फणसाच्या गर्‍यांचे सांदण

Submitted by सुलेखा on 2 July, 2014 - 01:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नेहमी रसाचा फणस मिळतोच असे नाही.तसेच नुसते खाण्यासाठी गरे आणले जातात.या गर्‍यांपासून फणसाचे सांदण केले आहेंत.त्यासाठी तांदूळाचा रवा घरीच केला आहे.त्याची पद्धत अशी--एक वाटी सुवासीक तांदूळ पाण्याने धुवून एका कापडावर ५ मिनिटे पसरुन ठेवा.आता एका पॅन / कढई मधे एक चमचा--नेहमीचा चमचा
,टे.स्पून नाही- तूप गरम करुन त्यात हे तांदूळ घालुन मंद आचेवर परता.तांदूळ
फुलायला लागले कि गॅस बंद करा.तांदूळ परतताना लाल किंवा कडक करायचे
नाहीत.परतलेले तांदूळ कोंबट करा व मिक्सरमधे फिरवुन त्याचा रवा काढून
घ्या.पर्याय म्हणून इडली रवा/जाड रवा वापरता येईल .अर्थात याला तूपात
परतुन घ्यायचे आहे.
साहित्य :--
१ वाटी तांदूळाचा रवा,
८ मोठे गरे .
१ १/४ कप दूध.[रोजचा कप /मेझरिग कप नाही.]
१/२ वाटी साखर,
२ चमचे खोवलेले खोबरे,
चवीपुरते /पाव टी स्पून मीठ,
१ चमचा केशर वेलची सिरप,
१ सपाट चमचा इनो.

क्रमवार पाककृती: 

फणसाचे गरे सुरीने चिरुन घ्यावे.मिक्सरच्या भांडयामध्ये गरे, साखर व सव्वा कप दूधघालुन फिरवावे. फणसाच्या गर्‍यांचे बारीक तुकडे राहिले तरी चालेल.
आता तांदूळ रवा व हे मिश्रण,चवीपुरते मीठ. , ओले खोबरेआणि केसर सिरप हे
सर्व एकत्र करुन तासभर ठेवा.
तासाभराने मिश्रण ढवळुन पहा. ढोकळ्यासारखे सरभरीत दिसले पाहिजे.तांदूळ जुने असतील तर मिश्रण घट्ट दिसेल अशा वेळी आणखी थोडे दूध घाला.
गॅसवर प्रेशर पॅन पाणी घालुन गरम करायला ठेवा.
ढवळलेल्या मिश्रणात एक स्पाट चमचा इनो घालुन खूप छान फेटा.
आता कूकरच्या डब्याला/ढोकळा पात्र /.काठ असलेली थाळी /इडली पात्र्राला तूप/तेलाचा हात लावून त्यात तयार मिश्रण घाला.प्रेशर पॅन ला प्रेशर काढलेले झाकण लावुन मंद गॅसवर १५ मिनिटे वाफवा.
111.JPG
थंड झाले कि सुरीने वड्या कापा.गरम व थंड दोन्ही चवीला छान लागतात.
333.JPG

अधिक टिपा: 

फणसाच्या गर्‍याचे प्रमाण जास्त केले तरी चालेले.
गर्‍याच्या गोडीप्रमाणे साखर घालावी. वाफवण्याआधी मिश्रण खाऊन पहावे मिश्रण
छान गोड लागले पाहिजे.कारण तांदूळ रवा शिजल्यावर सांदणाची गोडी थोडी कमी
होते. त्याप्रमाणे आणखी पिठी साखर घालावी.
बासमती वा तत्सम सुवासिक तांदूळ वापरल्यास सांदणाची चव जास्त छान येते.
उपवासासाठी करताना वर्‍याचे तांदूळ /मोरधन/भगर वापरा.
फणसाऐवजी केळे,सफरचंद,स्ट्रॉबेरी वापरता येईल.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पा.कृ.
कुठलेही फळ न वापरता व पाण्याऐवजी नाररळाचे दुध वापुरुन मी सांदण करते. बाकी रेसिपी सारखीच.
पण इनो का घातलंय?