अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"कागज़ पे रख कर रोटियां खायें भी तो कैसे ?
खून से लथपथ आता है अखबार आज कल....."

आत्ताच वाचण्यात आलं. नेमकं.
कोणाचं आहे माहीत नाही.

मिर्ची,

तुमची हिंदू-मुस्लिम मतं मीही बदलण्याच्या भानगडीत पडत नाही. तुमच्या मतांचा आदर आहे. फक्त ती वस्तुस्थितीवर आधारित असावीत,एव्हढाच आग्रह धरेन. तुमचा इथला संदेश वाचला. वस्तुस्थितीशी पडताळून पाहतो.

१.
>> राजकारणी भोंदु धर्माच्या नावाने आपल्याला एकमेकांशी भांडायला लावतात आणि स्वतःची पोळी शेकून घेतात.

अगदी बरोबर. लोकमान्य टिळकांचं मत उद्धृत करतो :

>> हिंदुमुसलमानांचे अनेक ठिकाणी १८९३ मध्ये दंगे झाले. या संघर्षात हिंदू आणि मुसलमान असे दोनच पक्ष नसून
>> सरकार हा एक तिसरा पक्ष आहे, हे लक्षात घेतल्याशिवाय दंग्यांच्या कारणांची उपपत्ती लागणार नाही,
>> असे टिळकांचे मत होते.

यानुसार कोणात्या राज्यकर्त्याच्या कारकीर्दीत दंगली झाल्या ते पाहूया. गुजरातेत काँग्रेसच्या राज्यात ज्या भयंकर दंगली झाल्या, त्या मोदींनी अवघ्या ३ दिवसांत आटोक्यात आणल्या. मग मोदींसारखा राज्यकर्ता हवा ना दंगली रोखायला? इथे एक गुजराती मुस्लिम जाहीर कार्यक्रमात म्हणतोय की फक्त गुजरात २००२ च्या दंगलीतल्या गुन्हेगारांना शिक्षा झाल्या आहेत. स्वतंत्र भारतातील बाकी ४६००० (होय, सेहेचाळीस हज्जार) दंगलींतल्या दंगेखोरांना काहीही शिक्षा झालेली नाही.

महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर युतीच्या साडेचार वर्षांच्या कालावधीत एकही दंगल झाली नाही. एकंदरीत हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत आला तरच दंगलींना प्रतिबंध बसतो.

या पार्श्वभूमीवर विचार करू पाहता केजरीवाल यांना दंगली (जर झाल्याच तर) रोखता येतील का? त्यांनी केलेली इशरत जहांची भलामण आणि बाटला हाऊस चकमकीच्या चौकशीची मागणी यावरून मला तसा विश्वास वाटंत नाही.

२.
>> तर तात्पर्य असं की हिंदु-मुस्लिम ह्या विषयावरची माझी मतं ठाम आहेत आणि मला ती बदलवायची नाहीत.

तुमच्या मतांचा आदर आहेच! Happy मात्र तीच मतं हिंदूंनी स्वीकारावीत का यावर चर्चा करायला हरकत नसावी.

३.
>> राहिला प्रश्न केजरीवालांचा. ते हिंदु-मुस्लिम, जातपात, गरीब-श्रीमंत असल्या गोष्टींवरून कधीही, कोणातही
>> फूट पाडणार नाहीत ...

कर्रेक्ट. ते स्वत:हून कधीच फूट पाडणार नाहीत. पण दुर्दैवाने दंगली झाल्याच तर आटोक्यात आणू शकतील का? या बाबतीत मोदींचा अनुभव वादातीत आहे. सत्तेची सूत्रे हाती घेऊन अवघे ५० तासही झाले नसतांना मोदींनी ज्या तडफेने दंगली रोखल्या त्यावरून ते खमके आहेत हे दिसून येतं.

आ.न.,
-गा.पै.

>>एकंदरीत हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत आला तरच दंगलींना प्रतिबंध बसतो.

चोरांनाच जामदारखान्याच्या किल्ल्या देऊन टाकल्या तर चोर्‍या कमी होतात असे झाले हे.

बाकी मुद्द्यांना उत्तरे देणे विषयांतर होईल.

>>महेश, गापै यांचे कोणते मुद्दे अयोग्य वाटले नाहीत, व का, ते लिहा.
>>नुसतं अनुमोदन दिलं, की ते बरोबर आहेत असं लोकांना वाटतं. अ‍ॅक्चुअली गामा यांचे सर्वच मुद्दे विनोदी आहेत.

>>नुसतं अनुमोदन दिलं, की ते बरोबर आहेत असं लोकांना वाटतं. Lol
काय सांगता, लोक एवढे हे आहेत काय ? Wink

एवढे सगळे लिहित बसण्याएवढा वेळ नाहीये आत्ता, जमल्यास क्र. योग्य की अयोग्य असे देईन विकांताला. मग तुम्ही जोड्या जुळवून घ्या Happy

लखोबा लोखंडे यांचे विनोदी प्रतिसाद
गुजरात मधे 2002 ला काँग्रेस चे सरकार होते केंद्र मधे पण काँग्रेसचे सरकार होते हे आज कळले
Biggrin
दंगल घडवून सत्तेवर येणार्यांनां लाज नावाची चीज नसते हे सिध्द झाले
नागपूरी मुक्ताफळ

महेश ... विषय बदलायचा आणि असंबंधीत पोस्टी टाकुन धागा वाहता करायाचा हेच तर धंधे आहेत या लोकांचे...

महाराष्ट्राच्याच वाटेला हा सापत्नभाव का? आपने महाराष्ट्रातील निस्वार्थि (अ‍ॅक्टिव/नॉट सो अ‍ॅक्टिव) कार्यकर्त्यांचा तरी विचार करायला हवा होता. जाहिर निषेध...

असच आपल काहीतरी :-

Tushar Bhambare
'गरज राष्ट्रवादी'मुक्त' महाराष्ट्राची' रविवार लोकसत्तामध्ये 'तिरकी रेघ' या स्तंभात संजय पवारांनी लिहिलेल्या या लेखाची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत असतांना आणि चार दिवसात सुमारे पावणे दोनशे ऑनलाईन प्रतिक्रियांचा पाऊस पडल्यावर लोकसत्ताने आपल्या संकेतस्थळावरून हा लेख हटवला. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाबद्दल इतकं धारदार लिहिल्याचं आणि लोकसत्तानेही ते छापल्याचं कौतुक होत असतांना हा लेख हटवणे दुर्दैवीच म्हणव लागेल. पत्रकारितेत आपला एक मानदंड प्रस्थापित करणाऱ्या लोकसत्ताकडून हि अपेक्षा नव्हती.

हो लेख उडालाय... लोकसत्ता कडून खरंच ही अपेक्षा न्हवती. अतिशय सडेतोड तरीही संयत लेख होता तो. निषेध.!!!

८-१० दिवसांच्या सक्तीच्या राजकारण-माबोसंन्यासानंतर मी परत. (कोणी-कोणी कपाळावर हात मारून घेतला? :डोमा:)

गापै,
<<फक्त ती वस्तुस्थितीवर आधारित असावीत,एव्हढाच आग्रह धरेन.>>

तुमच्या प्रतिसादातून असं दिसतंय की वस्तुस्थितीची जी बाजू तुम्हाला माहीत आहे त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध बाजू मला माहीत आहे (ह्याच्याशी आपचा काही संबंध नाही)
काय चर्चा करणार?
शिवाय विकु म्हणतायत तसं ह्या मुद्द्यांना इथे उत्तर देणं विषयांतर होईल.

<<चार राज्यांतून माघार... लोकसभेच्य वेळी आकाशात उडत असलेलं विमान जमिनीवर आलं म्हणायचं !>>

आपचं सोडा हो स्पार्टाकस. येडी पार्टी आहे ती. पण देश जिंकलेली भाजपा राजधानीत निवडणूक का होऊ देईना तेवढं सांगा. देश जिंकूनही राजधानीतून माघार का?????? नेशन वॉण्टस टु नो...
(वाड्राचं उत्तर नाहीच दिलंत अजून.)

<<महाराष्ट्राच्याच वाटेला हा सापत्नभाव का? आपने महाराष्ट्रातील निस्वार्थि (अ‍ॅक्टिव/नॉट सो अ‍ॅक्टिव) कार्यकर्त्यांचा तरी विचार करायला हवा होता. जाहिर निषेध...>>

निवडणूक लढवणं एवढंच काम असतं का ओ भौ कार्यकर्त्यांचं? इथंच तर घोडं अडकलंय राजकारणाचं. निवडणूक नाही ना मग काम पण नाही. असले कार्यकर्ते आपमध्ये नसले तरी चालतील. वैम.

सुनटून्यांची गल्ली चुकलीये का?

कुमार विश्वास सध्या कॅनडा-अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. त्यांचे ट्वीटस -

हम लड़ेगें साथी हर उदास मौसम के ख़िलाफ़ !

@ArvindKejriwal Lv u as a friend n Respct u as a crusader.एक हठी तपस्वी साधनारत.Sorry m nt with u today.All th best.

@ArvindKejriwal तुम अकेले नहीं,हर उम्मीद भरी आँख का जागता सपना हो.परदेस से समंदर भर दुआएँ कि बेहतर दुनिया के लिए लड़ाई कामयाब हो.Lv u hero.

सकाळपासून वाचलेल्या मैत्रीदिनाच्या संदेशांपैकी सर्वोत्तम संदेश Happy

आज भाजपा नेत्यांच्या पोटात दुखणार Wink

>>निवडणूक लढवणं एवढंच काम असतं का ओ भौ कार्यकर्त्यांचं <<
अरे हो, विसरलोच. माबो, फेबुसारख्या सोशल साइटवर किल्ला लढ्वायचा अस्तो हे ध्यानातच नाहि आलं... Happy

राजभौ, सोशल मिडीयावर किल्ला लढवणारे आमच्यासारखे लोक आपचे कार्यकर्ते नाहीत, फक्त समर्थक आहेत आणि ह्याबद्दल खरंच वाईट वाटतं. देशात आले की मी पंधरा दिवसांपुरती का होईना कार्यकर्ती होणार.
कार्यकर्ते व्यवस्थित कामं करत आहेत.

दरम्यान, दिल्लीत निवडणूका घ्या आणि लोकांना हक्काचं सरकार मिळवून द्या ह्या मागणीसाठी आज जंतरमंतरवर आपची रॅली झाली. फक्त सोशल मिडियावरच नव्हे तर जमिनीवरही आप ला लोकांचं समर्थन आहे हे पाहून आज बाँग्रेसच्या नेत्यांच्या झोपा उडणार.

Kejriwal hasn't lost his touch: AAP's Jantar Mantar rally draws massive crowds

"Asked about AAP's performance in Parliamentary elections, Kaur said, "Lok Sabha elections are different from state elections. Look at what happened in Uttrakhand. BJP has lost all three seats in the by-election. The dynamics are changing," said Kaur."
सहमत.

अरविंद केजरीवाल दिल्लीऐवजी झारखंडमध्ये असते तर हा घोडेबाजार थांबवता आला असता - लालचंद, साइमन और फूलचंद्र कल शामिल होंगे भाजपा में

दिल्लीत हाच प्रकार होताना दिसला आणि घडायच्या आत थांबवला गेला. त्यामुळे बाँग्रेसी हात चोळत बसले आहेत.
कालच्या रॅलीचे 'आक्षेपार्ह' पोस्टर्स लावून जनतेची मालमत्ता विद्रुप केली म्हणून ३-४ दिवसांपूर्वी पोलिसांनी ४ स्वयंसेवकांना पकडलं होतं. शहरभर वेगवेगळ्या पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स कसे पसरलेले असतात हे सांगायची गरज नाही.
"चुनाव से क्यों भाग रही है भाजपा?"
असं लिहिलेले पोस्टर्स आक्षेपार्ह का वाटले पोलिसांना? दडपशाही. https://pbs.twimg.com/media/BtnKSsEIEAAq3Jo.jpg:large

आणखी काय तर राजकीय पोस्टर्स लावण्यासाठी रिक्षा आणि बसेसचा वापर करायचा नाही असं उपराज्यपालांनी सांगितलंय.
एकीकडून 'आता रिक्षावाले आपला समर्थन देत नाहीत' असंही म्हणायचं आणि वरून असले आदेश काढायचे. त्यांनाही माहीत आहे की रिक्षावाले आता जास्त ताकदीने आपला समर्थन देत आहेत. म्हणून दडपशाही.
Political ads not allowed on autos, govt tells HC

कालच्या रॅलीचे फोटो -
http://t.co/07dtwI6XmU
http://t.co/P6ECRj47Co

"3 अगस्त को दिन में तीन बजे मुझे जंतर मंतर पहुंचना ही था, सो पहुंचा. इसलिए नहीं कि मैं इस पार्टी का कोई नेता हूं, कोई कार्यकर्ता हूं या कोई पद पाने या कोई इलेक्शन लड़ने का आकांक्षी हूं. सिर्फ इसलिए कि इस देश को कांग्रेस और भाजपा का विकल्प मिलना चाहिए. कम्युनिस्टों ने गल्तियां करके खुद को तो नष्ट किया ही, कांग्रेस-भाजपा के विकल्प के स्पेस को भी नष्ट किया. ऐसे में आम आदमी पार्टी का उदय बड़ी परिघटना है. छोटे स्तर पर ही सही, दिल्ली जैसे छोटे राज्य में ही सही, आम आदमी पार्टी का फिर से खड़े होना और छा जाना बड़ी बात है. यह 3 अगस्त की 3 बजे वाली रैली ने साबित किया. मैं जब जंतर मंतर पहुंचा तो अरविंद केजरीवाल को साक्षात देखने की खातिर मुख्य मंच की ओर बढ़ने लगा तो भीड़ के किनारे किनारे चलता रहा चलता रहा चलता रहा, रास्ता खत्म ही ना हो." http://bhadas4media.com/state/up/897-kejr-jantar-mantar.html

"चुनाव से क्यों भाग रही है भाजपा?"
<<
<<
दिल्लीच्या लोकांनी विश्वासांनी हातात दिलेली सत्ता, सोडुन जे 'आआप' वाले फक्त ४९ दिवसात पळून गेले, तेच आआप वाले लोक "चुनाव से क्यों भाग रही है भाजपा?" असे विचारतायत?

दिल्लीच्या लोकांनी विश्वासांनी हातात दिलेली सत्ता, सोडुन जे 'आआप' वाले फक्त ४९ दिवसात पळून गेले, तेच आआप वाले लोक "चुनाव से क्यों भाग रही है भाजपा?" असे विचारतायत?>>>>

आंग्रे प्रतिप्रश्न करायचं सोडून भाजपाने फेर निवडणूका लवकर जाहिर केल्या तर त्यांच्यासाठी ते फायद्याचं ठरेल. दिल्लीतला कमी झालेला आपचा सपोर्ट परत वाढायला लागलाय. फक्त आपवालेच नाही सर्वसामान्य जनता पण विचारात पडलिये की दिल्लीत सरकार कधी बनेल? निवडणूका होणार की नाही?

अल्पना, +१
<<दिल्लीतला कमी झालेला आपचा सपोर्ट परत वाढायला लागलाय. >>
एवढं वाक्य सोडून.

>>दिल्लीच्या लोकांनी विश्वासांनी हातात दिलेली सत्ता, सोडुन जे 'आआप' वाले फक्त ४९ दिवसात पळून गेले, तेच >>आआप वाले लोक "चुनाव से क्यों भाग रही है भाजपा?" असे विचारतायत? +१०१

>>नाही समजावून सांगू शकणार तुम्हाला ___/\__ +१०१

मिर्ची ताई
<<कम्युनिस्टों ने गल्तियां करके खुद को तो नष्ट किया ही, कांग्रेस-भाजपा के विकल्प के स्पेस को भी नष्ट किया. ऐसे में आम आदमी पार्टी का उदय बड़ी परिघटना है>>

आआप कम्युनिस्टां चा विकल्प आहे का?

असे असेल तर खरच ख़ठीण आहे देशाचे. या वेळी काय फ़ुकट वाटणार?

कालच्या रॅलीत केजरीवाल यांनी ठणकावुन सांगीतले की,
जर निवडणुका येत्या महीन्यात घेतल्यातर आआप ला ४०, नोव्हेंबर मध्ये ५० आणि फेब्रुवारी मध्ये ५५ , जागा मिळतील, त्यामुळे बिजेपी घाबरलेली आहे,

जर केजरीवालना ईतका आत्मविश्वास असेल तर त्यांनी पुढच्या मे मध्येच निवडणुका घेण्याबद्दल आग्रह धरला पाहीजे, कारण तेंव्हा आआप ला ७० पैकी ७० जागा मिळू शकतील !!

:G:-G:खोखो:

:G:-G:खोखो:

http://indiatoday.intoday.in/story/aap-jantar-mantar-rally-arvind-kejriw...

आधीच्या निवडणुकीच्या वेळी माझे जे मत होते, तेच आत्ता पण आहे.
होऊन जाऊ द्या (असे म्हणले की पुर्वीचे लावणीपट आठवतात) निवडणुका,
आणि येऊ द्या सत्तेत आआपला. असे काही अगदीच जरूरी नाही की भाजपच आले पाहिजे.
जेणेकरून जनतेची कामे चालू राहतील, मार्गी लागतील, समस्या कमी होतील हे झाले पाहिजे.
बाकी भ्रष्टाचाराबद्दल माझे फारसे काही आग्रही मत नाही,

त्याचे कारण आआपचा जो दावा आहे तो मला अगदी हास्यास्पद वाटतो, लोकपाल, बिकपाल, इ.
तसा तो कोणीही आव आणुन केला तरी भारतात तो कायमच हास्यास्पदच असणार आहे.
हे असले प्रयत्न म्हणजे काविळीने पिवळ्या पडलेल्या माणसाला रंग लावून तो चांगला झाला आहे असे दाखविण्यासारखे आहे.

मुळात जालिम उपाय करायला कोणीच तयार नाही, माहित असुनही धजावणार नाहीत. ना कॉन्ग्रेस, ना भाजप, ना आआप.
जालिम उपाय = लोकांनाच सारखे सारखे ठणकावून सांगितले पाहिजे, सोशल मेडियामधुन सगळीकडून हॅमर करत राहिले पाहिजे, की भ्रष्टाचार हा काही फक्त सत्तास्थानांमधेच असतो असे नाही. तर तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्यात सर्वत्र व्यापलेला आहे, तो सर्वांनी मिळून ठरवून निपटून काढला तरच वरच्या पातळीवरचा कमी होईल.
पण लोकांना हे कडू डोस पाजण्याचे काम करणार कोण ? जो कोणी करेल त्याला सत्ता मिळणार नाही.
मग काय आम्ही चांगले आणि ते वाईट असे चालूच राहणार कायम सत्ता मिळविण्यासाठी.
आणि यामधे आआप देखील वेगळी नाही असे मला तरी वाटते.

<<आआप कम्युनिस्टां चा विकल्प आहे का?>>

असं कोण आणि कुठे म्हटलं युरो?

<<या वेळी काय फ़ुकट वाटणार?>>

२५०० किलो चंदन नक्कीच नाही वाटणार Wink

<<जर केजरीवालना ईतका आत्मविश्वास असेल तर त्यांनी पुढच्या मे मध्येच निवडणुका घेण्याबद्दल आग्रह धरला पाहीजे, कारण तेंव्हा आआप ला ७० पैकी ७० जागा मिळू शकतील !! >>

विवं/शेनं,
आपचं सोडा हो. भाजपा निवडणूका का घेत नाहीये ह्याचं उत्तर द्या की.
केजरीवाल लोकांमध्ये फिरतात, पुढच्या मेपर्यंत 'अच्छे दिन' मुळे लोकांचे काय हाल होतील ह्याची त्यांना जाणीव असावी.

आआप कम्युनिस्टां चा विकल्प आहे का?

असं कोण आणि कुठे म्हटलं युरो?

मग या वक्याचा अर्थ तरी सांगा
<<कम्युनिस्टों ने गल्तियां करके खुद को तो नष्ट किया ही, कांग्रेस-भाजपा के विकल्प के स्पेस को भी नष्ट किया. ऐसे में आम आदमी पार्टी का उदय बड़ी परिघटना है>>

२५०० टन चंदन? अगदी २५०० मेगावॉट सारख म्हणत आहात.

<<जालिम उपाय = लोकांनाच सारखे सारखे ठणकावून सांगितले पाहिजे, सोशल मेडियामधुन सगळीकडून हॅमर करत राहिले पाहिजे, की भ्रष्टाचार हा काही फक्त सत्तास्थानांमधेच असतो असे नाही. तर तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्यात सर्वत्र व्यापलेला आहे, तो सर्वांनी मिळून ठरवून निपटून काढला तरच वरच्या पातळीवरचा कमी होईल.>>

असहमत.
तुम्ही हरसिमरत कौर सारखं बोलताय. त्या सुद्धा असंच म्हणाल्या होत्या -"आप हमारें ही पीछे क्यों पडे हो? जरा लोगों में जाओ ना, उन्हें भी तो ये ग्यान दो ना" Uhoh
माझ्या माहितीत केजरीवाल पहिले राजकीय नेते असतील ज्यांनी मुख्यमंत्री शपथविधीच्या वेळी खचाखच भरलेल्या मैदानावरच्या लोकांना शपथ घ्यायला लावली होती "आज से ना हम रिश्वत लेंगे, ना रिश्वत देंगे"
(आता कोणीतरी म्हणेलच-शपथ घ्यायला लावून काय होणार?)

वरून होणारा भ्रष्टाचार आटोक्यात आल्याशिवाय छोट्या पातळीवरचा म्हणजे सामान्य जनतेकडून होणारा भ्रष्टाचार आटोक्यात येणार नाही !

हरसिमरत बादल बोलल्या होत्या तो व्हिडिओ शोधताना कोणीतरी (माझ्यासारख्या) अतिउत्साही प्राण्याने बनवलेला हा व्हिडिओ सापडला. महेश, तुमच्या प्रश्नांचं उत्तर मोठ्या बच्चनकाकांनी दिलंय त्यात.
हरसिमरतची बोलण्याची पद्धत, देहबोली सगळं बघून भयंकर राग आला होता तेव्हा. म्हणजे हे लोक हजारो करोडोंचा घोटाळा करणार, पण आपण काही बोलायचं नाही. आणि एखादा साधा माणूस पाचशे-हजाराची लाच घेताना पकडला गेला तर त्याला तुरुंगात टाकायचं ? किंवा मग १० पैसे तिकीट असताना १५ पैसे घेतले म्हणून बसवाहकाला नोकरीवरून काढून टाकायचं ? खोटं वाटतंय? हे वाचा - A departmental inquiry was conducted and the verdict delivered. Singh was found guilty of causing a loss of 5 paise to the public exchequer and his summary dismissal from service was ordered in 1976 on the grounds that he was a repeat offender.
आहे की नै गंंमत ?

युरो,
कम्युनिस्टांनी तिसरा विकल्प बनण्याची संधी घालवली. आता आप तिसरा विकल्प बनत आहे. म्हणजे आप कम्युनिस्ट आहे असा अर्थ का घेताय?
आप नेहमीच सांगत आलंय की आम्ही कुठलाच 'इझ्म' पाळण्यात अर्थ नाही. सामान्य लोकांच्या प्रश्नांची लॉजिकल उत्तरे जिथून मिळतील तिथून ती घ्यायची हे आमचं काम.
२५०० किलो लाकडांचा संदर्भ हा होता.

Pages