Submitted by सुशांत खुरसाले on 2 August, 2014 - 00:09
टुमदार घरांच्या टोळ्या
बदनाम मनांची वस्ती
जर इथे भेटलो असतो
तर फिकीर पडली नसती
तू भेटीला बोलवले
ती जागा संथ निराळी
सांजवतो डोह तिथे अन्
सुर्याचा संप कपाळी
वर अशा सभ्य खडकांवर
टाकून पाय बसताना
मन तर-तम, तर-तम करते
भोवती तूच असताना
वाचल्या पहा डोहाने
सावल्या एकरुपताना
नवखेच जाणवे काही
हे शब्द नवे सुचताना
आठवे पुन्हा शब्दांना
सत्याचा धुरकट रंग
जन्मभर पुरावा इतका
असतो का देह अभंग ?
--सुशांत ..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा खुरसाले एकदम सही मस्त
व्वा खुरसाले एकदम सही मस्त फ्लो
अप्रतीम कविता
धन्यवाद वैवकु ...
धन्यवाद वैवकु ...:)
ओघवती
ओघवती
धन्स ...
धन्स ...
कविता दमदार सुशांत, तू भेटीला
कविता दमदार सुशांत,
तू भेटीला बोलवले
ती जागा संथ निराळी
सांजवतो डोह तिथे अन्
...........................
हे निराळेपण अजून स्पष्ट करणारी चौथी ओळ हवी .. असं मात्र वाटलं.
धन्यवाद भारतीताई . तुम्ही
धन्यवाद भारतीताई .
तुम्ही म्हणताय त्या ओळीबाबत विचार केलेला मी ;पण त्या क्षणी ते ठीक वाटलं ..
I'll try for better options .
वाह खुप सुंदर लय असलेली
वाह खुप सुंदर लय असलेली कविता....
सुरेख! (भारतीताईंशी त्या
सुरेख!
(भारतीताईंशी त्या ओळीबद्दल सहमत. आणि ते 'सूर्याचा' हवं.)
सुरेख कविता! आवडली
सुरेख कविता! आवडली