मायबोलीवरच्या स्मरणीय कथा

Submitted by निशा राकेश गायकवाड on 6 June, 2014 - 06:23

प्रिय मायबोलीकर

मायबोलीवर तुम्हाला मनापासून आवडलेल्या आणि लक्षात राहिलेल्या कथेंची नावे इथे लिहा बघुयात कुणाची कथा जास्त वेळा रिपीट होतेय. टाका मग पटापट नाव ....

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२१२८४ ही लिंक आधी दिली गेलेली आहे. क्लिक करून पाहीलं. ६० च्या दशकात रमलेले रसिक पुणेकर असं काहीसं वाटलं.

ते वर्तुळ अजुन अर्धवर्तुळ आहे. Happy लेखक - विशाल कुलकर्णी.

बाकी आवडत्या कथांमध्ये बेफिकीर यांच्या अनेक कथा-कादंबर्‍या, धुंद रवींच्या विनोदी कथा, डॉक्टर सुरेश शिंदेच्या वैद्द्यकिय निदानचातुर्यकथा आहेतच. वरील प्रतिसादामध्ये उल्लेखिलेल्या अनेक लेखक व लेखिकांच्या लिखाणाचे वाचन केलेले नाही, आता मात्र त्याचे वाचन करावेच लागेल.

डॉ. सुरेश शिंदे यांचे सगळे लेख....
बर्याच दिवसात्/महिन्यात त्यांचा एक हि लेख नाहि वाचायला मिळाले.ते का इथे येत नाहियेत हे कोणाला व कुठे विचारावे कळत नव्हते...कोणि सांगु शकेल का इथेच

हा धागा उघडल्या बद्दल आभार

बेफी, विशाल, कचा, नंदिनी यांच्या कथा.
दाद ऑल टाइम फेव्हरेट Happy
रवी, चिमण यांच्या विनोदी कथा.

http://www.maayboli.com/node/24945 "ती संध्याकाळ अन निसर्गाशी तादात्म्य पावलेली माझ्या जिव्हाळ्याची माणसं-" रेव्यु.