मासे ४८) घोलू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 May, 2014 - 03:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घोलू मासा
अर्धा चमचा हळद
पाव चमचा हिंग
१ ते २ चमचे मसाला
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

आवडीनुसार किंवा गरज वाटल्यास खालील साहित्य वापरावे.
आल, लसूण, मिरची, कोथींबीर वाटण
रवा किंवा तांदुळ किंवा बेसनचे पीठ

क्रमवार पाककृती: 

घोलूचा आकार पापलेटच्या कुळातला असून त्याच्या अंगावर एक प्रकारची नक्षी असते. घोलू शक्यतो कोळ्णीकडून कापून घ्यायचा. घरी कापायचा असल्यास त्याच्या डोक्याखाली पोटाच्या भागाला चिर देऊन पोटातील घाण काढावी व शेपूट आणि पर काढून माशाच्या तुकड्या कराव्यात.
कालवण करायचे असल्यास पापलेट प्रमाणेच करावे.

तळण्यासाठी वरील तेल सोडून सगळे साहित्य तुकड्यांना लावावे.

तवा चांगला तापला की त्यावर तेल टाकून जर नवशिके असाल आणि वाटण लावले असेल तर थोडा रवा किंवा तांदुळ पीठ लावून तुकड्या सोडा म्हणजे वाटणामुळे त्या चिकटणार नाहीत. शिवाय अशा कव्हरमुळे कुरकुरीत पणाही येतो. १ बाजू ५-७ मिनीटे मध्यम आचेवर शिजवून दुसरी बाजू ४-५ मिनीटे शिजवा.

मी खालच्या फोटोत कव्हरसाठी काही लावलेले नाही.

चविला हा मासा चांगला असतो.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १ ते २ तुकड्या
अधिक टिपा: 

जर मासा एकदम फ्रेश असेल तर वाटण न लावता त्याच्या मुळ चवीने चवदार लागतो. जर वास येतोय असे वाटत असेल तर वाटण लावावे. वाटण तव्याला बरेचदा चिकटते म्हणून त्याला कव्हर लावायचे म्हणजे तव्याला तुकड्या चिकटून तुटत नाहीत.

माहितीचा स्रोत: 
कोळीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घोलू शक्यतो कोळ्णीकडून कापून घ्यायचा. घरी कापायचा असल्यास त्याच्या डोक्याखाली पोटाच्या भागाला चिर देऊन पोटातील घाण काढावी व शेपूट आणि पर काढून माशाच्या तुकड्या कराव्यात. >> जागू पोटातले साफ करण्यासाठी कोळणी कडून कापून घ्या म्हटलय का कि काही अजून कारण आहे ?

पट्टीच्या पापलेट आवडणार्ञाला हा मासा मोस्टली आवडणार नाही. चवीत काहीतरी विशिष्ट फरक आहे तो मलातरी आवडला नाही. आम्हाला सुरुवातीला पापलेट मिळाले नव्हते तेव्हा चुकून आणला होता (पाकिटावर पॉम्पॅनो लिहिलं होतं. वाटलं टायपो असेल Wink )

असामी, पापलेटइतका स्मूथ नाहीये कापायला असं नवरा म्हणाला होता. बाकी जागू एक्सपर्ट कमेंट देईलच Happy

जागू शेवटचा फोटो छान दिसतोय.

<<ते शिर्षकात ४८) काय आहे? (माशाच चित्र की अजुन काही?)>>
@अग्निपंख - जागूताई माशांवर लेखमाला लिहितेय त्यातल हा अठ्ठेचाळीसावा लेख आहे.

@ जागूताई : थँक्स. वाट बघीन त्या लेखाची.

अग्निपंख हे तुमच्यासाठी - http://www.maayboli.com/node/23836

गुरुदास मालवण कडच्या लोकांना विचारावे लागेल.

आसामी आपल्या घरी धारदार विळी किंवा काती असेल तर असे मासे व्यवस्थित कापता येतात नाहीतर कुरतडल्यासारखे कापले जातात. कोळणींकडे चांगल्या धारदार कात्या असतात. त्या व्यवस्थित कापून देतात.

वेका पापलेटच्या खालोखालच चव असते.

तुशपी तुला विपु जात नाही तसेच तुझे प्रोफाईलचे पान उघडत नाही. जमल्यास मला संपर्कातून मेल कर.

Pages