग वाफा, मग धूर असे होणार.. शिवाय हवामान खात्याला पण अंदाज येईलच.

सध्या त्या डोंगरावरच घरे बांधलेली आहेत.. असे ना घडो, पण त्यांना सुरक्षित जागी पण हलवावे लागेल.

उदय.... नवलाची गोष्ट म्हणजे तिथे काहीही विकायला नव्हते. ( किमान चणे फुटाणे, भेळ, गंडेरी, शिंगाडे, बोरे, पेरु, फुगे, साबणाचे फुगे, फोटोवाला, भविष्य सांगणारे..... हवे होते नै )

मॉरिशस अतिशय सुंदर आहे, दिनेशदा तुम्ही दिलेली माहीतीही छान आहे.

२५ नं च्या फुलाचे नाव नॉस्टर्शियम (Nasturtium) आहे. याची फुले आणि पाने दोन्ही सॅलडमध्ये घालून खातात. साधारण मोहरीसारखा तीक्ष्ण वास आणि चव असते. आपल्या डोश्यावर पण मस्त दिसतात ही फुले. माझ्याकडे पिवळ्या फुलांचे रोप आहे पण याचे खुप प्रकार असतात. मस्त भडक रंग असतात यात.

verrry beautifullllllllllll!!!

दिनेश दा हे ही फोटो सुंदर आहेत. मालिका बघायला मजा येतेय. >>> +१००

मामीचे फोटोही मस्तंच.

दिनेश, २३ वा फोटो सुंदर!

रच्याकने, मालिका सुरू झाल्यापासून तुमच्या देवाचे (निसर्गाचे) दर्शन तर घडवताहातच. आता हा कुठला वेगळा देव दाखवणार आहात त्याची उत्सुकता आहे Happy

नाहीतर पर्यटक आपले विवरात वाकुन बघताहेत आणि हे साहेब अचानक भ्वॉक करुन बाहेर येतील >>> Rofl परिस्थीती गंभीर असेल पण हे वाक्य वाचून हसायला आलेच.

परत आभार !

कट्यार.. माझ्या कॅमेरा फार गुणी आहे !

हो मनी, मी खाल्ली आहेत. माझ्या गोव्याच्या घरी लावली होती. एका मायबोलीकरणीनेच ( भाग्य) बिया पाठवल्या होत्या. या ठिकाणी ही फुले अशीच रस्त्याच्या कडेला फुललेली होती.

माधव, अगदी तीर्थक्षेत्री जाणार आहोत आपण !