मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre

Submitted by दिनेश. on 1 August, 2014 - 09:03

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152

दुसरा दिवस रविवार होता. त्यादिवशी मला कुठलीही टुअर नव्हती म्हणून स्वतंत्रपणे फिरायचे ठरवले.
नेटवर काही छान ठिकाणे दिसत होती. पण रविवार असल्याने ती बंद होती. शुगर म्यूझियम मात्र उघडे आहे,
असे टॅक्सीवाल्याने सांगितले. म्हणून तिथे गेलो.

साखर हा या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा राहिला आहे आणि सध्याही तेच निर्यातीचे प्रमुख उत्पादन आहे.
उसाच्या शेतीत काम करायला म्हणून अनेक भारतीय लोक गेले असले तरी त्यांना गुलाम म्हणणे मला तरी
योग्य वाटत नाही. एकतर ते कसबी होतेच शिवाय त्यांचे फार हाल झाले असे काही वाटत नाही.

या देशाची जमीन आणि हवामान उस उत्पादनासाठी योग्य असले तरी, ज्यावेळी सुरवात केली त्याकाळी सर्व
जमीन नांगरल्यासारखी सपाट होती, असे मुळीच नव्हते. त्यातले मोठेमोठे खडक फोडून बाहेर काढावे लागले,
काही शेतात अजूनही असे ढीग दिसतात.

साखरेचे उत्पादन त्या काळच्या युरपमधे अजिबात नव्हते. साखरेचा कच्चा माल म्हणजे उस तिथे पिकत नव्हता.
बीट व इतर शेतमालापासून मिळणारे उत्पादन मर्यादीत होते, शिवाय ते कारखानेही महायुद्धाच्या काळात बंद
पडले होते. त्यामूळे वसाहतवाद्यांनी या देशाचा चांगलाच उपयोग करून घेतला.

साखरेचे तंत्रज्ञान मात्र मूळ भारताचे. चिनी लोकांनाही आपणचे ते तंत्र दिले.

एका जून्या साखर कारखान्यात हे संग्रहालय आहे. सर्व मशिनरी शाबूत आहे. मांडणी तर अतिशय सुंदर आहे.
साखरेसंबंधी सर्व माहिती रंजक रुपात तिथे मांडलेली आहे. ( केवळ साखरच नव्हे तर एकंदर या देशासंबंधी
इतरही माहिती आहेच. )

तिथे ती माहिती इंग्रजी आणि फ्रेंच दोन्ही भाषांत लिहिलेली आहे, शिवाय छापील पुस्तकही मिळायची सोय आहे.
http://www.aventuredusucre.com/index.php?nv=content&id=33 इथे आणखी माहिती आहे.

जवळच रेस्टॉरंट आहे. साखर आणि रम विकणारे एक दुकानही आहे. एकंदर मस्त जागा आहे ही. चला फोटोतून
ओळख करून घेऊ या.

१) सकाळीच हॉटेलमधून असे मस्त दर्शन झाले

२) रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाची शेती

३) पण तिथे जंगलेही भरपूर आहेत.

४) संग्रहालयाचा दर्शनी भाग

५)

६) यंत्रांची मांडणी

७) वेगवेगळ्या प्रकारची साखर

८) मॉरिशियस आधी आणि मग स्वर्ग निर्माण केला

९) जून्या काळचे गलबत

१०)

११) या सर्व ठिकाणी जाता येते

१२) वेगवेगळ्या साखरेची मांडणी

१३) अरब व्यापारी साखरेच्या अश्या ढेपा नेत असत. ( खनिज मिठाच्या अश्याच ढेपा आजही आफ्रिकेत वापरात आहेत.)

१४) चिमणी... हिच्या आधाराने पुर्वी गावे वसली

१५)

१६) प्रत्येक ठिकाणी सविस्तर माहिती आहे

१७) हे काय असेल बरं ?

१८) मेल बॉक्स

१९)

२०)

२१)

२२)

२३) त्या काळातली प्रयोगशाळा

२४) साखर, साखर, साखर

२५) आणि तिची वेगवेगळ्या तपमानातील रुपे

२६) जरा नीट बघा बरं... साखर आपली, चिन्यांची नाही

२७) त्या गलबतातला आतला भाग

२८) कधी काळी उसाची वाहतूक तिथे रेल्वेतून होत असे

२९) उसाचे पण चित्र काढता येते ?

३०)

३१) हा प्रकार मला माहीत नव्हता. उसाची लागवड पेरं लावून करतात एवढेच माहीत होते. पण अशी लागवड सातापेक्षा जास्त वेळा करता येत नाही. नवीन लागवडीसाठी अश्या तर्‍हेने निवडक वाण निवडून संकरीत "बियाणे" तयार करतात.

३२)

३३) तिथल्या खास जास्वंदी

३४)

३५)

३६)

३७) मागे वळून बघताना

३८) २६ क्रमांकाच्या फोटोतला बोर्ड नीट वाचता येत नाही, तो इथे मोठा करून देतोय.

३९) या देशाचे आकारमान जरी लहान असले तरी तिथे वेगवेगळ्या प्रकारची माती सापडते आणि अर्थातच त्यानुसार उसाचा वाण निवडतात.

४०) साखरेचे स्फटीक वेगळे करणारी यंत्रणा... ( शशांकने माहिती दिलीय प्रतिसादात.. )

पुढे चालू...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा हा भाग सुद्धा नेहमीप्रमाणेच मस्त.......सगळे फोटो आणि माहिती अतिशय सुरेख. शुगर म्यूझियम चे फोटो पाहून एक गोष्ट आठवली मला एकदातरी साखर कशी बनते ते पहावयाची इच्छा आहे, पण माझी आई म्हणते साखर बनविताना पाहणे तेवढे आनंददायक नसते. तुमचे फोटो पाहून तर मस्त वाटते आहे.

आभार दोस्तांनो.
साती, शेतात कुठेही बांध दिसले नाहीत त्यावरून अंदाज केला कि ती सरकारी किंवा किमान कंपन्यांच्या मालकीची असावी. तसेही त्यांचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर आमच्यासारख्या परक्या पर्यटकांशी त्याची चर्चा न करण्याचा संकेत सर्वच टूअर ऑपरेटर्स पाळतात.. तिथेही.

अनन्या... तिथे या प्रोसेसच्या क्लीप्स दाखवल्या जात होत्या. एखाद्या चालू कारखान्याला भेट दिली तर तो
मळीचा वास ( आपल्यासारख्या, सवय नसलेल्यांना Happy ) असह्य होतो. तिथे तो नव्हता.
सध्या तरी तिथे बहुतेक सर्व प्रक्रिया यंत्रांनेच केली जाते.

छान माहीती.
स्टिम टर्बाइन-जनरेटर व मिल हाऊसचे फोटो खासच.

साती, तिकडचे सगळे साखर कारखाने आणि उसाची शेती ही खासगी आहे. तसेच युरोपात फक्त इथलीच साखर जाणार असा काहीतरी करारच होता आता आतापर्यंत. म्हणजेच मॉरिशससाठी युरोप ही हक्काची मोनोपलीस्टिक बाजारपेठ होती. त्या कराराची मुदत संपल्यानंतर मॉरिशसने पर्यटनासारख्या इतर क्षेत्राकडेही लक्ष द्यायला सुरुवात केल्ये.

खुपच छान...
नवीन लागवडीसाठी अश्या तर्‍हेने निवडक वाण निवडून संकरीत "बियाणे" तयार करतात+++ १००% आमच्या साठी पण नविन आहे..
तिथल्या जास्वंदीत पण साखर उतरल्या सारखी दिसतेय... Happy
आणी उसाचे चित्रं, क्या बात है!

सुंदर माहिती. फोटोही सुरेखच....

उसाला सरसकट सगळीकडेच तुरे येत नाहीत. एका विशिष्ट हवामानाची गरज असते. भारतात फक्त कोईमतूरला असे वातावरण असल्याने तिथे आपले राष्ट्र्रीय उस संशोधन केंद्र आहे. संकरीत बियाणे निर्मितीकरता याचा उपयोग केला जातो.

त्या २२ क्र. च्या प्र चि त मॅस्कट ( massecuite) म्हणून जे दाखवले आहे त्यात उसाचा रस गरम होत होत साखरेचे क्रिस्टल्स तयार होतात - यात अल्कोहोलमधे विरघळलेली साखर सीड करतात - या साखरेच्या रेणूच्या आसपास साखर क्रिस्टलाईज होते. (जसे तिळाभोवती साखर क्रिस्टलाईज होते आणि हलवा तयार होतो सेम तसेच...) या प्रक्रियेत तो साखरेचा पाक सतत ढवळत रहाणे फार गरजेचे असते. भारतात (जिथे वीजेचा अजिबात भरवसा नसतो) कुठल्याही साखर कारखान्यात या मॅस्कटकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देतात. समजा वीज गेलीच तर मॅन्युअली तो पाक फिरवावा लागतोच - अन्यथा तो पूर्ण मॅस्कट फेकून द्यावा लागतो - कारण मग तो दगडापेक्षा कठीण होऊन बसतो... Happy

एकंदरीत साखर कारखाना हे माझ्या दृष्टीने तरी अतिशय प्रेक्षणीय स्थान आहे. खूप गुंतागुंतीची प्रक्रिया असते - या साखरेमागे .... Happy

हर्पेन, सध्या उसाखालची लागवड कमी करून बांधकामे चाललेली दिसताहेत खरे !
शशांक... त्या यंत्राचा पण आहे फोटो. पुढच्या भागात देतो. मला वाटलं होतं हे सगळे फोटो रुक्ष वाटतील मायबोलीकरांना, म्हणून निवडकच टाकले आहेत Happy

२४ व्या फोटोत साखरेच्या सर्व प्रकारांची नावे दिसत आहेत.पण हे एवढे प्रकार वापरतात तरी कशाकशात?बेकरी/बेकिंग मध्ये?
मला फक्त castor sugar,brown sugar,icing sugar असेच प्रकार माहित होते!
दिनेशदा, तुम्ही कोणकोणते प्रकार खरेदी केलेत?

जास्वंद वेगळी आणि छान.

साखरेचे museum तुमच्यामुळे बघायला मिळाले व आवडलेही.

मस्त महिती. सुंदर प्रचि.

जास्वंद माझ्या विशेष आवडीची असल्याने ते जास्त आवडले.

खूप सुंदर लेख व सफर दिनेशदा.
साखरेचं मूळ तंत्रज्ञान भारताचं.. याचा संदर्भ मिळेल? कारण नॅटजिओच्या ऑगस्ट १३ च्या अंकात साखरेचा इतिहास दिलाय त्यात वेगळा उल्लेख आहे.

खूपच सुंदर!
मॉरिशस च्या जंगलांबद्दल वाचले होते सकाळ मध्ये आणि इतर ठिकाणी.ही गोष्ट व्यवस्थित पहिल्यांदा समजून घेता आली.

दिनेश, मॉरिशसच्या साखरेला पूर्वी मोरस-साखर म्हणत हे चिं.वि.जोशींच्या चिमणराव मध्ये वाचलं होतं , मोर-ससा-खर अशी कोटी त्यांनी केली त्यावर हे आठवलं Happy
प्रचि , माहिती मस्त ! एक तर पाकृ नाहीतर पर्यटन ,हेवा वाटावा अशी प्रचि देत रहा तुम्ही , आम्ही मनावर संयम ठेवून त्यांचा आनंद घेऊ Happy

मस्त माहिती आणि प्रचि. शुगर म्युझिअम मध्ये गर्दी अजिबातच दिसत नाहीये, म्हणजे अगदीच निवांतपणे तुमची सफर घडली तर. Happy

परत आभार..
सारिवा.. सध्या साखरेचे आणि माझे बिनसल्याने कुठलीच साखर घेतली नाही. नाही म्ह्णायला रमच्या बाटलीसोबत एक साखरेची पुडी मिळाली पण ज्या व्यक्तीसाठी रम आणली होती, तिलाच दिली.

विज्ञानानंद... तिथला एक माहितीफलक मोठा करून दिला आहे आता. त्यानुसार चिन्यांनी हे तंत्र भारताकडून घेतले असे कळते. ( नॅटजिओची माहिती जास्त अद्यावत असण्याची शक्यता आहे, अवश्य द्या. )

ऋन्मेष... मागे वळून बघितले त्यावेळी ती फ्रेम फारच सुंदर दिसली... दाद दिल्याबद्दल छान वाटले.

रंगासेठ.. रविवार असल्याने असेल. आणि सर्वसाधारणपणे पर्यटक मोजक्याच ठिकाणी जातात.
रविवारी स्थानिक लोक घरीच थांबतात, फारतर समुद्रकिनारी जातात. त्यामूळे रस्त्यावरही कुणी नव्हते.

Pages