२४ फेब्रुवारीक कोकन महोत्सवाचा उद्घाटन झाला.त्याचदिवशी मी गजालीकर आणि काही मायबोलीकरांका समस धाडलय '२६ फेब्रुवारीक माझो कोकण महोत्सवाक हजेरी लावच्हो बेत आसा,तुमका त्या दिवशी जमात काय येवक? म्हणुन'. शनीवर्कर मायबोलीकरांनी आधीच हात वर करुन जमणार नाय म्हणुन कळवल्यान. एका मायबोलीकरणीन तर माका काय कोकण महोत्सवात इन्टरेस्ट नाय म्हणुन रीप्लाय धाडलो. ( कसो होतलो अशानं कोकणचो कॅलिफोर्निया? ) हो नाय करता करता शेवटी मी आणि नीलुच रवलो आणि आम्ही दोघांच महोत्सवाक जावन ईलव.महोत्सवाक योगेश२४ भेटलो.
कोकण महोत्सवाची ही चित्रमय झलक.
देवीचा देउळ
दीपमाळ
बैलगाडी
महोत्सवाच्या दारातलो मावळो
दारातुन शिरल्यावर समोरच महाराष्ट्राचा आराध्यदैवत
ह्या नाचाच्या प्रकाराचा नाव जाणकार सांगशात काय?
कोळी नॄत्याची तयारी
खास मायबोलीसाठी दिलेली पोझ
कलाकार माय-लेक
दशावतारी कलाकार तयारच होते
दशावतार
कळसुत्री बाहुल्यांचो खेळ
पितामह भीष्मानं पण भाषण करुची संधी सोडूक नाय
क्षणभर विश्रांती
कोकणाताला एक घर
कोकणातल्या गावच्या घरातली चूल
अजुनही कंदीलच घरात
बांबूपासुन बनवलेल्या शोभेच्या वस्तु
फर्निचर
इंटिरीअर डेकोरेशनच्या नवीन कल्पना
कोकण म्हटल्यार मसाले व्हयेच
शुभ कार्याक नथ,कुडी आणि आबोलीचो गजरो व्हयोच
ग्रीटींगवरच्या गणपतीमुळे घरघरात पोचलेल्या अरुण दाभोळकरांची एक कलाकृती
अरुण दाभोळकर
बालगंधर्व
एका दालनात कोकणच्या प्रसिद्ध किल्ले,देवळांचे गोपाळ बोधे, उदय साळगावकर वगैरेंनी काढलेले फोटो होते तर दुसर्या दालनात कोकणच्याच काही प्रसिद्ध चित्रकारांची (संभाजी कदम, एम आर आचरेकर,सुजाता शिरवाडकर ) चित्र आणि शिल्पं (अजिंक्य चौलकर) होती.
ह्या कोकण महोत्सवात सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोकणचे खाद्यपदार्थ जसे मालवणी खाजा, खटखटे लाडू काय खय दिसूक नायत. प्रत्येक दालनात भर होतो तो फक्त रीअल ईस्टेट डेव्हलपरांच्या नवीन हाउसिंग प्रोजेक्टच्याच माहितीचो. त्यामुळे खरो कोकणी माणुस ह्या श्रीमंती झगमगाटात पार झाकूनच गेलो.
सही फोटू एकदम!
सही फोटू एकदम!
The exhibition intends giving
The exhibition intends giving opportunity to small businessmen from various fields like tourism, investment, Ayurved, Fruit processing, Agriculture, Plant Nurseries, various other industries हा हेतु ग्लोबल कोकण च्या वेबसाईट वरच आहे त्यामुळे रीअल ईस्टेट आणि पर्यटन स्टॉल्स नाव ठेवायचे कारण नसावे. त्यातही पाचेक वेगळी दालनं करुन त्यातल्या मुख्य्त्वे येका दालनात ( बहुतेक मनोज तोरोडकर दालन) रिअल इस्टेट आणि पर्यटनाचे स्टॉल्स होते.
Ayurved, Fruit processing, Agriculture, Plant Nurseries यांचे ही चांगले स्टॉल्स होते
मला खासं आवडलेली गोष्ट म्हणजे कोकणात ठाणे जिल्हा येतो हे बरेच जण विसरतात , इथे घोलवड, जव्हार, वसई इथेलए स्टॉल्स होते, वसई ची सुकेळी होती आणि कोकणरत्नांच्या फोटोत येक दोन का असेनात ठाणे जिल्ह्यातल्या रत्नांचे फोटो होते. वर कुणितरी उल्लेख केल्याप्रमाणे वाड्याच्या आदिवासी कलाकारांचा नाच ही होता (वाडा कोकणातच येतं)
तोषा मस्तच सफर घडवलीस
तोषा मस्तच सफर घडवलीस
आशुतोष... मित्राचो फोटो -
आशुतोष...
मित्राचो फोटो - अरुण दाभोलकरांचो - बघुन खूप बरां वाट्लां... आधी तेणि तुमका स्वतःचो फोटो काढुक दिल्यानी ह्यांच एक अप्रूप...
गोफ नृत्य:- हो प्रकार खूप पूर्वी पासून कोकणात आसा... पश्चिम महाराष्ट्रातसुन तो ईलेलो आसात, पण तेचो ऊल्लेख मात्र खंयच मिळणा नाय... माझे वडिल सांगत त्या संदर्भान सांगतंय, पूर्वी गावा-गावात शेतिची कामां आटोपली की, ग्राम दैवतांचे 'नाम्-सप्ताह' होयत, म्हणजे साधारण पणे श्रावण म्हयनो ते श्री गणपतीचां आगमन ह्या कालवधीत ह्ये नाम्-सप्ताह साजरे होयत. ग्रामदैवता समोर संपूर्ण रात्र जागवण्या साठी बर्याच ठिकाणि या प्रकारचे गोफ खेळले जायत. साधारण पणे ४ आणि त्या पटीत, हे गोफ खेळणारे खास लोकच ह्यो खेळ खेळत, आणि तेका साथ-संगत असायची ती गावकर्यांच्या भजनांची...
गावातलां एकादा बडां प्रस्थ गणपतीच्या दिवसांत आपल्या गणपती समोर देखिल अशा प्रकारचे खेळ आयोजीत करीत. काळाच्या ओघात ही कला मध्यंतरी नाहीशी होण्याची शक्यता निर्माण झालेली. पण सध्या मात्र नव्या दमाच्या खेळ्-गड्यांनी ही विस्मृतीत जाणारी कला पुनरुज्जीवीत केल्यानी... कोकणातल्या बर्याचश्या आडगावात आता तर गोफ खेळणारे संघ तयार झालेसत...
फोटो मस्त इलेत, पुण थंयसर
फोटो मस्त इलेत, पुण थंयसर थोड्यो वस्तू ग्लोबल कशो दिसतां माकां!
पणजीच्या म्यूझियममधे कोकणातील
पणजीच्या म्यूझियममधे कोकणातील पारंपारिक भांडी बरीच आहेत. त्याचे फोटो असतील माझ्याकडे.
तिथेच, त्रिपुरारी पोर्णिमेला गोफ नृत्य पण बघितले होते.
पाटावरची चूल मला पण खटकली होती. मग म्हंटलं प्रदर्शनीय वस्तू ती, अस्सल थोडिच.
Pages