नुकताच नेटवर आमीर खानने पीके चित्रपटासाठी केलेले पोस्टर पाहिले आणी धक्काच बसला ! पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नक्की कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला? परंपरा, प्रतिष्ठा आणी अनुशासन असलेली आपली संस्कृती खाऊजा च्या लाटेपुढे हतबल होत आहे का ? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो. हाच ट्रेंड मराठीत आला आणी स्वजो ने असेच पोस्टर केले तर? त्यात बजेट नाही म्हणून हातात टू इन वन च्या ऐवजी आयपॉड नॅनो घेतता तर? अरेरे, कुठे ते अंगभर कपडे घालून वर निळा स्वेटर घालणारे आमच्या वेळचे नायक आणे कुठे हे खुदालाही डरवणारे आजकालचे नायक!
१ हेच का ते अच्छे दिन ?
२ अमीर खानच्या पत्रिकेत शुक्र उच्चीचा पण बुध नीचेचा असे असल्याने तो असे narcissistic वर्तन करत असेल का?
३ Homeopathy मधल्या Lycopodium किंवा Pulsetilla औषध अशा केसेस मध्ये परिणामकारक असेल का?
४ मांसाहारी व्यक्तीमध्ये सात्विक गुणापेक्षा तामस गुणाचे संवर्धन जास्त असल्याने असे होत असेल का?
५ अरविंद केजरीवालांसारखा स्वच्छ माणून पंप्र झाल्यावर असला आचरटपणा थांबेल का?
६ व्यवसायिक भारतीय सिनेमात कॉस्ट्यूम डिझायनिंग हा विषय गभीरतेने घ्यायला कधी सुरुवात होणार? इथे तर मुदलात कॉस्ट्यूमचाच पत्ता नाही.
हुम्म!!! उगा कायपण!!!!,
हुम्म!!! उगा कायपण!!!!, वल्कले व्हती की!!!!! अन मी म्हणतो ह्या चंदेल राजांस "फुलावर फुल आपटताना" बी दाखवता आलेच असते की
सोन्याबापु. वर हेडरमध्ये
सोन्याबापु.:फिदी:
वर हेडरमध्ये विकुनी सन्स्कृती, मोदी, मान्साहार, आप, सोनिया ( च्या वाती) , राहुल, आरक्षण, समाज, अच्छे दिन्,तत्वज्ञान आणी होमीओ पॅथी आणुन हे सिद्ध केले की त्याना असे म्हणायचे आहे की यापुढे मायबोलीकरानी या हेडरमध्ये लिहीलेल्या धाग्यान्वर चर्चा करण्या ऐवजी इथे अमिरच्या धाग्यावर काय ती दन्गल, हाणामारी करावी.:खोखो:
म्हणजे अॅडमीन यान्चे पण काम वाचेल. आणी सगळ्याच चर्चा अगदी होमीओपॅथीसकट, इथे झाल्या तर हा बाफ हिट्टे बॉस ठरेल. पण मला तर असे काय्बाय घडताना दिसना.:अओ::फिदी:
सोन्या बापु लवन्गी
सोन्या बापु लवन्गी फटाक्यान्ची माळ लावली की अॅटमबॉम्ब?
<<
फुसकुली सोडलिये.
वर एका आयडीने बोलून झाल्यावर दुसर्या आयडीने येऊन झील तोडलेली दिसली नाही का?
*
त्या शब्दखुणांतल्या प्रत्येक खुणेचा डायरेक्ट संबंध लेखनाशी आहे हे एकेक प्रतिसाद उदाहरणादाखल घेऊन सिद्ध करून देऊ शकतो. च्यालेंज घेण्याची इच्छा असलेल्या क्षक्षक्ष क्षक्ष यांच्या डू आयडीने, किंवा विशिष्ट धाग्याच्या नावाच्या फेसबुकावरील मेंब्रांनी, पुन्हा ती आयडी माबोवर वापरणार नाही असे वचन द्यावे.
मग समजवून सांगतो.
गुरुजींची फेसबुकवरची पोस्ट
गुरुजींची फेसबुकवरची पोस्ट चिकटवू का ? वेगळी आहे. अशा प्रकारचे बाफ येतील तेव्हां ती पुन्हा वापरता येईल. लेखक, मेंब्रांची परवानगी असावी.
इब्लिस एखादी गोष्ट सहज म्हणून
इब्लिस एखादी गोष्ट सहज म्हणून लिहीली की त्यातुन गैरसमज किन्वा आपल्याला पाहीजे ते सोयीस्कर अर्थ लावायचे असे काही आहे का?
वर विकुनी अमीर शी सम्बन्धीत धागा काढला तर हेडर मध्ये चित्रपट, सन्गीत, नग्नता, सामाजीक सन्स्कार, इन्टरनेट ( ज्याच्या वरुन सहज रित्या नग्नता आणी बाकी गुप्त गोष्टी सहज शोधता येतात) असे का नाही टाकले?
मोदी, मान्साहार, सोनिया, आप वगैरे लिहुन विकुना अप्रत्यक्षीतरित्या असे सुचवायचे होते का, की अमीर वरुन झालेल्या चर्चेत बाकी सदस्य ही वर लिहीलेली नावे सहज म्हणून चर्चेत आणुन बाफ भरकटवुन टाकतात.
दुसरे ते झीलतोडे/ केसतोडे वगैरे शब्दान्चा अर्थ मला खरोखर माहीत नाही, कारण असले शब्द मी घरी, शेजारी अथवा इतरत्र ( मी रहाते तिथे तरी ) ऐकलेले नाहीत. दुसरे असे की तुमचे ज्यान्च्याशी नेहेमी वाद/ भान्डणे होतात, त्यान्च्याशी पण मला काहीही घेणे देणे नाही, कारण ते माझ्या परीचयाचे नाहीत, आणी मी मायबोली सोडली तर कुठल्याही आय डीला वैयक्तीकरित्या देखील ओळखत नाही. तेवढा वेळ पण सध्या ( ठरवला तरी ) मला नाही.
तुमचा त्या आय डीन्वरील राग मी समजू शकते, पण कृपया तुमचे वाद त्यान्च्याशी ठेवा. माझे तुमच्याशी काही वैर नसल्याने मला त्यात न गोवलेले बरे, कारण मी वादापासुन नेहेमी दूर रहायचे ठरवते. जर तुम्हाला मला काही बोलायचे असेल तर आधी त्या विकुना बोला, ज्यानी हेडरमध्ये असे लिहुन अप्रत्यक्षरित्या विनोद/ वाद/ गैरसमज इत्यादी निर्माण केलेय.
अर्र्र्र्र्र्र्र, माझा बाफ
अर्र्र्र्र्र्र्र,
माझा बाफ चुकला होता....
अर्र्र्र्र्र्र्र, माझा बाफ
अर्र्र्र्र्र्र्र,
माझा बाफ चुकला होता....
>>>>>>
कट्यार काळजात घुसली ,,, तुम्ही कुठे घुसवली
(दिवा घ्या स्माईली)
( हे पोस्टर आल्याबरोबर
( हे पोस्टर आल्याबरोबर गुर्जिंचं स्टेटस ताबडतोब आलं होतं . आता इथले योद्धे थंड झाल्याने डकवत आहे ).
वर्ष २०२४ (पीकेला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल )
तरुण मुलांनी बाहेर जाताना अंगभर कपडे घालणे खूप गरजेचे आहे. दहा वर्षांपूर्वी आमीरखान सारख्यांनी पुरूषदेहाच्या प्रदर्शनाचं समर्थन केल्याने आज ही परिस्थिती ओढवली आहे. त्यापूर्वी रणवीर कपूर, सलमान खान, जॉन अब्राहम, नील मुकेश यांच्यासारख्यांकडून पुरूष देहाचे नग्न प्रदर्शन होऊनही परिस्थिती हाताबाहेर गेली नव्हती. कारण यातल्या कुणाचीच इमेज आमीरप्रमाणे नसल्याने ते ट्रेण्डसेटर नव्हते. आज जाहीरातीतून होणा-या उथळ प्रदर्शनामुळे पुरूषजातीची मान खाली जातेय. अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. हे सर्व आता नियंत्रणापलिकडे गेलं असल्याने काय काळजी घ्यावी याबद्दल तज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.
१. तरूण मुलांनी फेसबुकवर वारंवार आपली छायाचित्रे अपलोड करू नयेत.
२. आपला फोन नंबर व पत्ता अनोळखी मुलींशी शेअर करू नयेत. तसेच अनोळखी मुलांशीही या गोष्टी शेअर करू नयेत. बरेचदा मुलांची माहीती काढण्यासाठी मुलींकडून मुलांच्या फेक प्रोफाईलचा वापर होत असतो, त्याला मुलं बळी पडतात.
३. बाहेर पडताना अंगभर कपडे घालावेत.
४. रात्रीच्या वेळी एखादी महिला सोबत असल्याशिवाय विनाकारण बाहेर पडू नये.
५. रूपाने आणि बांध्याने आकर्षक मुलांनी कट्ट्यावरच्या मुलींच्या कमेण्ट्सकडे लक्ष देऊ नये. शब्दाने शब्द वाढतो हे लक्षात असू द्यावे. तसंच विचारणा करणारा मुलगा हा प्रसंगी टार्गेट होण्याची शक्यता असते.
६. रस्त्यात डोळा मारणा-या किंवा शिट्टी मारणा-या मुलींच्या टोळक्याकडे दुर्लक्ष करावे.
७. रिक्षामधे महिला चालक असल्यास आधी रिक्षाचा नंबर लिहून घ्यावा व रिक्षाचालकीला ऐकू जाईल असे मी अमूक नंबरच्या रिक्षाने येत आहे असे फोनवरून बोलावे. यामुळे पुढचा अनर्थ टळतो असे सर्व्हेचे आकडे सांगतात.
८. आई वडिलांनी मुलांच्या जाण्या येण्याच्या वेळांकडे लक्ष द्यावे. मुलींना बंधनं नाहीत मग आम्हालाच का असे प्रश्न मुले विचारतात, याची पटतील अशी उत्तरे तयार ठेवावीत.
९. सततच्या छेडछेडीविरुद्ध अहिल्या सेनेच्या भगिनींना सांगावे. त्यांच्याकडून गुंड मुलींचा बंदोबस्त होतो. पण वारंवार तक्रारी केल्यास त्याचे महत्व कमी होते हे लक्षात असू द्यावे.
१०. पुरूष मुक्ती वाहिनी तर्फे घेण्यात येणा-या जनजागरण कार्यक्रमास पालक व मूल यांनी हजेरी लावावी. मुलींनाही आवर्जून बोलवावे. पुरूषांच्या दृष्टीकोणातून विचार करू शकणा-या महिला वक्त्यांच्या भाषणाने चांगला परिणाम होतो.
११. आता काय आम्ही तरूण नाही आम्ही का काळजी घ्यावी असा विचार काही चाळीशीतले आकर्षक पुरूष करतात. पण कुठल्याही वयाच्या पुरूषाने असा विचार करणे हे सकटास आमंत्रण आहे हे लक्षात ठेवावे.
या वर्षी पीकेच्या पोस्टरचा निषेध दिन साजरा करण्यात येणार आहे. यामुळे तरुणात जागृती होईल तसेच पुरूषदेह ही काही उपभोग्य वस्तू नाही हा संदेश समाजात जाईल. पुरूषाला, मुलांना पूर्वीप्रमाणे बनियन चड्डीत सायकलव्रून स्वच्छंदीप्रमाणे निळ्या आकाशाखाली वावरता यावे यासाठी वर्षभर जनजागृतीचे जे कार्यक्रम पुरूष मुक्ती वाहीनी राबवते त्यात तन मन धन अर्पून काम करणा-या तरूणांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे, लक्षात ठेवा, उद्याचा सूर्य हा आपल्या मुक्तीचा संदेश घेऊन येणार आहे.
उत्तिष्ठित जाग्रत !
बर ते होमिओपदीच्या औषधांनी
बर ते होमिओपदीच्या औषधांनी काही फरक पडणार की नाही ते सांगा की. इथे अर्न्हिकाची बाटली पडली आहे घरात त्याचे काय करावे?
ती ट्रान्झिस्टरपासून लांब
ती ट्रान्झिस्टरपासून लांब ठेव.
ती ट्रान्झिस्टरपासून लांब
ती ट्रान्झिस्टरपासून लांब ठेव. >>>
रश्मीतै, फुसकुली चा प्रतिसाद
रश्मीतै,
फुसकुली चा प्रतिसाद तुमच्या प्रश्नावर असला, तरी पुढचं ह्यांच्या साठी होतं :
>>
आजकाल काही लोकांना विषय कोणताही असला तरी त्यात 'जात, धर्म, संस्कृती, मोदि आणि गांधी' यांना मध्ये आणल्याशिवाय चर्चा(?) पुर्णच होऊ शकत नाही असे का वाटते?
<<
तेव्हा कृपया, गैरसमज नसावा, ही नम्र विनंती.
*
झीलतोड्या:
तमाशा,पोवाडा इ. महाराष्ट्राच्या लोककलांत, मुख्य गायकाने एक ओळ म्हटली की मागे तुणतुणं हाती धरून जीरं रं जी रं रं जी जी जी... असे म्हणणारा जो कोरस असतो, त्या कोरस मेंबरला झीलतोड्या म्हणतात.
हा शब्द तुम्ही ऐकलेला नसला तरी शुद्ध मराठी व लोकमान्य आहे.
केसतोडा :
हा शब्द केसाच्या मुळांशी असलेल्या ग्रंथींत झालेल्या जंतूप्रदुर्भावातून उद्भवणार्या गळूला उद्देशून वापरतात. हा केस काढून टाकला, की तो छोटा अॅब्सेस (अर्बुद) आपोआप ड्रेन होतो. (वेधला जातो), याशब्दाचा वापर मीतरी अद्याप माबोवर केल्याचे आठवत नाही.
इतर अनेक तोडे आहेत. पण तुम्ही सांगितलेले इतकेच.
इब्लिस ओके. मी खरोखर हा शब्द
इब्लिस ओके.:स्मित: मी खरोखर हा शब्द ऐकलेला नाहीये. ते कोरसचे माहीत आहे पण त्या मेम्बर्सना झीलतोडे म्हणतात हे माहीत नव्हते. केसतोडे हा शब्द तुम्ही वापरत नाही/ वापरलेला नाही हे पण माहीत आहे.
पण त्या दिवशी तुम्ही नेमका माझाच प्रतीसाद पकडल्याने मी वैतागाने पुढचे यमक जुळवले. गैर समज दुर झालाय.:स्मित:
१ हेच का ते अच्छे दिन ? >>
१ हेच का ते अच्छे दिन ? >> याहून काही अच्छे असू शकते असे तुम्हाला वाटते का? राष्ट्रहीत दिसत नाही का तुम्हाला या कृतीमध्ये?
२ अमीर खानच्या पत्रिकेत >> हा गोंधळ सगळ्यांचाच होतो. लहानपणीच शांती केली असती तरी देखील फायदा झाला नसता. भुताबरोबर काम केलं असल्याने असं होतं.
३ Homeopathy >> त्यात फारच गाळून गाळून औषधे देतात. हा तळागाळातल्या लोकांना आवडणारा हिरो असल्याने फरक पडत असावा.
४ मांसाहारी >> हे नक्की. मांस पाहिल्यावर हिंस्त्र होणारी माणसे पाहिलीत. धावत, रांग तोडून जातात. तंदूरी संपली की परत आणणार नाहीत, लिमिटेड आहे असं असतं बहुदा. नंतर आलूटिक्की किंवा हराभरा कबाब खावा लागेल या भितीने त्यांचे असे होते असे ऐकीवात आहे.
५ अरविंद केजरीवाल >> यात शंकाच नाही. ज्या पद्धतीने ते शाल गुंडाळून स्वतःला झाकून घेत ते पाहता याला नक्कीच गोधडी तरी देतीलच.
६ कॉस्ट्यूम डिझायनिंग >> अनारकली, क्रोशा, छाकडा, पॅचवर्क असे छानछान धागे असताना तुम्हाला हा प्रश्न का पडावा हा मला प्रश्न पडलाय.
असे म्हणणारा जो कोरस असतो,
असे म्हणणारा जो कोरस असतो, त्या कोरस मेंबरला झीलतोड्या म्हणतात.
>>. त्यांना झीलकरी म्हणतात. झीलतोडे ऐकले नाही पण असू शकेल. पण तरीही त्याचा अर्थ लागत नाही. त्यात काही ही कट केले जात नाही. जसे की लावणी तोडणे !
Pages