काय मागु ?

Submitted by नितीनचंद्र on 12 August, 2014 - 02:57

कोणा ज्योतिषाला आपले भविष्य खोटे ठरावे असे वाटते ? काही प्रसंगी भविष्य चुकावे अशीच प्रार्थना कराविशी वाटते कारण ज्याने प्रयत्नपुर्वक टाळावे असा जातकच ( प्रश्नकर्ता ) हतबल झालेला दिसतो.

मी जिथे नोकरी करतो तिथे मला ज्योतिषाचा अभ्यास आहे हा विषय लपवण्याचा प्रयत्न असतो. कारण कामाच्या ठिकाणी ज्योतिष विषयाची चर्चा करणे हा कामाच्या वेळेचा अपव्यय तर आहेच शिवाय ज्यांना ज्योतिष विषयाचा तिरस्कार आहे त्यांना आपल्यावर टीका करायची अनायसे संधी दिल्यासारखे आहे.

सुरेशपासुन ( बदललेले नाव ) हा विषय लपला नाही कारण सुरेश जरी आपल्या गुणांवर नोकरीला लागला होता तरी ज्यांच्या ओळखीने तो आमच्या कंपनीत आला होता त्यांना माझा ज्योतिषविषयक अभ्यास माहित होता.

एकदा कामाच्या निमित्त आम्हाला दोघांना मुंबईला जावे लागले आणि लांबच्या प्रवासात गप्पा होत असताना हा विषय निघाला. कंपनीमध्ये याची चर्चा करायची नाही असे ठरवुन मी त्याची जन्मवेळ, जन्मस्थळ आणि जन्मतारीख मागुन घेतली. आजकाल स्मार्टफ़ोनवर अ‍ॅस्ट्रोअ‍ॅपवर पत्रीका बनाविण्यास वेळ लागलाच नाही.

मुंबईला जाताना आम्ही चहा पाण्यासाठी थांबलो. चहा झाल्यावर सुरेशने नेहमीप्रमाणे त्याची सिगारेट शिलगावली आणि त्याची सिगारेट संपवुन तो ड्रायव्हरसीटवर बसला मग मी त्याला प्रश्न विचारला, " बोल काय प्रश्न आहे ?"

सुरेश म्हणाला " प्रश्न काहीच नाही. सर्व काही चांगले आहे. ते तसेच राहिल ना ?"

एखादाच असा जातक असतो ज्याला तात्कालीक प्रश्न काहीही नसतो तर भविष्याचा वेध त्याला खरा भविष्यकाळाच्या नियोजनासाठी हवा असतो. मला अडचण याचीच असते की जेव्हा जातक काहीच विचारत नाही तेव्हा नेमके कशावर बोलायचे ?

सुरेशच्या पत्रीकेत कुटुंबस्थानातला राहु आणि नेपच्युन वृश्चिक राशिला तर त्याचा अधिपती मंगळ अष्टमस्थानात आहे. तसेच रोग स्थानात मीनेचा गुरु वक्री आहे.

सुरेशच सातत्याने सिगारेट ओढण मला सलत होत त्याच बरोबर त्याच तंबाखु खाणे आणि मुखाचे आरोग्य स्थान बिघडलेले असणे या संदर्भात काही प्रश्न विचारावा असे वाटु लागल्यामुळे मी त्याला " हे तंबाखु आणि सिगारेटचे व्यसन किती वर्षांपासुन आहे असा प्रश्न विचारला." यावर उत्तर देताना सुरेश म्हणाला "साधारण २० वर्षे आहे. हाच प्रश्न का विचारावासा वाटला ? पत्रिकेत अजुन काही विचारण्यासारखे नाही का ?"

पत्रीकेचे विवेचन करताना मी सांगीतले की कुटुंबस्थान किंवा दुसरे स्थान हे तोंड/ खाणे पिणे व त्यासंद्र्भाताल्या सवयी या करता पाहिला जातो. इथे असलेली वृश्चिक रास आणि त्यात असलेले राहु आणि नेपच्युन ग्रह कुटुंबस्थान किंवा मुखाचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभुत होताना दिसतात याचा प्रत्यवाय लगेच अष्टमात पडलेली वृषभ रास पाहुन येतो. त्यात अष्टमात पडलेला मंगळ आणि केतु हे पापग्रह दिसतात. "या तंबाखु/ सिगारेटमुळे कधी काही त्रास झाला आहे का ? पत्रीकेत किमान एकदा तरी यासाठी ट्रिटमेंट घ्यावी लागली असणार असे दिसते" अस म्हणताच भर हायवेवर सुरेशने कार वेग कमी करत बाजुला घेतली आणि बंद करुन म्हणाला " काय सांगता ?"

" काय सांगु तुम्हाला ? मला कितीतरी दिवस जबडा कितीतरी दिवस निट उघडता येत नव्हता. बरीच ट्रीटमेंट घेतल्यानंतर हे ठिक झाला. मला डॉक्टरांनी तंबाखु आणि सिगारेट सोडायचा सल्ला दिलाय पण हे व्यसन सुटतच नाही. डॉक्टरांच्या मते माझ्या जबड्यांच्या स्नायुला फ़ंगल इंन्फ़ेक्शन झाल होत. ते एका खास प्रकारच्या अ‍ॅंटीबायोटिक्सने बर झाल पण डॉक्टरांच्या मते जर त्या जंतुंना या अ‍ॅंटीबायोटिक्सवर मात करता आली तर हे पुन्हा होऊ शकत."

मलाही ह्या पत्रीकेत आता औत्सुक्य निर्माण झाल होत " मग आता तुमच म्हणण काय ?" मी सुरेशला प्रश्न विचारला.

"तुम्हाला माहित आहे आणि याचा प्रचारही दुरदर्शन सारख्या माध्यमातुन होतो. कायद्याने आता सिगारेटच्या पाकिटावर आणि तंबाखुच्या पाऊचवर कॅन्सरच्या घोक्याची सुचना दिलेली असताना मी वेगळ काय सांगाव अशी अपेक्शा आहे ? या सर्व सुचना तुम्हाला समजतात मग तुम्ही हे सर्व सोडत का नाही ." तो ऐकतो आहे हे पाहुन मी जरा माझ्या जास्त वयाचा आधार घेत उपदेश केला.

" सोडायची आहे हो पण सुटत नाही म्हणुन तर काळजी वाटते. तुम्ही ही पत्रिका पाहुन नेमक्या विषयाला हात घालाल अशी कल्पना पण आली नाही कारण ही गोष्ट घडली त्याला आता दहा वर्षे झाली. तेव्हा तर मी ऐन जवानीत होतो. एखाद महिना जेमतेम झाला आणि मग सल्ला झुगारुन मी पुन्हा सिगारेट ओढु लागलो. तंबाखु मात्र गायछाप ऐवजी ही त्यातल्या त्यात चांगल्या ब्रॅडची आणि कापडी छोट्याश्या पिशवीत असलेला पाऊच जो तोंडात ठेवायला सोईचा आणि थुंकताना सार्वजनिक ठिकाणी पिचकारी न मारता फ़ेकता येईल असा वापरतो."

तंबाखुबरोबरच मनातली मळमळ पण बाहेर आली. अनेकांची अनेक व्यसने सुटणे हा मोठा कठीण कार्येक्रम असतो. त्यातुन माझी स्वत:ची बार वर्षे सुटलेली सिगारेट काही महिने सुरु राहुन प्रयत्नपुर्वक सोडावी लागल्यामुळे फ़ार उपदेशामृत पाजणे कठीणच होते.

" मला सांगा पुढे काय होईल ?" मला कॅन्सरचा धोका आहे किंवा नाही ? सुरेशने महत्वाचा प्रश्न विचारला.

सुरेशची पत्रीका इथे वाचकांसाठी दिलेली आहे. जन्मवेळ, जन्मतारिख आणि स्थळ तसेच खरे नाव गुप्त ठेवले आहे. सार्वजनिक ठिकाणी याचा उल्लेख करायचा नाही अशी आचारसंहीता असल्यामुळे हे क्रमप्राप्त आहे. पत्रिकेतल्या सहाव्या स्थानातला मीन राशीचा गुरु तांत्रिक दोषामुळे नीट दिसत नाही. तसेच अष्टमात मंगळही नीट दिसत नाही.

Suresh.png

सुरेश आता त्या धक्यातुन बराच सावरला होता. त्याने गाडी सुरु केली आणि आम्ही परत मुंबईच्या दिशेने जाऊ लागलो. पत्रीका फ़ार न तपासता कॅन्सर विषयी होय किंवा नाही सांगणे चुकीचे ठरले असते. जर मी वर वर पाहुन कॅन्सरचा धोका आहे म्हणल तर हा आनंदी मनुष्य निष्कारण आपले आयुष्य एका भितीपोटी जगेल. आणि कॅन्सरची भिती नाही म्हणाव आणि ही केस अपवादात्मक रित्या चुकली तर मग मात्र टोचणी लागेल ती कायमची. "इतक लगेच नाही सांगता येणार, मला संदर्भ तपासावे लागतील "अस म्हणुन मी सुरेशकडुन वेळ मागुन घेतला.
मलाही उत्सुकता लागलीच होती.

सावकाशीने मी खास करुन श्री पै यांनी लिहलेले मेडीकल अ‍ॅस्ट्रोलॉजी हे पुस्तक उघडले ज्यात गुरु हा कॅन्सर प्रोन असतो या संदर्भात. याच कारण सुरेशच्या सहाव्या म्हणजेच रोग स्थानात बसलेला वक्री गुरु. श्री पै हे स्वत: पेशाने डॉक्टर नाहीत परंतु त्यांच्या पत्नी डॉक्टर असल्यामुळे व त्यांच्या प्रेरणेने त्यांनी हे पुस्तक लिहल आहे. त्यांचा रोगांचा ज्योतिषशास्त्राच्या अंगाने अभ्यास हा केव्हडातरी व्यासंग आहे. हा व्यासंग खास करुन कॅन्सरचे पेशंटचा त्यांनी ११३५ कुंडल्यांचा अभ्यास करुन व आपला शोध निबंध धी अमेरिकन फ़ेडरेशन ऑफ़ अ‍ॅस्ट्रोलोजर्स च्या रिसर्च जर्नलमध्ये प्रसिध्द करुन प्रमाणीत केलेली आहे. त्यांच ह्या विषयातल मत मी प्रमाणीत मानुन जातकाला सल्ला देण्याचे ठरवले.

श्री पै यांनी लिहल्या प्रमाणे मंगळ, गुरु आणि हर्षल यांचा योग एकमेकांशी नव्हता ( युती ही नाही आणि दृष्टीयोगही नाही ) तसेच मंगळ, गुरु आणि हर्षल यांची दृष्टी विषीष्ठ स्थानावर असणे हा दुय्यम प्रकारचा योग, याशिवाय तिसरा आणि चवथ्या प्रकारच्या योगात कॅन्सर होण्याची शक्यता कमी कमी होत जाते परंतु अजिबात नसते असे नाही.

सुरेशच्या पत्रीकेत धनस्थान किंवा कुटुंबस्थान यावर गुरुची नववी दृष्टी तसेच अष्टमातल्या मंगळाची सप्तम दृष्टी स्पष्टपणे दिसत होती. युरेनस किंवा हर्षलला दृष्टी असते असे मानायचे कारण नाही कारण जुन्या ग्रंथात हर्षल, नेपच्युन किंवा प्लुटॊ या ग्रहांना स्थान नाही. आजकालच्या ज्योतिषांनी कुंभ ही रास हर्षलची मानली आहे. प्रत्येक ग्रहाला सातवी दृष्टी असते हा जरी नियम लावला तरी श्री सुरेश यांच्या कुटुंबस्थानावर किंवा जिभ, तोंड यांचे कारकत्व असलेल्या स्थानावर ही हर्षल अथवा युरेनसची दृष्टी नाही.

म्हणजे श्री पै यांनी सांगीतलेल्या नियमातला एकही नियम संपुर्णपणे लागु होत नसला तरी थोड्याप्रमाणात लागु होतो. तसेच एखाद्या सिगारेट न ओढणारा किंवा तंबाखु न खाणारा जर असा प्रश्न विचारेल तर कॅन्सरची जेव्हडी शक्यता दिसेल त्यापेक्शा यात जास्त शक्यता असल्यामुळे मी त्याला तुझी पत्रिका कॅन्सर प्रोन आहे त्यामुळे तु सिगारेट आणि तंबाखुचा कायमचा नाद सोड असे सांगीतले.

श्री सुरेश यांचा स्वाभावीक प्रश्न होता की कॅन्सर झालाच तर वयाच्या कितव्या वर्षी होईल ? मी श्री सुरेश यांना हा काळ केतुच्या महादशेत म्हणजे २०१६ ते २०२३ या काळात तसेच राहुचे वृषभ राशीतले भ्रमणही तेव्हाच म्हणजे २०२२ च्या सुमारास येईल असे सांगीतले. याच सुमारास श्री सुरेश यांची साडेसाती सुध्दा सुरु होते त्यामुळे त्यांना मानसीक त्रासाबरोबरच बारावा शनी खर्च देऊन जाईल. हा कशाचा हे वेगळे सांगायला नकोच होते. सुरेशने मला व्यसन सोडेन म्हणुन ग्वाही दिली असली तरी हे घडेलच याची खात्री देता येत नाही.

यानंतर सुरेश यांना अचानक नोकरी सोडावी लागली. याचे कारण लिहणे म्हणजे आणखी एक स्वतंत्र प्रकरण लिहावे लागेल. अधुन मधुन आम्ही बोलतो. पण व्यसनाबद्दल मी विचारत नाही. व्यसनाबद्दल मायबोलीवर खुप चर्चा झाली आहे. एखाद व्यसन माणसाला का लागत याच कारण शोधताना पुर्वजन्म प्रभावाने अस मी सांगीतल्यास मायबोलीवर पटणार नाही. पण सुरेश यांची पत्रीका पहताना खाणे पिणे यांच्या सवयी तपासताना राहु त्या म्हणजे द्वितीय स्थानात सापडतो. राहु हा पुर्वजन्माचे दोष दाखवतो. याचाच अर्थ धुम्रपान किंवा तंबाखुचे कोणत्याही प्रकाराने सेवन हा दोष किंवा सवय ह्याच नाही तर मागील जन्मापासुन आहे हेच दर्शवितो. राहु हा धुम्रपान दर्शवितो असा समज वाचकांनी करुन घेऊ नये परंतु खाण्यापिण्याच्या सवयीत दोष आहे. दुसरे स्थान बाधीत आहे जे सवयी किंवा व्यसन याचे कारण आहे.

दुसरे स्थानी जलराशी असुन तिथे शुक्र असता दारुचे व्यसन लागते. तसेच गुरु असता गोड खाणे याची सवय लागते. बुध असता खाणे लहान मुलाप्रमाणे जास्त वेळा पण थोडे थोडे तसेच मंगळ / रवी असता तिखट पदार्थ खाणे. शुक्र जल राशीत नसता भेळ, वडापाव या सारख्या चटकदार पदार्थांची आवड असे सांगता येते. शनी असता शिळे खाणे तर चंद्र असता दुधाचे पदार्थ याची आवड दिसते. दुसरे स्थानी असलेला राहु नॉनव्हेजची आवड देतो.

सवयी कशा लागतात असा विचार केला तर अनुकरणाने लागतात. मात्या पित्याकडुन लागतात, व्यावसायीक सवयी असतात. काही समाजात लहान मुलांना दारु पाजतात किंवा घरातच दारु बनते त्यामुळे दारु पिणे हे चहा पिणे इतके सहज घडत असते. सिगारेटचे तसे नाही. कोणत्याही समाजात ( भारतात तरी ) सिगारेट वडीलांच्या अनुकरणामुळे लागेल पण घरात मुद्दाम ओढायला लावली जाणार नाही. अर्थात अनुकरण करणे हे जरी साहाजिक असले तरी त्याचे व्यसन होणे आणि ते त्रास होऊनही न सुटणे ह्याचा विचार केल्यास पुर्वजन्म आणि राहुचा प्रत्यवाय आल्याशिवाय रहात नाही.

२०२२ साल अजुन यायचे आहे. परमेश्वर करो आणि सुरेशचे व्यसन सुटो अन्यथा अल्प शक्यता असलेले कॅन्सरच्या शक्यतेचे भविष्य खोटे ठरो. यापेक्शा मी काय मागु ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे ..

माझी पत्रिका अशीच म्हण्जे तूळ लग्नाची आहे. राहू, केतू या सुरेशच्या पत्रिके सारखेच आहेत ...बाकीच्या ग्रहांची स्थानं वेगळी आहेत. माझी पत्रिका सुरेशपेक्षा भयानक आहे. मीझ्या पत्रिकेच्या ९ व्या घरांत ४ ग्रह आहेत; शनि-मंगळ-चंद्र-बुध.

मला दारू , सिगरेट इ. व्यसनं नाहीत, मी मांसाहार करत नाही. पण मला तुमच्या वरच्या भाकीतामुळे थोडी भीती वाटली

अर्पणाजी,

आपल्या पत्रिकेचा अभ्यास अश्या पध्दतीने करु नका. नुसते ग्रह नाहीत तर अनेक फॅक्टर यात ४ मिनीटाच्या फरकाने बदलतात. उदा. माझे वडील आणि त्यांचे जुळे भाऊ यांच्या वरवर पत्रिका सारख्या दिसायच्या पण कृष्ण्मुर्ती पध्दतीने अभ्यास केल्यावर समजले की दोघांच्या आयुष्यात साम्य का नाही.

धन्यवाद नितीनचंद्र. माझा अभ्यास नाही आहे, मला काही नाही कळत; फक्त पत्रिका आहे जवळ त्यात साधर्म्य दिसलं म्हणून भीती वाटली.

अपर्णा उगाच घाबरु नका. काहीन्ची पत्रिका वर वर सारखी असली तरी प्रचन्ड फरक असतो. नाहीतर टाटान्च्या बरोबरीने त्याच वेळी जन्मलेले बरेच जण टाटान्सारखे वन मॅन शो झाले असते.

पुन्हा एकदा अप्रतिम लेख… मित्राबाबतची भविष्यवाणी खोटी ठरो ही अपेक्षा… अजून नवीन लेखांच्या प्रतीक्षेत. पुढील लेखनास शुभेच्छा!

गुरु स्थानहानी करो जीवः प्रमाणे न वागता स्वराशीचे सात्विक फल देवो व जातकाला सद्बुद्धी देवो अशीच इच्छा आहे.आपले भविष्य १०० टक्के चुको!

ते त्या पत्रिकेतल्या घरांबद्दल आहे. तुमच्या लक्षात येणं कठीण आहे. त्यांना बरोब्बर समजेल.

दुसर्‍या आणि आठव्या स्थानाचा उल्लेख मी केलेला आहे. पण दोन वेळा पाच आणि अकरा या स्थानाच्या उल्लेखाबद्दल काही समजले नाही.

असो. तुम्ही लिहले म्हणजे ते योग्यच असेल.

The following do not ‘work’ i.e., don’t ‘produce the desired effect or claimed results / benefit(s)’: हे सर्व निरर्थक व विनाशी थोताण्ड आहे.

‘Alternative medicine or ‘tall-claims-quackery’ (all other than modern ‘allopathic’ medicine & surgery), astrology, biochemic (“12 क्षार / salts”), black-magic (करणी, मूठ मारणे / मंतर मारना, etc.), casting-off-evil-gaze (नझर उतारना), colour-therapy, 'double-your-money'-trick-[charlatans], dream analysis, feng-shui ("wind-water" ‘वास्तुशास्त्र’), 'get-rich-quick' schemes, ghee-detox, holy-water therapy, homoeopathy (worse than holy-water!), kundalini-chakra awakening / stabilization, magneto-therapy, marma-therapy, numerology, palmistry (हस्तसामुद्रिक), peer-aulia, physiognomy, pilgrimage, reflexology, Reki, satyanarayan, séance-planchett, shraddha-paksh, siddhi-babas, Tarot, water therapy, etc.

Spending one’s life-time-resources in pursuing any of the above is costly, stupid, useless -- & may be dangerous if relied on solely / exclusively.