लक्ष्मीबाई धुरंधर आणि उकडलेली अंडी - भाग २

Submitted by दिनेश. on 2 July, 2014 - 08:07

तर मी चक्क उकडलेली अंडी का इथे मांडलीत ? मी अंडी खात नाही.. ( त्याच्यामागे मोठा इतिहास आहे.
मी ५ वर्षांचा असताना माझे एका कोंबडीवर प्रेम बसले होते. पण तिची योजना ज्या कारणासाठी झाली
होती, त्याच कारणासाठी घरातच तिची कत्तल झाली.. मेल्यावरही तिच्या पोटात अंडे सापडले. त्या तिच्या
त्यागाने मी फारच इमोशनल झालो आणि त्यानंतर अंडेच काय, नॉन व्हेज खाणेही सोडले... मला माहीत
आहे माझ्या या प्रेमकहाणीला सर्व हसणार आहात.... दुनिया ऐसीही होती है... आवरा ! )

या पुस्तकाच्या काळात, जेवणामधे काहीतरी वेगळे करावे असे खानसाम्यांना वाटत असे. एका राज्याच्या
दरबारी खानसाम्याने ताटातील सर्व पदार्थ साखरेपासून केले होते. तर एकाने पिस्त्यांना डाळीसारखे कापून
त्याची डाळ व बदामांना तांदळासारखे कापून त्याचा पुलाव केला होता.
आणखी एकाने शिजवलेल्या भाताचा प्रत्येक दाणा अर्धा केशराच्या पाण्याने रंगवून मोत्या पोवळ्याचा पुलाव
केला होता.

ही परंपरा ओगलेआज्जींनी देखील पाळली. त्यांनी फसवे डिंकाचे लाडू ( कणीक व पोहे वापरून ) फसवे अळीवाचे
लाडू ( गाजराचा किस वापरून ) लिहिले आहेत.

या पुस्तकातही असे काही पदार्थ होते. कृत्रिम ऑमलेट आहे, ते उडदापासून बनवलेले होते. कृत्रिम कणंग
नावाचा एक पदार्थ होता. शिजलेल्या भातात साखर घालून ती जिरवायची. मग लाल चवळी, शिजवून
वाटायची. त्याची पारी करून आत साखरभात भरायचा. त्याला लांबट आकार द्यायचा. आणि ते वाफवायचे.

तशी हि अंडी देखील फसवी आहेत. ( माझे तिच्यावरचे प्रेम फारच सच्चे होते बरं ! )

याची कृती त्या पुस्तकातच आहे. कृत्रिम कवठें या नावाने.

अंडी फोडून त्यातला बलक काढून ती रिकामी करायची. मग पिठाच्या आधाराने उभी ठेवायची.
चायना ग्रास कापून दूधात शिजवायचे. त्यात साखर घालायची. मग ती अंडी त्या मिश्रणाने अर्धी भरायची.
मग माव्यात केशर घालून त्याचा गोळा करायचा. तो गोळाही त्या अंड्यात टाकायचा. मग परत चायना ग्रास
शिजवून त्यात टाकायचे. ते सेट झाले कि कवच फोडून आतले अंडे मोकळे करायचे, आणि उभे कापायचे.

हा पदार्थ करून बघायची मला फार ईच्छा होती पण माझे काही प्रॅक्टीकल प्रॉब्लेम्स होते. अंडी फोडल्यावर
माव्याचा गोळा घालण्यासाठी मोठे छिद्र करावे लागणार मग तेवढ्या भागाचा गोलाकार परत कसा आणायचा.
आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्या बलकाचे मी काय करू ?

परवा बाजारात किंडर जॉय चॉकलेट्स बघितली आणि माझे काम फारच सोपे झाले. फक्त द्रव ओतताना
तो थोडा थंड करून ओतावा लागला. ( एका चॉकलेट शेलची वाट लावली. )

तर अशा तर्‍हेने मी माझ्या पहिल्या प्रेमाशी एकनिष्ठ राहिलो.

जेवणावर राहून गेलेली स्वीट डीश... स्वीकार करावी.

माझ्या पाककलेतील दुसर्‍या गुरू लक्ष्मीबाई धुरंधरांना साष्टांग नमस्कार !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साष्टांग नमस्कार.....................
मस्त दिनेशदा..

हेडिंग वरुन कळेचना काय प्रकार आहे- पण वाचल्यावर थक्कच झाले. कस सुचत दिनेशदा तुम्हाला हे सगळ ? मला तर वाचुनहि जमेल अस वाटत नाही. आणि शाकाहारीला मांसाहारी --क्षमस्व -- अंडाहारी बनवुन खाण-- कल्पनाहि करु शकत नाही. तुमच्या कल्पना-शक्तीला मात्र दाद देते. अप्रतिम.

इदं ना मम.. असेच म्ह्णीन. कल्पना करा १९१० साली जिथे स्त्रीशिक्षणाचीच वानवा होती त्या काळात लक्ष्मीबाईंनी एवढी माहिती जमवली, ती लिहून काढली.. प्रकाशित केली.
त्यांच्या पदार्थांचे फोटो नाहीत या पुस्तकात पण त्यांनी हे सर्व पदार्थ नक्कीच करून बघितले असतील.

तसे तर ओगले आज्जीपण कलाकार होत्या. श्रीखंडापासून त्या छोट्या छोट्या बाहुल्या बनवत असत आणि लग्नाच्या पंगतीचा देखावा करत असत. ( रुचिरा मधे फोटो आहे त्याचा. वनिता समाजात त्यांचे प्रदर्शनही भरत असे. ) मंगला बर्वे आता ७५ त आहेत तरी उकडीचे मोदक स्वहस्ते बनवतात. आणि माझी आद्य गुरु, माझी आई
तर आज ८० व्या वर्षी पण हौसेने सर्व जेवण बनवते.. या सर्व जणींचे ऋण माझ्यावर आहेच. राहोच. फिटणार नाही.

०००००

मंजूडी, कसे करू ? विषय मधे तो पर्याय दिसत नाही.

______/|\______
दा कमाल आहे तुमची
या अंड्यांसाठी साष्टांगाशीवाय काहीही कमी म्हणजे ब्रम्हाचा अपमान. Happy

Sorry about English.pan mi just silent reader aslyane marathit type karayachi savay nahi. Ha lekh vachlavar Laxmibai Dhurandhar vishayi google karayacha prayatna kela ani eka blog var khalil mahiti milali.
Grahinimitra or Hazaar paakriya" is one of the oldest Marathi language cookbook that was written by Mrs. Laxmibai K. Dhurandhar. It has 485 pages of recipes, plus index pages which makes a total of 509 pages. The date of publication is listed as October 13, 1910. Published by Balwant Book Bhandar of Girgaum, Bombay.
My mother had the earlier version and she used it to cook for us. The one I have is the 16th edition printed in December of 1968 and the cost was Rs.10. My feeling is that the method of organization of the recipes is the order she wrote them sometimes by the type of vegetables or types of ladoos etc. However the index is very nice and useful. I used it as a new bride and still use it when I really want to find out or confirm the ingredients or the authenticity of some dishes.The measurements are in sher, chatak and sometimes in teaspoons and dessert spoons --not consistent. One can follow the recipes after gaining cooking experience. Not for a novice cook to learn how to cook as the author assumes a cook's savvy or insight in the kitchen which is absent as a novice. There are terms like use 2 bunches of onions (available in Crawford Market). So the author assumed you were living in Bombay(Mumbai) or had access to the famous market and doesn't specify what makes a bunch of onions. She also used terms like mirchi(chillies) worth 2 Annas(the currency used in that era).In a way she did not forecast for the current inflation !!! Anyway, I will not part with my copy. I love it and will always treasure it. The author was very advanced and learned for her time.

Pages