झटपट चिरोटे

Submitted by प्रभा on 1 July, 2014 - 13:12
zatpat chirote
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बेकरीत मिळते ती खारी २०० ग्रॅम , साखर २५० ग्रॅम, ,जायफळ- विलायची पावडर, केशर, तुप.

खारी २०० ग्रॅम, साखर २५० ग्रॅम, जायफळ - विलायची पावडर , केशर , तुप

क्रमवार पाककृती: 

प्रथम साखरेचा पक्का पाक बनवुन घ्यावा .त्यात जा - वि पावडर , केशर व २ - ३ चमचे तुप घालावे .
नंतर त्या पाकात १- १ खारी टाकावी. याप्रमाणे सर्व खारी पाकात टाकल्यावर हलक्या हाताने खाली-वर कराव्या. सगळ्या खारींना चांगला पाक लागायला हवा. १-२ मिनिटांनी गॅस बंद करावा. त्यानंतर एका ताटाला तुप लावुन घ्यावे. व त्यात १-१ खारी थोड्या- थोड्या अंतरावर काढुन ठेवावी. थंड झाल्यावर
डब्यात भरुन ठेवावी. तयार झटपट चिरोटे अगदी कुरकुरीत.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी.
अधिक टिपा: 

कुठल्याहि बेकरीत खारी मिळते. आमच्या येथे पालेकर बेकरीत मिळते. त्यामुळे नेहमीच केल्या जात. छान कुरकुरीत होतात.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG-20140630-00538.jpg
.

Sad नाही बा. चहात बुडवायची खारी अशी चिरोटा म्हणून खायची म्हणजे अगदी "दिल बोले हदिप्पा" होतंय माझ! चांगल लागत असेल पण तरी... Sad

मी एकदा करुन बघणार नक्की. चिरोट्यांसारखीच लागली तर "दिल बोले बुम बुम" Biggrin

पाकातल्या चिरोट्यांसाठी निदान पाक करुन खारी टाकायचीत. पिठीसाखरेच्या चिरोट्यांचं तर अगदीच सोप्पं. बेकरीतच पिठीसाखर घेऊन जायची. गरमागरम ट्रे काढला की त्यावर पिठीसाखर भुरभुरवायची. हाकानाका. असंही बटरचे दहिवडे करतातच की लोक.

प्रभाताई, आयडिया छान आहे Happy

ह्याला वाटल्यास 'नट-फ्री बकलावा' म्हणा. चिरोटा म्हणजे कसा राजबिंडा असतो.>>>> सिमन्तिनी किती वैतागलीयेस खारीला चिरोटा बनवल्याबद्दल Lol 'राजबिंडा चिरोटा' Rofl

पाकातल्या चिरोट्यांसाठी निदान पाक करुन खारी टाकायचीत. पिठीसाखरेच्या चिरोट्यांचं तर अगदीच सोप्पं. बेकरीतच पिठीसाखर घेऊन जायची. गरमागरम ट्रे काढला की त्यावर पिठीसाखर भुरभुरवायची. हाकानाका >> अगाइ ग.. मेले मी हसुन हसुन

"दिल बोले हदिप्पा", "दिल बोले बुम बुम" <<< Rofl
प्रभाताई, मला गोड काहीही आवडत त्यामूळे माझ्याकडून खपून जाईल हा पदार्थ. Happy

कल्पना छान आहे . पण नाही आवडली .
चहात खारी बुड्वून खाणार्या आणि साबांच्या ट्रेन्ड हाताखाली ,चिरोटे बनवण्याची प्रायमरी पास केलेल्या मला तर अजिबात नाही .

( रिक्शा फिरवणं रिक्शा फिरवणं काय म्हणतात ते हे च वाटत Wink )

चिरोट्यांना सुटणाऱ्या पापुद्र्यांतच खरी कला आहे. खारीचे चिरोटे म्हणजे कॉपी करून पहिला नंबर मिळवण्यासारख आहे. प्रयत्नांचे कष्ट नाहीत त्यामुळे यशाचा आनंद नाही. Happy

व्हाट इस चिरोटे??
ते नेमकं दिसतं कसं?

आपटे फुडस चे पाकातले चिरोटे फेमस आहेत अस वाचलय.

गुगल इमेज वर चिरोटे पाहिले.
कोल्हापुरात खाजा नावाचा एक प्रकार असतो.
साधारण तसं दिसतय प्रकरण.
फक्त शेप वेगळे.

लोडाचा चिरोटा असतो तो असाच दिसतो साधारण ! >>
साधारण तसं दिसतय प्रकरण.>> राहुल गांधी पण साधारण नेहरूच्यासारखा दिसतो.

धन्यवाद -- प्रतिक्रिया वाचुन मजा वाटली.चिरोटे करायला तसे अवघड्च, आजच्या धकाधकीच्या जिवनात एव्हडा वेळही नसतो . खाण्याची इच्छा तर असतेच. त्यामुळे चिरोट्यांना पर्याय म्हणुन म्हणा किंवा भुक लागल्या नंतर पटकन तोंडात टाकायला, ज्यांना गोड आवड्त अशांना घरात करुन ठेवलेत तर खुपच सोय होते. तळणाचा प्रश्न नाही.. आंबुस चव हवी असेल तर सॅट्रीक अ‍ॅसिडहि वापरु शकता. ''खारीची गोडी '' म्हणा हव तर. नाही का? करुन बघा. तुम्हाला नक्की आवडेल .

आयडिया छान आहे, फक्त पाककृतीचे नाव बदला. कारण चिरोटे म्हणजे चिरोटेच.

व्हॉट इज चिरोटे? >> गोड खाऱ्या. अधिक माहितीसाठी 'कळत नकळत' सिनेमात चिरोट्यांपायी अशोक सराफला जे नाचगाणे करावे लागले ते पहा म्हणजे मेहनतीची कल्पना येईल. Proud

अच्छा '' स्वीट खारी '' म्हणुया. किंवा कुणाला अजुन नवीन नांव सुचल्यास अवश्य कळवा.

पाकातल्या पुर्‍यांसारखी "पाकातली खारी">> पण कष्ट करायचेच तर चिरोटेच का करू नये? Happy (असं खारीप्रेमींना वाटणारच!)

आमच्याकडे खार्‍या चिरोट्यांची 'खारी बिस्किटं' म्हणून हेटाळणी होते.

Pages