मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre

Submitted by दिनेश. on 1 August, 2014 - 09:03

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152

दुसरा दिवस रविवार होता. त्यादिवशी मला कुठलीही टुअर नव्हती म्हणून स्वतंत्रपणे फिरायचे ठरवले.
नेटवर काही छान ठिकाणे दिसत होती. पण रविवार असल्याने ती बंद होती. शुगर म्यूझियम मात्र उघडे आहे,
असे टॅक्सीवाल्याने सांगितले. म्हणून तिथे गेलो.

साखर हा या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा राहिला आहे आणि सध्याही तेच निर्यातीचे प्रमुख उत्पादन आहे.
उसाच्या शेतीत काम करायला म्हणून अनेक भारतीय लोक गेले असले तरी त्यांना गुलाम म्हणणे मला तरी
योग्य वाटत नाही. एकतर ते कसबी होतेच शिवाय त्यांचे फार हाल झाले असे काही वाटत नाही.

या देशाची जमीन आणि हवामान उस उत्पादनासाठी योग्य असले तरी, ज्यावेळी सुरवात केली त्याकाळी सर्व
जमीन नांगरल्यासारखी सपाट होती, असे मुळीच नव्हते. त्यातले मोठेमोठे खडक फोडून बाहेर काढावे लागले,
काही शेतात अजूनही असे ढीग दिसतात.

साखरेचे उत्पादन त्या काळच्या युरपमधे अजिबात नव्हते. साखरेचा कच्चा माल म्हणजे उस तिथे पिकत नव्हता.
बीट व इतर शेतमालापासून मिळणारे उत्पादन मर्यादीत होते, शिवाय ते कारखानेही महायुद्धाच्या काळात बंद
पडले होते. त्यामूळे वसाहतवाद्यांनी या देशाचा चांगलाच उपयोग करून घेतला.

साखरेचे तंत्रज्ञान मात्र मूळ भारताचे. चिनी लोकांनाही आपणचे ते तंत्र दिले.

एका जून्या साखर कारखान्यात हे संग्रहालय आहे. सर्व मशिनरी शाबूत आहे. मांडणी तर अतिशय सुंदर आहे.
साखरेसंबंधी सर्व माहिती रंजक रुपात तिथे मांडलेली आहे. ( केवळ साखरच नव्हे तर एकंदर या देशासंबंधी
इतरही माहिती आहेच. )

तिथे ती माहिती इंग्रजी आणि फ्रेंच दोन्ही भाषांत लिहिलेली आहे, शिवाय छापील पुस्तकही मिळायची सोय आहे.
http://www.aventuredusucre.com/index.php?nv=content&id=33 इथे आणखी माहिती आहे.

जवळच रेस्टॉरंट आहे. साखर आणि रम विकणारे एक दुकानही आहे. एकंदर मस्त जागा आहे ही. चला फोटोतून
ओळख करून घेऊ या.

१) सकाळीच हॉटेलमधून असे मस्त दर्शन झाले

२) रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाची शेती

३) पण तिथे जंगलेही भरपूर आहेत.

४) संग्रहालयाचा दर्शनी भाग

५)

६) यंत्रांची मांडणी

७) वेगवेगळ्या प्रकारची साखर

८) मॉरिशियस आधी आणि मग स्वर्ग निर्माण केला

९) जून्या काळचे गलबत

१०)

११) या सर्व ठिकाणी जाता येते

१२) वेगवेगळ्या साखरेची मांडणी

१३) अरब व्यापारी साखरेच्या अश्या ढेपा नेत असत. ( खनिज मिठाच्या अश्याच ढेपा आजही आफ्रिकेत वापरात आहेत.)

१४) चिमणी... हिच्या आधाराने पुर्वी गावे वसली

१५)

१६) प्रत्येक ठिकाणी सविस्तर माहिती आहे

१७) हे काय असेल बरं ?

१८) मेल बॉक्स

१९)

२०)

२१)

२२)

२३) त्या काळातली प्रयोगशाळा

२४) साखर, साखर, साखर

२५) आणि तिची वेगवेगळ्या तपमानातील रुपे

२६) जरा नीट बघा बरं... साखर आपली, चिन्यांची नाही

२७) त्या गलबतातला आतला भाग

२८) कधी काळी उसाची वाहतूक तिथे रेल्वेतून होत असे

२९) उसाचे पण चित्र काढता येते ?

३०)

३१) हा प्रकार मला माहीत नव्हता. उसाची लागवड पेरं लावून करतात एवढेच माहीत होते. पण अशी लागवड सातापेक्षा जास्त वेळा करता येत नाही. नवीन लागवडीसाठी अश्या तर्‍हेने निवडक वाण निवडून संकरीत "बियाणे" तयार करतात.

३२)

३३) तिथल्या खास जास्वंदी

३४)

३५)

३६)

३७) मागे वळून बघताना

३८) २६ क्रमांकाच्या फोटोतला बोर्ड नीट वाचता येत नाही, तो इथे मोठा करून देतोय.

३९) या देशाचे आकारमान जरी लहान असले तरी तिथे वेगवेगळ्या प्रकारची माती सापडते आणि अर्थातच त्यानुसार उसाचा वाण निवडतात.

४०) साखरेचे स्फटीक वेगळे करणारी यंत्रणा... ( शशांकने माहिती दिलीय प्रतिसादात.. )

पुढे चालू...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्णन फोटो छान Happy
उसाला सरसकट सगळीकडेच तुरे येत नाहीत. एका विशिष्ट हवामानाची गरज असते. भारतात फक्त कोईमतूरला असे वातावरण असल्याने तिथे आपले राष्ट्र्रीय उस संशोधन केंद्र आहे. संकरीत बियाणे निर्मितीकरता याचा उपयोग केला जातो.>>> या निमित्ताने ही माहिती कळाली. धन्स शशांक.

दिनेश, मस्तच माहिती.

ऊस हे जमिनीला आतिशय महाग पडणारे पीक आहे ना? त्याने जमिनीचा कस झपाट्याने कमी होतो. त्यामुळे ते पीक सातत्याने आणि दीर्घकाल घेता येत नाही. मग साखरेची प्रामुख्याने निर्यात करणारा एक लहानसा देश ते कसे जमवतो?

माधव, नेमके माहीत नाही पण तिथे खताचा वापर फारसा होताना दिसला नाही. पाण्याचा साठा भरपूर आहे शिवाय पाऊसही नियमित आहेच. मूळ जमिनच कसदार असावी. ( आपल्याकडे खताचा अतिवापर होतो ना ? )

उसाशिवाय थोडाफार भाजीपाला व फळे होतात. गहू, तांदूळ आयात करावे लागतात असे टॅक्सीवाल्याने सांगितले.

प्रत्येक सहलीबरोबर तुमचे योग्य नियोजन, माहिती आणी सुरेख फोटो पाहुन खूप कौतुक वाटते.:स्मित: आणी नियोजनाबरोबर दुसर्‍याशी शेअरिन्ग करणे हा मुख्य भाग. धन्यवाद त्या करता.

मी साप्ताहीक सकाळ की भटकन्ती ( मिलिन्द गुणाजीन्चे) असे साप्ताहीक होते आठवत नाही, पण वाचले होते की हा देश चक्क भरपूर ऊस आणी साखरेचा उत्पादक असुनही तिथला ऊसाचा रस मात्र पिववत नाही. म्हणजे आपल्याकडे आपण गुर्‍हाळात पितो तसा. प्रस्तुत लेखिकेने हा अनूभव घेऊन मग त्या विषयी लिहीले होते.

रश्मी Happy आभार.

आपल्याकडे जशी जागोजाग नवनाथ रसवंती गृह असतात तशी तिथे अजिबात नव्हती. फक्त एकाच ठिकाणी
ते होते. यंत्रांत एका बाजूने उस टाकला कि दुसर्‍या बाजूने भुसाच येत असे.
तो रस होता १०० रुपयाला ( आपले २०० रुपये. ) आम्ही त्याची टींगलच केली. १०० रुपयाला साधा.. त्यात तिथे रम वगैरे मिसळून घ्यायची पण सोय होती. त्याचा अर्थातच एस्ट्रा चार्ज.

छान माहिती आणि एक से एक सुंदर प्र.चीं. साठी अनेक धन्यवाद.
तिथेपण फ्लाय अ‍ॅश (याला मराठीत काय म्हणतात ?) चा त्रास जाणवला का? आपल्याकडे साखर कारखाना परीसरात ह्याचा भलताच त्रास असतो.

रांचो.. शनि शिंगणापूर भागात मी बघितला हा प्रकार. पण हा कारखाना चालू नव्हता. तिथे उसाच्या चोथ्याचा वापर करून वीज निर्मिती करतात. इंधन म्हणून दुसरे काहीतरी वापरतात. ( पुस्तक शोधावे लागेल मला ) असे अंधुक वाचल्याचे आठवतेय.

Pages