अघटीत -- २

Submitted by नितीनचंद्र on 2 June, 2014 - 07:17

अघटीत भाग पहिला - http://www.maayboli.com/node/18721

शनिवारी मी लोकलने लोणावळ्याला गेलो. स्टेशनवर माझा मावसभाऊ शाम मला न्यायला आला होता. मी त्याच्या मोटरसायकल वर मळवली आणि लोणावला याच्या मधोमध असलेल्या रस्त्यावर एका बंगल्यात रहात होता तिथे गेलो. खुप गरम होत होत. घराजवळ विहीर होती त्यातल थंडगार पाणी काढुन मी अंघोळ करुन फ्रेश झालो.

माझ्या भावाने सांगीतल की बाबाचा कार्येक्रम रात्री १२ वाजायच्या सुमारास असतो. मग भावाच्या बायकोने तयार केलेल्या जेवण जेउन आम्ही गप्पा मारत बसलो.

१९४७ साली ज्या सिंधी फॅमीली मुंबईत आल्या त्यात माझे वडीलांचे वडील पुण्यात सेटल झाले आणि मावसभावाचे आजोबा लोणावळ्याला. जमिन स्वस्त मिळाली म्हणुन लोणावळ्यापासुन ५ किलोमीटर्स वर मावसभावाच्या आजोबांनी घर बांधले आणि चिक्की बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. सुरवातीला मावसभावाचे वडील स्वतः चिक्की विकायचे. मग पुढे त्यांनी सेल्समन ठेवायला सुरवात केली जे ट्रेन मधे, रेल्वे स्टेशन आणि दुकानातुन चिक्की विकु लागले.

आज मावसभाऊ हे संभाळतो. त्याच्या फॅक्टरीत १५ लोक रोज चिक्की बनवतात. घराच्याच एका भागात चिक्कीचा कारखाना आहे. २०-२५ सेल्स मन चिक्की विकायच काम करतात त्यामुळे मावसभाऊ घरातच असतो. अधुन मधुन पुण्याला शेंगदाणा, गुळ, खोबर खरेदीसाठी मार्केटयार्ड ला येतो तेव्हा कधीतरी आईला आणि मला भेटतो.

आमच्या गप्पा धंदा आणि इनकम वरुन चालल्या होत्या तोवर त्याने अजिबात माझ्या वडीलांचा विषय काढला नाही. सध्या खुप काँपिडीशन असल्यामुळे धंदा बदलावा का हा प्रश्न त्याला सतावतो आहे. हा प्रश्न बाबाच्या माध्यामतुन त्याच्या वडीलांना विचारावा आणि अश्या प्रसंगी तु बरोबर असशील तर मला सोबत होईल आणि तुला पटल तर तुझ्या वडीलाशी बोलता येईल अस शाम म्हणाला.

गप्पा मारता मारता रात्रीचे ११ वाजले. जाताना शाम त्याच्या बायकोशी काही बोलला. दोघांच्या बोलण्यात संवादापेक्षा वादच असावा असे वाटले. शाम म्हणुनतर सोबतीला महेशला बोलावल आहे अस म्हणत होता. शामच्या बायकोचा माझ्या हुशारीवर भरवसा होता पण तिला रिस्क वाटत होती आणि बाबाच्या या कामाची ख्याती काही चांगली नव्हती म्हणुन ती पुन्हा पुन्हा शामला परावृत करत असावी.

" बायका त्या बायकाच " शाम हसत म्हणाला. त्याने मोटरसायकल ला किक मारली आणी आम्ही निघालो. परीसरात अंधार होता. आम्ही त्याचा मोटरसायकलवर पवना डॅम च्या दिशेने निघालो. शामच घर लोणावळ्यापासुन ५ किलोमीटरवर तर बाबाची कोठी तिथुन पुढे ३ किलोमीटरवर. पवना डॅम साधारण लोणावळ्याहुन १५ किलोमीटरवर आहे. हा रस्ता सिंगल आहे. दिवसा क्वचीत एखादे वहान समोरुन येते पण शामच गाव सोडल की सगळा रस्ता निर्मनुष्य असतो.

बाबाची कोठी रस्त्यापासुन थोडी लांब एका टेकाडावर होती. आम्ही रस्त्याच्या बाजुला मोटारसायकल लाऊन टेकडी चढु लागलो. सवय नसल्यामुळे आम्हाला दम लागत होता. आमच्या दोघांच्या हातात टॉर्च होते. पायवाट साधारण ठीक होती. थोडी झाड झुडप होती पण पाऊलवाट बरी होती.

"शाम तु कधी इथे आला आहेस का रात्रीच्या वेळी ? " मी शामला विचारले. शाम म्हणाला तशी वेळच आली नाही. माझे वडील मात्र आपल्या अनेम नातेवाईकांना घेऊन इथे यायचे. तुला अमरकाका माहित आहे ना ? तो पण आला होता. मी १५ वर्षांचा असेल. त्याला घेऊन पप्पा गेले होते बाबा कडे. त्याची बायको गायब झाली होती. माहेरी जाते सांगुन कुठे गेली कळत नव्हते. मग बाबाने अमरकाकाच्या बायकोच्या मेलेल्या वडिलांना बोलावले. मग उलगडा झाला की अमरकाकाच्या बायकोचे प्रेमप्रकरण लग्नाच्या आधीपासुनच होते. पुढे ती वारली माहेरी वारली अस सांगुन अमरकाकाने उठामणा केला आणि नाद सोडला. मला नीट समजत नव्हत पण त्यानंतर पुन्हा नातेवाईक आले नाहीत. पप्पा ही वारले आणि मला ही प्रश्न नाही पडला.

महेश खर सांगायच तर लीलामावशीने मला तुला बोलाउन तुझ्या वडीलांना प्रश्न विचारायला सांगीतल आहे की तु लग्न का नाही करत. माझ्या धंद्याच म्हणशील तर हा काही मोठा प्रश्न नाही.

हम्..... . मला शंका आलीच की लीलामावशी म्हणजे आईन हा इलाज काढला. मला थोडी उत्सुकता हे नेमक खर की खोट जाणुन घेण्याची होती. खरच मेलेली माणस येतात का नाही हे पहाण्याची. बाकी लग्न सध्यातरी न करण्याच्या माझ्या निर्णयावर ठाम असायचो. अस कुणी सांगुन बदलायच असत तर आईने सांगुन नसत का लग्न केल ?

तोवर बाबाच्या कोठीचा परिसर लागला. दिवट्या पेटवुन इथे उजेड करण्यात आला होता. एक भलमोठ आंगण ज्यात बसायला पोती आणि घोंगडी टाकली होती. आंगणाच्या मागे एक पत्र्याची शेड होती जिथे बाबा रहायचा. प्लँचेटचे काम फक्त अमावस्येच्या रात्री तेही आठ महिने. कारण पावसाळ्यात बाबाच कोठी सोडुन दुसरीकडे रहायला जायचा.

शामने बाबाच्या सहायकाला विचारल की किती नंबर आहेत ? त्याचा सहायक पण दिसायला नंबरी होता. खाली धोतर, अंगात बंडी, डोक्याला मुंडास आणि अक्क्डबाज मिशांचा झुपका. डोळे कुठल्यातरी विचारांनी भारलेले.

" खास नाय एक जोडप आलय कर्जत हुन. त्येंचा नंबर झाला की तुमचाच. ते आत गेल की तुम्ही दरवाज्यात बसा. ते बाहर आल की तुम्ही आत जा" आमच्या समोर ते जोडप आत गेल.

"शाम, अश्या रात्री बाईला घेऊन येणारा हा माणुस जरा भारीच दिसतोय." मी म्हणालो. मी त्या जोडप्याच निरीक्षण आधीच केल होत. तस जोडप अडाणी वाटत नव्हत पण सुशिक्षीत ही नव्हत.

जोडप आत गेल तस बाबाच्या कोठीच्या बाहेरच्या बाकावर आम्ही बसलो. मी दिवटीच्या उजेडात घड्याळात पाहिल तेव्हा रात्रीचे बारा वाजलेले दिसले. फड फड झाली म्हणुन समोर पाहिल तर एका झाडाच्या ढोलीत एक घुबड बसलेल दिसल. ते घुबड जेव्हा आवाज करु लागल तसा बाबाच्या सहायकाने एक भला मोठा नगारा उचलुन मोकळ्या जागेत आणी हाततल्या दोन टिपर्‍यांनी वाजवायला सुरवात केली.

" काळ भैरवनाथ महाराज की जय ! काळ भैरवनाथ महाराजकी जय ! असा घोष केला मग नगारा थांबवला तसा कोठीतुन चमत्कारीक आवाज येऊ लागला. ती भाषापण काही तरी विचीत्र होती. बहुदा कसले तरी मंत्र असावेत. मी लक्ष देऊन सगळ पहात होतो आणि ऐकतही होतो. वातावरण गुढ वाटत होते. शामने माझा हात धरला आणि घट्ट धरुन ठेवला. त्याच्या चेहेर्‍यावर भिती मला स्पष्टच दिसत होती.

" कशाला आलाय ? काय परश्न आहे तुझा ? बाबाचा आवाज घुमला सोबत समोरच्या अग्नीत काही टाकल्याने येणारा तडतड आवाजही येत होता. आम्हाला आतला बाबा किंवा ते जोडप दिसत नव्हत पण डोळ्यासमोर चित्र उभ करता येईल इतका मोठा आवाज आत होत होता.

बाबा आम्हाला मुल होत नाही. डॉक्टर म्हण्तो तुमच्यात काही दोष नाही . ती स्त्री बोलली.

किती वर्स झाली लग्नाला ? बाबाने विचारले. यावर दोघांपैकी कोणीच बोलले नाहीत. बहुदा बोटांच्या खुणेने त्यांनी वर्ष सांगीतली असावीत. जरा पुढे जाऊन ते बघावस वाटत होत मी शाम ला खुणावल की बाकाच्या त्या टोकाला बसु म्हणजे सगळ चित्र स्पष्ट होईल. शामच्या विरोधाला न जुमानता मी त्या सहायका कडे नजर टाकली. तो नगारा सॉडुन आसमंतात नजर लाऊन बसला होता. इकडे काय चाललय या कडे त्याचे लक्ष नव्हत. मी शामला ओढतच पुढे आणले. बाकाच्या टोकाला बसल्यावर मला समोर बाबा दिसु लागला आणि त्याच्या समोर बसलेले जोडपे.

बाबाच्या समोर अग्नी होता आणी त्याच्याच बाजुला एका कापडावर एक तिवई होती. त्या तिवईवर एक पाट होता आणि पाटावर एक मोठा तांब्या उलटा टाकलेला दिसत होता. बाबाच्या गळ्यात अनेक माळा होत्या. केसांचा घट्ट बुचडा. कमरेवर वस्त्र नव्हत आणि खाली एखाद घोतर असाव.

बाबाने तांब्या उचलला आणि काही मंत्र घोष केला. अग्नित पुन्हा काहीतरी टाकला आणि म्हणला कोणाला बोलवायच ? जोडप्यातला पुरुष काहीच बोलत नव्हता. ती स्त्री म्हणाली अप्पाला, माझ्या बा ला बोलवा. परत बाबाने काही मंत्राचा घोष केला आणि अग्नीत तडतड वाजणार काही टाकल. मग म्हणाला काय नाव तुझ्या बाच ?

बाई म्हणाली " बाजी लोके आम्ही आग्री समाजाचे आहोत.

"बाजी लोके ...... ए बाजी लोके तुज्या चेडवान साद घातली आहे " हजर हो लागलीच हजर हो असा मोठ्ठा आवाज बाबाने केला. तु आल्याच समजाव म्हणुन हा तांब्या हलव. ए बाई, हा आत्मा माझ्या शरीरात प्रवेश करत तेव्हा माजा आवाज बदलल. तुला जवा वाटल की माझ्या मुखाने तुजा बा बोलतो तेव्हा तु पयला नमस्कार कर तुझ्या बा ला आणि मग प्रश्न विचार.

होय बाबा म्हाराज ! त्या बाईने मान डोलाऊन सुचना समजली असे दाखवले.

तुझ्या प्रश्नाच उत्तर मिळाल की मला १००० रुपये दक्षीणा द्यायची काय समजला ? बाबाने दरडाऊन विचारले.

होय बाबा म्हाराज ! त्याबाईने मान डोलावली.

बाजी लोके हजर हो नाहीतर मला आग्या वेताळ पाठवावा लागेल तुला आणायला. मान गरागरा फिरवत बाबा घुमु लागला. त्याचे डोळे पांढरे दिसत होते. बहुतेक डोळ्याची बुबळ वरच्या दिशेला फिरवल्यामुळे पांढराच भाग फक्त दिसत होता.

बघता बघता बाबाचा आवाज बदलला. " मोने मोने " बाबाच्या तोंडुन आवाज येत होता.

"बाबा तुम्ही आला का ? हे काय मोने मोने काय म्हनता" शांता आहे माझ नाव.

बाबाचा खुल्ला मोठठा आवाज आता घोगरा झाला होता.

"शांताच नाव हाय तुझ, मला माहित हाय पण म्या तुला मोने म्हनायचो ते या सख्या बरोबर पाट लावल्यावर विसरलीस काय ग रांडे ?"

"या बया ? बाबा म्हाराज म्या माझ्या बापाला बोलावला माझा मेलेला दाल्ला कसा आला ?" शांता आता चांगलीच घाबरलेली दिसत होती.

"या बाबाला काय इचारतेस ? माला इचार माला . बाबा स्वतः छाती बडवत होता आणि म्हणत होता मला विचार "

" म्या बसलोय ना ? कसा होऊ देईल तुला मुल ह्या सख्याकडुन ? , ह्या हरामखोर सख्यान माला मारला दारुत इष कालवुन. त्याचा बदला घेतल्याबिगर मी जायचा नाय. ह्या सख्याचा मुडदा बसवतो मग तु लाव परत पाट"

आता सखाराम आणि शांता दोघही एकमेकांकडे पहात होते. शांताचा पहिला नवरा सुभाष कसा मेला हे फक्त सखारामलाच माहित होत ते आता उघड झाल होत. बघता बघता बाबाने कोपर्‍यातली काठी उचलली आणि सखारामवर उगारली. सखाराम उठला आणि तडक पळत बाहेर आला. त्याच्या मागे बाबा काठी घेऊन पळत आला.

सखाराम वाट फुटेल तिकड पळु लागला आणि त्याच्या मागे बाबा लागला.

शाम पळ, काय खर नाय.

अनिल तुला सांगतो, त्या टेकाडावरुन आम्ही खालो. शामची मोटारसायकल मी चालवायला घेतली. शाम मागे बसलेला पाहिला आणि जे सुसाट वेगाने सुटलो ते घरी आलो.

जीव घाबरा झाला होता. रात्र भर आम्हा दोघांना झोप नाही. सकाळी मी निघालो ते लोकल पकडुन घरी आलो.

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users