मासे/मटण/चिकन/अंडी फॅन क्लब

Submitted by जागू on 23 February, 2011 - 05:04

खास मासेखाउंसाठी हा धागा आहे पण मासे न खाणार्‍यांचेही इथे हार्दिक स्वागत आहे.
तुम्हाला आवडत असलेले मासे तसेच तुम्ही टाकलेल्या पाककृती इथे शेअर करा. म्हणजे सगळे मासे एकत्र पाहता येतील.

ह्या माझ्या रेसिपीज.

ओले मासे :

१) खरबी कोलंबि - http://www.maayboli.com/node/17813
२) तांब - http://www.maayboli.com/node/16087
३) खरबी - http://www.maayboli.com/node/16433
४) चिवनी - http://www.maayboli.com/node/17090
५) सरंगा - http://www.maayboli.com/node/17246
६) बोंबिल - http://www.maayboli.com/node/17361
७) तिसर्‍या/शिवल्या - http://www.maayboli.com/node/17476
८) कालवं - http://www.maayboli.com/node/17608
९) बोईट - http://www.maayboli.com/node/17668
१०) मोदकं - http://www.maayboli.com/node/17789
११) बांगडा - http://www.maayboli.com/node/18075
१२) जवळा - http://www.maayboli.com/node/18208
१३) वाकट्या - http://www.maayboli.com/node/18382
१४) जिताडा - http://www.maayboli.com/node/20560
१५) बला - http://www.maayboli.com/node/20877
१६) मांदेली - http://www.maayboli.com/node/21084
१७) रावस - http://www.maayboli.com/node/21417
१८) खुबड्या - http://www.maayboli.com/node/22050
१९) खुबे - http://www.maayboli.com/node/22575
२०) निवटे - http://www.maayboli.com/node/22776
२१) कोलिम - http://www.maayboli.com/node/23828#new
२२) काटी/करलई - http://www.maayboli.com/node/24374
२३) चिंबोरे/खेकडे - http://www.maayboli.com/node/24606
२४) पालकं - http://www.maayboli.com/node/24872
२५) हलवा - http://www.maayboli.com/node/25204#comment-1318139
२६) कडकड्या - http://www.maayboli.com/node/25353
२७) वडा - http://www.maayboli.com/node/25511
२८) करंदी - http://www.maayboli.com/node/25559
२९) नळ माखली - http://www.maayboli.com/node/25838
३०) शिंगाळ्याची अंडी - http://www.maayboli.com/node/26257
३१) कोलंबी - http://www.maayboli.com/node/26378
३२) पापलेट - http://www.maayboli.com/node/26562
33) कालेटं - http://www.maayboli.com/node/26762
३४) टोळ - http://www.maayboli.com/node/29033
३५) सुरमई - http://www.maayboli.com/node/29247
३६) घोये - http://www.maayboli.com/node/30559
३७) घोळ - http://www.maayboli.com/node/31057
३८) भाकस - http://www.maayboli.com/node/31547
३९) इंग्लिश मासे - http://www.maayboli.com/node/31741
४०) कान्टा - http://www.maayboli.com/node/39244
४१) पिळसा - http://www.maayboli.com/node/40182
४२) ढोमा - http://www.maayboli.com/node/41698
४३) खेंगट - http://www.maayboli.com/node/43809
४४) हेकरू - http://www.maayboli.com/node/43900
४५) खवली - http://www.maayboli.com/node/45612
४६) नारबा - http://www.maayboli.com/node/46074
४७) राणी मासे - http://www.maayboli.com/node/48437
४८) घोलू - http://www.maayboli.com/node/49147
४९) चोर बोंबिल/सोयरे बोंबिल - http://www.maayboli.com/node/53700
५०) शेवंड http://www.maayboli.com/node/53940

सुके मासे :

(फोटो सकट रेसिपीज)
१) सुकी करंदी/सुकट - http://www.maayboli.com/node/39289

सुकट मेथी घालून - http://www.maayboli.com/node/9332
बोंबिल बटाटा कालवण - http://www.maayboli.com/node/8910
बोंबिल बटाटा सुके - http://www.maayboli.com/node/8909
जवळा वांग - http://www.maayboli.com/node/8617
कुरकुरीत बोंबिल - http://www.maayboli.com/node/8119
सागरी सुका मेवा http://www.maayboli.com/node/52789

चिकन/मटण
१) तंदुर चिकन - http://www.maayboli.com/node/22424
२) पोपटी - http://www.maayboli.com/node/21397
३) पारंपारीक चिकन्/मटण रस्सा - http://www.maayboli.com/node/18422
४) ग्रिन चिकन - http://www.maayboli.com/node/18406
५) पाया सुप - http://www.maayboli.com/node/44407

अंडी
१) अंडा मसाला - http://www.maayboli.com/node/18273
२) अंडी पालक - http://www.maayboli.com/node/48744

माशांचे इतर प्रकार.
भरले खेकडे http://www.maayboli.com/node/47358

मांसाहारी स्टार्टर्स १) माखलीच्या रिंग्ज http://www.maayboli.com/node/46763

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू सोल्लीडच गं.. पण मला नुसते पंखा व्हायचे नाहीय.. खाय्चेय पण. पुढच्या महिन्यात २५ पासुन दर रविवार तुझ्या घरी Happy

साधना बर्‍याच रविवारी मी नसते. काही ना काही कार्यक्रम असतातच. वाशीत पण बरेचदा येते. मग तुझ्याकडेच येईन. इतरवेळी तु माझ्याकडे ये.

कॉलेज हॉस्टेलवर असताना एक डिश होती.. ऑम्लेट पोहे... आम्लेट तयार होत आले की त्यात कांदापोहे (आधी तयार असलेले) टाकायचे .. पोह्यामध्ये ऑम्लेटचे तुकडे चांगले लागतात.. Happy अंडे सोडुन दुसरे कुठले सामिष अन्न आवडत नाही.

योगेश तु खातोस मासे ?
पंत. वर्षा फॅनची हवा जरा जोरात येउद्या. म्हणजे रेसिपी टाका.
साधना डन.
मोहनप्यारे पहिलांदाच ऐकली ही डिश.

गरमागरम वाफाळणार्‍या भातावर अंडे फोडून टाकावे, अटोमॅटीक हाफ-फ्राय राईस मिळतो. हाच प्रकार नूडल्स वापरुन करायचा प्रयत्न मात्र फसला कारण नूडल्स लवकर गार झाले.
बाकी पोपटीची अजून वाट पहात आहे!!!

वर्षा लवकर टाक.
नुतन धन्स.
आगाउ आम्ही पण हा प्रकार करतो. तव्यावर तेलात थोडा मसाला टाकायचा, अंडे, मिठ टाकुन परतवायचे आणि त्यावर भात टाकुन तो परतवायचा. चायनिजला लाजवेल असा प्रकार तयार होतो.

योगेश तु खातोस मासे ?>>>>>जागू, मी फक्त पापलेट आणि मांदेली (तेही फ्राय) खातो. त्यातल्या त्यात तळलेली कुरकुरीत मांदेली खुपच आवडीची Proud

मी मोठा पंखा, Happy आम्हाला आठ्वड्यात कमीत कमी तीन वेळा मासे लागतात...
आत्ताच गरमागरम तळलेला हलवा खाउन हा बाफ वाचतोय...
ही घ्या तुम्हाला सर्वांना P1010023.jpgतळलेली सुरमई....

आज आमच्या घरात केलेल्य चिंबोर्‍या...

शिजवल्यावर ...

ही अर्धा किलो वजनाची माकली.. ऑक्टोपस शिजण्याच्या प्रतीक्षेत. Happy

Octopus khaataat?????

baajaaraat miLato????

ऑक्टोपस खातात म्हणजे काय??? अगदी चवीने खातात. आणि अर्थातच बाजारात.. इव्हन म्हणजे रिलायन्स फ्रेशच्या फिश शॉपी मधेही मिळतात. Happy

जागुतै तु काय एकत नाय... शेवटी तुझ्या मना सारखं केलंच तु..आता इथे रोज हजेरी लावावी लागेल..!
असल्या तोंडाने

3D%20Smiles%20(46).gif

काय बोलता ऑक्टोपस खातात ???

खतरनाक ....
.
.
आताच बेयर ग्रील ने ऑक्टोपस खाल्ला ....कच्चा ....मॅन वर्सेस वाईल्ड मधे Proud

असो ...एकदा ट्राय करायलाच पाहीजे ....जागु ...मी कुठली रेसीपी टाकणार ??? घरच्या कुणी माझे नाव ह्या फॅनक्लबात पाहीले तर मलाच टाकुन देतील ते Proud

Pages