हेतेढकल खाकरा भेळ

Submitted by नीधप on 6 August, 2014 - 08:36
khakara bhel
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खाकरे - प्लेन किंवा फ्लेवर्ड.

तेल, मोहरी, जिरं, हळद, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, किसलेले आले, भाजलेले दाणे, लिंबू, सैंधव

हेतेढकलवस्तू - बोल्ड केलेल्या मस्ट.. बाकीच्या ऑप्शनल
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, कोचवलेली काकडी
न वापरलेले पण वापरू शकाल अश्या वस्तू - किसलेले गाजर, किसलेला कोबी, सॅलडची पाने, मक्याचे दाणे, संत्र्याच्या फोडींचे तुकडे, पुदिन्याची पाने, स्प्राऊटस, उकडलेला बटाटा, सांडग्याची मिरची वगैरे
khakra-bhel-03.jpg

क्रमवार पाककृती: 

चित्रातल्या प्रमाणे खाकरे चुरून घेणे.
khakra-bhel-01.jpg

फोडणी: तेल-तापले-मोहरी-जिरे-तडतड-हळद-हिंग-हिरवी मिरची-किसलेले आले-कढीपत्ता... जरा खमंग परतून घेणे.
खाकरे दमट झाले असतील तर ते फोडणीवर घाला. नसतील तर फोडणी खाकर्‍यांवर ओता.
भाजलेले दाणे घाला. मिक्स करून घ्या.

khakra-bhel-02.jpg
माझ्याकडचे खाकरे प्लेन असल्याने मी फोडणी केली. मसाला किंवा फ्लेवर्ड खाकरे वापरत असाल आणि त्याची चव तशीच ठेवायची असेल तर फोडणी स्किप करू शकता. पण मग सगळे मिक्स करताना तिखटाच्या अंदाजाने लाल तिखट पावडर घालावी.

कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व बाकीच्या ढकलवस्तू चिरून झाल्या असल्यास तुमची तयारी पूर्ण झाली आहे.

परतलेल्या चुर्‍यामधे या सर्व वस्तू मिक्स करून मग वरून चवीप्रमाणे सैंधव घाला, वरून लिंबू पिळा आणि लगेच खा.

खायच्या अगदी आयत्या वेळेला चुरा व ढकलवस्तू मिक्स करायच्या आहेत. खाकर्‍यांचा कुरकुरीतपणा खाताना जाणवला पाहिजे.
khakra-bhel-04.jpg

हा चटपटा वगैरे स्वाद कमी वाटला तर मग भेळेच्या चटण्या हा बाफ रेफर करून हवी ती चटणी ओता. पण खरंतर गरज पडणार नाही. Happy

वाढणी/प्रमाण: 
आवडले तर एका माणसाला नाही आवडले तर पूरी बारात खायेगी.. ;)
अधिक टिपा: 

पाहिजे ते व्हेरिएशन करून बघा.
या खाकरा भेळेची प्लेट सेट करून त्यावर प्लेन ऑम्लेट टाकून पण भारी लागत असणार.
भेळ आहे त्यामुळे फरसाण घालून करून बघायला हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
केलेले प्रयोग हो फक्त प्रयोग! :)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

...

हायला खरंच अगदीच हे ते ढकल रेसीपी. मस्त लागत असणार. Happy
मी पाहीन करून. यात न संपलेले पुड्याच्या तळात गेलेले चिवडे पण ढकतला येतील.

वा वा... अगदीच कोणालाही करता येऊ शकेल असा पदार्थ..

योग्या..पुड्यांच्या तळ्यात गेलेले चिवडे रिस्की असतात.. पार वाट लावू शकतील पदार्थाची सगळं मीठ खाली जमा झाल्यामुळे..

मस्तच. मी करते अशी थोड्या वेगळ्या प्रकारे म्हणजे फोडणी नाही करत. डाळिंबाचे दाणे मात्र टाकून नाही बघितले. कधी कधी खाक-यावर सर्व कोशिंबीर करून पण घालते.

आता सेम ह्या पद्धतीने करून बघेन.

अरे ही हेतेढकल खाकरा भेळ मी पण करते. माझ्या व्हर्जनमध्ये मेथी खाकरे, भाजलेला पापड, भाजलेले दाणे, मीठवाले साधे कॉर्नफ्लेक्स, हिरवी मिरची, कांदा, टॉमॅटो ( घरात असेलच तर कैरी/लिंबू, गाजर, काकडी, मोड आलेली मटकी, आलू भुजिया किंवा इतर कोणतीही शेव) आणि इमली पिचकू असतं. Happy

मस्त ! सोप्प
संध्याकाळच्या डब्यात टिकेल का ?
म्हणजे सकाळी करून नेल आणि पाच सहा च्या दरम्यान काही तरी खाण्यास होईल अस .

जाई, खाकरा कुरकुरीत असताना खायला मजा.
बाकीचं एकत्र करून आणि खाकरा चुरा वेगळा असं नेलंस आणि आयत्यावेळेला मिक्स केलंस तर जमेल पण मग कच्च्या कांद्याच्या वासाचं काय करशील?

जाई नाही टिकणार बहुतेक, खाकरा मऊ पडेल. ऐनवेळी बाकीच्या पदार्थात खाकरा वेगळा नेऊन चुरडला तर चालेल पण काकडीला पण पाणी खूप सुटेल.

ओह कांदा नाही का ! पण ते एडजस्ट करून घेईन थोड ।
तुझी आईडिया मस्त आहे . वेगवेगळ डबे न्यायची .
वडापाव , भज्या , शेवपुरी हादडण्यापेक्षा हे बेस्ट आहे

हो ! अंजू ताई , बरोबर

Pages