पॅचवर्क आणि एम्ब्रॉयडरी - काही नमुने

Submitted by मामी on 24 July, 2014 - 00:55

माझ्या आईने केलेले हे पॅचवर्कचे काही नमुने. खूप जुने आहेत. जवळजवळ ४० वर्षांपूर्वीचे. त्यामुळे काही ठिकाणी कापड थोडं विटलं आणि विरलं आहे.

ही शकुंतला. खरंतर आईला अजून तीन नायिका करायच्या होत्या. मत्स्यगंधा, दमयंती आणि अजून एक कोणीतरी होती. त्यांची चित्रं आईनं तिच्या एका आर्टिस्ट मैत्रिणीकडून काढून देखिल आणली होती. पण ते प्रोजेक्ट काही पूर्ण होऊ शकले नाही.

शकुंतलेच्या गजर्‍याकरता, गळ्यातल्या आणि हातातल्या फुलांच्या माळेकरता खूप छान आणि नाजूक टाके घातले आहेत. तिचे केसही अगदी बारीक टाक्यांनी भरले आहेत.

दिवाणखान्यातल्या सोफ्याच्या पाठीवर घालण्याकरता बनवलेली ही चित्रे.

ही एक लहान मुलांच्या बेडवरची चादर :

चादरीवरची चित्रे जवळून :

पॅचवर्कमध्ये त्यातील कॅरॅक्टरच्या कपड्यांसाठी आकर्षक डिझाईन असलेली कापडं लागत. त्यावेळीच्या कपड्यांच्या दुकानात ताग्यातून उरलेली शेवटची थोडी थोडी कापडं एका बॉक्समध्ये घालून स्वस्त्यात विकायला ठेवलेली असत. आई नेहमी अशी कापडं निवडून निवडून आणत असे. अ‍ॅक्च्युअली, अजूनही बॅगभर कापडं घरी आहेत. ती काढून टाकायला काही आई तयार नाहीये.

यापैकी शकुंतला मी फ्रेम करून घेणार आहे. बाकीच्यांचं काय करावं ते कळत नाहीये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हे मी कसं मिसलं इतके दिवस.
कसलं सही आहे हे. ती शकुंतला बघितलेली तेव्हाच प्रेमात पडलेले मी. काय तो ग्रेस, तो गजरा, डोळे, ते हरीण अन पानातली कमळं.... एकसे एक Happy
बाकीची चिल्ळीपिल्ली पण कसली गोड आहेत. प्रत्येकाचे हावभाव पर्फेक्ट. हँट्स ऑफ टू हर ___/\___

अरे, माझ्याकडूनही निसटलं हे अप्रतिम काम. फारच सुंदर. निव्वळ भरतकामाद्वारे दाखवलेला त्रिमिती आभास तर महान आहे. आपण हे सर्व नमुने राखून ठेवण्याचा विचार करता आहात हेही छान. त्यावर योग्य ती माहिती लिहावी ही सूचना आवडली.
आपल्या आईला नमस्कार सांगा.

Pages