Submitted by सूनटून्या on 4 June, 2014 - 07:39
मायबोलीवरील वैयक्तिक शेरेबाजीचा निषेध म्हणून मजकूर delete केला आहे, क्षमस्व!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वरील वृत्तपत्रात त्याच दिवशी
वरील वृत्तपत्रात त्याच दिवशी माबोकर आनंदयात्री यांचाही केंजळगडावरचा लेख आला होता.
थरारक.. तूम्ही लोक या
थरारक.. तूम्ही लोक या प्रयत्नांचे चलतचित्रण का करत नाही ? आता हाताळण्यास सोपे असे कॅमेरे आहेत.
आणि आमच्यासारख्या अनेक जणांना यातला थरार जवळून बघता येईल.
हा लेखही मस्तच! काय सरळ्सोट
हा लेखही मस्तच! काय सरळ्सोट कडा आहे. फोटोजही मस्त आलेत.
जबराट आहे रे...मस्त...तो
जबराट आहे रे...मस्त...तो सरळसोट कडा बघुन काटा आला अंगावर
दिनेश. आम्ही सगळ चलत चित्रण
दिनेश.
आम्ही सगळ चलत चित्रण नेहमीच करतो. फक्त वेळेचा प्रश्न आहे. खर म्हनाव तर कार्यक्रमालाच वेळ देताना आमच्या नाकी नऊ येतात, तेंव्हा या इतर गोष्टींसाठी खरोखर वेळ देत येत नाही. सगळ एकदम raw आहे, ते एडीट करून final कराव लागेल. तुकारामांचा अभंग आहे न ''जसे आहे तसेच राहावे'' असाच काहीस, अगदी त्याच वृत्तीची माणस आहेत हो. :-). प्रसिद्धी नको आहे हो.
मलाच खाज असल्यामुळे मी इथे लिहितोय :-). नाहीतर तुम्हीच विचार करा, २-२ वर्षांपूर्वीचे लेख आता का लिहितोय.
कैच्याकै धाडशी आहात तुम्ही
कैच्याकै धाडशी आहात तुम्ही लोक. किती सरळसोट चढाई आहे! पहिल्या चढणार्या मुलाचं धाडस आणि रिस्क घेण्याची तयारी अफाटच. वर चढताना मधेच खाली बघितलं गेलं तर? की तुम्हाला असं सरळसोट कातळाच्या मध्येच उभं राहून खाली बघायची भितीच वाटत नाही? घोरपडीसारखे कसे काय उभ्या कातळाला चिकटता?
_/\_
एकदम थरारक.
एकदम थरारक.
मुजरा राजे. पुन्हा एकदा थरारक
मुजरा राजे.
पुन्हा एकदा थरारक फोटोज आणि वृत्तांत.
प्रचि १३!!!!!!!
जबरदस्त... सगळ्या मावळ्यांना
जबरदस्त...

सगळ्या मावळ्यांना मुजरा आहे... फोटोही सुंदर ... चलचित्रण पहायला आवडेल
येस्स्स... आधी हा लेख मी
येस्स्स... आधी हा लेख मी पूर्ण वाचला होता, मग माझा केंजळचा वाचला होता
सलाम!
रॉ असलं तरी जतन करा.
रॉ असलं तरी जतन करा. तूम्हालाही काही वर्षानंतर ते बघताना परत आवडेल. आपल्याकडच्या अशा मोहिमांचे चित्रीकरण मी क्वचितच बघितलंय. पुढे मागे जर एडीटींगचे यूझर फ्रेंडली सॉफ्टवेअर आले तर त्यावर संस्कार करता येतील. पण जपून ठेवा नक्की !
सूनटून्या, लई झ्याक! सुंदर
सूनटून्या,
लई झ्याक! सुंदर वर्णन. चढाईही तोलामोलाचीच. पण एव्हढा अवघड सुळका तुमच्या ओघवत्या शैलीने पार सोपा झाला!
पाहिलं प्रचि पाहतांना सुळका मुख्य डोंगरापासून वेगळा वाटंत नाही. बारकाईने पाहिल्यावर कळून येतं. मग गुग्गुळाचार्यांना विचारल्याशिवाय चैन पडेना. हाच ना तो?
ते स्टेशन असं नामकरण वाचून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची आठवण झाली!
आ.न.,
-गा.पै.
जबराट..
जबराट..
मस्त रे !!
मस्त रे !!
कसले भन्नाट दिसतायत ते
कसले भन्नाट दिसतायत ते क्लायम्बिंगचे फोटो.
तुकारामांचा अभंग आहे न ''जसे आहे तसेच राहावे'' असाच काहीस, अगदी त्याच वृत्तीची माणस आहेत हो. स्मित. प्रसिद्धी नको आहे हो.>>> अगदीच. ऐकून आहे मी पण किरण अडफडकरांबद्दल.
बरं एक सुधारणा सुचवते. ब+E=बॅग
मस्त वर्णन, लेख. चित्तथरारक
मस्त वर्णन, लेख. चित्तथरारक फोटो.
जबरी! खूप वर्ष झाली मुंब्रा
जबरी!
खूप वर्ष झाली मुंब्रा नर्सरीला जाउन. रविवार म्हणजे मुंब्रा किंवा गांधीटोपी नक्की असायचे.
सणसणीत मोहिम! मस्त
सणसणीत मोहिम!
मस्त फोटोज..
सह्याद्रीतल्या सुळकेगिरीचं फोटोडॉक्युमेंटेशन करण्याच्या उपक्रमाबद्दल खूप अभिनंदन!!!
सर्व कौतूककरांचे मनपूर्वक
सर्व कौतूककरांचे मनपूर्वक आभार!
गामा
बरोबर त्योच त्यो!
आऊटडोअर्स
सूचना अमलात आणतो.
Discoverसह्याद्री
तुझा सल्ला खूपच मनावर घेतलाय
भन्नाट आणि थरारक. त्या
भन्नाट आणि थरारक. त्या सुळक्याचा फोटो बघुनच भिती वाटते त्यावर चढाई करणार्या मावळ्याना मानाचा मुजरा.
अफाट! जबरदस्त धाडस!
अफाट!
जबरदस्त धाडस!
मुजरा राजे. > +१ फोटो धडकी
मुजरा राजे. > +१
फोटो धडकी भरवणारे आहेतच.. सोबत वर्णनही उत्तम!
शेवटच्या पॅच मधला १०० फुटांचा ओव्हरहँग कसा पार केला? त्या बद्दल माहिती द्याल का?
इंद्रधनुष्य शेवटच्या पॅच मधला
इंद्रधनुष्य
शेवटच्या पॅच मधला १०० फुटांचा ओव्हरहँग कसा पार केला? त्या बद्दल माहिती द्याल का?>>>>>>
शेवटच्या पॅच मध्ये रॉक भरपूर अस्थिर होता. प्रदीपने एक-दोन प्रयत्न करून पाहीले पण रॉक निघून हातात यायला लागला. त्यामुळे अगदी नाईलाजाने सरळ धार सोडून थोडेसे उजवीकडून चढाई करावी लागली (फोटो मध्ये दिसतेय बघा). खरेतर प्रदीपसुद्धा थोडासा हिरमुसला होता. आणि मार्ग बदलावा लागल्यामुळे शेवटची चढाई तेव्हढी आव्हानात्मक नव्हती (प्रची १७ पहा)
ओके... धन्यवाद प्रचि १७
ओके... धन्यवाद
प्रचि १७ मधे दिसणारा ओव्हरहँग अशक्य आहे. उजवि कडिल नाराजी लक्षात आली.
तो overhang एकदम अशक्य
तो overhang एकदम अशक्य कोटीतला नव्हता. पकडण्यासाठी होल्ड्स होते पण अस्थिर होते.
तुम्ही मुर्ब्र्याला कधी आला आहात का??
तिथे वेव चा जो खडक आहे, त्याच्या बाजूलाच एक छोटासा ९-१० फुटांचा overhang आहे, अगदी त्याच पठडीतला होता तो.
जबरदस्त.
जबरदस्त.
पूर्वी एखाद्या रविवारी ट्रेक
पूर्वी एखाद्या रविवारी ट्रेक नसला की मुंब्रा नर्सरी किंवा मुंब्रा वेस्ट फेसला जायचं, पण घरी नाही बसायचं हे ठरलेलंच असायचं. वर म्हणताय तो वेव्हचा रॉक व ओव्हरहँगही व्यवस्थित आठवतोय मला.
अप्रतिम ... सलाम तुम्हाला
अप्रतिम ... सलाम तुम्हाला
दिनेशदा म्हणतायत त्यात तथ्य
दिनेशदा म्हणतायत त्यात तथ्य आहे. चित्रिकरण करुन ते इतरांनाही पहाण्यासाठी उपलब्ध करुन दिले तर प्रेरणा घेऊन काही खाजाळू प्रस्तरारोहक तयार होतील..
शैलभ्रमरने हा सुळका सर केल्यानंतरची चित्रफित मी पाहिली होती.. त्यांत शेवटी हितेंद्रची एक जबरदस्त मुव्ह आहे ती पहाण्यासारखी आहे.. !
एकदम मस्त लेख व मस्त प्रकाशचित्रे..!
कातळाशी झट्या घेण्याचं काम सोप्पं नाही. सगळ्या टिमचे अभिनंदन आणि _/\_.
हेम दिनेशदा व इतर
हेम
दिनेशदा व इतर व्यक्तींच्या प्रेमळ आग्रहामुळे मी व्हिडीओवर काम करतोय. उद्याच टाकतो व्हिडीओ.
हितेंद्रच्या जबरदस्त कौशल्याविषयी अजिबात असूया अगर किंतु परंतु नाही, उलट महाराष्ट्राचा गुणवान खेळाडू म्हणून कौतुकाच जास्त आहे.
शैलभ्रमर आमच्यापेक्षा थोडे व्यावसायिक पद्धतीने छायाचित्रण करतात. पहिल्यांदा ते सुळका सर करतात, त्यानंतर व्हिडीओ शुटींग करण्याआधी ३-४ वेळा संपूर्ण मार्गावर परत चढाई करतात आणि खाचा-खोचा माहित करून घेतात. थोडक्यात मार्गाची निट ओळख झाल्यानंतर खास व्हिडीओ शुटींग साठी वेगळी चढाई करतात.
गिरीविराजमध्ये आम्ही, जी सुरुवातीला चढाई करतो तीचेच व्हिडीओ शुटींग करतो. त्यामुळे त्यात तुम्हाला तो व्यावसायिकपणा जाणवणार नाही.
Pages