असतो का देह अभंग ?

Submitted by सुशांत खुरसाले on 2 August, 2014 - 00:09

टुमदार घरांच्या टोळ्या
बदनाम मनांची वस्ती
जर इथे भेटलो असतो
तर फिकीर पडली नसती

तू भेटीला बोलवले
ती जागा संथ निराळी
सांजवतो डोह तिथे अन्
सुर्याचा संप कपाळी

वर अशा सभ्य खडकांवर
टाकून पाय बसताना
मन तर-तम, तर-तम करते
भोवती तूच असताना

वाचल्या पहा डोहाने
सावल्या एकरुपताना
नवखेच जाणवे काही
हे शब्द नवे सुचताना

आठवे पुन्हा शब्दांना
सत्याचा धुरकट रंग
जन्मभर पुरावा इतका
असतो का देह अभंग ?

--सुशांत ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स ...

कविता दमदार सुशांत,
तू भेटीला बोलवले
ती जागा संथ निराळी
सांजवतो डोह तिथे अन्
...........................
हे निराळेपण अजून स्पष्ट करणारी चौथी ओळ हवी .. असं मात्र वाटलं.

धन्यवाद भारतीताई .

तुम्ही म्हणताय त्या ओळीबाबत विचार केलेला मी ;पण त्या क्षणी ते ठीक वाटलं ..
I'll try for better options . Happy