मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटते की सेरीयल अशी लांबवणे ही "जनतेच्या पैशांची उधळण" आहे
यावर एक धागा काढावा काय? की असा धागा काढणे यशस्वी आयड्ञांकडे आऊटसोर्स करावे?
(अरे व्वा, मलाही लिंक देणे जमले की..... पण भारी कॉपीपेस्ट करीत बसावे लागते बोवा... )

अग नाही दक्षु, अदिती प्रेग्नन्ट दाखवली नाहीये, वरती ते मधुकर देशमुखानी तसा अन्दाज व्यक्त करुन लिहीलय. आणी आतला आवाज वगैरे असत ग, पण आजकाल नोकर्‍यान्चा जिथे भरवसा राहीलेला नाहीये, तिथे या कलाकाराना प्रत्येक वेळी काम मिळेलच अशी शाश्वती नसावी. मागे भगवान दादा आणी गणपत पाटलान्चे वैयक्तीक आयुष्यात पैसा नसल्याने जे काय झालेय, त्यावरुन या लोकानी आता आहे ते कमवा, पुढचे कोणी पाहीलेय असा विचार करुन कामे घेतली असतील.

अवान्तरः अग्नीपथ, शक्ती सारखे अभिनयाचा कस दाखवणारे सिनेमे अमिताभने केलेत, तसे महान आणी गन्गा जमना सारखे पुचाट सिनेमे पण केलेत की.

पण लॉजिक बाजूला ठेवुन प्रेक्षक बावळट आहेत हे निर्माते आणी लेखकाना का वाटत रहाते देव जाणे.

मी काय म्हणते मंदार कुमठेकर.. तुम्हाला जर इथले प्रतिसाद वाचण आवडत नाहीये तर तुम्ही इथे येउन प्रतिसाद वाचण का थांबवत नाही.... असंख्य लोकांना थांबा थांबा अस सांगण्यापेक्षा आपण एकट्याने थांबण जास्त सोप नाही का?

>>>> असंख्य लोकांना थांबा थांबा अस सांगण्यापेक्षा आपण एकट्याने थांबण जास्त सोप नाही का? <<<
बरोबर आहे तुमचे Happy मान्य. छान आहे वाक्य.
पऽऽऽणऽ............
असंख्य लोकांना "पळा पळा" अस सांगण्याकर्ता आपण एकट्याने शिंगे रोखून गर्दीत धावत घुसणेही सोप्पेच नाहीये का? Wink Proud

कुमठेकर दक्षिणाने काय आचरटपणा केलाय? ती एकटी नाहीये टिका करणारी, आम्ही साssssssssssरे आहोत त्यात सामिल. ऊगा तिला एकटीला बोल लावु नका, कळ्ळे?

कित्ती कित्ती दुष्ट बै तुम्ही लोक.
त्यांच घर फळलेल/फुललेल / बहरलेल चाल्णार नाही. प्रेग्नंट तर म्हणे नक्को नक्को.
हे त्या होणार्‍या बाळावर अन्याय करत आहात असे नाही वाटत तुम्हाला ?

हो की.:फिदी::डोमा:

पुढची ईस्टोरी... आतल्या गोटातुन.. खास हा धागा "शिरेसली वाचणार्‍यांन" साठी
अदि ला आता स्म्रुतिभ्रन्श नाही स्म्रुतिभ्रष्ट होणार.. (खरे म्हणजे ति तशी अक्टिंग करणार)
तिला वाटणार की 'तिचे लग्न झालेले आहे. जय तीचा नवरा आहे. मग तीचे मन राखण्यासाठी सगळे तशीच अक्टिंग करणार. जे खरे आहे तेच सगळे. केतकर काका काकु, आण्णा, सगळे सगळे तसेच फ़क्त उघड उघड पणे.
गट्टु, रजनी, जुई, म्हसोबा सगळे च जळ जळ जळणार पण करतात काय? गट्टु चा आदेश (होम वाला नाही) असणार. आदि चे मन आधी राखा. Happy

आदितीची स्म्रुती आता जाणार, ती आपल्या पप्पांकडे रहायला जाणार, ते तीचे लग्न सुभा शी लावणार आणि जय गप्प बसणार...
मग अचानक तिची स्म्रुती परत येणार आणि सुभा तीला उदार मनाने जय साठी सोडून देणार

सुभा तीला उदार मनाने जय साठी सोडून देणार >>> ?? Happy एवढ्या अ‍ॅडवान्स झाल्यात मराठी सिरीयल्स? Proud

बाय द वे तिची व त्या जाह्नवीची मेमरी एकाच वेळेला गेली असती तर हिला तिकडे व तिला इकडे पाठवून जरा बदल झाला असता Happy

>>>> मेरी आदिती नही दूंगा .....आऽऽऽऊंऽऽऽऽ <<<<< Rofl
नीरा, आयडीया खतरनाक आहे, पण सेरियल लेखकु इतके डोके लावतील याची शक्यता कमि वाटते...

काल तर काय अती दाखवलंय की अख्खा दिवस हॉस्पिटल मध्ये बसून सुद्धा जय ला आदितीला भेटता आलेलं नाही. ती नर्स ऑर्डर सोडते ना 'एकेकाने आत जा' Lol Rofl बेजान हसले मी... सारखं लाईटचं बटण ऑन ऑफ करावं तसं यांची आदिती ला भेटण्याची वेळ संपते, ते पण नेमकं जय ला आत जायचं असतं तेव्हाच.

Pages