मिठाचा चहा म्हटल्यावर मिठाचा खडा लागल्यासारखं झालं ना ?
अहो पण खरंच असा चहा आहे आणि खूप टेस्टी आहे. हिमालयन टी किंवा तिबेटीयन टी या नावाने हा चहा प्रसिद्ध आहे. नंदादेवी मोहीमेदरम्यान आणि लडाख मधल्या वास्तव्यात या चहाशी चांगलीच दोस्ती झाली. नंदादेवी मोहीम काही पूर्ण झाली नाही पण बेसकँपला तिबेटीयन चहा बनवण्याचं प्रशिक्षण मिळालं. आयटीबीएफ च्या दार्जिलिंगच्या माउंटेनिअरैंग इन्स्टीट्यूटचे एक तिबेटी प्रशिक्षक होते, ली दोरजी नावाचे त्यांनी पारंपारीक चहाही शिकवला आणि त्याच्या कैक वर्जन्सची माहीती पण दिली.
इथे रेसिपी देत नसून या चहाची माहीती दिलीय म्हणून फोटो वगैरे टा़कलेला नाही. नेटवरून प्रचि टाकायचा कंटाळा आलाय. पण या माहीतीवरून चहा बनवता येईल हे नक्की.
परंपरागत तिबेटीयन चहा बनवण्याची पद्धत खूपच सोपी आहे. ब्रिटीशकालीन पॉट टी आठवतो ना ? मला तो चिनीमातीचा विशिष्ट आकार खूप आवडतो. हल्ली अनब्रेकेबल मधे पण अगदी ग्लासचा फील देणारी केटल्स आली आहेत. स्टीलची पण आहेत. तुम्ही काहीही घ्या. त्यात कोरा चहा उकळून घ्या. तिबेटीयन टी चे पत्ते थोडे चवीला वेगळे असतात. त्याने काही फरक पडत नाही. इकडे चहाला पुएर (Pu -erh Tea) | म्हणतात. बाजारात मिळणा-या रेड लेबलपेक्षा यलो लेबल टी वापरल्यास चांगली चव मिळते. कुणी आसामात जाणार असेल तर तिबेटीयन चहाचे पत्ते आणायला सांगा. ( वै.इ. : मला बघून किंवा वासाने फरक कळाला नाही. कसं ओळखयाचं हे सांगता येत नाही). तिबेटमधल्या एका विशिष्ट भागात मिळणा-या ब्लॅक टी चे पत्ते तिबेटमधे वापरले जातात. तर दूध व बटरसाठी याकचं बटर वापरलं जातं. गायीच्या लोण्यापेक्षा याकचं लोणी श्रेष्ठ असं तिबेटींचं म्हणणं आहे. बाजारात याक बटर किंवा याक मिल्क मिळतं. खरं तर आपल्यासाठी कुठलंही दूध किंवा बटर चालणेबल आहे. नाहीतर याक आणून पार्किंगमधे बांधावा लागेल.
पारंपारीक पद्धतीत ब्लॅक टी वापरतात हे सांगितलंच.
चार कप पाणी
ब्लॅक टी (लिप्टनच्या दोन टी बॅग्ज किंवा दोन चमचे लूज)
१/४ टी स्पून मीठ ( अंदाज वेगवेगळा )
२ टेबलस्पून बटर
१/३ कप दूध
ब्लेण्डरची गरज पडेल.
आधी चार कप पाणी उकळून घ्या. त्यात टी बॅग्ज किंवा पावडर घाला.
१/३ कप ते अर्धा कप दूघ घाला.
१/४ टी स्पून मीठ घाला.
टी बॅग्ज काढून घ्या. पावडर असल्यास गाळून घ्या.
पुन्हा मागच्याप्रमाणेच दूध घाला आणि उकळा.
ज्योत बंद करा.
आता हा चहा प्लास्टीक कंटेनर मधे ओतून घ्या. त्यात आधी दोन टेबलस्पून बटर घालायला विसरू नका. चर्न च्या ऐवजी ज्या भांड्यात ब्लेण्डर वापरता येईल असंच भांडं सोयीचं पडेल. ब्लेण्डर ने चहा सोपा होतो. नाहीतर कंटेनर (झाकणाचा) हलवून घेण्यात खूप वेळ जातो. हे तिबेटी हे चहाचं पाणी नंतर पुन्हा वापरतात. कारण वेळखाऊ प्रोसेस आहे ही.
२ ते ३ मिनिटे ब्लेण्डरच्या सहाय्याने घुसळून घ्या. तिबेटमधे चर्न म्हणून एक भांडं मिळतं त्यात ते खूप वेळ चहा हलवत ठेवतात.त्याने चव छान येते असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या कुणाला उत्साह आणि वेळ असेल त्यांनी करायला हरकत नाही. (रवीने घुसळलं तरी चालेल).
हा मिठाचा चहा चहा ऐवजी सूप म्हणून पिल्यास चवीबाबत तोंड आंबट होणार नाही.
भारतीय पद्धत :
ही झाली तिबेटीयन चहाची ट्रॅडीशनल रेसिपी. हा सगळा जामानिमा शक्य असल्यास करून पहावा. पण ही साधनसामुग्री न मिळाल्यास किंवा चव न आवडल्यास ली दोरजींनी भारतीय वर्जन्स देखील सुचवली होती. असा चहा केला देखील होता, पण लिहून काढायचं तर ती जशीच्या तशी लक्षात न राहील्याने नेटवरून पुन्हा संदर्भ घेतले आणि पक्की खात्री केली. खरं म्हणजे ही वर्जन्स आपण आपल्याला हवी तशी करून घेऊ शकतो त्यासाठी ओरीजिनलची माहीती मात्र हवी.
आपल्याला करून पाहता येण्यासारखं ( आणि भारतियांना आवडण्यासारखं) वर्जन
एक प्लास्टीकचा जार घ्या. त्यात बटर आणि अदमासे मीठ घाला. हे झालं की त्यावर हळूहळू केटलमधून उकळता चहा ओता. बटर वितळून चहा घट्ट होत जाईल. थोडं ढवळून घ्यावं लागेल. मिठाचा अंदाज येईपर्यंत सुरुवातीचे काही प्रयोग चहाची चव खारट किंवा अळणी होण्याची शक्यता आहे. कुणाकुणाला पहिल्याच फटक्यात जमू शकेल. अशांना .....कडून बोन चायनाच्या क्रोकरीचा सेट बक्षीस मिळेल.
तुम्ही या रेसिपीला मॉडीफाय करून आवडीनुसार घट्ट किंवा पातळ दूध घालू शकता. साय नकाच घालू. आधीच बटर आहे. साखर घालायची तर घाला. पण साखरेची सवय नसलेलीच बरी, नाही का ? एकेकाची आवड.
मिठाऐवजी लिंबू पिळून घातलेल्या चहाची चव तर लाजवाब ! मीठ आणि लिंबू असा प्रयोग करून पाहीलेला नाही. आपल्या जबाबदारीवरच करावा.
नमकीन चाय (काश्मीर) :
काश्मीरमधे नमकीन चाय म्हणून असा चहा प्रसिद्ध आहे. चहाची पत्ती ग्रीन टी ची वापरतात. तिथे बटर वापरत नाहीत. पण मीठ वापरतात. हे लोक चहात बेकिंग सोडा पण घालतात. ही रेसिपी ट्राय केलेली नाही त्यामुळं जास्त सांगता येत नाही.
सध्या इतकंच चहायण. करून बघणार ना ? कळवा लगेच कसा वाटला हा चहा ते.
( पाककृती म्हणून पोस्ट करण्याइतका विश्वास नव्हता. पण या विभागात हलवून या रेसिपीवर शिक्कामोर्तब केल्याबद्दल संपादकांचे आभार ).
फारच कन्फुज केलं राव. एकदा
फारच कन्फुज केलं राव. एकदा बटर आणि मीठ घालून झाल्यावर परत बटरवर चहा ओता आणि अदमासे मीठ टाका.
सूप म्हणूनच प्यायला पाहिजे.
एरवीचा चहादेखील (दूध वगैरे
एरवीचा चहादेखील (दूध वगैरे घातलेला) उंचावरून पेल्यात ओतला,तर त्याची चवही अधिक छान लागते.
अमितव - कन्फुज झालात का ?
अमितव - कन्फुज झालात का ? सॉरी ! ट्रॅडीशनल आणि आपल्याला करता येण्यासारखी पद्धत या दोन्ही देण्याच्य़ा नादात तसं झालं असेल. बदल करण्यात येईल.
देवकी - अगदी ! हे काल आठवलं होतं. अमृततुल्य मधे एका पातेल्यातून दुस-या पातेल्यात चार पाच वेळा त्यासाठीच करत असावेत. खरंच चहा बनवणे, सर्व करणे आणि पिणे हा एखादा सोहळाच असायला हवा. आपण खुपच घाई करतो. जणू काही चहाची ऑर्डर देणारा आता देहांताची शिक्षा देणार असल्याप्रमाने. पण खरं म्हणजे आपल्यालाच पेशन्स किंवा वेळ नसतो रोजच्या घाईगडबडीत.
लवकरच दोन्ही प्रकारे चहा करून बघण्यात येईल. त्या वेळी प्रचि पण घेणेत येतील.
छान सविस्तर लिहिलंय.. तिथे
छान सविस्तर लिहिलंय.. तिथे कोरडी हवा आणि थंड हवामान म्हणून चहातले लोणी ओठांना सतत लागत रहावे म्हणून ही योजना आहे.
मला चव आवडेल का, ते चाखल्याशिवाय कळणार नाही. आमच्याकडे हे प्रकरण सिलोनचा चहा, पोर्तुगालची साखर, डॅनिश बटर, जर्मन दूध आणि अंगोलन मीठ ... असे इंटरनॅशनल होणार आहे.
अमुल बटर चालेल का? त्यातही
अमुल बटर चालेल का? त्यातही मीठ असतेच.
तिथे कोरडी हवा आणि थंड हवामान
तिथे कोरडी हवा आणि थंड हवामान म्हणून चहातले लोणी ओठांना सतत लागत रहावे म्हणून ही योजना आहे.>> खरच की. हे लक्षातच नाही आलं.
सिलोनचा चहा, पोर्तुगालची साखर, डॅनिश बटर, जर्मन दूध आणि अंगोलन मीठ >>> व्वाव ! नवीन इंटरनॅशनल वर्जन तयार होईल हे. वाचायला आवडेल याबद्दल. पण हे इनग्रेडिएण्ट्स आम्हाला नाही मिळणार !
मस्त............ मी आज टॉमेटो
मस्त............ मी आज टॉमेटो चहा बनवलेला.......
वा खूपच छान. आळस झटकून प्लीज
वा खूपच छान. आळस झटकून प्लीज छायाचित्र मिळावून इथे डकवाल का? चित्र मस्ट आहे.
उदयन मस्त............ मी आज
उदयन
मस्त............ मी आज टॉमेटो चहा बनवलेला.......
>>>>>>>>>>
तू हा कसा बनवला माहीत नाहीस पण मी मात्र कॉलेजच्या कँटीनमध्ये हा प्रकार बनवायचो.
करायचोच काय, तर चहाच्या पेल्यामध्ये सँडवीचमधील टोमेटोची एक स्लाईस डुबुक डुबुक करत दोन वेळा बुडवून काढायचो की झाला तयार टोमेटो चहा. आणि ट्रस्ट मी एवढा अल्टिमेट लागायचा की जेव्हा मला तशी चहा प्यायची हुक्की यायची आणि सँडवीज वगैरे कोणी घेतले नसेल तर काऊंटरवरून एक स्लाईस उसनी मागून घ्यायचो, डुबूक डुबूक करून परत देतो म्हणून
बाकी हा नमकीन चाय कितपत झेपेल
बाकी हा नमकीन चाय कितपत झेपेल शंका आहे, पण ट्राय केल्याशिवाय समजणार नाही. कोरी चहा तर आईच बनवून देईल, पुढचे बटर आणि मीठ दिलेल्या पद्धतीने मिसळवायचे मला जमून जाईल, सो करून बघण्यात येईल.
एक प्रश्न कम शंका - मला चहात तिखट शेव किंवा फरसाण टाकून खायला आवडते, आणि त्यापेक्षा जास्त मजा नंतर ती चहा प्यायला येते कारण तिला तिखटाचा झणझणीत फ्लेवर आला असतो, चहा शेवटाला थोडीशी कोमट झालेली असली तरी मस्त तिखट चटका बसतो.
असो, तर हा प्रकार या नमकीन चहाच्या संगतीने केले तर काय होईल, कसे लागेल काही अंदाज ?
अभि मी टोमँटो चे सुप बनवतो
अभि
मी टोमँटो चे सुप बनवतो आणि ते "चहाच्या कपातून" पितो
झाला टोमँटो चहा
उदय बाकी मस्त आयडीया, आता
उदय

बाकी मस्त आयडीया, आता दारूसाठी पण हा चहाच्या कपाचा प्रयोग करता येईल, आधी जो काही ब्रांण्ड असेल तो, पण पुढे तरी चहा प्यायलो म्हणून जोडता येईल. बोले तो उद्या संडेलाच सिग्नेचर टी ट्राय करतो
धागा थोडा भरकटला त्याबद्दल क्षमस्व, पण काहीतरी त्यातून निघाले हे महत्वाचे.
अनेक वर्जन्स बनू लागलेत
अनेक वर्जन्स बनू लागलेत
माझा रोजचा चहा म्हणजे आईस क्युब घालून केलेला लेमन टी. हिवाळ्यात गवती चहा... आणि पाऊस पडत असताना वाफाळता दूधाचा चहा. तिबेटीयन चहा काल बनवायचा होता पण सन्डे म्हटल्यावर ऐनवेळी प्रोग्राम मधे बदल होणं हे नेहमीचं असतं.
@ बी - या आठवड्यात टाकीन प्रचि. नाहीच बनवला तर नेटवरुन दिलेले चालतील का ?
माझ्या माहितीप्रमाणे
माझ्या माहितीप्रमाणे काश्मीरमध्ये नमकीन चहा असला प्रकार नाही.
गुलाबी चहा असतो. त्या वेळी झेपला नाही पण परत एकदा ट्राय केला तर आवडेल. खूपच हेल्दी प्रकार आहे.
ल्युबिना नावाची बाई सांगते रेसिपी. तिच्या चॅनलचं नाव लक्षात नाही पण.
तो गुलाबी काहवा असेल गं.. तो
नेटवर पाहिले. गुलाबी चाय म्हणजेच नम्किन किंवा नून चाय म्हणे.
माहितीप्रमाणे काश्मीरमध्ये
माहितीप्रमाणे काश्मीरमध्ये नमकीन चहा असला प्रकार नाही..... कहावा असतो.त्यात मीठ असते.चांगला लागतो.
गिरनारचे कहावा satche मिळतात.सुरुवातीला चव वेगळी वाटली.नंतर आवडला.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
गुलाबी चाय म्हणजेच नम्किन
गुलाबी चाय म्हणजेच नम्किन किंवा नून चाय म्हणे.>> ओह. नून माहिती होतं. धन्यवाद माहितीबद्दल.
नून चाय >>> मी प्यायले आहे
नून चाय >>> मी प्यायले आहे नून चाय. आवडला होता मला. पण नेहमीचा चहाला रिप्लेस करू शकत नाही.