deja vu

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
Time to
read
<1’

कुठे काही नवीन नाही का इथे?
शुभेच्छा बीबी भरुन वाहतोय पण वाहूदे, नाहीतर आपल्याला कोण 'जीवेत शरदः शतम्' म्हणणार, आपण मन्त्री थोडेच आहोत!

दिनेश 'नायजेरिया' लिहितायत पण मला पुन्हा केनया च वाचतोय असं वाटतंय! ~D

सगळीकडे प्रवासवर्णनाचे पीक आले आहे. भारतात कुठेही गाडीने फिरण्याचा मी आता धसकाच घेतलाय. त्यात पुन्हा हवाईदेवीच्या बीबी वर प्रवासविषयक लेखन पाहून मला किंकाळी फोडून जागेवर जाऊन बेशुद्ध पडावेसे वाटले! मी 'प्रवासातील कुजबुज' वगैरे च्या अपेक्षेने गेले होते! ~D

ते GS1 आणि टीम कुठले गड शोधून सर करत फिरतायत. मला संशय येतो. तेलबैला आणि नागफणी चा फोटो मला सारखाच वाटला.

तेच तेच प्रश्न, त्याच त्याच पार्ट्या, तेच तेच मेनू, त्याच त्याच रेसिपीज!- पार्ले व पाककला.

कमी कपडे आणि मुली मुले!

बर्फाच्छदित डोंगर, समुद्र, आणि ताजी सुकी फुले!

पीपीवर सातशे फेरे आणि
सूतकताईचे धागेदोरे!

मला ते 'दे जा वू' का काय ते तसं झालंय! 'जा वू दे'. (झालं!)

हे स्वगत का काय ते असावं. या शब्दावर लिंबाचा copyright नाही ना? नाहीतर 'मनोगत' म्हणा. पण मनोगताचं नाव इथे काढलेलं काही लोकाना आवडत नाही!

आता 'वर्षा विहारा' कडून अपेक्षा वाढल्या आहेत! कारण... कारण त्यांचे डिटेल्स अजून आलेले नाहीत. तिथे काही नवीन असेल अशी आशा! ~D

प्रकार: 

गिरी Lol
पूर्वीचेच आहे हे. आणि तेव्हा 'तेच तेच' चालू आहे असं लिहिलंय म्हणजे फक्त गेली चार वर्षे नसून हे त्याच्याही पूर्वीपासून चालू आहे. Proud

Pages