हेतेढकल खाकरा भेळ

Submitted by नीधप on 6 August, 2014 - 08:36
khakara bhel
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खाकरे - प्लेन किंवा फ्लेवर्ड.

तेल, मोहरी, जिरं, हळद, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, किसलेले आले, भाजलेले दाणे, लिंबू, सैंधव

हेतेढकलवस्तू - बोल्ड केलेल्या मस्ट.. बाकीच्या ऑप्शनल
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, कोचवलेली काकडी
न वापरलेले पण वापरू शकाल अश्या वस्तू - किसलेले गाजर, किसलेला कोबी, सॅलडची पाने, मक्याचे दाणे, संत्र्याच्या फोडींचे तुकडे, पुदिन्याची पाने, स्प्राऊटस, उकडलेला बटाटा, सांडग्याची मिरची वगैरे
khakra-bhel-03.jpg

क्रमवार पाककृती: 

चित्रातल्या प्रमाणे खाकरे चुरून घेणे.
khakra-bhel-01.jpg

फोडणी: तेल-तापले-मोहरी-जिरे-तडतड-हळद-हिंग-हिरवी मिरची-किसलेले आले-कढीपत्ता... जरा खमंग परतून घेणे.
खाकरे दमट झाले असतील तर ते फोडणीवर घाला. नसतील तर फोडणी खाकर्‍यांवर ओता.
भाजलेले दाणे घाला. मिक्स करून घ्या.

khakra-bhel-02.jpg
माझ्याकडचे खाकरे प्लेन असल्याने मी फोडणी केली. मसाला किंवा फ्लेवर्ड खाकरे वापरत असाल आणि त्याची चव तशीच ठेवायची असेल तर फोडणी स्किप करू शकता. पण मग सगळे मिक्स करताना तिखटाच्या अंदाजाने लाल तिखट पावडर घालावी.

कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व बाकीच्या ढकलवस्तू चिरून झाल्या असल्यास तुमची तयारी पूर्ण झाली आहे.

परतलेल्या चुर्‍यामधे या सर्व वस्तू मिक्स करून मग वरून चवीप्रमाणे सैंधव घाला, वरून लिंबू पिळा आणि लगेच खा.

खायच्या अगदी आयत्या वेळेला चुरा व ढकलवस्तू मिक्स करायच्या आहेत. खाकर्‍यांचा कुरकुरीतपणा खाताना जाणवला पाहिजे.
khakra-bhel-04.jpg

हा चटपटा वगैरे स्वाद कमी वाटला तर मग भेळेच्या चटण्या हा बाफ रेफर करून हवी ती चटणी ओता. पण खरंतर गरज पडणार नाही. Happy

वाढणी/प्रमाण: 
आवडले तर एका माणसाला नाही आवडले तर पूरी बारात खायेगी.. ;)
अधिक टिपा: 

पाहिजे ते व्हेरिएशन करून बघा.
या खाकरा भेळेची प्लेट सेट करून त्यावर प्लेन ऑम्लेट टाकून पण भारी लागत असणार.
भेळ आहे त्यामुळे फरसाण घालून करून बघायला हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
केलेले प्रयोग हो फक्त प्रयोग! :)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nee, nakki lihi series! kharach upayogi hoil ti.
mala svat:la tari nigutini karayachya padarthanchi bhayankar dhasti asate.
kruti karatanach manat dhakadhuk asata kama naye..
dhakaladhakalivalya recipyat to dhasti navacha main ingredient missing asalyamule tya yashasvi ani hitttt donhi hotat Wink Lol

हा हा..
तशी 'रिसायकल, रियूज, रिपर्पज' अशी पण सिरीज करता येईल. ज्यात फोचीपो, फोचीभा, फोचाभा, उरसूरढकलथालीपीठ असले पदार्थ येतील. Wink

कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, >>> अगदी अगदी.. हे बोल्ड केलेले पदार्थच मी तिथे मसाला पापड स्टाईल मसाला खाकरा मध्ये लिहिलेले.. खाकर्‍यात तर हल्ली फ्लेवरही चिक्कार मिळतात, तिखट चवीचा असेल तर काकडीसुद्धा मस्त लागते.. खाऊन खाऊन दमलो की शेवटी पेय म्हणून सुमधुर थंडगार ताक Happy

पहिला फोटू किती मस्तय! डाळिंबाचे दाणे काय यम्मी दिसताहेत Happy प्रकार आवडला ... एकदम झकास दिसतोय.
आणि हो ... नाव पण झकास! हे ते ढकल Lol

Pages