Submitted by समीर चव्हाण on 16 July, 2014 - 00:47
हे पान हलेनासे का झाले आहे
हे गूढ कळेनासे का झाले आहे
फारा दिवसांनी रस्त्यावर हा आलो
संदर्भ मिळेनासे का झाले आहे
डोळ्यांत तुझ्याही इच्छा धूसर धूसर
काहीच दिसेनासे का झाले आहे
प्रेमात निखरले एके प्रतिमेचेपण
हे रंग विटेनासे का झाले आहे
हे वाट असे बघणे आशेवर कोण्या
हे पाय निघेनासे का झाले आहे
सांजेस विरागी पाचोळा होताना
आयुष्य ढळेनासे का झाले आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"हे वाट असे बघणे आशेवर
"हे वाट असे बघणे आशेवर कोण्या
हे पाय निघेनासे का झाले आहे" >>> हा सर्वात छान वाटला.
Pages