दर्जेदार विनोद/किस्से

Submitted by फारुक सुतार on 6 August, 2014 - 07:16

नविन धागा (आधी हा धागा झाला असेलतर क्षमस्व!) ... दर्जेदार विनोद अपेक्षित आहेत... अशलिल किंवा भावना दुखावणारे नसावेत...

असाच एक वाचलेला विनोद...

उम्म्या कॉल सेंटरला फोन करतो..
Cc -मी आपल्याला कश्या प्रकारे मदत करू शकतो?
उम्म्या - मी नोट पॅडवर टाईप करत होतो..अचानक सगळे शब्द गायब झाले..
Cc - गायब झाले?
उम्म्या -हो..मी आता काहीही टाईप केलं तर ते स्क्रीनवर उमटत नाहीये..
Cc - तुम्ही नक्की नोट पॅड वर आहात की त्याच्या बाहेर आलात..
उम्म्या - माहित नाही..
Cc - बरं...तुम्हाला 'C ' प्रोम्प्ट दिसतोय का..
उम्म्या - 'C ' प्रोम्प्ट म्हणजे?
Cc -बरं..मला सांगा तुम्हाला कर्सर दिसतोय का स्क्रीनवर..
उम्म्या - अहो काहीच दिसत नाहीये..तेच तर सांगतोय कधीचं...
Cc - तुमचा मॉनिटर चालू आहे की बंद?
उम्म्या - मॉनिटर म्हणजे काय?
Cc - तुमच्या टेबल वर T .V सारखा जो डब्बा आहे तो..
उम्म्या - ते कसं ओळखू ?
Cc - मॉनिटर च्या मागे पॉवर केबल आहे का कनेक्ट केलेली? आणि मॉनिटरचा लाईट लागतो का?
उम्म्या - पॉवर केबल लावलेली आहे..पण लाईट नाही लागत आहे..
Cc - बरं..मॉनिटरच्या मागची दुसरी केबल तुमच्या कम्प्युटरला जोडलेली आहे का?
उम्म्या -मला नाही दिसत..
Cc - म्हणजे ?
उम्म्या - अहो इथे अंधार आहे..फक्त खिडकीचा प्रकाश येतोय..
Cc - मग लाईट चालू करा ना..
उम्म्या - अहो..लाईट गेलीये कधीपासून....
Cc - ओह !! मला आता कळाला प्रॉबलेम...एक काम करा..तुमचा कम्प्युटर पैक करा...आणि जिथून
आणलाय त्याला परत द्या..
उम्म्या - का हो काय झालं? आणि त्यांना काय सांगू परत देताना?
Cc -सांगा की मी कॉम्प्युटर घेण्याच्या लायकीचा नाहीये..मला अक्कल आली की परत घेईन........

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार पुर्वी असा एक धागा होता. आत्ता असलेल्या आयडींपैकी अनेक आयडी तेव्हा अस्तित्वात आलेले नव्हते.
माझ्या आठवणीप्रमाणे मी, झक्की, दिनेश, पेशवा असे काहीच तेव्हाचे आयडी आता दिसतात.
वे.मा. आणि काही प्रशासकही होतेच अर्थात.
तो धागा वाहता होता. पण बहुतेक तेच तेच विनोद येऊ लागले किंवा हलक्या दर्जाचे येऊ लागलें म्हणुन की काय तो धागा बंद करण्यात आला.
तसे तर आत्तापण गरज नाहीये फार. कोणताही वादग्रस्त धागा पहा विनोदीच असतो. Happy