संस्कार

Submitted by बेफ़िकीर on 19 July, 2014 - 11:19

जे आपल्या हातातून गेले किंवा जे कधी प्राप्तच झाले नाही त्याचे फायदे इतके जाणवणे की जे हातात आहे ते अतृप्तीस कारणीभूत ठरणे हा मानवी स्वभाव आहे......तरीही......

गेल्या काही महिन्यांत अनेक व्यक्तिमत्वांच्या गाठीभेटी होण्याचा योग आला. ही व्यक्तिमत्वे तुमच्याआमच्यापेक्षा थोड्या वेगळ्या वाटेवर वाटचाल तरी करत आहेत किंवा आपापल्या क्षेत्रात सर्वमान्यपणे दिग्गजपदाला पोहोचलेली तरी आहेत. ह्या सर्व स्त्रिया आहेत. वयोगट आहे चोवीस ते सत्तर! क्षेत्रे आहेत समाजकार्य, राजकारण, मॉडेलिंग, चित्रपट अभिनेत्री, वकील, पत्रकारिता, फॉरीन मल्टिनॅशनलची सी ई ओ, पद्मश्री, फिल्मफेअर किताबधारक इत्यादी प्रकारची! ह्यांच्यासवे ह्या यादीत शोषित तरुणी, कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी, परित्यक्ता, एच आय व्ही पॉझिटिव्ह, मसाज पार्लरमधील तरुणी, वेश्या, कलावंतीणी, मुरळी, देवाला सोडलेल्या, विवाहबाह्य संबंधांमुळे गुन्हेगार झालेल्या, 'वाईफ स्वॅपिंग'च्या बळी, वृद्धा, कातकरी, बुधवार पेठेत 'धंदा' करणार्‍या आणि स्वतःच्या आईनेच गिर्‍हाईकासमोर सादर केलेल्या स्त्रियाही आहेत.

हे काम अजून एक दशांशही पूर्ण झालेले नाही, पण जे काही अनुभवले आहे ते हतबुद्ध करणारे आहे.

ज्या महान स्त्रिया भेटल्या त्यांच्यापैकी अनेकींच्या इतिहासात केव्हातरी काळाकुट्ट कालखंड आलेला होता आणि त्यावर प्रभावीपणे मात करणे शक्य न झाल्याने त्यांना जो कष्टप्रद मार्ग स्वीकारावा लागला त्यातून तावून सुलाखून आज त्या तेजस्वीपणे झळाळत आहेत.

ज्या शोषित महिला भेटल्या त्यांचे काळेकुट्ट वर्तमान हमखास काळ्याकुट्ट इतिहासाचा एक जेमतेम व त्यातल्यात्यात अधिक सह्य असा कोपरा व्यापून दुर्दैवीरीत्या कशाच्यातरी प्रतीक्षेत कुढत आहे.

मिळेल त्या परिस्थितीशी जुळवून घेणे ही सजीवाची नैसर्गीक प्रवृत्ती आहे......तरीही......

स्त्रीच कशाला, हजारो पुरुषही ह्या ना त्या प्रकारे शोषणाला जीवनाचा अविभाज्य भाग मानून मार्ग आक्रमित आहेत. पुरुष असल्यामुळे ह्या शोषणाचा सूड ते पुढे एखाद्या हक्काच्या व सोशिक स्त्रीवर घेऊ शकत आहेत किंवा कोणावरतरी तीव्रपणे घेऊ इच्छित आहेत इतकाच सूक्ष्म फरक!

शोषणाचा सूड घेण्याची इच्छा साहजिक आहे......तरीही......

एक समान वैचारीक अपेक्षा आश्चर्यकारकरीत्या समोर येत आहे, ह्यातील प्रत्येकाकडून!

महत्वाची बाब म्हणजे ही 'अपेक्षा' एक 'थेट अपेक्षा' ह्या स्वरुपात समोर येत नाही आहे. ती समोर येत आहे 'नक्की काय आणि कोठे चुकले' ह्याच्या कारणमीमांसेतून!

संस्कार, सद्भावना व संयम ह्या तीन घटकांची ह्या समाजात आजमितीला अभूतपूर्व वानवा आढळून येत आहे.

नवीन तंत्रज्ञान, त्याचा 'काही प्रमाणातील' अनावश्यक पगडा, भीषण स्पर्धा, त्या स्पर्धेत मी आहे आणि नुसताच 'आहे' असे नाही तर बर्‍यापैकी पुढे आहे हे सांगण्याची अहमअहमिका, आपल्याला येत असलेले नैराश्य हे नैराश्य आहे हे मान्य करण्यास असलेला दुराभिमानी विरोध असे काही घटक साधारण अर्ध्या लोकसंख्येला उरलेल्या अर्ध्या लोकसंख्येवर न पेलणारा भार टाकण्यास प्रवृत्त करत आहेत.

तुलनेने कमी राहणीमानाने तितक्याच समाधानात जगता येते हा विचार लोप पावत आहे. हा विचार आधी होता म्हणून होता की परिस्थितीच तशी असल्यामुळे होता ह्याबाबत वर उल्लेखिलेल्या व्यक्तिमत्वांचे म्हणणे असे आहे की तो आजही असू शकतो.

थोडक्यात, आजचे पालक पाल्यांच्याबाबत दोन गोष्टी करत नाही आहेतः

१. जमेल ते शिक आणि जमेल तसा जग हे सांगणे

२. त्याचवेळी पाल्याने माणूस म्हणून कसे असावे हे सांगणे

किंबहुना, आजमितीला संस्कार केले जात नसून ताण वाढवला जात आहे.

आता ह्या मुद्याशी वर उल्लेखिलेल्या व्यक्तिमत्वांच्या उल्लेखाचा संबंध काय?

तर तो संबंध असा की त्यातील ज्या व्यक्तिमत्वांच्या इतिहासात किंवा वर्तमानात एक भयावह कालखंड आलेला आहे त्यांची तसे होण्याची कारणमीमांसा त्यांच्या नकळत त्यांच्या पालकांनी केलेल्या (खरे तर न केलेल्या) संस्कारांशी आणि टाकलेल्या दबावाशी निगडीत आहे.

संस्कार!

पारंपारीक भारतीय संस्कार!

सूज्ञ वाचकांना जाणवावे की 'आधुनिकता वा आधुनिक विचारशैली' हा 'भौगोलिक विचारप्रणालीला' पर्याय असू शकत नाही. 'उदाहरणार्थ' पाश्चिमात्य जगात शोभेलसे राहणीमान भारतात राहून मिळवताना (/मिळवण्याच्या प्रयत्नांत असताना) येथील प्रदेशाने सुचवलेले / शिफारस केलेले संस्कार त्यागणे हे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे.

शेवटी वर्तनातील सर्व प्रश्न भौतिक गरजेतून निर्माण होतात......तरीही......

कुठेतरी आपल्यावर झालेले संस्कार आपण पुढच्या पिढीवर करणे शक्य आहे की नाही ह्याचा विचार करताना आपण मुळातच पुढच्या पिढीसमोर असलेल्या तीव्र स्पर्धेला फार घाईने शरण जात आहोत.

संस्कार अजूनही शक्य आहेत का? आपण (किंवा मी) ज्यांना संस्कार 'वगैरे' मानतो ते आता संस्कार राहिलेले आहेत का? आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून मुले 'आपण कसे वागावे' हे शिकणे आता इर्रिलेव्हंट झालेले आहे का?

की संस्कारांची व्याख्याच बदललेली आहे? संस्कार म्हणजे 'तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत' असे झालेले आहे व ते सर्वमान्य आहे? 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' असाही संस्कारांचा एक अर्थ असायचा हे आता अमान्य होत आहे का?

'संस्कार' ह्या बाबीला कट ऑफ लाईन असूच शकत नाही का? की प्रादेशिक संदर्भात ती असावी?

अत्यंत उच्चविद्याविभुषित कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाला दहाव्वीला चौर्‍याण्णव टक्के गुण मिळूनही प्रवेश मिळत नाही म्हणून त्याला येता जाता झापणे आणि नुकतीच वयात आलेली मुलगी आर्थिक हातभार लावण्यासाठी आणलेल्या गिर्‍हाईकासमोर जायच्याऐवजी मागच्या दारातून पळून जाते म्हणून तिला पुन्हा न स्वीकारणे ह्या दोन्हींत कुठेतरी प्रादेशीक विचारप्रणालीला स्वार्थासाठी न जुमानणारी एक अतृप्तता व एक असंस्कृतता आहे.

डिस्क्लेमर - पूर्ण जाणीव आहे की दिलेली उदाहरणे, ऐकलेले अनुभव ह्या अनुषंगाने लिहिलेला हा लेख बर्‍याच मोठ्या विषयाशी निगडीत असू शकत असेल आणि लेख लिहिताना कदाचित तो तितक्या व्यापकपणे लिहू शकलो नसेन किंवा लिहू शकलो असेनही पण स्ट्रक्चर वेगळे असू शकत होते असे वाटू शकेल.

तरी केंद्रीय मुद्दा हा आहे की आपल्या प्रदेशातील संस्कृतीला, लोकसंख्येला, राहणीमानाला, संधींच्या उपलब्धतेला व लढा देण्याच्या क्षमतेला पोषक असे संस्कार देण्यात आताची कार्यरत पिढी नुसतीच कमी पडत नाही आहे तर ह्याबाबत पूर्णपणे इग्नोरंटही आहे.

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संस्कार : मला वाटते याची डेफिनेशन व्यक्ती नुसार बदलते. पण थोडक्यात सांगायचे तर आपल्या बिव्हेयिअर मधुन आपल्या नविन पिढीला जाणारा संदेश म्हणजेच संस्कार असावेत असे वाटते आणि जंव्हा 'प्रॅक्टीकॅलिटी' या गोंडस नावाखाली काही आपलेच 'बिव्हेयिअर्स' नकळत ट्रान्स्मिट होतात आणि नंतर आपल्यालाच खटकतात / खटकत राहतात त्यावेळी मग 'संस्काराची' आठवण होते.

आता ९४ % ची गोष्ट आहे ती आहे सुरु असलेल्या रॅट रेस ची, मी तुला अमुक अमुक सगळ उपल्ब्ध करुन देतोय, त्यासाठी मी इतके कष्ट करतोय तर माझी इच्छा तु पुर्ण केलीच पाहिजेस. मी कुठे कमी पडतोय का? मग तु का / कुठे कमी पडतो आहेस? ही भुमिका. मुलाला कमी मार्क (९४%) मिळाले म्हणजे आपण (पालक) हरलो. ही मानसिकता. आता कदाचित या पालकांच्या पालकांची अशी भुमिका आणि मानसिकता नसेल, पण समाजात राहुन अश्या प्रकारची मानसिकता तयार व्हायला कितीसा वेळ लागतो? म्हणुन या पालकांच्या पालकांनी केले नव्हते का संस्कार? त्यांच्या दृष्टीने अतिशय चांगलेच केले असणार. पण तो काळ वेगळा होता, त्यावेळी अशी जीवघेणी (अक्षरशः) स्पर्धा नव्हती या एका विचाराखाली सगळे स्वाइप आउट होते. (यावर अजुन एक प्रतिस्साद वेगळा देइन)

आता स्वतःच्या मुलीला ..... तिच्या आईने जे जग पाहिले आहे, त्यानुसार तिला तरी कुठे वाटत असणार कि आपली मुलगी याच ठिकाणी आपण जे भोगले ते भोगावे. पण परिस्थिती नुसार जर तिला तो निर्णय घ्यावा लागत असेल तर कुठल्या पट्टीने आपण तिचे संस्कार मोजणार. टेबलच्या या बाजुला बसुन कमेंट करणे आणि तिकडची बाजु समजाउन घेणे यात बराच फरक पडतो. आणि इझी मनी साठी एखादी चांगल्या संस्कार केलेल्या घरातील मुलगी असलेच प्रकार स्वखुशीने करत असेल (कदाचित मैत्रीण करते म्हणुन) तर त्या पट्टीचे स्केल कसे बदलायचे.

सगळेच रीलेटीव्ह आहे आणि ते इतके रिलेटीव्ह आहे कि रेल्वे पण मोशन मध्ये आहे - प्लॅटफॉर्म पण मोशन मध्ये आहे - रुळ पण मोशन मध्ये आहेत - आणि रेल्वेत बसलेली माणसे पण..... प्रत्येकाचे पर्स्पेक्टीव्ह वेगळे त्यामुळे प्रत्येकाला दुसर्‍याचे चुकिचे वाटतात .....

मस्त निपा, शेवटचा पॅरा! तरीही काहीतरी अ‍ॅबसोल्यूट म्हणून प्रादेशिकतेपुरते उरते असे आपले मला वाटते. ह्या प्रदेशात एका विशिष्ट प्रकारची मानसिकता निर्माण करणे (व अर्थातच तितकीच लोकसंख्याही निर्माण होऊ देणे) हे अधिक बरे व्हावे. Happy

लेख प्रचंड विचारप्रवर्तक आहे यात वाद नाही पण त्याबरोबरच योग्य संस्कार जरी होत असले तरीही त्याबरहुकूम चालत राहणे हे वेगाने बदलणा-या सामाजिक परिस्थितीमुळे जसेच्या तसे अवलंबिणे पुढच्या पिढीला अशक्यप्राय होत जात असावे. नाहीतर एकाच घरात समान संस्कार झालेल्या भावा-बहीणींच्या आचरणात कमालीचा विरोधाभास पाहण्यात आला नसता.

>>>>अर्थातच तितकीच लोकसंख्याही निर्माण होऊ देणे<<<<<

हा कळीचा मुद्दा वाटतो. गरजेपोटी (आर्थिक, भावनिक) नोकरी करणारे आई-वडील, पोटापाण्यासाठी स्थलांतरीत व्हावे लागल्याने निर्माण झालेली विभक्त कुटुंबं ह्या नि अश्या ब-याच कारणाने घरातील मोठ्या लोकांच्या वागण्या-बोलण्यातून सहजी, येता-जाता होणा-या संस्कारांची वानवा ! या बाबी लक्षात घेता सुसंस्कारी मुले घडविण्याच्या दृष्टीने कुटुंबाची संख्या मर्यादित ठेवणे गरजेचे होवून बसलेय असे वाटते.
काही वर्षांपूर्वी दैनिक सकाळने एक सदर सुरू केले होते 'एका अपत्याच कुटुंब' त्यातील लेख या दृष्टीने खरोखर अंजन घालणारे होते.

-सुप्रिया.

धाग्यापेक्षा निवांत पाटलांची प्रतिक्रीया सुसंबद्ध वाटतेय.
खास करुन शेवटचा पॅरा. संस्कार हा शब्दच अत्यंत रिलेटिव्ह आहे.

It will be the last thing I say ™look who's talking?"
I hope everything is fine at your end...

इथे तुम्हाला मला काही वैयक्तिक बोलायचं असेल तर बोलू शकता.
भाषेची पातळी वगैरे नेहमीचीच राहू द्या.
हा धागा वाहता झाला तरी काही बिघडत नाही...

यात तसंही काही अभ्यासू वगैरे काही नाही, ना वैचारीक आहे.
सेंटर फ्रेश मुक्ताफळंच ही..

जागता पहारा कुणी ठेवायचा याबद्दल एका तरल क्षणी महामहोपाध्यायांनी उपदेश केला होता की

पहारा ठेवणा-याला काही अधिकार असावा लागतो.
इथे पहारा ठेवणा-यांना कुणी विचारत नाही.

तर आपण आता सेंटरफ्रेश मुक्ताफळे या धाग्यावरच्या पोस्टींचा इथे परामर्श घेऊयात.

प्रधानमंत्री मनमोहनसिंह
अर्थमंत्री पी चिदंबरम
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे
राहुलं गांधी, दिग्विजयसिंह

यांच्या वक्तव्यांचा समाचार घेण्यासाठी या साहेबांना कुणी अधिकार दिले होते ?
यांच्या धाग्याने दिल्ली हलत होती की वॉशिंग्टन !!

पाहूयात पुढच्या १०० पोस्टींमधे.

@ बॉबी जासूस
मराठीत लिहीत जा प्लीज.

It will be the last thing I say ™look who's talking?" >> म्हणजे तुम्ही असं म्हणणार नाही आहात. हो ना ?
I hope everything is fine at your end... >>> हे कशाला जोडून आणखी ?
अर्थ काय या पोस्टचा ?

माणूस गेला तरी त्याच्या कार्याच्या रुपाने तो ह्या जगातच राहतो.

पुनर्जन्मास शुभेच्छा!
==============================================

वेबमास्टरांचे व प्रशासकांचे हार्दिक अभिनंदन!

Sad