व्यसन नावाचा राक्षस!

Submitted by अविनाश खेडकर on 8 August, 2014 - 02:23

आज एका मित्राच्या अंतयात्रेस गेलो होतो. आमचा १० वर्षाचा सहवास कायमचाच संपला होता. त्याचे कुटूंबीय आक्रोश करत होते. त्याच्या ऐन तीशीत या जगाचा नोरोप घेण्याने सगळ्यांनाच हळहळ वाटत होती. पण माझ मन त्याचा मृत्यू मान्य करायला तयार होत नाही. कधी काळी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारा तरूण दारूच्या नादाला कधी लागला ते आम्हालाही कळल नाही. पुढे त्याचे हे व्यसन एव्हढे वाढले कि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.
त्याची उर बडवून रडनारी आई, हतबल बाप, शुध्द हरपलेली बायको आणि ३ वर्षाचं एक केविलवाण पोर पाहून काळीज पार हेलावून गेल. अशी वेळ देवाने शत्रुवर देखील आनू नये अस क्षणभर वाटल. पण देव कुठे आणतो असली वेळ माणसावर? ती तर मानूस स्वता:च ओढून घेतो आणि स्वता:चा नाश करून घेतो.

मनात एक हळहळ सतत राहील की मी माझ्या मित्रासाठी काहीच करू शकलो नाही. मी बर्‍याच वेळा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला समजावण्याइतपत माझी क्षमता नव्ह्ती कदाचित. पण कुणी त्याला
वेळीच व्यसनापासून परावत्त केल असत तर आज तो आमच्यात असता, हेही तितकच खर. माझ्या मित्रासारखे व्यसनाच्या आहारी जावून कित्येकजन स्वता:च्या व त्यांच्या कुटूंबीयांच्या जीवनाची राखरांगोळी करतात त्याची काही गिनती आहे का? म्हनून मी ठरवलय की मला जस शक्य होईल तस मी लोकांना व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करील. त्यासाठी शाळा कॉलेजेस व प्रसंगी खेडोपाडी जावून लो़कांशी चर्चा करील.

पण मित्रांनो यासाठी मला आपली बहूमोल मदत हवी आहे. कारण व्यसन मुक्ती या विषयावरील माझ ज्ञान अगदी तोकडं आहे व अनुभव शून्य. पण माझा हेतू प्रामाणिक आहे व संकल्प तडीस नेण्याची जिद्दही अफाट आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी मला या कामी मदत करावी. आपण आपणास या विषया संबंधीत कुठलीही माहीती या ठिकाणी देऊ शकता. आपणास माहिती पुरवणे सोपे जावे म्हणून मुद्दे देत आहे .

१. व्यसन म्हणजे काय? व्यसनाचे प्रकार.

२. व्यसन कसे लागते व त्याची कारणे ( वैदकीय दृष्टीकोन )

३. एखादा माणूस व्यसनाच्या आहारी गेला आहे ते कसे ओळखावे ? त्याची लक्षणे.

४. व्यसनाचे सामाजिक, आर्थिक व बोध्दिक दुष्परीणाम .

५. व्यसनापासून परावृत्त कसे व्हावे वा करावे.

६. व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या शेवाभावी संस्था व शासकीय उपक्रम

७. व्यसनापासून परावृत्त झालेली काही प्रेरणादायी उदाहरणे.

८. व्यसनमुक्ती संदर्भातील मान्यवरांचे लेख, रेकोर्डिंग इत्यादी.

आणि या व्यतिरिक्त कोणतीही माहिती समर्पक उदाहरणे, शेर, कविता विनोद जे कि व्यसनमुक्ती कार्यक्रमासाठी उपयुक्त ठरतील. अशी माहिती तुम्ही पाठवू शकता वा लिंक देवू शकता.

तुम्ही ही माहिती माझ्या इ मेलवरही पाठवू शकता. वा फोन करून काही सुचना करू शकता. माझा आय डी खाली देत आहे.

avinash007.khedkar@gmail.com

mobile: 08888325748

मी हा धागा खूप सकारात्मक हेतूने उघडला आहे. व्यसनमुक्ती विषयी आपले काही नकारात्म मते असतील. उदा. व्यसनमुक्ती अशक्य असते. टेन्शन फ्री लाईफसाठी व्यसनाशिवाय पर्याय नाही इत्यादी तर अशी मते कृपया आपल्याकडेच ठेवा. कारण अशा मतांवर हुज्जत घालण्याची माझी बिलकुल इच्छा नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इति टोचा मोहदय.
मी हा धागा खूप सकारात्मक हेतूने उघडला आहे. व्यसनमुक्ती विषयी आपले काही नकारात्म मते असतील. उदा. व्यसनमुक्ती अशक्य असते. टेन्शन फ्री लाईफसाठी व्यसनाशिवाय पर्याय नाही इत्यादी तर अशी मते कृपया आपल्याकडेच ठेवा. कारण अशा मतांवर हुज्जत घालण्याची माझी बिलकुल इच्छा नाही.

हे मी माझ्या धाग्याच्या शेवटी आवर्जून टाकले होते. कारण माबोवर अशा तथाकथित बौध्दिक लढाया मी आजप्रर्यंत्न अनेक धांग्यांवर अनुभवल्या आहेत. आता त्यातून त्या शूरवीरांनी काय साध्य केले हा संशोधनाचा विषय आहे म्हणा. राहता राहिली तुमच्या प्रश्नाचे उत्तरे शोधण्याची बाब. त्या सर्व प्रश्नाची उत्तरे शोधण्याची गरज नाही, कारन ती आहेत माझ्या जवळ. पण मी हा धागा खूप सकारात्मक हेतूने उघडला आहे. त्यामुळे त्याची चर्चा इथे नको कारन त्याने मूळ उद्देश साध्य होत नाही. लागल्यास आपण त्याची वेगळ्या ठिकाणी चर्चा करू.
आशा आहे आपण समजून घ्याल. याउर आपले काही प्रश्न असल्यास क्षमस्व कारन त्या प्रश्नाची उत्तरे देण्याइतपत माझी योग्यता नाही. म्हणून हा शेवटचा प्रतिसाद समाजावा.

आयुष्याची वाट त्या व्यसनी माणसामुळे लागली नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का?>>> नही नही ये नही.
एवढं सगळं चांगलं असताना त्या येड्याने दारूला का जवळ करावे? इन फॅक्ट- त्याच्या बायकोचा निर्णय योग्य होता / आहे. पण एक संसार तुटला त्याचं दु:ख आहेच.

टोचा, तुमचेही बरोबरच आहे. पण ज्यांची जवळची माणसे व्यसनी आहेत त्यांना नाही पटणार तुमची मते, कारण त्यांना कसेही करुन त्यांचा माणुस पहिल्यासारखा परत झालेला पाहिजे. मग तो कुठल्या उपायाने झाला याच्यशी त्यांना देणेघेणे नाही. यात कोणाच्या मुलीचे आयुष्य बरबाद झाले तरी त्यांना फरक पडत नाही. Sad

इथे व्यसनी लोकांना कसे सावरायचे यावर मते मागवलीत. त्यांना कसे टाकायचे यावर नाही.

इथे व्यसनी लोकांना कसे सावरायचे यावर मते मागवलीत. त्यांना कसे टाकायचे यावर नाही >>>>>
साधना ताई - मी त्याबद्दल च मत दिले होते. व्यसनी माणसाला दुसरे कोणी सावरू शकत नाही. व्यसनी माणुस स्वता जो पर्यंत ठरवत नाहीत, तो पर्यंत कुठलाही उपाय फार दिवस काम करत नाही.

आणि जवळचा माणुस जर दुसर्‍या माणसांना त्रास द्यायला लागला तर काय करायचे? जवळचा म्हणुन माफ करायचे?

बेफिजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपण पुरवलेल्या मुद्देसूद माहितीचा खूप फायदा होइल. विशेष सुचनांबद्दल आभरी आहे.

आपल्या समाजात तरुणांचे सर्व प्रकारचे प्रश्न एकदा लग्न झाले की लगेच दुस-या दिवशी धाडकन सुटतात असे मानले जाते> +१

आता माझे चार आणे
१) व्यसन हा एक आजार आहे. जसा कि डायबेटीस / क्यान्सर. फक्त डायबेटीस /क्यान्सर या रोगाना राजमान्यता आहे ( किव्वा ते रोग झाले तर लोकाना सहानुभूती वाटते पण या रोग्याबद्दल सहानुभूती वाटत नाही . हा त्याचा चोइस आहे असे लोकांना वाटते पण तसे ते नसते ) .

२) दारू पिण्याबद्दल लोकांच आक्षेप नसतो पण या रोगाबद्दल मात्र बोलणही लोक टाळतात

३ ) ह्या रोगाची लक्षण पटकन लक्षात येत नाहीत किव्वा हा आजार एखाद्या व्यक्तीला जडला आहे याची कुठलीही परीक्षा नाही ( जशी कि इतर रोगांची परीक्षा होते)

३) व्यसनाची सुरवात हि आधी थोडस घेऊन बघू. ऑफिस मध्ये पार्टीज मध्ये/मित्रांमधे अरे तू अजून एकदाही घेऊन बघितली नाहीस? असा कसा रे तू ? इत्यादी इत्यादी कारणांनी सुरवात होऊन त्याच अतिरिक्त सेवनात कधी रुपांतर होत ते त्याच व्यक्तीला कळत नाही.

४) पूर्वी पण लोक व्यसन करतच होती .पण लपून छपुन पण आता दारू पिण्याला जनमान्यता मिळाल्याने उघड उघड लोक पिऊ लागली. त्यातली पिणारी सगळी च्या सगळी लोक व्यसनी होत नाहीत . जी लोक अतिरेकी स्वभावाची असतात तीच सिलेकटेड लोक व्यसनी होतात.त्या माणसाच्या अतिरेकी /झोकून देण्याच्या स्वभावाला जर व्यवस्थित वळण लागल तर हि लोक सामान्य लोकांपेक्षा कुठल्या कुठे पोचतात

५) व्यसन हे कस सुरु होत ( म्हणजेच दारू च व्यसन माणसाचा ताबा कधी घेत ते त्या माणसालाच कळत नाही. )एकदा का दारू पिण्याची लिमिट एखाद्या माणसाने क्रोस केली कि दारू त्याला ताब्यात घेते .
आधी माणूस कंट्रोल मध्ये दारू पीत असतो आणि मग दारू त्या माणसाला कंट्रोल करायला लागते तेव्हा तो मनुष्य त्या व्यसनाचा रोगी झाला आहे असे समजावे.

६) घरच्या लोकांना कळायला उशीर लागतो. कारण तो रोगी काही न काही खोटी नाटी कारण देऊन व्यसन करत असतो.हा खोट बोलायला लावणारा आजार आहे

७) एकदा का हा एक रोग आहे हे घरच्या लोकांनी आणि त्या माणसांनी एक्सेप्ट केल आणि जर का त्या माणसांनी स्वताहून ठरवलं " मी कंट्रोल करणार आहे . मला माझ कौटुंबिक आयुष्य सुंदर रीतीने जगायचं आहे/ मला माझ करियर बिघडू द्यायचं नाहीये" तर तो त्या व्यसनापासून दूर राहू शकतो. १००% आणि कितीही वर्ष

८) घरच्या माणसांनी त्याला एक्सेप्ट करायला सुरवात केली कि तो सुधारू शकतो पण घरच्या माणसांनीच जर हिडीस /फिडीस केल तर केस बिघडू शकते आणि त्या रोग्याची सुधारण्याची शक्यता धुसर होते . घरातल्या माणसांनी ह्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करण खूप महत्वाच आहे

९ ) हे व्यसन कुठल्याही वयात लागू शकत लग्न करायच्या आधी . लग्न झाल्यानंतर मिडल एज मध्ये आणि रिटायर झाल्यावर काहीच करायला राहील नाही .मोकळा वेळ रिकामाच रिकामा वेळ मिळायला लागला कि हि . कुठल्याही वयात/कुठल्याही जेन्डर ला( स्त्री/पुरुष) / गरीब श्रीमंत कोणालाही अगदी कोणालाही व्यसन लागू शकत.( व्यसन कुठलाही भेदभाव करत नाही )

१० ) गरीब व्यसनी लोक ठर्रा पितात आणि श्रीमत व्यसनी लोक विदेशी दारू पितात. पण सगळ्याचा परिणाम एकच असतो. गरीब व्यसनी लोक दारू पिउन रत्यावर पडतात आणि श्रीमंत व्यसनी लोक स्वताच्या घरात बसून दारू पितात इतकाच काय तो फरक

११ ) त्या माणसाने स्वताहून व्यसनातून बाहेर पडायचं ठरवलं असेल तर अल्कोहोलिक अनोनिमास सारख्या संस्था त्या रोग्यांना व्यसनातून बाहेर पडण्याकरता मदत करतात. अल्कोहोलिक अन्यानिमास हि एकमेव अशी संस्था आहे जी कुठलेही पैसे न घेता व्यसनी रोग्याला या रोगातून बाहेर पडण्यासाठी मदत करते

व्यसनी माणसाला दुसरे कोणी सावरू शकत नाही. व्यसनी माणुस स्वता जो पर्यंत ठरवत नाहीत, तो पर्यंत कुठलाही उपाय फार दिवस काम करत नाही.<< नाही. व्यसनामुळे नंतर नंतर शरीर त्या पर्टीक्युलर सबस्टन्सवर अवलंबून राहते जर ते मिळाले नाहीतर विड्रॉल सिम्प्टम्स येतात. हे विड्रॉल सिम्प्टम्स इतके भयानक असतात की त्यावर नशा करणे अथवा वैद्यकीय उपचार हेच शक्य असतं. या स्टेजला पोचल्यावर व्यसनी माणसाची विल पॉवर कितीही स्ट्राँग असली तरी टेम्प्टेशन अथवा तलफ ही जास्त वरचढ ठरते. ही अवस्था ओळखून त्यावर त्या क्षणी वैद्यकीय उपचार करणे, मानसिक, भावनिक आधार देणे यासाठी व्यसनी माणसाच्या आजूबाजूला तशी माणसं अस्णं गरजेचं असतं, पण "बहुतेकदा" इथवर पोचेपर्यंत तो माणूस "नालायक बेवडा चोर्‍या करणारा खोटं बोलणारा" वगैरे बरंच काही झालेला असतो, परिणामी हा सपोर्ट त्याला मिळू शकत नाही. व्यसनी अजून एकटा पडत जातो, अजून नशा करत जातो आणि हे दुष्टचक्र चालूच राहतं. मुळात व्यसनी माणसाला कूठं थांबावं हेच समजत नसतं ना!! तोच त्याचा मानसिक आजार असतो.

व्यसनाधीनता हा आजारच आहे, आणि त्याला सक्तीच्या उपचारांची गरज आहे. हे उपचार आयुष्यभरासाठी असतात. हे उपचर म्हणजे निव्वळ गोळ्या औषधे नव्हेत, तर व्यसनापासून दूर नेणारे, मानसिकरीत्या गुंतवून ठेवणारे असे असतात. "गेल्या सहा महिन्यांत प्यायला नाही" म्हणजे तो बरा झाला असं कधीच नसतं.

एखादाच माणूस व्यसनी का होतो याची वेगवेगळी मानसशास्त्रीय कारणे आहेत. मी वाचली आहेत, पण मला नीट शब्दांत लिहिता येणार नाही. इथले डॉक्टर अधिक चांगल्यारीत्या लिहू शकतील.

बेफि, नंदिनी, सुजा पोस्ट आवडल्या.

व्यसनाशी लढाई ही आयुष्यभराची. सपोर्ट ग्रूप्सच्या मिटिंग्जला सातत्याने जाणे आवश्यक. आजूबाजूच्या लोकांनी-मित्रमैत्रीणींनीही आधार देणे खूप महत्वाचे. आपण डायबेटिस असेल तर म्हणतो ना की मी डायबेटिक आहे आणि आता माझा डायबेटिस अंडर कंट्रोल आहे तसेच 'मी व्यसनी असून गेले अमुक दिवस्/महिने/वर्षे क्लिन आहे ' हे मान्य करणे आणि लक्षात ठेवणे महत्वाचे. यजमान(होस्ट) मंडळींनी अल्कोहोलिक ड्रिंक्सच्या जोडीला नॉन अल्कोहोलिक ऑप्शन्स ठेवावेत. एखाद्या नेहमी अल्कोहोलिक ड्रिंक्स घेणार्‍या व्यक्तीने नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्स मागितले तर उगाच 'आग्रह' करु नये तसेच प्रश्नही विचारत बसू नये किंवा 'बरे झाले घेत नाहियेस ' असेही म्हणू नये.त्या व्यक्तीच्या प्रायवसीला आणि डिग्निटीला धक्का न लावता आपल्यापरीने आश्वासक आधार द्यावा.
जे क्लिन आहेत त्यांच्याबाबतीत - तुम्ही जेनेटिकली प्रिडिस्पोस्झ्ड अशा प्रकारात असाल तर सुरुवातीपासूनच सावध रहाणे महत्वाचे.

हे लेखन इतक्या सार्‍या ग्रूप्समधे का टाकलंय? इंडेक्समधे नीट दिसत नाहिये त्यामुळे.

BEFIKIR, SUJATA, NANDINI
KHUP USEFUL POST.
AVINASH TUMHALA SHUBHECHA.
SORRY FOR ENGLISH.

अविनाश, स्वाती२, गजानन, रेव्यू आणि बादशाह,

धन्यवाद!

नंदिनी:

>>>हे विड्रॉल सिम्प्टम्स इतके भयानक असतात की त्यावर नशा करणे अथवा वैद्यकीय उपचार हेच शक्य असतं. या स्टेजला पोचल्यावर व्यसनी माणसाची विल पॉवर कितीही स्ट्राँग असली तरी टेम्प्टेशन अथवा तलफ ही जास्त वरचढ ठरते. ही अवस्था ओळखून त्यावर त्या क्षणी वैद्यकीय उपचार करणे, मानसिक, भावनिक आधार देणे यासाठी व्यसनी माणसाच्या आजूबाजूला तशी माणसं अस्णं गरजेचं असतं, पण "बहुतेकदा" इथवर पोचेपर्यंत तो माणूस "नालायक बेवडा चोर्‍या करणारा खोटं बोलणारा" वगैरे बरंच काही झालेला असतो, परिणामी हा सपोर्ट त्याला मिळू शकत नाही. व्यसनी अजून एकटा पडत जातो, अजून नशा करत जातो आणि हे दुष्टचक्र चालूच राहतं. मुळात व्यसनी माणसाला कूठं थांबावं हेच समजत नसतं ना!! तोच त्याचा मानसिक आजार असतो. <<<

विथड्रॉल सिंप्टम्स भयानक असतात ह्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मी! मी एकटाही टाकला गेलो नव्हतो. मी नालायक, बेवडा (बेवड्याचा प्रश्नच नाही कारण मला ते सिंप्टम्स धूम्रपानामुळे आलेले होते, हनुमानाप्रमाणे छाती नखांनी फाडावीशी वाटत होती अक्षरशः, छाती फाडून रक्त काढावेसे वाटत होते, अ‍ॅल्कोहोलचा असा काहीच प्रॉब्लेम नव्हता मला), चोर्‍या करणारा, खोटं बोलणारा झालो नाही. मला सपोर्ट डॉक्टरांकडूनच मिळाला आणि तोही टोबॅकोयुक्त च्युईंग गम चघळण्याचा उपाय दिला जाण्याचा! ते चघळले तेव्हा लक्षात आले की मी पूर्वी ओढत होतो त्या सिगारेटपेक्षाही ते स्ट्राँग होते व ते चघळून मला चक्कर येत होती. मग ते बंद करून डॉक्टरांना सांगून धूम्रपानच सुरू केले. तसेच, व्यसनी माणसाला कुठे थांबावं हे कळत असतं, 'फक्त थांबावं हे मान्य होत नसतं' इतकंच!

खूप सार्वत्रिकीकरण चांगले नाही असे मला वाटते. ४५ वर्षांच्या आयुष्यात २७ वर्षे जो आधार मला सिगारेटने दिलेला आहे तो ह्या जगाने दिलेला नाही. म्हणून सिगारेट ओढावी असे मुळीच नाही. किंबहुना तो आधार सिगारेटने दिला नसता तर तो आधार मला 'ड्यु" ही वाटला नसता. (म्हणजे मी मुळातच स्मोकर नसतो तर)

म्हणायचे इतकेच आहे की:

१. मी प्रामाणिकपणे माझी केस सांगितली

आणि

२. निर्व्यसनींनी व्यसनाधीनांना एकदम रूल आऊट करणे (त्यांचा तोच मानसिक आजार असतो वगैरे, तो चोर्‍या करतो, खोटे बोलतो वगैरे) हे योग्य वाटले नाही. Happy

टीप - धूम्रपान वाईट आहे ह्याची पूर्ण जाणीव आहे व हा प्रतिसाद धूम्रपानाची शिफारस अजिबात करत नाही. Happy

पल्मनरी एंबॉलिझम होऊन गेल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी मला हे विथड्रॉल सिंप्टम्प्स आले होते.

सत्यमेव जयते मध्ये आलेल्या सायकिअ‍ॅट्रिस्ट (डॉ आशिष देशपांडे) ह्यांनी सांगितले होते की ज्यांना असे व्यसन लागते त्यांच्या मेंदूत पराटिक्युलरली दारूमुळे काही विशिष्ट पेशी तयार होतात आणि त्या पेशींमुळे माणूस व्यसनाधीन होतो. आणि त्या पेशींना दारू मिळू न देता आणि औषधोपचाराने नष्ट करावे लागते.

कोणाला ह्याबद्दल पूर्ण माहिती मिळाल्यास शेयर करावी. सर्वांना फायदा होईल.

अविनाशजी,

त्याला वेळीच व्यसनापासून परावत्त केल असत तर आज तो आमच्यात असता >>>>> सत्यवचन!

देखतादेखत माणसे वारतात.
आपल्या मदतीवाचून असोत किंवा केवळ माहिती-अभावी असोत.
तेव्हा स्वतःहून पुढाकार घेऊन काहीतरी करायला आपण उद्युक्त होतो. हे साहजिकच आहे.
तुम्हीही स्वत:हून पुढे झालात ही आनंदाची गोष्ट आहे.

माझी २००४ साली अन्जिओप्लास्टी झाली. माझ्यासोबतच त्याच दिवसात त्याच विकाराने आजारी पडलेले आमचे शेजारी त्याच दिवसांत वयाच्या ३७ व्या वर्षी केवळ माहिती-अभावी वारले.

मला माहीत असलेल्या आणि ज्यामुळे मी त्यातून बाहेर आलो, त्या उपायांची वाट मी त्यांना दाखवू शकलो नाही ह्याचा मला अत्यंत खेद झाला. मग मी हृदयधमनीविकारावर स्वत: गोळा केलेली सर्व माहिती मनोगत डॉट कॉमवर ३० प्रकरणांत टाकली. आज मला जाणवते आहे की त्या माहितीचा असंख्य लोकांना आजही उपयोग होतो आहे!

तेव्हा तुम्ही करत आहात ते काम खरोखरीच उदात्त हेतूने प्रेरित आणि उपयुक्त आहे. सुरू ठेवा. ज्यांचे अनुभव वेगळे आहेत ते लोक काहीही म्हणोत. ह्या कामाकरता माझ्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

Vyasan kase sodav. Manache kadhi aeku naka dokya che aaeka sharir aaple aahe. ya sharirala kay dyayche aani kay nai he aaplya ver aahe.prachand aatmvishwas hi far garjechi gosht aahe.aani ho vyasan he ekdam sodlya varch sutte karan blood madhun alkhol gele pahije.shakyato vachna kade aaple man kendrit kara aani talaf lagli ki kahi tari khaun ghya.... Best of luck.

बियरची बला !
जास्तीत जास्त तरुणांनी बियर पिऊन ' झिंग ' अनुभवावी व सरकारला भरपूर महसूल मिळवून द्यावा म्हणून हल्ली सगळीकडे ' बियर शॉपी ' सुरु झाली आहे ..नुकतेच एका तरुणांच्या टोळक्याला हातात बियरचे टीन घेवून भरधाव वेगाने मोटारसायकल चालवताना पहिले ..जेमतेम १५ ते १८ या वयोगटातील त्या टोळक्यात मुलीही होत्या ...
१ ) बियरने काही होत नाही ..बियर म्हणजे दारू नव्हे ..हा एक मोठ्ठा गैरसमज सध्या अनेक लोकांच्या मनात असल्याचे लक्षात येतेय ..अर्थात कोण्यातरी बियरबाज व्यक्तींनीच हा गैरसमज पसरविला आहे ..बियर मध्ये अल्कोहोल असते ..फक्त तुलनेत कमी प्रमाणात असते ..बहुतेक दारूड्यांची व्यसनी होण्याची सुरवात बियरनेच झाली आहे हे सत्य आहे .
२) बियर पिणे हे उगाचच सधनतेचे किवा अधिक पुढारलेले असल्याचे लक्षण आहे हा एक दुसरा गैरसमज लोकांमध्ये पसरतो आहे.. त्यामुळे बियर पिणे हे जास्त सोफीस्टीकेटेड असल्याचे मानणारे अनेक महाभाग मला माहित आहेत ..हे महाभाग सर्रास घरी बियर घेवून येतात ..घरातल्या महिलांना देखील बियर ने काही होत नाही हे पटवून देत ..त्यांना देखील बियर घेण्यास भाग पाडतात .
३ ) उन्हाळ्यात बियर घेणे आरोग्यास चांगले असते असा देखील प्रसार झालेला असून ..अनेक जण उन्हाळ्यात ' चिल्ड बियर ' घेणे हे ज्यूस किवा सरबत घेण्यासारखे मानतात ..
४ ) सरकारशी साटेलोटे असलेल्या दारू उत्पादकांनीच बियर विक्रीचे लायसन मिळणे सहज सोपे करून ..जास्तीत जास्त बियर खपावी याची पुरेपूर दक्षता घेतली आहे .
५ ) एकदा का तुम्ही या बियर ची ' झिंग ' अनुभवलीत की मग दारू आणि इतर मादक पदार्थांच्या आहारी जाणे सोपे असते ...
तुषार नातू ( कोपी -पेस्ट नातू साहेबांच्या परवानगीने )

@सुजा, नंदिनी
अप्रतिम प्रतिसाद. आपल्या ताज महालान माझी वीट लावू इच्छित नाही.
एकाच फरक आहे मधुमेह किंवा कर्करोग याला जगमान्यता आहे. व्यसनाला नाही याचे कारण बहुसंख्य वेळा दुष्परिणाम माहित असूनही व्यसनी व्यक्तीने ते स्वीकारलेले असते. परंतु जाणून बुजून कोणी मधुमेह किंवा कर्करोग ओढवलेला नसतो. शिवाय व्यसनमुक्तीसाठी कुटुंब आणी परिवारालाच आधार फार आवश्यक असतो त्या पातळीवरील सहभाग इतर रोगांना आवश्यक नसतो. मधुमेह किंवा कर्करोग कुणालाही होऊ शकतो अगदी नवजात बालकाला सुद्धा व्यसनाचे तसे नाही. तेंव्हा व्यसनाला उगाच उडत्त्तेच्या पातळीवर आणले जाते ते चूक आहे. एवढे सर्व असले तरीही( म्हणजे स्वतः ओढवलेला असला तरी) व्यसन हा एक आजार आहे. (स्थूलपणा सारखाच) त्या व्यक्तीला व्यसनमुक्त होण्यासाठी समाजाची, कुटुंबाची आणी मित्रपरिवाराची अत्यंत आवश्यकता असते.
दुर्दैवाने जसे धूम्रपानाचे उदात्तीकरण १९५० ते १९८० या काळात झाले तसेच उदात्तीकरण दारूचे त्या पुढील ३० वर्षात होत आहे. ब्रिटनची राष्ट्रीय आरोग्य योजना यांनी दाखवलेल्या सांख्यिकी नुसार १९९४ साली एका वर्षात ब्रिटन साडे सात लाख पौंड थेट धुम्रपाना मुळे होणार्या रोगांच्या इलाजावर खर्च करीत असे. तर सिगरेट बनवणार्या कंपन्या ७५० लाख पौंड सिगरेटच्या जाहिरातीवर खर्च करीत असत. आणी जोवर या जाहिराती थांबवल्या नाहीत तर होणारा खर्च पाण्यात गेल्यासारखा होता. कारण सिगरेटच्या जाहिराती या नवीन फुन्क्ये तयार करण्यासाठी लागतात. मुळ धुम्रपान करणारे जाहिरातींनी आपला ब्रान्ड बदलत नाहीत.
आज हीच वस्तुस्थिती दारू बददल आहे. आपण वाईन किंवा बियरला प्रोत्साहन देत आहोत. जाहिराती मध्ये पैसे मिळतात हा "उद्योग" कराच्या रूपाने पैसा देतो आहे म्हणून पण हाच भस्मासुर उद्या आपल्या पुढच्या पिढीवर उलटलेला पाहताना डोळे पांढरे होताना दिसतील.

बेफिकीर साहेब
तंबाखूचे व्यसन हे दारू पेक्षा जास्त भयंकर आहे. त्याच्या विथड्रॉल सिंप्टम्स दारू किंवा गर्द इतक्या भयानक नसतात. दारू च्या व्यसनाच्या आहारी गेलेला माणू दारू प्यायल्याशिवाय उभा राहू शकत नाही कि कोणतेही काम करू शकत नाही. आपल्या मुलांची खोटी शपथ घेणे चोरी करणे हे तो सहज करू शकतो. गर्दच्या व्यासंसाठी माणूस खून सुद्धा करू शकतो आणी स्त्री हि शरीर विक्रय सुद्धा करू लागते. तंबाखूच्या विथड्रॉल सिंप्टम्स अशा शारीरिक आणी इतक्या भयानक नसतात.
आपल्या स्वतःच्याच म्हणण्याप्रमाणे "२७ वर्षे जो आधार मला सिगारेटने दिलेला आहे तो ह्या जगाने दिलेला नाही".हा लंगडा मानसिक आधार आपल्याला का शोधावा लागला हे आपण स्वतः आत्मपरीक्षण करून पाहावे.( आपल्या प्रामाणिक कथनात हे एक लंगडे समर्थन वाटले म्हणून त्यावर भाष्य केले आहे) तंबाखू (निकोटीन आपल्याला असेच पांगळे बनवते कि आपलयाला कोणत्याही परिस्थितीत निकोटीनचा आधार बरा वाटू लागतो जरी हा आधार स्वतः पांगळा असला तरीही).
सिगारेट ने किंवा दारूने आपल्याला कोणताही मानसिक आधार मिळत नाही. एवढेच आपले विचार भरकटवण्यात ते मदत करते. त्यमुळे माणूस त्यावर मानसिकदृष्ट्या अवलंबीत होतो.
दुर्दैवाने त्यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वात जाणवण्या एवढा बदल होत नसल्याने तंबाखूच्या व्यसनाला दारू किंवा गर्द तितकी बदनामी मिळालेली नाही. परंतु त्याचे परिणाम शरीराच्या प्रत्येक अवयवावर होतात.
गेली इतकी वर्षे एका मागोमाग एक सरकारे सिगरेटवर कर लावताना दिसतात पण बिडी किंवा तंबाखू वर नाही याचे कारण राजकीय आहे. गरीबांचा कळवळा घेणारी सरकारे गरिबांच्या आयुष्याशी अक्षरशः खेळताना दिसतात. महाराष्ट्रात गुटख्याला बंदी घालून मा . आर आर पाटील यांनी असंख्य गरीब आणी निम्न मध्यम वर्गीयांवर अगणित उपकार केले आहेत.
दारूचे उदात्तीकरण थांबवणे आवश्यक आहे.
(नौदलाच्या व्यसन मुक्ती केंद्रात ३ महिने प्रत्यक्ष आणी ३ महिने अप्रत्यक्ष रित्या काम केल्यावर आणी मुळात डॉक्टर असल्याने आलेल्या वैयक्तिक अनुभवावर आधारित माझी मते आहेत. कालौघात ती जुनी किंवा कालबाह्य झाली असण्याची शक्यता मी नाकारत नाही)

Pages