online hotel booking vishayi mahiti havi aahe

Submitted by निशिगंध on 11 August, 2014 - 11:08

online hotel booking kase krtat ..krupaya savistar mahiti dya...maze adnyan dur kara...

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्‍याच टुरिझम वेबसाईट्स आहेत, जशा की ट्रिप अ‍ॅड्वायझर.कॉम, हॉटेल्स.कॉम, ऑर्‍बिट्झ ज्यांच्यावर फ्लाईट, हॉटेल्स, हॉट्ल्स+फ्लाईट्स असे ऑप्शन्स अवलेबल असतात. तीन चार साईट्स एका वेळी ओपन करून कोण काय रेट्स देतंय ते बघा. कायम ऑनलाईन बुकिंग्ज केली आहेत तेव्हा काळजीचं कारण नाही. अर्थात हे सगळं करण्यात वेळ मात्र बराच जातो.
ऑनलाईन हॉटेल सर्च करताना ट्रॅवल डेट्स, किती अ‍ॅडल्ट्स, किती मुलं, मुलांची वयं त्याप्रमाणे किती रुम्स वगैरे माहिती भरावी लागते. हे भरल्यावर मग कोणत्या हॉटेलच्या रुम्स त्या काळात शिल्लक आहेत, त्यांचे दर हे चॉईस दिसतात. तुमच्या खिशाला परवडेल ते ऑप्शन्स निवडून मग फायनली बुकिंगचे पैसे भरू शकता. तुमच्या इमेलला त्याचं कन्फर्मेशन येतं ते प्रिंट करून ज्यावेळी चेक इन कराल त्यावेळी दाखवा.

तुम्हाला नक्की काय हवंय ते आधी ठरवा..
इतर site वरून माहिती गोळा करून तुम्हाला देणार्‍या Trivago.com सारख्या site आहेत.
आधी त्या हॉटेलमधे राहणे झाले असेल तर प्रश्न नाही...
नवीन ठिकाणी जाताना, ती जागा Google Map वर कुठे आहे ते बघून गेल्यास आधी अंदाज येईल.

बुकिंग करणे सोप्पे असते.
पण Cancellation ची शक्यता असेल , तर Cancellation policy बघुन घ्या.
तिथेच जेवणाची अपेक्षा असेल तर हॉटेलमधे अगर जवळपास जेवण्याच्या सोई काय आहेत ते बघा . (हे पान आहारशास्त्र / पाककॄती मधे आहे म्हणून म्हणतोय)...

सायो + १

वर सायोनं दिल्या आहेत त्या साईटस चांगल्या आणि ऑथेंटिक आहेत. तेथून तुम्ही बुकिंग करू शकता. इतर उगाच माहित नसलेल्या साईटवर बुकींग न केलेले बरे. आपले क्रेडिट कार्डचे डिटेल्स द्यावे लागतात त्यामुळे ही खबरदारी घ्या.

या साईटसचा उपयोग करून आपल्याला हवे ते एखादे हॉटेल निवडून मग त्या हॉटेलच्या साईटवर जाऊनही बुकिंग करता येईल. फोन करून त्यांच्याशी बोलून घासाघीस करता येईल. बरेचदा अशावेळी पार्टपेमेंट करून मग उर्वरित रक्कम प्रत्यक्ष गेल्यावर भरता येते.

डायरेक्ट हॉटेलशी बोलल्याने जेवणाचा प्लॅनही आपल्याला हवा तो निवडता येतो. साईटसिइंग करता दिवसभर बाहेर राहणार असाल तर फक्त ब्रेकफास्ट अथवा ब्रेफा + डिनर असा प्लॅन निवडावा.

ऑल द बेस्ट.

हरकत नसेल तर धाग्याचे नाव छोटे करु शकाल का?

वरच्या प्रतिसादकांना अनुमोदन. बहुतेक सर्व माहिती आली आहे वर.

मी booking.com साईट वरुन बर्याच वेळा बुकिन्ग केले आहे. दर पण वाजवी आहेत ...

maayboli vr prashna vicharnyacha maza pahilach prasang aahe...tari thode sambhalun ghyave...