मासे ४८) घोलू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 May, 2014 - 03:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घोलू मासा
अर्धा चमचा हळद
पाव चमचा हिंग
१ ते २ चमचे मसाला
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

आवडीनुसार किंवा गरज वाटल्यास खालील साहित्य वापरावे.
आल, लसूण, मिरची, कोथींबीर वाटण
रवा किंवा तांदुळ किंवा बेसनचे पीठ

क्रमवार पाककृती: 

घोलूचा आकार पापलेटच्या कुळातला असून त्याच्या अंगावर एक प्रकारची नक्षी असते. घोलू शक्यतो कोळ्णीकडून कापून घ्यायचा. घरी कापायचा असल्यास त्याच्या डोक्याखाली पोटाच्या भागाला चिर देऊन पोटातील घाण काढावी व शेपूट आणि पर काढून माशाच्या तुकड्या कराव्यात.
कालवण करायचे असल्यास पापलेट प्रमाणेच करावे.

तळण्यासाठी वरील तेल सोडून सगळे साहित्य तुकड्यांना लावावे.

तवा चांगला तापला की त्यावर तेल टाकून जर नवशिके असाल आणि वाटण लावले असेल तर थोडा रवा किंवा तांदुळ पीठ लावून तुकड्या सोडा म्हणजे वाटणामुळे त्या चिकटणार नाहीत. शिवाय अशा कव्हरमुळे कुरकुरीत पणाही येतो. १ बाजू ५-७ मिनीटे मध्यम आचेवर शिजवून दुसरी बाजू ४-५ मिनीटे शिजवा.

मी खालच्या फोटोत कव्हरसाठी काही लावलेले नाही.

चविला हा मासा चांगला असतो.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १ ते २ तुकड्या
अधिक टिपा: 

जर मासा एकदम फ्रेश असेल तर वाटण न लावता त्याच्या मुळ चवीने चवदार लागतो. जर वास येतोय असे वाटत असेल तर वाटण लावावे. वाटण तव्याला बरेचदा चिकटते म्हणून त्याला कव्हर लावायचे म्हणजे तव्याला तुकड्या चिकटून तुटत नाहीत.

माहितीचा स्रोत: 
कोळीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे, जागू तुला किती मासे माहीत आहेत ! मस्त दिसतोय तळलेला मासा Happy

किती दिवसांपासून एक विचारायचं होतं. माशाचा प्रकार कुठलाही असो त्याला लावायचा मसाला एकच असतो. अशावेळी डोळे मिटून घास घेतलास तर तू लिहिलेल्या प्रत्येक माशाची चव तुला वेगवेगळी ओळखता येईल ? हा इन जनरल सगळ्याच पट्टीच्या मासेखाऊंसाठी प्रश्न आहे.

मला कोळंबीची चव वेगळी कळते. सुरमई, पापलेट कळू शकेल. सामन पापलेट,सुरमईपेक्षा वेगळा कळतो पण हल्ली ऑरेंज बासा आणते तो सामनसारखाच वाटतो चवीला. तसाच ऑईलीही असतो. एकंदरीत माशाची म्हणून एक चव असते तेवढीच कळते बाकी सगळे मासे थोड्याफार प्रमाणात सारखेच लागतात. काही कमी वासाचे आणि काही जास्त वासाचे एवढा फरक करु शकेन फक्त !

I love Black Pomfrets...Yammi...

प्रत्येक माशाची चव वेगळी असते मसाल्यात कितीही व्हेरीएशन आणा...त्यातल्या काट्यांच्या प्रमाणावर चव ठरते...

जागू सगळ्य माशाम्च्या किमतीसुद्धा लिही ना रेफरन्स साठी.
अगो ऑरेंज बासा आणि सामन हे मासे पहिल्याम्दाच एइकले. फोटो टाका ना

वॉव जागु तोंपासूऊउ ...

जागु प्रत्येक वेळी वाटण फ्रेश करतेस कि डीप फ्रीज मधे करून ठेवलेले चालतं???

फार काटे नाहीत ना याला??

चिकना चिकना म्हावरा Happy

वेल अग एरिया प्रमाणे माश्याच्या किंमतीही बदलतात.

आमच्या इथे वाट्यावर, तुकडीवर मासे मिळतात तर उरणच्या बाहेर गेल्यावर किलोवर मिळतात. त्यामुळे अंदाज बांधणे कठीण आहे. शिवाय जिथे डायरेक्ट मासे पकडूण आणले जातात तिथे किंमत कमी असते तर तेच मासे निर्यात होऊन तिथे त्याची किंमत जास्त बनते. उरणपेक्षा मी मुरुडला माश्यांच्या किंमती खुप कमी पाहिल्या आहेत.

वर्षू ताई मी नेहमी फ्रेश वाटण वापरते. पण फ्रिज मधले असेल तरी चालेल.

अगो मसाल्याने तिखटपणा येतो पण माशाची मुळ चव काही बदलत नाही. प्रत्येक माशाला वेगळी चव असते. मला न बघता काही माशांची चव बिनचुक सांगता येईल.

दिनेशदा, विज्ञानदास, दक्षिणा, नंदिनी, सामी धन्यवाद.

वॉव !!
तोंपासू

ह्या माश्यापेक्षा तो राणी मासा देखणा होता
गुलाबी + fatty
हो की नै जागुतै Lol Proud

जाई अग नावातच राणी म्हटल्यावर सुंदरच असणार ना.

ह्याने मेहेंदी काढून घेतलेय अंगावर.

ते गाणच आठवत नाही मला एक कोळी गीत आहे चिकना चिकना म्हावरा माझा. त्याचीच आठवण होतेय आजच्या प्रतिसादांनी.

ते गाणच आठवत नाही मला एक कोळी गीत आहे चिकना चिकना म्हावरा माझा>>>>>

घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा
चिकना चिकना म्हावरा माझा

इस्वास ठेव रं सांगतंय्‌ नक्‍की
याचे पुर ती कोंबरी फिकी
अंगानं जोर येईल कामकाजा दादा कामकाजा
चिकना चिकना म्हावरा माझा

बोलू नको नाई बरपाचा ह्यो
नीट बग नाई काल-परवाचा ह्यो
वासकलाशीतंस चल फुट जा
चिकना चिकना म्हावरा माझा

तलूनशी खा जरा गरम गरम
मिटुनशी जाईल सगला भरम
वाजंल खुषीचा बेंडबाजा दादा बेंडबाजा
चिकना चिकना म्हावरा माझा

हे जिप्सी सह्ही. धन्स रे.
काय मस्त खेळकर कोळी गीत आहे.

अजुन एक शिंगाळा नवरा झयलाय गो कोलबी नवरी झयली गो बाय. ह्या गाण्यात ह्या घोलूचे नाव आहे कुठेतरी. ते गाण पण मला मिळत नाही कुठे.

ह्या गाण्यात ह्या घोलूचे नाव आहे कुठेतरी>>>>>हो बहुतेक "घोलु झयलीय करवली..." असा उल्लेख आहे.
घरी आहेत हि सगळी गाणी Happy

(विषयांतराबद्दल क्षमस्व Happy )

जागू, थोडे विषयांतर.. लता मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेले, आयलंय बंदरा चांदाचं जहाज, हवलुबाईची पुनीव आज.. ऐकलेस का ? खुप सुंदर गाणे आहे.

दिनेशदा नाही ऐकलय. जर तुमच्याकडे असेल तर नक्की द्या मला.

हो जिप्स्या बहुतेक करवलीच आहे घोलू त्या गाण्यात.

दक्षे, सामी Lol

देखणा मासा !

<<त्याच्या डोक्याखाली पोटाच्या भागाला चिर देऊन पोटातील घाण काढावी व शेपूट आणि पर काढून माशाच्या तुकड्या कराव्यात.>>

ह्या कृती चे फोटो टाकता येतील का तुला ? चांगलं दिसणार नाही ते ह्याची कल्पना आहे मला पण मला पहायचय !

बापरे, जागू तुला किती मासे माहीत आहेत ! >>> +१
चित्रकोडे असते ना (की ,ह्याला बाहेर जायचा रस्ता कळत नाही तुम्ही मदत करल का) तशी नक्षी आहे ग!

जागू, आठवणीतली गाणी मधे नाही दिसत आहे.

आयलंय बंदरा चांदाचं जहाज, हवलुबाईची पुनीव आज
परसन झायली ईकईरा माय, डोंगरची माय
आयचे लेकराला कमती काय, काय कमती नाय

असे शब्द आहेत. त्या दोघांनी गायलेले ते एकमेव गाणे असावे.
जिप्स्याकडे असणार !

ओ जागूताई प्लीज प्लीज प्लीज 'पोटातील घाण काढावी' याऐवजी 'मासा साफ करून घ्यावा' असं लिहीत जाल का यापुढे? Wink

ह्या गाण्यात ह्या घोलूचे नाव आहे कुठेतरी. ते गाण पण मला मिळत नाही कुठे.>>>>>जागू, हे घे गाणं. सगळ्या माशांची नावे काय समजत नव्हती Happy म्हणुन एकच कडवं टाईप केलंय. Happy (ईमेल चेक कर Wink )

शिंगाला नवरा झयलाय गो
कोलबी नवरी झयली गो बाय
भर उदान नवरा निंगाला गो
नवरीच्या मांडवा दारी गो बाय

सरगा दादा सजलाय रं
घोलू झायली करवली
चिंबोर्‍या दादा नाचतंय रं
वाकटी निंगाली करवली
दारू पिऊनशी निवटा परलाय गो
परलाय मंगलेदारा गो बाय

देवकी हो अगदी चित्रकोड्याप्रणेच आहे नक्षी.

शकुन मी काही दिवसांनी ह्याचा एक वेगळा धागा टाकेन.

दिनेशदा छान गाण आहे. होळीवर आधारीत आहे अस वाटतय.

नुतन धन्स.

मार्कट्वेन मासा साफ करण्यामध्ये त्याची खवले काढणे, पर, शेपुट काढणे पण आले.

जिप्स्या मस्त आहे ना हे गाण. मजेशीर एकदम.
तुझा मेल मिळाला पण ऑफिसमध्ये ओपन होत नाहिये. घरी जाऊन बघेन.

Pages