साळी/ धानाच्या लाह्यांची खिचडी

Submitted by मंजूताई on 15 July, 2014 - 01:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साळीच्या/धानाच्या लाह्या ४ वाट्या, बटाटा १ दाण्याचे कुट अर्धी वाटी, साजूक तूप एक चमचा, जिरे हिरवी मिर्ची, कोथिंबीर मीठ साखर ओला नारळ लिंबू

क्रमवार पाककृती: 

एका कढईत साबुदाणा खिचडी प्रमाणे फोडणी करुन त्यात चिरलेला बटाटा टाका व बटाटा खरपूस होईपर्यंत लाह्या एका रोळीत घेऊन धुवून निथळत ठेवा. बटाटा छान खरपूस झाला की लाह्या, मीठ साखर, दाण्याचे कुट टाकून चांगले परतून घ्या. झटपट पौष्टीक खिचडी ओला नारळ, कोथिंबीर व लिंबाने सजवून खा व खिलवा.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांचा हलका नाश्ता
अधिक टिपा: 

बटाटा कच्चा किंवा उकडलेला घेऊ किंवा बटाटा न घालताही करु शकता.

माहितीचा स्रोत: 
स्वःप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुशिलाच झाला की हा फक्त उपवासाच्या फोडणीचा. Happy
पण करुन बघण्यात येइल साळीच्या लाह्या कंपल्सरी खायला सांगितल्या आहेत. त्यामुळे नुसत चिवडा आणि दुधात नको होतात दरवेळी.
हा पदार्थ इंटरेस्टींग वाटतोय.

पदार्थ मस्त वाटतोय.साळीच्या/धानाच्या लाह्या कुठे मिळतील?