मायबोलीकर मनीषला भेटण्यासाठी गटग

Submitted by चिनूक्स on 17 June, 2014 - 03:43
ठिकाण/पत्ता: 
मल्टिस्पाइस, एरंडवणे, पुणे.

तर, मायबोलीकर मनीष पुण्यास सुट्टीनिमित्त येत आहे.
त्याला भेटण्यासाठी गटग करण्याचे आयोजिले आहे.

तरी सर्वांनी अवश्य येण्याचे करावे. धन्यवाद. कृपया. धन्यवाद.

माहितीचा स्रोत: 
मीच.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 21, 2014 - 09:59 to 14:29
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतंय मनीष त्तुच एक प्रायव्हेट विमान करुन खिडकीत उभे राहुन मस्पा मस्पा मस्पा >> मपा एअरलाइन चालू करतो एक Wink

एवढे सगळे करण्यापेक्षा.. तुम्ही सगळेच अँटवर्प ला या... उसगाव आणि भारतातल्या सगळ्यांना मध्यवर्ती ठिकाण आहे. युरोपात कोणि असेल तर तेही येउ शकतील. शिवाय इथल्या प्रदूषित नद्यांचं पाणीही टेस्ट करता येइल Wink

Aisee kya baar hai Manish me..I am relatively new on Mayboli, hence asking . wadap che wimaan asel tar London hun ek pick up hoyeel ka ase pan vicharayache aahe

शिवाय इथल्या प्रदूषित नद्यांचं पाणीही टेस्ट करता येइल >> Lol

मनीषचे क्रोएशिया आज जिंकल्याने मनीष ओंजळीत हिरे घेऊन 'इन्हे माबोकरोंमे बाट दिया जाय' करेल सहज आज. की आता परतल्यामुळे मनीषचा संघ पुन्हा बेल्जियम आहे?

शबाना - नक्कीच. उसगावातून जाताना लंडनला हॉल्ट घ्यायला सांगू.

आगावा - जाऊ द्याना घरी आता वाजले की बारा कोणी म्ह्णू नये म्हणून एक मिनीट आधीच गटग संपणार.

त्यादिवशीची श्रद्धाची दैनंदिनी इम्याजिन करतोयः "सकाळी विश्वात्मावरच्या प्रतिक्रियांना उत्तरे. मग वरदासाठी स्पॉन्सर शोधला. तो न मिळाल्याने जड अंतःकरणाने बेल्जियम मधे हीरेखरेदी, व येताना जड पर्सने परत. बाकीचे लोक नदीचे प्रदूषण बघायला चालले होते. पण म्हंटले प्रदूषित नद्या बघायला बेल्जियमला कशाला जायला हवे. म्ह्णून इतरत्र फिरताना एक भाग ओळखीचा वाटला. मग लक्षात आले की तो यशराज च्या एका पिक्चर मधे लंडनचा भाग म्हणून दाखवला होता. मग मनीषच्या मस्पा फ्लाईटने नळस्टॉपलाच उतरवल्याने तेथून पायपीट. पर्सभर हीरे घेऊन नळस्टॉपपासून मस्पा पर्यंत कोणी आजपर्यंत गेले नसेल. उशीर झाल्याने बेल्जियम वाली चॉकोलेट्स हुकली. तेलयुक्त पालकभज्यांवर भागवावे लागले...."

Lol
जरा कन्फ्यूजन आहे. वर्दातैंना स्पॉन्सर न मिळाल्याने मीच त्यांच्यासाठी सुद्धा हिरे घ्यायचेत की काय? (वर्दा की तमन्ना है के हीरा उसे मिल जाये) बाकी 'हीरा है श्रद्धा के लिये' हे तर जाहिरातीतच म्हणून ठेवले आहे.

फारेंड, Lol
पर्सभर हीरे घेऊन घनघोर अंधारात नळस्टॉप ते घर अशी बिकट वाट दिवसभरात एक कणही (किंवा कणीसही) न खाता केवळ एक 'माता' च चालून जाऊ शकते म्हणून आज या ठिकाणी आम्ही तिला 'हिरकणी' किताब बहाल करत आहोत.

फारेंडा Lol

Aisee kya baar hai Manish me>>
उसके पास बेल्जीयम चाकलेट है. (और प्रदुषित पानीका गडु भी) Proud

ज्युमा, 'हिरकणी'.. Lol

प्रदूषित पाण्याचा गडू म्हणून कुणी घेणार नाही. अखेर हिम्मत करून जी व्यक्ती घेईल तिला साक्षात्कार होईल 'अरे यात कोन्याक होती'.. (युरोपीय प्रदेशात कोन्याक (जो शराब नही होती.. कालच चांदणी पाहिला!) पितात असे यशअंकल चोप्रा सांगून गेलेत.)

मनीषचे क्रोएशिया आज जिंकल्याने मनीष ओंजळीत हिरे घेऊन 'इन्हे माबोकरोंमे बाट दिया जाय' करेल सहज आज. की आता परतल्यामुळे मनीषचा संघ पुन्हा बेल्जियम आहे? >> माझा संघ पहिल्यापासूनच बेल्जियम आहे रे. क्रोएशियाचे लॉजिक लावलास तर रशिया स्पेन, ग्रीस आणि पोर्तुगाल सोडलास तर सगळेच युरोपियन संघ माझे होतिल Wink

मंडळी... संध्याकाळी ७:३० ला भेटू मस्पामधे..

भेटा आणि मज्जा करा. गडू, हिरे, बे. चॉ आणि इतर गोष्टींसकट सविस्तर पाल्हाळिक वृत्तांत येऊद्यात.

मनीष, ते व्हाया झुरिक ते मुंबई विमान 'जा जरा पूर्वेकडे' म्हणून किंचितसं वळवलं असतंस तर बरं झालं असतं की रे.. Wink

Pages