गेला पाऊस कुणीकडे...शोधूयात? चला...!

Submitted by विज्ञानदासू on 9 July, 2014 - 06:20

लगानच्या "काले मेघा काले मेघा पानी तो बरसा दो..." या गाण्याची प्रचिती सध्या सगळ्यांनाच येत आहे.पण इथे ढग काळे असण्याऐवजी सफेद रंगाचे जमा झाले आहेत.गेल्या वर्षी अशीच स्थिती होती आणि त्याच्याही गेल्यावेळी पाऊस जुलैपर्यंत फरपटत गेला.आता पावसाची तेही मान्सूनसारख्या,ही गत का झाली? कोणी म्हणाले जागतिक तापमान वाढ,कुणी म्हणते प्रदुषण,कुणी जंगलतोड आणखी बरेच काही.माबोवरपण चर्चा झाली,बाहेरही बघितले पण याविषयावर गुरुवर्य डॉ.माधव गाडगीळांचा लेखपण आला,तरीही लोकांना पाऊस रुसला असेच वाटले. त्यासाठी जुजबी माहीतीचा हा लेख इथल्या वाचकांसाठी.या पावसामागची खरी गोम कळण्यासाठी आपल्याला दोन महत्वाच्या ठिकाणी जावं लागणार आहे.त्यातलं पहिलं ठिकाण तुम्ही दक्षिण अमेरीकेच्या पेरु,चिले किनारपट्टीचा भाग निवडू शकता आणि दुसरा भाग विषुववृत्तीय प्रशांत महासागर.

तिथे जाण्याआधी नेहमीप्रमाणे थोडासा-गृहपाठ.आपण आधी भौगोलिक स्थान बघूयात.इंडोनेशियाचा वरचा भाग(जाकार्ता आसपासचा प्रदेश),दक्षिण ऑस्ट्रेलियाचा (डार्विन) किनारा,भारताचा दक्षिण-पूर्व किनारा आणि मध्य अमेरीकेचा खालील पश्चिम भाग् आणि द.अमेरीकेचा पश्चिम किनारा या दोन्ही च्या मध्ये जो प्रशांत महासागराचा भाग येईल त्याला म्हणतात विषुववृत्तीय प्रशान्त महासागर(Tropical Pacific).आपल्याला भारताच्या चेन्नईतून प्रवासाचा ओनामा करुन याच विषुववृत्तीय प्रशांतातून(वि.प्र.) मार्गक्रमणा करीत माचू-पिचू किंवा सायलेंट व्हॅलीला थोडी वर्ष राहून परत भारतात परतायचं आहे.

भारतात विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला गिल्बर्ट वॉकर नावाचा 'साहेब' केंब्रिज मधून गणितविद्या शिकून भारतात १९०२-०३ च्या दरम्यान खगोलनिरीक्षणासाठी आलेला.त्यांना भारतात मान्सूनमध्ये बदल दिसले तेव्हा ठराविक काळाने येणारी दुष्काळी स्थिती पाहून मागच्या-पुढच्या वर्षांच्या पावसाशी संबंधीत नोंदी ठेवायला त्यांनी चालू केले.तेव्हा त्यांना इंडोनेशियाच्या वरचा प्रशांतसागरी भाग आणि भारताबाजूला घुसलेला बंगालच्या सागरातला प्रशांतचा भाग यात काही ताळेबंद हालचालींचा प्रकार सापडला जो वार्‍याच्या आणि समुद्राच्या तापमानाशी जोडला गेला होता.यालाच नाव दिलं गेलं 'वॉकर जलाभिसरण.(वॉकर सर्क्यूलेशन). यातच एक अभ्यासनिरीक्षण म्हणजे जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनार्यावरती(व समुद्रभागात) जास्त दाबाचे पट्टे तयात होतात तेव्हा भारतात पाऊस नगण्य असतो.

पुढे हिंदी महासागर्,बंगालचा उपसागर आणि विष.प्रशांत यांचा अभ्यास रोलंड मॅडन आणि पॉल ज्युलियन या तर्कटशास्त्री द्वयीने केला,त्यावरुन ३०-६० दिवसांचा एक झोका सापडला.त्याला नाव पडलं मॅडन-ज्युलियन दोलन याच 'वॉकर भिसरणा'चा आणि ३०-६० दिवसांच्या 'मॅ-ज्यु' दोलनांचा एकत्रित परीणाम म्हणून एक मोठे दोलन झाले होते,तिच ही दोन भावंडं जी भारतात पाऊस पाडण्यासाठी आणि दुष्काळ आणण्यासाठी निर्माण झाली.त्यातला ख्रिस्ती गोंडस मुलगा म्हणजे 'अल-निनो' आणि मुलगी म्हणजे 'ला-नीना'.नावाच्या उगमाबद्दल आणि त्यांना लावण्याबद्दल जरा वादच आहेत्,जसे वडलांना एक नाव आवडते आणि आईला वेगळे तसेच.असा निनॉ म्ह्णजे 'ख्रिस्ती छोटा मुलगा' तर नीना म्हणजे 'मुलगी'.

जे वारे उत्तर-द्क्षिण गोलार्धातून विषुववृत्ताकडे वाहत असतात,तेच वारे पृथ्विच्या परीवलनामुळे उत्तर गोलार्धातून दक्षिणेकडे वाहातात.हे व्यापारी वारे.व्यापारी वार्‍यांना मध्येच विषु.प्रशांताला पार करावा लागतो.असे येत असता वाटेत त्यांना तप्त प्रशांत सागर भेटतो.पण...असा पण इथेही आडवा येतो बरं.इथे समुद्राचा वरचा थर(Open Surface) आणि खालचा थर(Sub-Surface) तयार होतात.खालचा थर थंड तर वरचा गरम होतो.ही सायकल सतत होऊन गरम प्रवाह वरचढ(Dominant) होतात.ही झाली पायाभूत माहिती.

ला नीनाचे नृत्य -
व्यापारी वारे,वातावरणीय तापमान आणि समुद्राचा वरचा थर एकमेकांना भिडला की या अल-निनो दख्खनी दोलनाला(ENSO) सुरुवात होते.आता आपण पेरुवियन फिल्डमध्ये पोहोचलो आहोत असे समजू.या समुद्रात थंड पाण्याचा प्रवाह असतो.हा थंड पाण्याचा प्रवाह द.अमेरीकेच्या भागाकडे वाढू लागतो.हळूहळू एवढा तीव्र होतो की उष्ण पाणी भारत्,डार्विन(ऑस्ट्रेलिया) आणि इंडोनेशीयाच्या बाजूला जमा होतं.अर्थातच,वारे उष्णतेकडे धावतात.व्यापारी वार्‍यांत सोबत बाष्प असतं.परीणामी पाऊस भारताकडे सरकतो आणि द.अमेरीका,मध्य अमेरीका थंडीनं गुरफटून जातात.आता अशा वेळी द.अमेरीका किनार्‍याचे पाणी थंडाव्यामुळे खनिज आणि जीवसंपत्तीला अनुकूल होते आणि मोठ्या प्रमाणात पौष्टीक अन्नघटक पाण्यात वाढीला लागतात.परीणाम,उत्कृष्ट आणि मुबलक मासळी पैदास होण्याला पोषक वातावरण तयार होते.तुम्हाला पौष्टीक,चविष्ट आणि वैविध्यपूर्ण सीफुड खायचं असेल तर या दिवसात पेरु,द.अमेरीकेला भेट द्यायलाच हवी.मासे,बाकीचे जलचर आणि शैवालांचे प्रकार वाढल्याने पक्ष्यांची संख्या वाढते आणि मासळी,इतर समुद्री खाद्य्,पक्ष्यांची विष्ठा,पर्यटन या सगळ्याची भर पेरू,चिली व तत्सम द.अमेरीकी अर्थव्यवस्थातेमध्ये पडते.ENSO च्या या फेजला नाव आहे 'ला नीना' फेज. (आकृती-पहा)
२००० सालचा ला नीना-
4.gif
नासाने जेसन नावाचे दोन उपग्रह आकाशात स्थिर केले आहेत.यांच्या कामांपैकी,एक काम आहे समुद्राची पाणी पातळी सतत मोजणे.जेव्हा पाणी उष्ण होते,त्या वरची हवा विरळ होते.अर्था अशा ठिकाणी हवेची पोकळी तयार होते.त्यावेळी नवी हवा ती जागा घेण्यासाठी जास्त दाबाकडून वाहात असते.जेव्हा उष्णतेने समुद्र भागावरची हवा विरळ होते,त्यावेळी तिथला जलभाग वर उचलला जातो,तर जिथे हवेचा दाब अधिक तिथला जलभाग खाली दबला जातो.जेसन उपग्रहांचं काम आहे की या वर खाली होणार्‍या पातळ्यांची उंची(अँप्लीट्यूड) मोजणे.जेव्हा उंची जास्त तो भाग तापलेला असतो.अर्थात उष्णतेकडे वारा वाहातो म्हणजे या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त.हा भाग इन्फ्रारेड मध्ये लाल रंगाने दाखवला जातो.तसाच जिथे कमी तापमान तिथे कमी पाऊस.म्हणजे जास्त हवेचा दाब्,त्या दाबमुळे समुद्राचा पृष्ठभाग खाली दबतो.जसे समजा आपण पाण्यात फुंकर मारली तर तिथला पाण्याचा भाग दबतो तर आजूबाजूचा वर उचलला जातो,तसेच.

वरील् आणि खाली दिलेल्या उपग्रह चित्रात निळा रंग कमी पाऊस वा थंड भाग दर्शवित आहे.तर लाल रंग उष्ण भाग वा जास्त पाऊस दर्शवित आहे.तर व्यापारी वारे वेगाने भारत आणि ऑस्ट्रेलियाकडे वाहातात.

वरच्या चित्रात उजव्या बाजूला मध्य अमेरीका आणी द.अमेरीकेचा पश्चिम किनारा आहे.तर डाव्या बाजूला भारत्,इंडोनेशीया.जर ला-नीना पाहीला तर निळा भाग उजव्या बाजूला आहे म्हणजे समुद्रातले थंड प्रवाह वाढलेले दिसतात.तर भारताच्या बाजूला लाल रंग म्हणजे उष्ण भाग दाखवला आहे.

एल निनोचे (छोट्या मुलाचे) बालीश हट्ट-
अशीच चार ते सहा वर्ष निघून जातात आणि द.म.अमेरीकेचे नागरीक अस्वस्थ होऊ लागतात.एखादा नको असणारा पाहुणा यावा आणि 'अतिथी तुम कब जाओगे' म्हणण्याची वेळ येणार असेल तर काय करतील बिचारे? तर समुद्रामध्ये गरम पाण्याचे प्रवाह वाढतात.जसे वर सांगितले ते दोन भाग समुद्राचा पृष्ठभाग आणि त्या खालचा प्रापनधर्माने ( Happy कन्वेक्शन) तापमान बदलतात.अगदी सौरजल तापकाप्रमाणे थंड पाणी गरम पाण्याची जागा घेत तापते तसेच.अशा रीतीने सर्व वि.प्र. तापून पाणी द.अमेरीकेकडे सरकू लागते.थंड पाण्यावर हे उष्ण पाणी वरचढ ठरते.वारा गरम भागाचा पाठलाग करतो या नियमाने,व्यापारी वारे द.अमेरीकेच्या किनार्‍यावर भयानक पाऊस वादळे देतात.सगळा समुद्र ढवळून निघतो.समुद्रसृष्टी,पक्षी प्राणी स्थलांतरीत होतात. आता आपण भारताकडे निघालेलो आहोत,अगदी जसे इतर जीव ती जागा सोडतात तसे आपणही चिली/पेरू देशांचा भरपूर आस्वाद घेऊन या एल नीनोपासून दूर निघालो आहोत.पण हाय रे..! तो भारतातही पाठ सोडेल तर हट्टी मुलगा कसला??आपण भारतात पोहोचतो आणि लक्ष्यात येतं याने 'पाऊसच नेलाय'! या बच्चमजींनी पाऊस तर नेलेला असतोच पण वणवे, युद्धं अशा भेटी पाठवून देतो.तर हा एल नीनो.(आकृती-पहा)

१९९७ चा सुपर एल नीनो
3.gif
इथे ला-नीनाच्या विरूद्ध स्थिती आहे.अगदी उलटे.पाऊस उजवीकडे म्हणजे द.अमेरीकेमध्ये जास्त तर डाव्या बाजूला नगण्या आहे.मोठ्या प्रमाणात पसरलेले दोन्ही रंग त्यात्या प्रकारची ताकद दर्शवितात.१९९७ ला आलेला हा सर्वात मोठा निनो होता.व्यापारी वारे वेगाने उत्तर अमेरीकेवरून येऊन द.अमेरीकेकडे वाहतायत.

भारतात एल नीनोवेळी का नसतो पाऊस?-
जेव्हा बाष्प युक्त नैऋत्य मान्सून वारे भारतीय भूप्रदेशाकडे वाहतात,त्यावेळी एक प्रवाह नैऋत्येकडून (अंदमान कडून) वाहतो तर दुसरा आग्नेयकडून(बंगालचा उपसागर) जातो.हा जो गोंडस मुलगा आहे(अल नीनो) तो काय करतो-एक तर वरचे(उत्तर अमेरीकेवरून ) बाष्पयुक्त व्यापारी वारे ओढून घेतोच पण इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलीयाच्या च्या भागात झालेले खुले वातावरण मान्सूनचे आग्नेय बाजूचे (बंगालच्या उपसागराकडचे) बाष्प आणि काही मूळ बाष्प ओढून घेते.त्यामूळे नैऋत्य मान्सून आग्नेय भागाकडे सरकतो.म्हणजे अंदमानवरुन येणारा नेहमीचा मान्सून बंगालच्या उपसागराकडून चीनला जातो आणि चीन मध्ये पूरस्थिती आणवतो.(आत्ता चीन मध्ये पूर आला होता/आहे)आता राहीले उरलेले नैऋत्य कोरडे/बाष्पाविनाच वारे वर तसेच आपल्याकडे वाहाते.जे आता वाहत आहे.

जेव्हा 'एल निनो' भारतात,ऑस्ट्रेलीयात दुष्काळ आणि वणव्यांची स्थिती वाढवतो,त्याचवेळी द.अमेरीकेला पाऊस आणि भरपूर समुद्रजीवांची रेलचेल करतो.तर छोटी मुलगी किंवा ला नीना येते तेव्हा भारतात भरपूर पाऊस(लाइक मुंबई २६ जुलै) आणि द.अमेरीकेला प्रचंड बोचरी थंडी देतात.हेच वारे पुढे वर अमेरीकेत पोहचून ख्रिसमस जाम बर्फमय करतात.

आता जेव्हा वरच्या मॅडन-ज्युलियन(माधव ज्युलियन वाचाल) दोलनामुळे जूनला ओढ लागते तर जुलै परत वारे वाहू लागतात.साधारण साठ दिवसाचे दोलन जुलै आणि ऑगस्टमध्ये बरा पाऊस देते.जर नीनो ताकादीचा नसेल तर आणि तरच! जर हे मॅ-ज्यॉ दोलन जागतीक तापमान वाढीमुळे वाढले तर नोव्हेंबरमध्ये पाऊस वाढतो.(सीझन एक्सटेंशन) गेल्या वर्षीची आणि त्या आधीची दिवाळी आपण पावसात साजरी केली होती,आठवत असेल.

एल् निनो मध्ये व्यापारी वार्‍यांचा वेग कमी होतो व त द.अमेरीकेकडे जास्त वाहतात.तेच ला नीनामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिअयाकडे वेगाने धावतात.

एल-नीनो आणि इतर परीस्थिती-
एल-नीनो मुळे बर्‍याचदा युद्ध परीस्थिती उद्भवते,हे खरे आहे. १९६५,१९७२ ची आपली भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान युद्धे याचीच साक्ष देतात.१९९७ च्या सुपर एल-नीनो नंतर १९९८ च्या डिसेंबरला कारगिलचे युद्ध उद्भवले.तसेच आत्ताचा एल नीनो हासुद्धा १९९७ ला तुलनात्मक सुपर एल नीनो मानला जाऊ लागलेला आहे.याचे परीणाम इराक जिहाद मध्ये आपल्याला दिसतात.आफ्रिकन देशांमध्ये झालेल्या प्रमुख दंगली,युद्धे हे सगळे एल-नीनो च्या प्रभावाखाली घडलेले दिसले आणि त्यानंतर शास्त्रज्ञांनी आणखी अभ्यास या दिशेने वळवला.मगाशी सहज डेटा बघत होतो.१९१४ साली एक एलनीनो आला आणि संपून १९१८ ला ला नीना सुरु झाली. १९३९ ला एक एल नीनो चालू झाला आणि १९४५ ला-नीना आली. आता तुम्हीच बघा याबाबत सनावळ्यांबाबत काही आठवतय का? Happy
हो!१९१४ ला पहिलं महायुद्ध सुरु होऊन ला-नीना आली त्यावेळेलाच ते संपलं.तसेच्,१९३९ च्या एल-निनो वेळी हिटलरने डाव साधला आणि १९४५ ला ला-नीना फेजनंतर दुसर्‍या महायुद्धाला पूर्णविराम मिळाला.

एल नीनो भारतासाठी आणखी दोन महत्वाच्या वर्षांची आठवण करुन देतो.तो म्हणजे १९६५-६६ आणि १९७२.आता पन्नाशीच्या पुढे असणारे याबाबत व्यवस्थित सांगू शकतील.त्या वर्षातले दुष्काळ महाप्रचंड होते.लाल भाकर्‍या खाव्या लागल्या,जनावरे,जनता आणि निसर्ग सगळ्यावरच मोठा प्रतिकूल परीणाम झाला.त्यात आपण याच परीस्थितीत युद्धस्थितीही भोगली.

पण गंम्मत पहा,तो लहान मुलगा दंगा घालतो तर 'मुलगी' मात्र पाऊस आणते. Happy
तर असा हा दोन गोंडस छोट्या बहीण-भावाचा खेळ सगळ्या जगाच्या मान्सूनला ताब्यात ठेवत असतो.तेव्हा पावसाला दोष देण्याऐवजी जर पाणी वाचवलत बरं होईल असंच सांगणं.निदान ती 'छोटी मुलगी' उगवेपर्यंत तरी!

खालील प्लेट्स बघा.
१)सध्याची परीस्थिती दर्शवणारा नकाशा.(el nino)
2 (2).jpg

तशी ही स्थिती महिन्यापूर्वीची आहे.लाल रंग जास्त पाऊस व उष्णता दाखवत आहे.निळा रंग कमी पाउस.

२)जुलै २००६ चा एल नीनो शेवट.भारतात मुंबईला झालेला पाऊस(लाल)दिसतो आहे.
5 (2).jpg

(लाल भाग=कमी दाब=जास्त प्रमाणात पाऊस=वाढलेली समुद्रपातळी,
निळा-जांभळा भाग्=जास्त दाब=कमी प्रमाणाचा पाऊस=खाली गेलेली समुद्रपातळी)
(समुद्रपातळीची उंची-फरक,मिमि मध्ये)
(आकृती संदर्भ-मुक्तस्रोत नासा हवामान विभाग,अमेरीका)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही वेल, यात अवैज्ञानिक असं काहीच नाही. पवनचक्क्या वार्‍याच्या उर्जेवर चालतात त्यामुळे त्या वार्‍याकडूनच उर्जा घेणार.

उर्जा काढून घेणे असे म्हणण्यापेक्षा वायू उर्जेचे प्रथम यांत्रिकी उर्जेत आणि नंतर विद्युत उर्जेत परिवर्तन होते असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल .

किरण,
नवीन महिने वाढवून काय होणार.हिवाळा कमी होत जाणार हे निश्चित.वरती एक सातार्‍यातला पावसाचा डेटा आहे.१९०५,१९२०,१९७० जवळपास्,आणि २००० चा पाऊस एकसारखाच म्हणजे कमीच आहे.ग्लोबल वार्मिंग तेव्हा कुठे होतं?

ग्लोबल वॉर्मिंगने हिमव्याप्त जमिनीला जास्त धोका आहे.ज्याने महासागराची पातळी वाढेल.वर आपण वाचले असेलच.पण पावसाचं प्रमाण,निदान बाष्पाचं तरी वाढेलच.

आता पाऊस कमी आहे,जूनच्या पेरण्या जुलै मध्ये कराव्यात असं सांगायचं असेल तर,कसं सांगणार?जूनमध्ये भरपूर पाऊस येणार आहे हे माहीती आहे,मग पेरण्या पुढे ढकला असं ही कसं आणि कुठल्या माध्यमातून सांगणार? बर ते ऐकून किती जण असं वागणार आहेत?परंपरागत जूनमध्येच पेरण्या करत आलो म्हणून मी जूनलाच टोकणार असंही करणारे लोक आहेत.बर तसे वाणही ठराविक हवामानात आणि महिन्यानुसार टिकतात.शेतीबद्दल किती उदासीनता आहे.ऊस लावून लोकं,टेकून बसतात.विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचं कारण सांगून मुलं शेती करायला नाकं मुरडतात.कितीतरी माणसं शेतीला,हवामानाच्या भरवसे सोडून नोकरी-व्यवसायाकडे वळतात.आता सध्या जरी शहरातल्या लोकांना झळ बसत नसली तरी उद्या आयात करायची वेळ आली की मग? त्याचं काय?

पाणी व्यवस्थित साठवून,आणि आहे त्याच पाण्याचे व्यव्स्थापन करुन शेती आणि इतर गोष्टी कराव्या लागणार आहेत.पाऊस नक्की केव्हा येणार हे जाणून घेण्याचं तंत्र आहे,पण ते वापरण्याऐवजी तुम्ही स्वावलंबी व्हा! त्याला यायचं तेव्हा येऊ दे.माझ्याकडे त्याला निदान पुढच्या काही महीन्यांसाठी पुरेल असे साठवून ठेवण्याची सोय आहे का? नसेल तर ती करण्यासाठी काय उपाय आहेत किंवा काय सोयी सुविधा मिळतात ते पहायला हवं.गंगाधर मुटेंचे काही लेख आहेत यावरती.

लीलावती बरोबर सांगितलत.ऊर्जा काढून घेणे यापेक्षा ऊर्जा रुपांतरीत होणे वापरा.वार्‍यातल्या ऊर्जेचा लॉस.आता शेतकरी स्वतःहून पुढे येतात्,पवनचक्क्या लावा म्हणून.

परत परत हा लेख वाचतोय मी आणि प्रतिक्रिया पण. Happy

उत्तर धृवावरील बर्फ वितळून समुद्राची पातळी अगोदरच वाढत आहे त्यात ह्या लोकांनी जर का ठरवून बर्फ आणून इकडे प्रशांत महासागरात ओतल तर बघायलाच नको. असही वाचायला मिळाला कि हे बर्फ वितळल्यामुळे पृथ्वीच्या पृष्टभागाचा तापमान अजून वाढेल. पांढरा रंग (बर्फ) सूर्यकिरण सर्वाधिक परावर्तीत करतो आणि काळा शोषून घेतो. तेव्हा जसजस हा शुभ्र बर्फ वितळतोय तसतस पृथ्वीची उष्णता (सूर्यकिरण) परावर्तीत करायची क्षमताहि कमी होत आहे. त्यामुळे पृष्टभागाचा तापमान वाढायला मदतच होत आहे.

अजुन एक मुद्द मला मान्डावासा वाटतो.

इतकी वर्ष आख्ख जग पर्यावरण ग्लोबल वार्मिंग वगैरे बद्दल बोलतय. रिओ-डी-जानेरो मध्ये त्याबद्दल अनेक बैठकी होतात. त्यात वाहन आणि उद्योगांमुळे जे प्रदूषण होत त्याबद्दल अक्षेप घेतले जातात. सर्वात जास्त प्रदूषण करणारा देश म्हणजे अमेरिका कारण सर्वाधिक वाहन त्याच लोकांकडे त्यामुळे कार्बन उत्सर्जन सर्वाधिक. त्याबद्दल काही करण्यास अगदी गेल्यावर्षी पर्यंत अमेरिका नाखूष होती पण गेल्या वर्षी जेव्हा हे लोक कमाल गारठले तेव्हा ह्यांना जाग आली. त्याची कारण आत्ता पुढे येत आहेत. तिथल्या हवामान तज्ञांनी सरकारला असे अंदाज दिले होते कि ग्लोबल वार्मिंग चा झाला तर अमेरिकेला फायदाच होईल. त्यांच्या अंदाजानुसार ग्लोबल वार्मिंग मुले उबदार / गरम वारे अमेरिकेत येतील आणि थंडी बर्याच अंशी कमी होईल. (ह्यासाठी त्यांनी बहुदा प्राचीन युरोप मधल्या हवामान बदलाचा आढावा घेतला. जेव्हा युरोप गोठला होता आणि नंतर उबदार झाला ) पण २००९ आणि २०१३ मध्ये ध्रुवीय वार्यांमुळे आलेली भीषण वादळ आणि पडलेल्या अभूतपूर्व थंडीमुळे त्यांचे हे सर्व अंदाज चुकीचे होते ते त्यांना आता लक्षात आलय आणि तापमान बदलाचा फटका संपूर्ण जगालाच बसणार आहे हे हि
ह्या दोन्ही मुद्द्यांबद्दल अजून काही लिहाल का ?

गारपीटीचा त्रास शेतकर्‍यांना नेहमीच होतो.त्यावरती काही प्रिकॉशनल्स अशू शकतील का?बर्‍याचा शेतीला पूर्ण आच्छादन घालणे हा एकच पर्याय शेतकरी काही ठिकाणी वापरताना दिसतो.एमआयटीतल्या एका टीमने मात्र एक प्रकल्प आराखडा तयार केला आहे.डॉपलर रडारचा वापर करुन गारा असणारे ढग शोधणे आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अशा ढगांपर्यंत पोहचून त्यावर सिडींग एजंट्स चा वापर करणे असा उपाय त्यांनी बाहेर आणला आहे.या प्रकल्पाची किंमत-खर्च इ. भार खूप मोठा आहे.त्याची संपूर्ण माहीती इथे मराठीतून मिळेल.प्रकल्प जरी वेळ्खाऊ,किचकट आणि अशाश्वत वाटत असला तरी शासनाला यात लक्ष्य घालायला वेळ मिळो हीच सदिच्छा!

http://www.epapergallery.com/Agrowon/4Jul2014/Normal/Pune/Page6.htm

@अमित,
चांगले मुद्दे.थोड्यावेळाने किंवा उद्या संध्याकाळीच लिहावं म्हणतोय..पण बर्फाच्छादित प्रदेश हे ध्रूवाकडे आहेत.म्हणजे सुर्यप्रकाश तिरपा पोहोचतो अशी जागा.अशा ठिकाणी,प्रकाश किरणे पोहोचू,परावर्तित होउन,तापमानात अशी किती वजावट करु शकतील,असे नाही का?पृथ्वी आईस एज कडे जाणार की तिचं वाळवंट होणार्,असे दोन फाटे आहेत.

या तुम्ही दिलेल्या मुद्यांवर आणखीन दोन मुद्दे आहेत,नंतर जोडतो. Happy
तोपर्यंत आईस एज येणार का आणि का,याचा विचार करा. Wink

Pages