Submitted by समीर चव्हाण on 16 July, 2014 - 00:47
हे पान हलेनासे का झाले आहे
हे गूढ कळेनासे का झाले आहे
फारा दिवसांनी रस्त्यावर हा आलो
संदर्भ मिळेनासे का झाले आहे
डोळ्यांत तुझ्याही इच्छा धूसर धूसर
काहीच दिसेनासे का झाले आहे
प्रेमात निखरले एके प्रतिमेचेपण
हे रंग विटेनासे का झाले आहे
हे वाट असे बघणे आशेवर कोण्या
हे पाय निघेनासे का झाले आहे
सांजेस विरागी पाचोळा होताना
आयुष्य ढळेनासे का झाले आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्याला उपजत गणितीय बुद्धी
त्याला उपजत गणितीय बुद्धी असावी! त्यासाठी गणिताचे प्रोफेसर अग्निपंखवाल्याला नाही व्हावे लागत!
शायराच्या गझलेशी प्रतिसाद
शायराच्या गझलेशी प्रतिसाद संबंधीत असावा लागतो का?
हे नवीनच ऐकतोय मी!
फुटकळ/चिल्लर/अगझलीय/छचोर/चावडीखोर असाहित्यिक गप्पात्मक प्रतिसादच तर पहात आलो आहे मी फक्त आणि फक्त यथे! (या संकेतस्थळावर)<<<
त्याला उपजत गणितीय बुद्धी असावी! त्यासाठी गणिताचे प्रोफेसर अग्निपंखवाल्याला नाही व्हावे लागत!<<<
धन्यवाद हास्यात्मक टाळीबद्दल!
धन्यवाद हास्यात्मक टाळीबद्दल!
काय गणितीय तल्लखपणा काय उपजत
काय गणितीय तल्लखपणा काय उपजत गणितीय बुद्धी, कमाल आहे प्रोफेसरसाहेब तुमची.
गणित म्हणजे काय आकडेमोडे आहे का ?
गणित कशाशी खातात हे तरी माहिती आहे का असे विचारावेसे वाटत होते. पण राहून देऊ.
तुम्ही तुमच्या गझलांवरच्या प्रतिसादांचा राग इथे का काढत आहे, कळले नाही.
मला आठवत नाही की माझ्याकडून अगझल वा असंबध्द चर्चा कधीही आपल्या गझलेखाली झाली.
मी शक्यतो फार लिहीत नाही. तुम्ही चिडत गेलात म्हणून चिडवायला मजा येत गेली; इतकेच.
प्रतिसाद देणा-या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
हे रंग हे पाय अशी अनेकवचने
हे रंग हे पाय अशी अनेकवचने आली तिथे झाले आहेत असे हवे होते असे वाटले बाकी सर्व शेर खयाल शब्द सगळे काही खूपच छान आहे
गणित कशाशी खातात हे तरी
गणित कशाशी खातात हे तरी माहिती आहे का असे विचारावेसे वाटत होते.<<<<<<<<
नाही ना असे खाणे पिणे माहिती असते तर गणिताचा प्रोफेसर झालो असतो व गणितीय कवने करत बसलो असतो!
मला मोजायला चालायची ना ही खुजी पट्टी....
कुणाच्या बेरजेमध्ये, वजाबाकीत मी नाही!
प्राध्यापक साहेब "सटकले"त
प्राध्यापक साहेब "सटकले"त वाटते
नाही ना असे खाणे पिणे माहिती
नाही ना असे खाणे पिणे माहिती असते तर गणिताचा प्रोफेसर झालो असतो व गणितीय कवने करत बसलो असतो!
मी प्रोफेसर नाही हो, शिक्षक आहे.
गणितीय कवने ह्या प्रकाराबद्दल थोडी माहिती द्याल का ?
हे रंग हे पाय अशी अनेकवचने
हे रंग हे पाय अशी अनेकवचने आली तिथे झाले आहेत असे हवे होते असे वाटले बाकी सर्व शेर खयाल शब्द सगळे काही खूपच छान आहे <<<<< सहमत !
खयाल सगळेच लाजवाब !
जे शायर सटकतात ते काळाच्या
जे शायर सटकतात ते काळाच्या ओघात उरतात!
तात्कालिक प्रशंसेने/निंदेने शायराचे उरणे ठरत नसते!
जे शायर सटकतात ते काळाच्या
जे शायर सटकतात ते काळाच्या ओघात उरतात!
तात्कालिक प्रशंसेने/निंदेने शायराचे उरणे ठरत नसते!<<<<<<
अहो मी प्राध्यापकांबद्दल बोलत होतो शायर कुठे घुसडताय मध्ये ?
तुम्ही नक्की शायर म्हटल्यावर चिडणार की प्राध्यापक म्हटल्यावर ते आधी ठरवा पाहू !!
असो
समीरजींच्या शिक्षक असण्याची आपणास एवढी का ईर्ष्या ते न कळे !! (हे ही खरे आहे म्हणा की ते कानपूर आयाय्टीत शिकवतात कुठल्यातरी वाडियाबीडीयात नाही ह्याबाबत त्यांचा योग्य तो आदर करायला शिका आधी देवसर !! )
(No subject)
माझी उजवल प्राध्यापकीय हयात
माझी उजवल प्राध्यापकीय हयात चोखपणे संपली बाळा!(३७वर्षे) मला कशाला कुठल्या कानपूरवाल्याची ईर्षा वाटायला हवी
माझ्या घरात गणिताचे चार प्राध्यापक आहेत जे विेदेशात नामवंत विद्यापीठात शिकवतात! बहुतेक आम्ही भाऊ प्राध्यापकच आहोत नाइलाजाने नव्हे तर आवड म्हणून! व्रत म्हणून!
बहुतेक आम्ही भाऊ प्राध्यापकच
बहुतेक आम्ही भाऊ प्राध्यापकच आहोत नाइलाजाने नव्हे तर आवड म्हणून! व्रत म्हणून!<<<
वा वा छानच ! मग तुम्हीच कसे गझलकार निघालात बाकीचे का नाहीत ???
त्यांचे गुण तुझ्या डोक्यावरून
त्यांचे गुण तुझ्या डोक्यावरून जाणारे आहेत
त्यांचे गुण तुझ्या डोक्यावरून
त्यांचे गुण तुझ्या डोक्यावरून जाणारे आहेत<< मग नकोच राहूचदेत आपले !!
एक तुम्हाला झेलत आहोत हे काय कमी आहे ?
अरे वा तुला झेल पण घेता येतो?
अरे वा तुला झेल पण घेता येतो?
अहो प्रोफेसर आपला नक्की
अहो प्रोफेसर आपला नक्की मुद्दा काय आहे?
>> नाइलाजाने नव्हे तर आवड
>> नाइलाजाने नव्हे तर आवड म्हणून! व्रत म्हणून!
व्रत म्हणून केलंत तर सारखी जाहिरात का करता त्याची? खरंच जेन्युइन प्रश्न आहे.
शिवाय व्रत म्हणून प्राध्यापकी केली असाल किंवा हमाली - त्याचा गझल लिहिण्याशी काय संबंध?
आणि उज्ज्वल (उजवल नव्हे!) म्हणजे नक्की काय स्पेशल केलंत?
रक्त आटते जनतेचे, देश सुंदर
रक्त आटते जनतेचे, देश सुंदर घडवायला
एकटा रावण पुरेसा, राज्य धुळीत मिळवायला
हा शेर आठवला.
मुटे, तुम्हाला आठवलेला शेर
मुटे,
तुम्हाला आठवलेला शेर लयीत म्हणता येत नाही आहे, म्हणजे बहुधा तुमचाच असावा.
बाई,
>>>आणि उज्ज्वल (उजवल नव्हे!) म्हणजे नक्की काय स्पेशल केलंत?<<<
तुम्ही जाब विचारताय की शिकू पाहताय?
दोन्ही शक्य नाहीये त्यांच्या
दोन्ही शक्य नाहीये त्यांच्या बाबतीत. वैताग व्यक्त करते आहे फक्त.
करा करा
करा करा
धन्यवाद
धन्यवाद
प्रतिसादांसाठी सगळ्यांचे
प्रतिसादांसाठी सगळ्यांचे आभार
समीर
हे वाट असे बघणे आशेवर
हे वाट असे बघणे आशेवर कोण्या
हे पाय निघेनासे का झाले आहे>>>> वाह!वाह!
सांजेस विरागी पाचोळा होताना
आयुष्य ढळेनासे का झाले आहे>>> वाह!वाह!
धन्यवाद, नरेश. प्रोफेसरांनी
धन्यवाद, नरेश.
प्रोफेसरांनी धाग्याची वाताहत केली, असो.
त्यांची वाताहत कालच झाली समीर
त्यांची वाताहत कालच झाली समीर
छान गझल
छान गझल
मतला , संदर्भ , पाचोळा हे शेर
मतला , संदर्भ , पाचोळा हे शेर फार आवडले .
'फारा' हा शब्द कळला नाही .
मी 'फार' असा अर्थ लावत शेर वाचून पाहिला .
Pages