नॅशनल हेराल्ड - सोगां, रागां जाणार जेलात!

Submitted by हतोडावाला on 28 June, 2014 - 08:52

स्वातंत्र्यपुर्व काळात नॅशनल हेराल्ड नावाचे वृत्तपत्र सुरु करुन स्वातंत्र्य चळवळ तेवत ठेवण्याचे काम या वृत्तपत्राकडे सोपविण्यात आले होते. याच गृपचे उर्दू वृत्तपत्र 'कौमी आवाज" या नावानी तर हिंदी वृत्तपत्र "नवजीवन" या नावानी निघत असत. त्या काळात नेहरू हे एक प्रमुख नेते असल्यामुळे त्यानाच या गृपचे अध्यक्ष करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर नेहरु पंतप्रधान झाल्यावर शासकीय मदत देऊन या गृपला प्रचंड मोठे केले. कवडीमोल भावात जमिनी व अत्यल्प दरात कर्ज अशी बरसात होऊ लागली व त्यामुळे हेराल्ड फुगत गेला. हा झाला इतिहास...

आता वर्तमान...

यंग इंडियन चा जन्म
स्पर्धेच्या युगात नॅशनल हेराल्डला तग धरता आले नाही व ९० करोडचे कर्ज डोक्यावर चढले. धंधा बसलेली कंपनी असल्यामुळे बाजारात पत शुन्य. कर्जाचे ओझे वाढत जाऊन एक दिवस कंपनी दिवाळखोरीत निघणार अशी परिस्थीती निर्माण होत गेली. अन याच काळात "यंग इंडियन" नावाच्या एका नव्या कंपनीचा जन्म होतो. राहूल गांधी व सोनिया गांधीनी एकत्र ५,००,०००/- रुपये पाच लाख भांडवल घालून ही कंपनी उभी केली. सोगा व रागा यांचे अनुक्रमे ३८% व ३८% तर ओस्कर फर्नांडिस १२% व मोतीलाल व्होरा १२% असे भाग भांडवलाचे प्रमाण ठरले.

एके दिवशी नवनिर्मीत कंपनी यंग इंडियाच्या डायरक्टर्सनी मिटींग बोलावली व असे ठरले की बिचा-या नॅशनल हेराल्डला मदत करायची. ९० करोडचे लोन यंग इंडियन्सने फेडायचे असा ठराव पास झाला व सगळ्यानी सह्या ठोकल्या. यात एक अट होती ती म्हणजे नॅशनल हेराल्डनी कर्जफेडीच्या बदल्यात आपले सगळे शेअर्स यंग इंडियन या कंपनीच्या नावे करुन द्यावे. अन यंग इंडियन्सचे श्री. मोतीलाल व्होरा यानी हा प्रस्ताव नॅशनल हेराल्डचे चेअरमन श्री. मोतीलाल व्होरा यांच्यापुढे मांडण्याचे ठरले. दोन्ही मोतीलाल व्होरा एकच व्यक्ती असले तरी श्री. मोतीलाल व्हारा यंग इंडियन मधून हा प्रस्ताव घेऊन हेराल्डला गेले. हेराल्डचे चेअरमन सेम असल्यामुळे त्यानी लगेच हा प्रस्ताव मान्यही केला.

दुस-या दिवशी सोनिया बाईनी काँग्रेसची मिटींग बोलावून असा ठराव पास करुन घेतला की बिचा-या नॅशनल हेराल्डनी स्वातंत्रय लढ्यात योगदान दिले होते व आज ती कंपनी अडचणीत असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या खात्यातून ९० कऱोडचे कर्ज नॅशनल हेराल्डला देण्यात यावे. ठराव लगेच संमत झाला नि पैसे नॅशनल हेराल्डला देण्यात आले.

पैसे दिल्यानंतर एक दोन दिवसात काँग्रेस पक्षाने अजुन एक मिटींग बोलावून असा ठराव पास करण्यात आला की नॅशनल हेराल्ड ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे काल दिलेली कर्जाऊ रक्कम बुडीत कर्ज म्हणून घोषीत करावे अन आपल्या बुक्स ओफ अकांऊंट्स मध्ये तशी नोंद करुन कायमचे रिटन ऑफ करावे. सोगांच्या आदेशा नंतर लगेच तसे करण्यात आले.

कथा संपली.... आता परिणाम.

१) नेशनल हेराल्डच्या शेअर्सचे मार्केट व्हॅल्यू रु. ५०००/- (पाच हजार कोटी होते)
२) दिल्लीत मोक्याच्या ठिकाणी ११ मजली ईमारत आहे.
३) अजुनही काही स्थावर नि इतर मालमत्ता आहे.
४) रागा भाऊनी लगेच ही इमारत ताब्यात घेऊन पासपोर्ट सेवा केंद्राला भाड्याने दिली.
५) महिना ६० लाख उत्पन्न निव्वड इमारतीच्या भाड्यातून यंग इंडियनला मिळू लागले.
६) यंग इंडिया ५ लाखा वरुन थेट ५००० कोटीची कंपनी बनली.
७) ९० करोडचे देणे काँग्रेस पक्षाच्या खात्यातून गेल्यामुळे यंग इंडियावर कोणताही ताण आला नाही.
८) या सगळ्या ठरांवांवर रागा व सोगा यांच्या सह्या आहेत.
९) डो. सुब्रम्हणीयम स्वामीनी नेमही प्रमाणे या वेळी सुद्धा थेट कोर्टात जाऊन तक्रार दिली आहे.
१०) आरोप सिद्ध झाल्यास २७ वर्षे शिक्षा होणार म्हणे...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख दोन वेळा कसा काय पडला.
कोणीतरी एडमिनला सांगा रे भाऊ एक उडवा म्हणा!

अन यंग इंडियन्सचे श्री. मोतीलाल व्होरा यानी हा प्रस्ताव नॅशनल हेराल्डचे चेअरमन श्री. मोतीलाल व्होरा यांच्यापुढे मांडण्याचे ठरले. दोन्ही मोतीलाल व्होरा एकच व्यक्ती असले तरी श्री. मोतीलाल व्हारा यंग इंडियन मधून हा प्रस्ताव घेऊन हेराल्डला गेले. हेराल्डचे चेअरमन सेम असल्यामुळे त्यानी लगेच हा प्रस्ताव मान्यही केला.
<<<

हे भारी आहे.

यात गुन्हा काय घडला? पक्षाने कम्पनॅअ‍ॅला पैस दॅनॅ ह गूनहा आहे का ?

कॉम्ग्रेसने मदत केल्यावर तिथे पासपोर्ट ऑफिस निघुन मोठे उत्पन्न चालु झाले, ही तर चांगलीच गोष्ट आहे की.

आता काँग्रेस पार्टीचे पैसे रागा सोगा , मोव्हो यांच्या खात्यात गेले यात सुस्वा च्या तीर्थरूपाचे काय गेले? हा पब्लिक मनी थोडाच आहे. ़ओंग्रेसचे सदश्य बघून घेतील ना त्यांच्या देणग्यांचे काय झाले ते !

काही शिक्षा होणार नाही.
थोडे दिवस भिजत घोंगडे पडणार आणि मग मोव्होला शिक्षा होईल थोडीफार.
काँग्रेसवाले म्हणतील हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे.

पण मूळात इतके अ‍ॅसेट्स असलेली कंपनी बुडित खात्यात होतीच का?

चला, म्हणजे काँग्रेस रागांच्या तिर्थरुपांची प्रायवेट लिमिटेड पार्टी आहे असं समजायला हरकत नाहि; उगाच काहि वेडे लोक तळागाळातील लोकांची वगैरे सांगुन दिशाभुल करत असतात... Happy

व्यापम वरून लक्ष जावे आणि या वर यावे म्हणून इतका खटाटोप व्हय..........
असो घोटाळा असेल तर नक्कीच शिक्षा व्हावी एक वचक म्हणून तरी थोडी जरब बसण्यासाठी तरी झालीच पाहीजे

बाकी व्यापम वर अळीमिळी का Wink

करा करमणूक। बाकी शुक्राचार्य ला काही काम देखील पाहीजेच

१, नॅशनल हेरॉल्ड आणि कॉग्रेस हे स्वातंत्रपुर्व काळात स्वातंत्र या गोष्टीसाठी लढत होते.

२. स्वातंत्र्यानंतर कॉग्रेसला राजकीय फायदा मिळाला , यात काही क्रेडिट हेराल्डलाही जाते.

३ . त्यामुळे हेराल्ड संकटात असताना कॉम्ग्रेसने मदत केली. प्रत्येकाने मात्रु पित्रु , गुरु आणि समाज अशी तीन ऋणे फेडायची असतात. असे महान हिंदु धर्म सांगतो. काँग्रेसने समाजऋण फेडले.

४, राहुलनी दुरद्रुष्टी दाखवुन स्थावर मालमत्तेचा वापर करुन कंपनी फायद्यात अणली.

पाच वर्शात मोदी देश बरबाद करेल तेंव्हा पुन्हा राहुलला संधी द्यायला हरकत नसावी नै का?

Proud

यात गुन्हा कुठे आहे?

सुस्वांनी काँग्रेसमधे प्रवेश केलाय का ? नमोंच्या भाषेत सांगायचं तर... पैसा मामा के घरसे आया है.

सुस्वांनी सर्वोच्च न्यायालयात इव्हीएम मशीन्स कशा प्रकारे हॅक केल्या जाऊ शकतात आणि मतदान झाल्यानंतर रिमोटच्या सहाय्याने कसे निकाल बदलले जाऊ शकतात याचं प्रात्यक्षिक दिलेलं आहे. त्या केसचं काय झालं ?

सर्वोच्च न्याया लयात प्रात्यक्षिकं दाखवली जातात आणि ओरिजिनल एव्हिडन्स घेतला जातो? बरं बरं असू द्या असूद्या.

छान

असू द्या तर असू द्या.
:प्रोफेसरांची झिम्मा खेळनारी भावली:

रागाला अमुल बेबी ,पप्पु म्हणत होतात, त्याने पाचलाखाचे पाचहजार कोटी केले. तुमच्या मोदीने दहा हजार कोटीचा चुराडा करुन देशाच्या हातात धूपाटणे दिले आहे ,महागाई वाढतच आहे.आता खरा पप्पू कोण? Proud .

अहो त्याना जेल मधे तर जाऊ द्या आधी.या भक्ताना फारच घाई बुवा. चीन आणि पाकिस्तानचे काय करणार ते तरी सांगा राव.

ज्यामनगर मधे सगले डिसिजन घ्यायचे तर दिल्लित चऊदा चऊदा तास कस्ल काम करतात ? गऊतमदादानि अ.सण्कल्प निट टाइप करूण दिला का ?

कायद्याने यात मला काही मोठा गुन्हा वाटत नाही. पण सोगा आणि रागा चा मनातिल खोट नक्कीच जाणवते.

कायद्याने मोठा गुन्हा का नाही.... रागा आणि सोगा यानी company act च्या section २५ खाली स्थापन केली आहे त्याम्धे जो काही फायदा होईल तो स्वतचा भल्यासाठी वापरु शकत नाही. त्यामुळे नॅशनल हेराल्डचे जे काही २००० कोटीचे मालमत्ता आहे तीचा फायादा आमच्या साठी नसुन तो लोकासाठी आहे असे सांगुन सुटु शकतात.
एकच छोटी चुक केली आही ती म्हणजे ह्या कंपनीचा पत्ता ७ रेसकोर्स रोड आहे जी सरकार्च्या मालकिची आहे. ह्या जागेवर सोगा आणि रागा हे उत्त्पन्न असलेली कंपनी काढु शकत नाही. ( त्याचा कंपनी ला पासपोर्ट कार्यालयाकडुन ९० लाख मिळ्तिल.) हा फौजदारी गुन्हा होत नाही २ ० वर्ष केस चालल्यावर थोडासा दंड करुन सोडण्यात येईल.

खोटः खर तर ह्या जागेची मालकी कोन्ग्रेस कडॅ असती तर तो अंतर्गत प्रश्न झाला असता. ही जागा जी कोग्रेस च्या मुखपत्राची आहे ती ४ लोकाना (ज्यात सोगा आणि रागा चा शेअर ७६% आहे) नाममात्र दरात विकली. आणि त्या चार लोकाकडे पैसे न्हवत म्हणुन कोन्ग्रेस ने ९० कोटीचे कर्ज दिले नंतर माफ केले. हे करण्यात कोग्रेस मुखपत्राचे चेअरमन श्री. मोतीलाल व्होरा , तेच ४ माणसाच्या कंपनीचे चेअरमन आणि सोगा कोग्रेस चे अध्यक्ष. कायद्यानी जरी हा गुन्हा नसला तरी कोग्रेस सारख्या पार्टी नैतिक द्रुष्ट्या जबाबदर आहे.

आता ह्या कंपनी चे ७६% शेअर सोगा आणी रागा कडे आहेत. ते जरी स्वता ह्याचा फायदा घेउ शकत नसले तरी , रॉबर्ट वढेराला मदतीची गरज आहे असे दाखऊन ह्या कंपनी चे उत्पन्न त्याना कायद्यानी दान करु शकतात.

आता जरी कोंग्रेस मधुन काढुन टाकले किवा राहुल मामाचा गावाला कायमचा रहायला गेला तरी ही संपती त्याचाच नावावर राहिल. थोडक्यात कोग्रेस ने आपले assets रागा आणि सोगा च्या नावावर करायला सुर्वात केली आहे. मोतिलाल व्होरा ( मुखपत्राचे चेअर मन) आणि ऑस्कर फणाडिस (कदाचित ह्याची कल्पना असेल ) ला ह्यात हातभार लावल्यामुळे त्याना छोटाशा हिस्सा देण्यात आला आहे.

अत्तापर्यन्त कॉग्रेस म्हणजे रागा आणी सोगा होती. अत्ता कॉग्रेस् चे १२५ वर्षात जमवलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता म्हनजे रागा आणि सोगा ची मालम्मत्ता असे झाले आहे.